आयुष्यात परीक्षा पहाणारे प्रसंग
पुष्कळवेळा येतात. कधी कधी ते लहान-लहान
लढायांसारखे वाटतात.त्यातून आपली
मानसिकता तयार होत असते. आपण आपल्या सीमा
ठरवतो. स्वतःलाच मर्यादा
घालतो. पण आपल्याला या
मर्यादा कशामुळे आल्या, याचा विचार आपण करत
नाही. आपला प्रयत्न वाया जाऊ
शकतो, त्यात अपयश येऊ शकतं,म्हणून
प्रयत्नच करायचा नाही, हा आपला स्थायीभाव
होतो. प्रयत्नांची भिती
वाटायला लागते. या भावनेमुळे आपण
धैर्य दाखवायलाच घाबरतो.“येत नाही”पेक्षा“करायचं
नाही”ही वृत्ती वागण्यात
बळावते.मग नको असलेली गोष्ट
टाळण्यासाठी सबबी पुढे केल्याजातात.कारण लहानपणापासून
परंपरेच्या आणि रूढींच्या“कंडिशनिंग”मुळे
आपल्यात एक नकारात्मक दृषीकोन तयार झालेला असतो.
हे जर टाळायचं असेल,तर
आपल्या मानसिकतेला अपयशामुळे मर्यादा न घालता प्रयत्नात कुठे कमी पडलो, नेमकी
चूक कुठे झाली हे शोधून पुन्हा नविन जोमाने कामाला भिडलं पाहीजे. जेव्हढा
कठीण प्रश्न तेव्हढीच प्रश्न सोडवण्याची जीद्द वाढली पाहीजे. कठीण
प्रसंग हे आपली कसोटी पहाण्यासाठी आलेले असतात. त्यांना धीटपणे
सामोरे जाणं यातच आपला खरा पुरुषार्थ सामावलेला आहे; हे
निश्चित मनी बाळगावे. स्वक्षमतेवरील
आत्मविश्वास जेवढा वाढेल, तेवढे आपण यशाजवळ
जातो.आपली सद्सदविवेक
बुध्दी वापरून निराशावादी दृष्टीकोन उखडून फेकता येतो. शेवटी
अपना हात जगन्नाथ हेच खरं.
आपली चुक नसतांनही
कधीकधी त्रास भोगायला लागतो.म्हणून निराश व्हायचे
नाही. भोवतालची परीस्थितीच
एव्हढी वाईट आहे की, आज चांगल्या माणसांचा
काटा काढला जातोय.पण धीर सोडून कसं
चालेल? सुंदर मूर्ती
घडवण्यासाठी टाकीचे घाव सोसावेच लागतात.सतत
प्रयत्न करत रहाणे हाच उत्तम पर्याय आहे.
माणूसजन्मघेतोत्यावेळीत्याच्याहाताच्यामुठीबंदअसतात.
परमेश्वरानेएकाहातात'आनंद' आणिएकाहातात'समाधान' कोंबूनपाठवलेलंअसतं.
माणूसमोठाहोऊलागतो. वाढत्यावयाबरोबर'आनंद' आणि'समाधान' कुठेकुठेसांडतजातात.
आता'आनंदी' होण्यासाठी‘कोणावर’तरी, ‘कशावर’ तरीअवलंबूनराहावंलागतं.
कुणाच्यायेण्यावर-कुणाच्याजाण्यावर. कुणाच्याअसण्यावर-कुणाच्यानसण्यावर.
काहीतरीमिळाल्यावर-कोणीतरीगमावल्यावर. कुणाच्याबोलण्यावर- कुणाच्यानबोलण्यावर.
खरंतर, 'आत'’आनंदाचानआटणाराझरावाहतोय. कधीहीत्यातउडीमारावीआिणमस्तडुंबावं.
इतकंअसून...आपणसगळेत्याझर्याच्याकाठावरउभेआहोत- पाण्याच्याटँकरचीवाटबघत!
जोवरहेवाटबघणंआहे.तोवरहीतहानभागणंअशक्य!
इतरांशीतुलनाकरतआणखीपैसे, आणखीकपडे, आणखीमोठंघर, आणखीवरची'पोझिशन', आणखीटक्के.. !
या'आणखी'’च्यामागेधावताधावतात्याआनंदाच्याझर्यापासूनकितीलांबआलोआपण!
जावेदअख्तरसाहेबांनीखूपछानलिहूनठेवलंय–
सबकाख़ुशीसेफासलाएककदमहै
एका गर्भाची डायरी
मी गर्भाशयाला जाऊन चिकटते.
आई माझ्या अस्तित्वाच्या जाणिवेने मोहोरते.
