गणपती विसर्जनाचे थोतांड -जेट जगदीश.
आस्तिक लोक आपल्याच देवाची जेवढी विटंबना करत असतात तेवढी नास्तिकांनीही कधी केलेली नसते. ज्या देवाला अंधभक्त आस्तिक दहा दिवस मनोभावे पूजतात त्याच देवाला अकराव्या दिवशी गटारात बुडवून दूषित पाण्यात वस्ती करायला भाग पाडतात. अशा वेळेस त्यांच्या भावना दुखावत नाहीत. पण कोणी नास्तिकाने चिकित्सक टीका केली तर मात्र त्यांच्या भावना हूळहूळायला लागतात आणि 'आमच्या भावना दुखावल्या' म्हणून ते कोल्हेकुई करू लागतात. ही आहे यांची उच्च संस्कृतिक भक्ती!👎
गटारातील दूषित पाण्यात विसर्जित केलेल्या गणपतीचे फोटो पाहील्यानंतर काही भक्तगण मला शहाणपणा शिकवायला लागले की, "अहो नास्तिक, तुम्हाला धर्मातले काही कळते काय? जेव्हा मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा तिच्यात चैतन्य निर्माण होते आणि जेव्हा उत्तरपूजा केली जाते तेव्हा तिच्यातील चैतन्य नाहीसे होते. मग त्या गटारातील मूर्त्यांमध्ये चैतन्य नसल्यामुळे आमच्या भावना दुखावण्याचा प्रश्न येतच नाही."
त्यावर मी म्हटले, "एकतर प्राणप्रतिष्ठा केल्यावर चैतन्य येते आणि उत्तरपूजा केल्यावर चैतन्य जाते असे कोठेही सिद्ध झालेले नाही. कारण मुळात चैतन्य येणे आणि जाणे हा मनाचा खेळ आहे. भट ब्राह्मणाने दक्षिणेच्या रूपाने स्वतःच्या पोटाची खळगी भरावी म्हणून निर्माण केलेले कर्मकांड आहे."
"बरे, एक वेळ गृहीत धरून चालू की उत्तरपूजा केल्यावर गणपतीच्या मूर्तीतील चैतन्य जाते. त्यामुळे भक्तांच्या भावना दुखावण्याचा प्रश्नच नाही. मग माझे भक्तगणांना असे आव्हान आहे की, जसे पंढरपूरच्या भटाने तीर्थकुंडात लघुशंका करून लोकांना तीर्थ पाजले तसेच तुम्ही या चैतन्य गेलेल्या गटारातील मूर्तीवर लघुशंका करावी आणि ते तीर्थ म्हणून प्राशन करावे. आहे हिम्मत?"🤔
गणपतीची उत्तरपूजा केल्यानंतर त्यातील चैतन्य नाहीसे होते म्हणून ते गटारात असले तरी भक्तांच्या भावना दुखावत नाहीत असे त्यांचे तत्वज्ञान असते. याच न्यायाने मग त्यांचे आप्तस्वकीय जर मृत्यूमुखी पडले तर त्यांच्यात चैतन्य नसल्यामुळे ते प्रेताला असेच गटारात फेकून देतील काय?🤔
यावरून देव मानणे किंवा न मानणे हा आस्तिकांचा सोयीचा मामला असतो, हेच सिद्ध होत नाही काय?
तसेच गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून त्यात प्राण फुंकून चैतन्य निर्माण करणारे आणि उत्तरपूजा करून प्राणहरण करत गणपतीतील चैतन्य नष्ट करणारे ब्राह्मण हे देवाचे बापच झाले म्हणायचे!👎
म्हणून लक्षात घ्या की, मूर्तीपूजेचे कर्मकांड सब झूठ है। भटूरड्या ब्राह्मणांनी आपल्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी निर्माण केलेली सोय आहे.
