Thursday, December 19, 2024

मार्गशीर्षातल्या महालक्ष्मी व्रताचे गुरुवार म्हणजे निव्वळ 'थोतांड'.

*मार्गशीर्षातल्या महालक्ष्मी व्रताचे गुरुवार म्हणजे निव्वळ 'थोतांड'. (^m^) (^j^) (मनोगते)*

मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारपासून पद्मपुराणाच्या संदर्भानुसार महालक्ष्मीचं व्रत मार्गशीर्षात दर गुरुवारी केल जातं. परंतु या व्रताचा पद्मपुराणात कुठेही उल्लेख आढळुन येत नाही. हे व्रत भरपूर धनाची ग्वाही देतं. शिवाय त्याला फारसा खर्चही नाही. वर ते पंधरा मिनिटात आटोपतं आणि वर्षातून फक्त चार किंवा पाच वेळेसच करावं लागतं. गाजराची पुंगी, वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली अस या व्रताच आहे. हे व्रत केलं आणि पैसे मिळाले तर उत्तमच. नाही मिळाले तरी ठिकाय. असा विचार करून हे व्रत घरोघरी पोहोचलं असावं. शिवाय याची नायिका राणी सूरतचंद्रिका गेल्या जन्मात नवऱ्याचा मार वगैरे खाणारी आहे. त्यामुळे तिच्याविषयी माहेरच्या साडीतल्या अलका कुबलला किंवा आजच्या सास बहू सिरियलमधल्या सोशिक सुनांना मिळते तशी एक सहानुभूतीही आहे. हातपाय न हलवता केवळ नारळ पुजून पैसा अडका मिळण्याची काडीचीही शक्यता नसल्याने हे व्रत फोलफटासारखं कचराकुंडीत टाकून द्यायच्याच लायकीच आहे.

महत्त्वाचं म्हणजे हे व्रत काही जुनंपुराणं बिल्कूल नाही. याची पहिली आवृत्ती 1973 सालची आहे. भट मंडळी या लहानशा पुस्तिकेला पोथी म्हणतात. या चोथा झालेल्या पोथीचा लेखक मिलिंदमाधव केळकर नावाचा ब्राह्मण आहे. तो स्वतःच असं म्हणतो की हा ‘ग्रंथ’ ‘शके १८९४’ला लिहून पूर्ण झाला. शके वगैरे म्हटल्यावर आपल्याला हे जुनं वाटतं. पण शके १८९४ म्हणजे 1962 सालं. भारत चीन युद्ध झालं आणि शम्मी कपूरच्या जंगली सिनेमातलं याहू गाणं गाजत होते ते हे साल. आता या कालपरवाच्या चोथा झालेल्या पोथीची जे कुणी प्राचीन धार्मिक ग्रंथ म्हणून पुजा घालत असतील त्यांनी यातून काय तो यथायोग्य बोध घ्यावा. केवळ पुस्तकांची तुफान विक्री होऊन त्यातुन बक्कळ पैसा मिळावा निव्वळ याच हेतूने केळकर नावाच्या ब्राह्मण प्रकाशकाने हे व्रत पुस्तक रुपाने आपल्या माथी मारले आहे. पुस्तकातल्या पूजाविधीत ही पोथी सात जणांना दान देण्याचा उल्लेख आहे. काही प्रकाशकांनी तर या वाक्याखाली रेषा मारूनही ही पोथी सात जणांना दान देण्याचा उल्लेख ठसवण्याचाही प्रयत्न केलेला आहे. शिवाय शक्य झाल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा द्यायलाही हे व्रत सांगते. पुस्तकाच्या विक्रीतुन भट-ब्राह्मणांची चंगळ करणारे हे व्रत म्हणजे निव्वळ थोतांड आणि थोतांडच आहे. किंबहुना आजवर ज्यांना आपण थोतांड म्हणतो, अशांनाही दर्जेदार म्हणावं इतकं ते बकवास आहे.

जर कुणाला व्रत करायची इतकीच जर हौस असेल तर त्यांनी ते दरवर्षी जानेवारी महीन्यात घालावं आणि त्या व्रतामध्ये अनाथ, गोर-गरीब आणि गरजु मुला-मुलींना यथाशक्ती शाळेची पुस्तक, गणवेश अथवा अन्नदान करावे. कारण जानेवारी महीन्यात ३ तारखेला ज्ञानगंगा "सावित्रीबाई फुले" यांची जयंती असते.

1 comment:

zareahnadel said...

828casino in Florida: 10 different casinos for sale
A relative newcomer, Caesars Palace Casino was 대전광역 출장마사지 the first Atlantic City casino to officially 영천 출장안마 reopen its doors. The opening 사천 출장마사지 was Jan 11, 2022 — 하남 출장마사지 Jan 13, 2022Barstool Sportsbook 사천 출장안마 & Casino