अनुसूचित 12 कलमांतील वर्णन केलेल्या कृती करणं हाच गुन्हा. त्यासाठी कठोर शिक्षा कमीत कमी 6 महिने कारावास आणि पाच हजार रुपये दंड. 7 वर्षं कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड अशी कमाल शिक्षा ठरवली आहे. हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल. याबरोबरच अशी कृतीचा प्रचार- प्रसार करणंही तेवढ्याच कठोर शिक्षेस पात्र ठरवलं आहे. त्यामुळे हा होऊ घातलेला कायदा कडक आहे, कठोर आहे.
अनुसूचित वर्णन केलेल्या 12 कृती म्हणजेच शिक्षापात्र गोष्टी आहेत. त्या काय आहेत ते आपण समजून घेऊ.

अनुसूची
1. भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवून मारहाण करणे, त्याचा विविध प्रकारे छळ करणे, चटके देणे, मूत्र-विष्ठा खायला लावणे आदी कृत्ये करणे. जर भूत उतरवण्यासाठी प्रार्थना, मंत्र म्हटले, पूजा केली तर गुन्हा नाही.
2. तथाकथित चमत्काराचा प्रयोग करून फसवणे, ठकवणे, आर्थिक प्राप्ती करणे.
3. जिवाला धोका निर्माण होतो अथवा शरीराला जीवघेण्या जखमा होतील अशा अमानुष, अघोरी प्रथांचा अवलंब करणे
4. गुप्तधन, जारणमारण, करणी, भानामती या नावाने अमानुष, अनिष्ट व अघोरी कृत्ये करणे, नरबळी देणे.
5. अतींद्रिय शक्ती असल्याचे भासवून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे, न ऐकल्यास वाईट परिणामांची धमकी देणे.
6. एखादी व्यक्ती करणी करते, जादूटोणा करते, भूत लावते, अपशकुनी आहे, सैतान आहे, असे जाहीर करणे.
7. जारणमारण, चेटूक केल्याच्या नावाखाली मारहाण करणे, नग्नावस्थेत धिंड काढणे, रोजच्या व्यवहारांवर बंदी घालणे.
8. भूत-पिशाच्चांना आवाहन करून घबराट निर्माण करणे, मृत्यूची भीती घालणे, भुताच्या कोपामुळं शारीरिक इजा झाली असे सांगणे.
9. कुत्रा, साप, विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा यासारखे उपचार करणे.
याचा अर्थ वैद्यकीय उपचार घेताना मंत्रतंत्र उपचार केले तर गुन्हा नाही. विषारी साप चावला तर अँटीव्हेनम इंजेक्शन, रेबीज निर्माण करू शकणारा कुत्रा चावला तर अँटीरेबीज इंजेक्शन व कोकणातील मोठा विंचू चावला तर वैद्यकीय उपचार माणसांचे प्राण वाचवू शकतात. ते प्राण वाचावेत, अंधश्रद्घांपायी माणसं मरू नयेत म्हणून हे कलम
10. बोटाने शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणे. गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणे.
11. स्वत:त विशेष शक्ती असल्याचे सांगून अलौकिक शक्तीद्वारा मूल होण्याचे एखाद्या स्त्रीला आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणे.
12. एखाद्या मतिमंद व्यक्तीमध्ये अलौकिक शक्ती असल्याचे भासवून त्या व्यक्तीचा धंदा व व्यवसायासाठी वापर करणे.
आता अनुसूचीतील या 12 गोष्टींविषयी कृती करणे गुन्हा ठरणार आहे. याबाहेरील एकाही गोष्टीचा, रूढी, परंपरेचा यामध्ये अंतर्भाव असणार नाही. ज्या गोष्टीमुळे सर्वसामान्य माणसांचा जीव जाऊ शकतो, जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, लुबाडणूक, फसवणूक होऊ शकते अशाच ठिकाणी हा कायदा हस्तक्षेप करणार आहे. अशा कायद्याला कोणता तरी सुबुद्घ माणूस विरोध करील काय? माणसांना फसू दे, मरू दे म्हणेल काय?

पोलिस दक्षता अधिकारी
या विधेयकाच्या 6 व्या कलमानुसार पोलिस निरीक्षक गट "ब', या दर्जाच्या अधिकाऱ्यांची "दक्षता अधिकारी' म्हणून नियुक्ती केली जाईल. कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये या अधिनियमातील कलमांनुसार गुन्हा दाखल झाला तरी तो दाखल करणे, तपास करणे, कोर्टात सादर करणे इ. कामे सामान्य पोलिस न करता हा दक्षता अधिकारी करेल. या विशेष तरतुदीमुळे प्रभावीपणे या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकेल.
पोलिसांना यामुळे भ्रष्टाचाराचं नवं कुरण मिळेल, असा आक्षेप काही लोक घेतात. पोलिसांमध्येही चांगली आणि वाईट, दोन्ही
प्रकारची माणसं असतात. शेवटी कायद्यांची राबवणूक पोलिसच करतात. मग ते भ्रष्टाचार करतील या भीतीने सारे कायदेच रद्द करायचे का? आज अस्तित्वात असलेल्या कायद्यांचाही उपयोग भ्रष्टाचारासाठी होऊ शकतो, म्हणून आपण ते रद्द केलेत का? उत्तम "दक्षता अधिकारी' नेमले जातील, ते उत्तम काम करतील हे पाहण्याचं काम आपण सारे जागरूक नागरिक, पत्रकार करू, असं ठरवणं जास्त समाजहिताचं असणार आहे.

हा कायदा देशभर लागू होईल?
महाराष्ट्रात मुंबई आहे. टीव्ही, प्रिंट मीडिया, सगळ्यांनाच मुंबईतून सगळ्यात जास्त मिळकत मिळते. भारतीय भाषेतीलच नव्हे, तर परदेशी भाषेतील टीव्हीसुद्धा मुंबईत प्रसारित होत असतो. अनुसूचित केलेल्या कृत्यांचा प्रचार-प्रसार करणंसुद्घा समान गुन्हा आहे. कमीत कमी शिक्षा सहा महिन्यांची आहे. त्यामुळे महाराष्ट्रात हे विधेयक लागू झाल्यावर देशभरातल्या प्रसिद्घिमाध्यमांना या कायद्याचा अभ्यास करून आपलं प्रसारण मुंबईत करावं लागणार आहे. कळत-नकळत या कायद्याचा प्रभाव देशावर पडणार आहे.

No comments:
Post a Comment