म्हणून संवेदनशील माणसांना गणपतीच्या विसर्जनानंतर सुबक सुंदर मूर्तींच्या तोडक्या-मोडक्या मुर्त्या झालेल्या पाहून मूर्तीच्या विटंबनेने त्यांचे मन विदीर्ण होते. इतर कुठल्याही धर्मातील मूर्त्यांची अशाप्रकारे विटंबना झालेली कोणाला दिसले आहे काय? तरी ते धर्म कनिष्ठ आणि हिंदू धर्म श्रेष्ठ! असे समजणे म्हणजे आत्मवंचनाच होय. मुर्त्यांची विटंबना होऊ नये म्हणून अंनिस गेली कित्येक वर्षे प्रचार करत धर्म सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी...
१) शाडूच्या मातीच्या मूर्ती बनवा.
२)पीओपीच्या मूर्ती बनवू नका.
३) हिंदू धर्मात गाईला मातेचा दर्जा दिलेला आहे. तेव्हा गोमयाने(शेणाने) गणपतीची मूर्ती बनवून त्याच मूर्तीचे विसर्जनानंतर खत म्हणून झाडांना देणे योग्य राहील.
४) मूर्ती लहान बनवा. म्हणजे घरातल्या बादलीत लहान मूर्तीचे विसर्जन केल्यावर ते पाणी तुम्ही झाडांना घातले तर जास्त चांगले राहील.
५) निर्माल्य कलशातच निर्माल्य टाका.
६) नैसर्गिक रंग वापरा. कारण रासायनिक रंगामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊन शेवटी त्याचा त्रास माणसालाच भोगायला लागतो.
७) मूर्ती दान करा.
८) नद्यातील वाहत्या पाण्यात विसर्जनाचा हट्ट सोडून मुर्त्यांचे कृत्रिम तलावात विसर्जन करा.
९) मूर्तीचे विसर्जन न करता पुढच्या वर्षी तीच मूर्ती पुन्हा वापरा.
१०) मूर्ती विसर्जनाचा परिसर स्वच्छ ठेवा. कारण तो जर निसरडा असेल तर अपघात घडू शकतात.
११) धातूची मूर्ती गणपती उत्सवात वापरा. म्हणजे पाण्यात विसर्जन करून तीच मूर्ती पुन्हा वापरता येईल.
असे अनेक उपाय गेली कित्येक वर्षे अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुचवत आलेली आहे. त्याला काही प्रमाणात आता चांगला प्रतिसाद मिळू लागलेला आहे. तरीही धर्मांधतेचे राजकारण करणारे हिंदुत्ववादी आणि डोकं गहाण ठेवलेले अंधभक्तच विरोध करत असतात. आजही सनातन संस्था म्हणते की, वाहत्या पाण्यातच मूर्तीचे विसर्जन करणे हे शास्त्र संमत आहे. मग पाण्याचे किती का प्रदूषण होईना; त्याचे त्यांना सोयरसुतक नसते. प्रदूषित पाणी पिऊन माणसे मेली तरी त्यांना चालते.
वरील सुचवलेले उपाय अंधभक्तांना करायचे नसतात. त्यांना विरोध करायचा आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती हिंदुद्वेषी म्हणून बोंबा मारायच्या, एवढेच त्यांचे काम असते. म्हणून आमच्या धर्मात ढवळाढवळ करायचा तुम्हाला अधिकार कोणी दिला असे म्हणत आमच्या भावना दुखावल्या म्हणून भटाळलेले उफराट्या काळजाचे अंधभक्त शहाजोगपणे कोल्हेकुई करत असतात. पण गटारातील दूषित पाण्यात बुडवलेल्या मोडक्या-तोडक्या गणपतीच्या मुर्त्या पाहून त्यांच्या भावना दुखावत नाहीत. यावरून त्यांचा मेंदू किती बधिर झालेला आहे हे स्पष्ट होते.🤦
बहुजनांनो आता तरी जागे व्हा आणि ब्राह्मणीकावा ओळखून देवाधर्माच्या नावाखाली निर्मिलेल्या अंधश्रद्धेच्या जोखडातून बाहेर पडा.🙄
No comments:
Post a Comment