आई बाबांना ही गोड बातमी सांगते.
आज मी अल्ट्रास्कॅन मशिनचा अनुभव घेतला.
त्या मशिनने माझे लिंग ओळखले.
मी आता मुलगी म्हणून जन्माला येणार.
ओह! कुणीतरी मला पुरते खरवडले...
आणि माझे अस्तित्व संपले की!
प्रत्येकाला आई हवीच असते.
...आणि बायकोही.
गर्लफ्रेंडची तर प्रत्येक तरूणाला आसोशी.
मग मुलगीच का नकोशी?
थोडक्यात काय---
गर्भलिंग चाचणी हा जरी गुन्हा असतो,
तरी
प्रत्येकाला वंशाचा दिवा हवा असतो.
ही
मानसिकता आपण केव्हा बदलणार?
माणसाच्या
क्वालिफिकेशन, डिग्री, परीक्षेतील
मार्क, टक्केवारी, ग्रेड
यापेक्षा त्याचा ' Talent ' महत्वाचा! त्याच्या 'पास्ट
पर्फोर्मंस ' ( Past Performance ) पेक्षा तो 'फ्युचर’मध्ये
काय करू शकतो हे महत्वाचे.त्याची traditional पद्धतीपेक्षा
वेगळ्या पद्धतीने विचार करायची कुवत किती हेमहत्वाचे. त्याला किती नवीन कल्पना
सुचू
शकतात
हे महत्वाचे.
विद्या
शिकुन ऐहिक समृध्दी मिळवायची आणि त्याची उतराई पारलौकीक सुख (?) मिळवण्यासाठी
देवळे आणि धार्मिक कर्मकांडासाठी देणग्या देऊन करायची! खरंम्हणजे त्या देणग्या
ज्ञानवृध्दी व शिक्षणाचा प्रसार तळागाळात करण्यासाठीदेणे योग्य व गरजेचे असते.
अथवा तळागाळातील गरीब होतकरू
विद्यार्थ्यांनादत्तक घेऊन, त्याचे पुर्ण शिक्षण
करणे गरजेचे आहे. हे आपल्या सुपीक मेंदूतशिरणे आवश्यक आहे. तेव्हा माझ्या
विद्यार्थ्यानो हे व्रत तुम्ही
अंगिकारालकाय?
एखाद्या व्यक्तिवर केवळ पाढरं किवा काळं लेबल
लावून केलेलं मुल्यमापन हे त्या व्यक्तिवर अन्याय करणारं असतं. पाढर्या व काळ्या
रंगाच्या दरम्यान जशा असंख्य छटा असतात; त्याचप्रमाणे ती व्यक्ति अमुक एक
प्रसांगात कशी वागली, असं प्रसंगानुरूप तिचं मुल्यमापन केल्यास ते अधिक वस्तुनिष्ठ
होऊन, परस्परसंबंध मलूल न होता टवटवीत रहातात.परस्परसंबंध हे एकरेषीय,एकांगी व
एकसाची असल्यास मृतवत बनतात.
पालकत्व
कुठल्याही प्राण्याला भिती वाटली,अस्तित्वाच्या
लढाईची वेळ आली तर तो तीन प्रकारांनी प्रत्युत्तर देतो. प्रतिस्पर्धीबरोबरीचा
किंवा लहान असेल तर ‘आक्रमण’ करतो, शक्तीमान असेल तर ‘पलायन’ करतो;आणि दोन्ही
जमण्यासारखं नसेल तर ‘निपचित’ पडतो. अविश्वास किंवा विरोध झाला की मुलांमधला
‘विचार’ संपतो;आणि ती भावनीक प्रेरणांनी व्यक्त होतात. मुलं एकतर अंगावर
येतात,भांडतात,तिथून निघून जातात किंवा काहीच प्रतिसाद देत नाहीत...दुर्लक्ष
करतात.मुल आपलं ऐकत नाही असं वाटलं की, आपल्या मनातली भिती जागी होते. आपल्याला ती
स्वतःच्या अस्तित्वाची भिती वाटते. अपमान, संताप, दुःख अशा बर्याच छटा तिला
असतात. ‘मुल आपलं ऐकत नाही म्हणजे काय... त्याच्या भल्यासाठी आणि प्रेमापोटीच
आम्ही सांगतोय ना?’ असे आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे;पण आपल्या देहबोलीतून ते
दिसत नाही. आपण आपल्या सामर्थ्याच्या जोरावर बळजबरीने मुलांना वाकवू पहातो. आणि
मुलं मात्र असमर्थ असल्यामुळे त्याच्या पद्धतीनं प्रतिकार करण्याचा केविलवाणा
प्रयत्न करत रहातात.
आपलं मुल अपयशी झालं तर लोक आपल्याला बोल
लावतील...म्हणजेच ‘लोक काय म्हणतील?’ हीच चिंता सर्वात जास्त असते. मुलांच्या
यश-अपयशात आपण आपली तथाकथित प्रतिष्ठा पणाला लावतो. बरे,लोक म्हणजे तरी कोण?...तर
या अवाढव्य जगात आपल्याला ओळखणारी पाचपंचवीस माणसं! त्यासाठी आपण कोण आटापिटा
करतो! आपल्या मुलांना आपल्या सुप्त महत्वाकांक्षेपायी त्यांची कुवत न जोखता किती
दडपण आणतो! इतरांशी तुलना करून आपल्या मुलांना किती घुसमटून टाकतो! याचा आपण पालक
म्हणून कधीतरी विचार करणार आहोत काय? मुलांचं कोवळेपण, मुलांची निरागसता, मुलांची
विचार करण्याचीआणि प्रयोगशील अनुभवातून शिकण्याची पद्धत आपल्या महत्वाकांक्षेमुळे
मुलांना एकांगी व एकसाची काम करायला लावून पुर्णपणे चिरडून टाकतो. जणू काही आपलं
मुल हे आपल्या हातातील एक यांत्रिक खेळणं आहे असं आपलं वागणं असतं. यातूनच आपल्यात
आणि मुलात विसंवाद व्हायला लागतो. मुलं अपल्याला टाळू लागतात.आईवडील आपल्याला
समजून घेत नाहीत असे त्यांना वाटायला लागते.आणि त्यांना समजून घेणारे मित्र जवळचे
वाटतात.ते घराबाहेर जास्तवेळ राहू लागतात.
आपण
मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ग्रस्त असतो,पण जगत मात्र असतो स्वतःच्या
भूतकाळात.मुलं मात्र स्वतःच्या वर्तमानात जगत असतात. एकीकडे ‘आमच्या लहानपणी...’
हे स्वगत आपल्या मनात सतत मोठ्यांदा चालू असतं. तर दुसरीकडे ‘वर्तमानात कसं जगायचं?’
यासाठी व्यक्तिमत्व विकासाचे कोर्सेस आणि पुस्तके वाचणंही चालूच असतं. मनातला
भूतकाळ, कल्पनेतला भविष्यकाळ आणि आजचा दोघांचाही वर्तमानकाळ यात अशी विलक्षण
रस्सीखेच चालू असते.आपण अनुभवलेले तणाव, पैशाची ओढाग्रस्त, नोकरीसाठी केलेली
वणवण,जगतांना झालेली अवहेलना आपल्या मुलांच्या वाट्याला येवू नये म्हणून आपण
मुलांना सुखाच्या कोषात वाढवतो.त्यांनाकाही कमी पडू देत नाही. मुलांना हवं ते हवं
तेव्हा मिळाल्यामुळे आपण त्यांना खरं तर पंगु बनवतो.त्यांना एखादी गोष्ट
मिळवण्यासाठी झगडावं लागतं याचं आकलन होत नाही. मग ती अस्वस्थ होतात,निराश
होतात,आक्रस्ताळेपणा करू लागतात. म्हणून त्यांच्यात लहाणपणापासूनच जबाबदारीची
जाणिव निर्माण करणं महत्वाचं असतं.त्यासाठी आपण मुलांना वेळ दिला पाहीजे.मुलांना
आपल्या घरगुती चर्चांमध्ये सहभागी करून घेतलं पाहीजे. त्यांनाही एक व्यक्ति म्हणून
आदराने वागवलं पाहीजे.त्यांच्या चुका त्यांना सकारात्मक पद्धतीने दाखवून द्यायला
हव्यात. वेगवेगळे पर्याय त्यांच्या समोर ठेवून योग्य तो पर्याय निवडायला वाव दिला
पाहीजे. हे वागणं आपल्या सहनशक्तीची कसोटी पहाणारं जरी असलं तरी आपल्या मुलांमधील
विसंवाद कमी होण्यास मदत करणारं आहे; हे मुलांच्या वर्तणुक बदलातून आपल्याला
नक्कीच जाणवेल.पहा प्रयत्न करून. जीवन हे दुःखाचा डोंगर नसून आनंदाचा सागर आहे; हे
कळेल.
प्रत्येक माणसाच्या आत एक विश्व सामावलेलं असतं. म्हणूनच आपण म्हणतो,
‘पिंडी ते ब्रम्हांडी’. म्हणजे या जगात जर अव्यवस्था, अनाचार, अत्याचार, हिंसा
असेल तर त्याचं कारण आपल्या प्रत्येकाच्या आतच त्याची बीजं आहेत असं नाही कां होत?
अपल्याच अंतरंगाचं दृश्य स्वरूप या जगात आपल्याला बघायला मिळतं.
आपलं मुल जर लहानपणापासून छोट्या पडद्यावर खून
मारामार्या पहातच मोठं होत असेल; आणि युद्धाचे व्हिडीओ गेम्स खेळून वाढत असेल, तर
या गोष्टींविषयी त्याचं मन संवेदनाहीन होतं. त्यामुळेच शाळेतील मुलं पटकन
हमरीतुमरीवर येतात...मारामारी करतात. साध्यासाध्या कारणांवरून एकमेकांचे जीव
घ्यायला मागेपुढे पहात नाहीत.
म्हणूनच आपल्या पालकत्वात जिथे कुठे द्वेष,
अशांतीची बीजं असतीलतर त्यांना शोधून काढून नाहीशी करायला हवीत. मुलांपर्यंत आपण
काय पोहोचवतोय याचा विचार करायला हवा. वंश, वर्ण, देश, धर्म, जात, आर्थिक स्तर,
शिक्षण यात भेदाभेद करून माणसांमधल्या मैत्रीचे पूल तोडून विद्वेशाच्या भिंती तर
बांधत नाही ना? हे बघायला लागेल.जगात असलेल्या वैचारीक कुरूपतेला आपण खतपाणी तर
घालत नाही ना? याचाही विचार करावा लागेल.
भयाचा प्रसंग असो वा आनंदाचा या प्रत्येकवेळी जो
विचाराने वागतो, संयमाने वागतो, कुठलीही गोष्ट उताविळपणे करत नाही, त्याच्यावर
कधीही पश्चातापाची वेळ येत नाही.म्हणूनच आपल्या मुलांमध्ये मानवजातीचा आणि चराचर
सृष्टीचा मैत्रीपूर्ण स्वीकार करण्यासाठी ससद्भावनेची बीजं रुजवावी लागतील.
आर्थिक सत्ता आणि सामाजिक सत्ता यांच्यातील नाते
नोकरशाहीमुळे अधिकच घट्ट होते. नोकरशाही म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेने स्वतःचे
महत्व वाढवण्यासाठी निर्माण केलेले अनावश्यक तसेच गुंतागुंतीच्या नियमांचे जंजाळ,
ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सरळमार्गी जीवन जगणे त्रासदायक होते. नाईलाजाने
त्यांना सत्ताधारी व अधिकारी यांच्या अंकीत रहावे लागते; म्हणून नोकरशाहीला जोमदार
विरोध झाला पाहीजे. अण्णा हजारेंचे आंदोलन हे त्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
ठाम नकार हाच पॉझिटीव्ह विचार
हल्ली आपल्याकडे ‘पॉझिटिव्ह’विचारांचा खूप बोलबाला
होत आहे. मात्र काही वेळा तो अयोग्य पध्द्तीने होत आहे, असे वाटते. त्यामुळे
‘नाही’ म्हणण्यातली वैचारिक स्पष्टतेची ऐट विरळ होत चालली आहे. योग्य कारणांसाठी
सारासार विवेक वापरून दिलेला नकार किंवा विधायक टीका म्हणजे ‘निगेटिव्ह थिंकिंग’ नव्हे;
हे लक्षात घ्यायला हवं. ऊठ्सूठ नकारघंटा वाजवणे वेगळे आणि योग्य वेळी भान जागे
करण्यासाठी नकाराधिकार वापरणे वेगळे! लहानपणी मुलांना ‘बाळकडू’ द्यायची आपल्याकडे
पध्दत असे. त्यातली कडू मात्रा अंतिमत: पोषकच असते. ‘नकार’ ही सुध्दा अशीच
पथ्यकारक कडू मात्रा आहे. वास्तवाचे साम्यक आकलन करून त्याचा स्वीकार करण्यासाठी
प्रसंगी नकार पचवायची तयारीही हवी. आणि अगदी दाही दिशांतून नकार आले तरी ‘अकरावी
दिशा’ तर आपल्या सर्जनशीलतेतून शोधता येतेच, असा आत्मविश्वासही जागा व्हायला हवा.
आजकाल भौतिक समृध्दी. मर्यादित कुटुंब पध्द्तीआणि
परस्पर संवादातील वाढते अंतर यामुळे आम्ही पालक मुलांना नकाराची मात्रा देण्यात
कचरत आहोत. म्हणुन मुलांना लहानपणापासून ‘मागू ते मिळेल’ अशी सवय लागते. त्यामुळे
‘नाही’ म्हटलेलं सहन न होण्यापासून सुरू होणारा मुलांचा मानसिक प्रवास, पुढे अधिक
अवघड वळणावर जाऊन पोहोचतो.‘नकार’पचवण्याची क्षमता नसल्यामुळे मग
आई,बाबा,आजी,प्रेयसी,मित्र अशा अनेकांचे खून करण्यापर्यंत मुलांची मजल जाते.अशा
बातम्या हल्ली वर्तमानपत्रातून वाचायला मिळतात.एखाद्या नकाराने आपलं समग्र जगणं
थोडच थांबत? फार तर एक वाट बंद होईल! पण इतर वाटा धुंडाळण्याचा सारासार विवेक
मुलांमध्ये निर्माण करणं आपल्याच हातात असतं. अनुकूल घडायची इच्छा जरूर असावी, पण
प्रसंगी प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यायला तयारही असावे. गोष्टीमधल्या
राजकुमारालाही ‘सात समुद्र’ ओलांडावे लागतातच ना! ही समज आपण आपल्या मुलांमध्ये
रुजवायला हवी. ‘प्रत्येक फुलाच्या पोकळीत एक अंधार असतो.’ हे सत्यही पचवता आले
पाहिजे, नाही का? जर उषेची लाली अनुभवायची असेल तर रात्रीचा अंधकार नाहीसा
होण्याची वाट पहावीच लागते. हा संयम मुलांमध्ये निर्माण करता यायला हवा. अपयशाने
खचून न जाता, आपले प्रयत्न कुठे कमी पडले याचा विचार करायला शिकवले पाहिजे.
आपल्याला काय हवे हे नेमके कळणे आवश्यक आहे; तरच यशाकडे झेप घेता येते.
तुम्ही समस्या सोडवायला
घेता तेव्हा समोर आलेले पहिले उत्तर हे अधिक गोंधळात टाकणारे असते. बहुतेक लोक याच
टप्प्यावरहार
मानतात. पण तुम्ही अधिक शोध घेत राहिलात आणि समस्येशी सतत खेळत राहिलात,त्या
समस्येचे अंतरंग खोलात जाऊन शोधत राहिलात तर एक वेळ अशी येते की अचानक मार्ग
सापडतो. साधे सरळ सुंदर उत्तर आपल्या हातात असते. अर्थात समस्या सोडवायला किती वेळ
लागेल हे तुमची रुची काय दर्जाची आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. स्वयंअध्यायनाचा
सराव असलेला एखादा समस्येच्या उत्तराकडे खचितच लवकर पोहोचू शकेल. म्हणूनच जीवनात
यशस्वी होण्यासाठी स्वयंअभ्यासाची सवय लागणे गरजेचे आहे.
सणवार म्हणजे आनंद,उत्साह,चैतन्य हे समीकरण बदलून
सण म्हणजे ध्वनीप्रदूषण,वायुप्रदूषण,घाण,बजबजपुरी,अविवेकी उत्साहाचा
अतिरेक,सर्वजनिक यंत्रणांवर येणारा ताण असं नवं समीकरण झालय. हा मुल्यसंस्थेचा
दारूण पराभव नाही का? ‘Today’s wastage
is tomorrows shortage.’हे आपल्या कधी लक्षात येणार? माझ्या एकट्याने
काय बदल होणार असा विचार करून,डोळेझाक आणि दुर्लक्ष करून चालेल काय? जेव्हा
उत्साहाला प्रगल्भतेचं कोंदण लाभतं तेव्हा सणाचं स्वरूप
सात्विक,स्निग्ध,आनंददायी,चैतन्यमय आणि शुभंकर होतं. आनंदाचा तो सहजाविष्कार असतो.
आज त्याची जागा आक्रमकतेनं,आक्रस्ताळेपणानं आणि आत्मकेंद्रितपणानं घेतली
आहे.सणांचा उत्साह साजरा करतांना समाजाचं भान आपण ठेवणार आहोत का? असं जेव्हा घडेल
तेव्हाच समाज खर्या अर्थानं सुशिक्षित झाला आहे असे म्हणता येईल.
जीवन हे नदीप्रमाणे पुढं
वाहणारं आहे.नदी कधी मागे वळून बघते का? नदीचा प्रवाह मागे जातांना कुणी पाहीला
आहे का? नदीप्रमाणे जीवनाचा प्रवाह पुढेच जाणारा आहे. पुढे जातांना नदी आपल्या
आजूबाजूचा परिसर सुपीक करत जाते;तसं आपल्या जीवनाचा प्रवाह पुढे जात असतांना,आपल्या
आजूबाजूच्या माणसांना प्रेम देता आलं पाहीजे. आपण आपल्या मुलांकरिता कष्ट
घेतो,प्रेम करतो,पैसे खर्च करतो,ते आपल्या आनंदासाठी! प्रेमाचा कधी व्यवहार करायचा
नसतो.आपल्या मुलांवर जिवापाड प्रेम करतांना,तसंच प्रेम मुलांकडून मिळेल, ही
अपेक्षा केली तर प्रेमाची किंमत शुन्य! पैशाप्रमाणे प्रेमाची देवाणघेवाण करायची
नसते. मुलांसाठी आपण विशेष काही करत नाही,हे जर प्रत्येकाने लक्षात घेतले,तर
अपेक्षाभंग होणारच नाही.
दैनंदिन जीवनातल्या गोष्टी करतांना मुलांना
सहभागी करणं, त्यांच्या मनाचा अंदाज घेणं, त्याचं मत विचारात घेणंम्हणजे त्यांचे
फाजील लाड पुरवणं नव्हे;तर जरूर तिथे वास्तवाचं भान देणं हे खरं पालक प्रेम आहे.
लहनपणापासून छोट्या छोट्या गोष्टीचे निर्णय घेण्याची संधी आपल्या घरातूनच लहान
मुलांना मिळायला हवी. अनेक गोष्टीतून एक गोष्ट निवडणं,एखदी गोष्ट करायची की नाही
हेही मुलांना ठरवू द्यावं.यातून मुलांची स्वतःची विचार करून निर्णय घेण्याची
वृत्ती विकसित होऊ शकते. ज्या मुलांना लहानपणी कोणतेच निर्णय घेऊ दिले जात नाहीत
ती मोठी झाल्यावर एकदम जीवनातील महत्वाचे निर्णय कसे काय घेऊ शकतील? तेव्हा
पालकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्याप्रेमाने मुलांची विचारशक्ती क्षीण तर
होत नाही ना? तो परावलंबी तर होत नाही ना?मुलांच्या उर्मी ओळखणं,त्यांना वाट करून
देणं,मुलांना जबाबदारी घ्यायला आणि ओळखायला शिकवणं हे पालक म्हणून खरं काम असतांना
आपण आपल्या प्रेमाचं ओझं मुलांवर लादतो...त्यांच्या आयुष्याचे निर्णय घेतो.
लहान मोठ्या प्रश्नातूनच मुलं हळूहळू विचार करून
निर्णय घ्यायला शिकतात. त्यामुळे एखादी गोष्ट नाही करता आली तर त्याचं खापर दुसर्यावर
फोडण्याऐवजी स्वतःच्या नियोजनात काय बदल करायला हवा किवा आपलं कुठं चुकलं हे
पडताळून पहाण्याची आणि त्यात योग्य ते बदल करण्याची मानसिकता तयार होते.स्वतःची जबाबदारी
स्वतः उचलण्याची धमक मुलात येते.या
वृत्तीचा मुलांना मोठेपणी फार उपयोग होतो. समवयस्क मित्रमैत्रिणींबरोबर रहातानाही
अयोग्य गोष्टींना नकार देण्याची धमकही यातूनच येऊ शकते.नाहीतर मग सगळे करतात
म्हणून आपणही करायचे,आपला विचार मांडायचा नाही, जबाबदारी घ्यायची नाही; फक्त
परिस्थितीवर टीका करायची किवा परिस्थितीला शरण जायचे ही मनोवृत्ती तयार होते.
स्वतःच्या विचारांना स्थान न देता आल्यामुळे इतरांच्या विचारांचाही योग्य तो
सन्मान करता येत नाही.
कधी-कधी वाटतं मुलांना जेव्हा पाहिजे तेव्हा वेळ
देणं किवा देता न येणं याची उणीव पालक भरून कढण्यासाठी मुलांचा शब्दही खाली पडू
देत नाहीत. त्यांना हवं ते आणि सांगतील ते आणून देणं यालाच ते प्रेम समजतात. यातून
मुलांचं तात्कालिक समाधान होत असलं तरी दीर्घकालीन मात्र नुकसानच होतं. मुलांचे
प्रकल्प, त्यांचा अभ्यास अशा गोष्टी पालकांनी स्वत: करून देणं,मुलांना चूक
करण्याची संधी न देणं,सतत त्यांच्या पुढेपुढे करणं,यातून मुलांमध्ये एकारलेपणाची
वृत्ती तयार होते. सगळ्या गोष्टी ‘रेडीमेड’ मिळवण्याची सवय लागते.एखादी गोष्ट
कष्टसाध्य असते,ती मिळवायला धडपड करावी लागते हेच मुलं विसरून जातात.खरं म्हटलं तर
आई-बाबा घरी नसतांना स्वत:ची सगळी कामं नीट करता येणार्या मुलांवर आई-बाबांचं खर
प्रेम आहे असं म्हणता येईल.खरं प्रेम जीवन सन्मानाने जगण्याचं बाळकडू
देतं;परावलंबीत होण्याचं नाही. मुलांचं व्यक्तिमत्व नाकारणारी,त्यांची गरजेपेक्षा
जास्त काळजी घेऊन त्यांना खुजं करणारी घरं ही ‘प्रेमळ घरं’ नाहीत.हे लक्षात
घ्यायला हवं.सगळी मुलं स्वभावत: चांगली असतात;परंतु हा चागुलपणा वयस्कांच्या व
आसपासच्या वातावरणाच्या दुष्प्रभावानं बिघडू शकतो.म्हणून मुलांना त्यांच्या
स्वभावानुसार वाढूदेणं, त्यांच्या स्वप्नांना खतपाणी घालणं,योग्य दिशा दाखवणं पण
त्या दिशेने त्यांचं त्यांनाच चालायला लावणं हेच खरं सजग पालकत्व होय.
माणसंआपल्याशीवाईटकावागतात?तरआपणकसंवागूनयेतेआपल्यालाशिकतायावंम्हणून!म्हणूनचआपल्यालाजेआवडतनाहीवापटतनाहीतेसोडूनद्यायचे;आणिजेआवडतेतेचपहायचीसवयलावूनघ्यायची. दुर्धरप्रसंगयेतातत्याकाळातअतार्किकविचारांचेचकवेलागूशकतात,कधीनकारात्मक,
शरणागतमनोवृत्तीतयारहोवूशकते. आधारासाठीखोट्या, भासात्मकमार्गाचामोहपडूशकतो.हेटाळूनपुढेजायचेतरमननिग्रहीआणिप्रगल्भहवे.आयुष्यजीआव्हानेदेतेतीआपणआपल्याबळाने,
विश्वासानेपेलायची. याकडेपहायचीआपलीदृष्टीविवेकाची,बुध्दिनिष्ठअसायलाहवी.
भगवान
उवाच
मी एकदा
देवाला विचारले,
”तुला
माणसाविषयी जास्त आश्चर्य का वाटते?”
देव
उत्तरला,
”माणुस
पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो.
आणि
आरोग्य
परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो.
तो
भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो.
आणि
भूतकाळात
सदोदित रममाण होतो.
त्यामुळे
तो वर्तमान जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही.
तो असा
जगतो की कधीच मरणार नाही
आणि
असा
मरतो की कधीच जगला नाही,”
आक्रमण नव्हे संक्रमण
आपल्या पूर्वाजांनी
खोदला असला संस्कृतीचा, परंपरांचा तलाव आपल्यासाठी;
तरी त्यातला गाळ
काढावा लागतो वरचेवर.
नाहीतर तवंग चढत
जातात त्या पाण्यावर... बुरसटलेल्या विचारांचे.
त्या तवंगाचे थर
अंगावर बाळगत
हीच लखलखती
संस्कृती आहे आपल्या देशाची, आपल्या प्रांताची
---या भ्रमात जगत
राहीलो तर डबकं होईल आयुष्याचं.
आणि मग कंठत राहू
सारा काळ त्याच दुर्गंधीत.
हे टाळायचं असेल तर
बदल हवेतच.
पण हे बदल वरवरचे
नकोत.
आपल्याला हवे आहे
ते वैचारिक परिवर्तन.
माणसाला माणूस
बनवणारं आणि माणसासारखं वागवणारं परिवर्तन.
त्यासाठी कष्ट
घ्यावे लागतील,आत्मपरीक्षण करावं लागेल.
ते केलं तर
संक्रमणाचा काळही सुसह्य होईल.
आणि आजच्या
वैशाखवणव्यातून सोडवणार्या
पावसाच्या निर्मळ सरी सहज
येतील आपल्या आयुष्यात.
स्पर्धा नको, सहकार्य हवे
मानव निर्मित प्रत्येक व्यवस्थेत स्पर्धा आहे.
एकाच व्यवस्थेचे घटक असणार्या व्यक्तींमध्ये स्पर्धा लावणे, काही ढोबळ, सरधोपट
निकषांवर त्यांना श्रेष्ठ-कनिष्ठ ठरवणे यात मुलभूत चूक आहे.मेंदू श्रेष्ठ की हृदय?
