एकांत आणि एकटेपणा –जेट जगदीश (^j^)
एकांतात माणूस स्वतःशी संवाद करत असतो; तर एकटेपणा माणसाला खायला उठत असतो.
एकांतात माणूस ध्यानमग्न होऊ शकतो; तर एकटेपणात माणसाचे ध्यान अस्थिर होते.
एकांतात माणूस स्वतःला प्रामाणिकपणे जोखतो; तर एकटेपणात मात्र स्वतःला जोखण्याची प्रक्रिया खंडित होते.
एकांतात माणूस आत्मपरीक्षण करून स्वतःतील दोष नाहीसे करण्याचा प्रयत्न करतो; तर एकटेपणात मात्र माणसाला आपण दोषी नाहीच असे वाटत असते म्हणून तो जगाला दोषी धरत असतो.
थोडक्यात...
एकांतात माणूस आनंदात राहू शकतो; पण एकटेपणा माणसाला नैराश्याकडे (डिप्रेशनमध्ये) नेऊ शकतो.
म्हणून माणसाने एकांतप्रिय असावे; पण एकटेपणाच्या धोकादायक ग्लानीत जाऊ नये.
No comments:
Post a Comment