Thursday, December 19, 2024

तेहतीस कोटी देव, प्रकार नव्हेत.

कोटी शब्दाचा हा नवीन अर्थ सांगणाऱ्या एका उर्मट पोस्टला मी पुढीलप्रमाणे उत्तर दिले होते ते माहितीसाठी इथे देत आहे. – उत्तम जोगदंड

प्रश्न : तेहतीस कोटी देव कोणते ?
या प्रश्नावर उत्तर देतांना पोस्ट-कर्त्याने ‘कोटी’ शब्दाचा अर्थ ‘करोड’ असा न घेता ‘प्रकार’ असा घेतला आहे. त्या नुसार तेहतीस ‘प्रकार’ ची नावे दिली आहेत. तसेच कोटीचा अर्थ करोड असा लावणार्‍या आपल्याच हिंदू बांधवांना ‘हिंदू धर्माला बदनाम करणारे महामूर्ख महाभाग’ असे संबोधले आहे.
जर पोस्ट कर्त्यांचे म्हणणे खरे मानले तर काही प्रश्न पडतात:  
1. कोटीचा अर्थ प्रकार व 33 प्रकारचे देव, हा शोध कुठे आणि कसा लागला? 
2. कोणत्या ईश्वराने हे 33 प्रकार (प्रत्येक प्रकाराचे कार्य कोणते?) निर्माण केले, त्याचा उल्लेख कोणत्या ग्रंथात आहे?
3. त्यांना प्राप्त झालेले हे एवढे अगाध ज्ञान गेली हजारों वर्षे कुठे होते? 
4. या आधीचे समस्त हिंदू पूर्वज कोटीचा अर्थ करोड असाच लावत होते. ते सुद्धा ‘महामूर्ख महाभाग’ होते काय? आणि महामूर्ख असावेतच, कारण पोस्ट-लेखकाने हा नवीन शोध लावून ते सिद्ध केले आहेच. 

खरे तर, तेहतीस कोटी देवांची नावे विचारल्यावर ती सांगता येत नव्हती म्हणून हा मारून मुटकून लावलेला शोध दिसतो आहे. आणि शिरजोरी म्हणजे कोटीचा अर्थ करोड असा घेणार्‍यांना महामूर्ख संबोधण्याचा माज हे लेखक दाखवतात.  परंतु पुढील वेबसाइटवर कोटीचा अर्थ प्रकार नसून करोडच आहे असे सनातन धर्माचा व ग्रंथांचा आधार घेऊन ठासून सांगीतले आहे. या लिंक वरील मजकूर कृपया वाचवा:   
http://hindi.webdunia.com/sanatan-dharma-article/hindu-goddess-and-god-33-million-or-kind-116111000018_1.html 
आता मूळ पोस्ट लेखकाने व त्याचा प्रचार करणार्‍यांनी  आपली भूमिका स्पष्ट करावी व कोण मूर्ख आहे ते पण वाचन, चिंतन, मनन करून व मुळाशी जाऊन समजून घ्यावे .

No comments: