Thursday, December 19, 2024
वैज्ञानिक दृष्टिकोन हाच जगण्याचा पाया असायला हवा.
ज्योतिष : शास्त्र की अंधश्रद्धा?
माऊलींच्या संजीवन समाधीचे रहस्य
महिलांनी कुंकू का लावावे? अर्थात कुंकवाची उठाठेव...
आयुर्वेदात विज्ञान किती आणि धार्मिक अस्मिता किती?
गणपती विसर्जनाचे थोतांड
मार्गशीर्षातल्या महालक्ष्मी व्रताचे गुरुवार म्हणजे निव्वळ 'थोतांड'.
ख्रिसमस ट्री आणि सांताक्लॉज
भावना दुखावण्याचा रोग
बाणस्तंभाबाबतची वस्तुस्थिती
*बाणस्तंभाबाबतची वस्तुस्थिती*
आजही ज्याची तपासणी करता येईल असा खालील मुद्दा निवडून त्यासंबंधी शोध घेतला असता मूळ माहितीत अथवा दाव्यात तफावत, विसंगती, असत्य आणि विपर्यास आढळून आला.
xxxxxxxxxxxxxxxxxxxx
*१०*🌹 . गुजरातेत असलेल्या सोमनाथ मंदिराजवळ एक स्तूप आहे जो ३००० वर्ष जुना आहे (कार्बन डेटिंग पद्धतीनुसार) आणि त्यावर एक संस्कृत श्लोक आहे. त्याचा अर्थ आहे 'इथून पुढे दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणताही मोठा भूखंड येत नाही'. ह्याचाच अर्थ आपले लोक जगभर फिरत होते. 'वास्को द गामा' हा त्याच्या जहाजापेक्षा पाच पट मोठ्या भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. मात्र भारताचा शोध त्यानं लावला असं आपला इतिहास आपल्याला शिकवतो ! १८०० सालच्या सुमारास ब्रिटिशांनी आपल्या जहाज बांधणी कारखान्यांना बंदी घातली आणि आपले जहाज बांधणी शास्त्राचे सर्व ज्ञान लयाला गेले.
xxxxxxxxxxxxxxxxxxxx
सोमनाथ मंदिराजवळ कोणताही स्तूप नाहीये. परंतु वरील मुद्द्यात दिलेले वर्णन हे तिथल्या एका गोष्टीला लागू पडते जी *बाणस्तंभ* (Arrow Pillar) नावाने ओळखली जाते.
हा एक चौकोनी दगडी खांब असून त्याच्या चारही बाजूंवर निरनिराळ्या मुर्त्या दाखवल्या असून त्यावर काही कोरीव काम केलेले दिसते. त्या खांबावर एक पृथ्वीचा गोल दाखवला असून त्या पृथ्वीच्या गोलातून आरपार गेलेला दक्षिण दिशा दाखवणारा बाण दिसतो. त्या खांबाच्या तळाकडे खालील मजकूर कोरलेला आहे.
"आसमुद्रान्त दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग"
ह्याचा अर्थ इथपासून ते थेट दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषा काढली असता मध्ये कोणतीही जमिन येत नाही असा सांगितला जातो.
हा स्तंभ कोणी, नेमका कधी बांधला याची खात्रीलायक माहिती उपलब्ध नाही. कार्बन डेटिंग पद्धतीने केवळ जैविक (organic) वस्तुंच्या काळाचे अनुमान काढता येते परंतु हा स्तंभ दगडी असल्यामुळे ह्या पध्दतीने त्याचा काळ, आयुष्य ठरवता येणार नाही.
Wikimapia नुसार त्या बाणस्तंभाचे अक्षांश-रेखांश 20°53'15"N 70°24'3"E आहेत [1]. बाणस्तंभावरील मजकूरानुसार त्या स्तंभापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत 70°24'3"E ह्या रेखांशावर कोठेही जमिन नाही. फार zoom न करता जर Google Maps, Wikimapia अथवा Google Earth मधे बघितले तर ते खरेही वाटते. तशा काही images internet वरच्या काही संकेतस्थळांवर दाखवलेल्यादेखील आहेत.
परंतु *बरेच zoom in करून Google Maps मध्ये 70°24'3"E रेखांशाची रेषा पकडून दक्षिण ध्रुवाकडे खालच्या दिशेने निघालो तर 49° अक्षांशाच्या आसपास फ्रान्सच्या अधिपत्याखालील Kerguelen Islands हे बेट लागतं. ह्याचे दुसरे नाव Desolation Islands आहे [2]. 70°24'3"E रेखांशाची रेषा ही ह्या बेटाच्या Courbet Peninsula ह्या प्रदेशातून जाते. आणि बेटाला केवळ किंचित स्पर्श करून गेली आहे वगैरे असे काही नाही तर ती चक्क, धडधडीत समुद्रापासून कित्येक किलोमीटर लांबून, आतून जमिनीवरून जाते.*
*त्यामुळे बाणस्तंभावर लिहिलेल्या मजकुरातील दावा चूक आहे.*
कॉंस्टंटिनोपलच्या, म्हणजे आत्ताच्या इस्तंबूलच्या, पाडावा नंतर रेशीम मार्ग हा युरोप आणि चीन यांना जोडणारा खुष्कीचा रस्ता बंद पडला. त्यामुळे युरोपातील देशांना पौर्वात्य देशांशी व्यापार करण्यासाठी दुसर्या मार्गाची निकड भासू लागली. त्यात आफ्रिका खंडाला वळसा घालून युरोपातून भारतापर्यंत पोचणारा पहिला युरोपियन म्हणजे वास्को द गामा. म्हणून *वास्को द गामाने भारताचा नव्हे तर युरोप पासून भारतापर्यंत पोचायचा सागरी मार्ग शोधून काढला* असे म्हंटले जाते.
संदर्भ:
1. http://wikimapia.org/4265523/Baan-stambh-Arrow-Pillar
2. https://en.m.wikipedia.org/wiki/Kerguelen_Islands
© कौस्तुभ शेज्वलकर
02jul2019
तेहतीस कोटी देव, प्रकार नव्हेत.
समजून घ्यायचे असेल तर...
एकांत आणि एकटेपणा
ईदच्या दिवशी काय घडले? तुकोबांचे मशिदीत कीर्तन झाले.
सामाजिक काम करणाऱ्या बुवाबाबांना विरोध का?
सुजाण पालकत्व म्हणजे काय?
संघ स्वयंसेवक घडण्याची प्रक्रिया
भारतीय दर्शने
चार्वाक तत्त्वज्ञान हे सर्वनिर्मूलवादी, पण जीवनातील प्रत्यक्ष अनुभवाशी नाते सांगणारे आहे. चार्वाक ही एक ‘चार्वाक दर्शन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नास्तिक मताची प्रवर्तक असलेली, कोणी चार्वाक नावाची व्यक्ती असावी, असा एक समज आहे. ही विचारपरंपरा वेदांइतकीच प्राचीन आहे. तिचे खरे नाव लोकायतिक/ ‘लोकायत’ किंवा ‘बार्हस्पत्य मत’ (बृहस्पतिप्रणीत विचार) असे आहे. परंपरा शंकर... पुरंदर... बृहस्पती... अशी धरली जाते.
ह्या दर्शनात "प्रत्यक्ष" हेच प्रमाण आहे. या शब्दात, प्रति आणि अक्ष अशी दोन पदे आहेत. अक्ष म्हणजे इन्द्रिय; त्यामुळे प्रत्यक्ष म्हणजे जे इंद्रियांना अनुभवता येते ते. "शब्द" आणि "अनुमान" याला मर्यादा आहेत. यामुळे आत्मा, ईश्वर आणि स्वर्ग
चार्वाक तत्त्वज्ञान जडवादी असल्याने ही दृश्य सृष्टी केवळ जड द्रव्यांची परिणती आहे असे ठाम मत या दर्शनाने मांडले. ‘भूतेभ्यः चैतन्यम्!‘ हा त्याचा मुख्य सिद्धान्त आहे. हे जड पदार्थ परस्परांच्या संपर्कात येतात आणि आकार धारण करतात आणि हे विश्व साकारते. ते घटक विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात आणि निरनिराळे देह उत्पन्न होतात व त्यात चैतन्य स्वयं उत्पन्न होते. अंतर्भूत घटकांचे प्रमाण बिघडले की, देह किंवा आकार नष्ट होतात, चैतन्यही नाश पावते. हाच मृत्यू. चैतन्य किंवा आत्मा जडाहून वेगळा नाही. तो देहात येतो, देहातून जातो, ही कल्पना वेडगळपणाची आहे, असे स्पष्ट मत या दर्शनात आढळते. या दर्शनात अर्थ आणि काम हेच पुरु
पंचज्ञानेंद्रियांनी ज्याचा अनुभव घेता येतो तेवढेच खरे. म्हणून आकाश हे महाभूत ते मानत नाहीत. लोकायत तत्त्वज्ञानानुसार महाभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज,वायू ही चार तत्त्वे; यांच्या संयोगांस शरीर, इंद्रिय अशा संज्ञा आहेत, त्यातून चैतन्याची निर्मिती होते. चेतनायुक्त शरीर म्हणजेच पुरुष. प्रत्यक्ष हेच प्रमाण आहे. अनुमान प्रमाण नाही. त्यामुळे परलोक अस्तित्त्वात नाही.
आत्मा नाही, त्यामुळे अर्थात पुनर्जन्म नाही. श्राद्ध, पक्ष इत्यादी पितरांसाठी करावयाचे विधी त्यांना पटत नाहीत. आत्मा मानणे म्हणजे जे दिसते (शरीर) ते नाही(विनाशी मानणे) आणि जे दिसत नाही(आत्मा) तो आहे(अविनाशी मानणे) असे म्हणणे. परलोक मानत नसल्याने, कर्मविपाकसिद्धांतावरही विश्वास नाही. तरी ह्या जन्मी जे करायचे ते करून घ्यावे, पुढचा जन्म वगैरे नसतो, हे त्यांचे मत आहे. असे हे लोकायतिक म्हणजेच ईहवादी तत्त्वज्ञान आहे.