किडनी महान आणि फुफ्फुस क्षुद्र असे आपण म्हणू का? डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत
प्रत्येक अवयवाचे कार्य नीट पार पडणे म्हणजेच आरोग्य! विविध अवयव जर आपापले
श्रेष्ठत्व-कनिष्ठत्व सिध्द करायला लागले तर काय होईल? असे असतांना
मानवनिर्मित प्रत्येक व्यवस्थेत, यंत्रणेत आपण स्पर्धा का आणतो?
पण
आपण आज स्पर्धा, तुलना याशिवाय विचारच करू शकत नाही. श्रेष्ठ कोण, कनिष्ठ कोण यावर
काथ्याकूट करत बसतो. आणि याकरता आकडेवारीचा आधार घेतो. सहकार्यापेक्षा स्पर्धेलाच
अधिक महत्व दिल्यामुळे माणसातील सहिष्णू वृत्ती आपण मारून टाकतो. त्यामुळे माणूस
फक्त ‘स्व’चाच विचार करायला शिकतो. आणि कसेही करून दुसर्याच्या डोक्यावर पाय
देवून पुढे जाण्यात इतिकर्तव्य समजतो. आपल्या मित्रांच्या, सहकार्यांच्या एक गुणाने
का होईना पुढे असण्यातच त्याला समाधान वाटू लागते. स्पर्धेमुळे स्वार्थी विचारांची
जोपासना झाल्याने मित्रांना मिळणार्या जास्त गुणाचा किंवा सहकार्यांना
मिळालेल्या प्रमोशनचा निखळ आनंद उपभोगता येत नाही. उलट काहीसे दु:खच होते.हे मनोरुग्ण
असण्याचे लक्षण नाही काय? म्हणून ‘स्पर्धा नको, सहकार्य हवे’ हे तत्व शालेयजीवनातच
रुजायला हवे. पण आपली नाथाघरची उलटी खूण! आपण मुलांना बालवाडीपासून स्पर्धा आणि
फक्त स्पर्धाच शिकवतो. याचा पहिला परिणाम म्हणजे सहकार्य संपते. जिंकणे, दुसर्याला
हरवणे, मी जिंकलो नाही तरी चालेल; पण दुसरा हरला पाहिजे,हे बाळकडू आपणच मुलांना
पाजतो.ही वृत्तीच आपल्या जीवनाचे आजचे वास्तव आहे असं नाही वाटत? याच
प्रवृत्तीमुळे आज सर्व यंत्रणा मोडकळीस आल्या आहेत.
बरं
ह्या जिंकण्या-हरण्याचे निकष तरी काय? तर मोजमापाच्या ठोकळेबाज पध्दती! 200-300
पानांची क्रमिक पुस्तके, ती सहा-आठ महीन्यात शिकवणार,त्यावर ठराविक 10-12 प्रश्न विचारणार,
ते तीन तासात सोडवा. अशारीतीने मिळणार्या गुणांवर आपण त्या मुलाचे वा व्यक्तीचे
कायमचे मुल्यमापन करणार. त्याला इतरांपेक्षा ‘हुशार’(?)
अथवा ‘ढ’(?)
ठरवणार!!! हेच तत्व आज सर्वत्र राबवले जाते. शाळांमध्ये काय किंवा मोठमोठ्या
कंपन्यात, कारखान्यात काय,ठराविक कालावधीत विशिष्ठ ‘टर्गेट’ गाठणे या चौकटीत
प्रत्येकाची गुणवत्ता, प्रतिभा ठरवली जाते. हे टर्गेट गाठले जावे यासाठी विशिष्ठ घटकांत,
कामगारांत स्पर्धा लावली जाते. स्पर्धा जिंकण्याची प्रेरणा मिळावी म्हणून विविध
अमिषे दाखवली जातात. बक्षिसे,बोनस,इन्सेंटीव्ह यांचा नुसता मारा चहूबाजूंनी केला
जातो. व्यक्तिगत फायद्यामुळे काहीकाळ हे सगळे चित्र फार आशादायी वाटते, पण
कालांतराने संपूर्ण यंत्रणा, व्यवस्था कोसळण्याच्या अवस्थेला येतात; तेव्हा वेळ
निघून गेलेली असते. म्ह्णून माझे पुन्हा हेच सांगणे आहे की “ स्पर्धा
नको,सहकार्य हवे.”आणि जर स्पर्धाच करायची असेल तर ती स्वत:शीच असावी...
मागच्यापेक्षा आपला कस किती वाढला आहे हे तपासण्यासाठी.
संतांनी आपल्याला भक्तीची
आणि नीतीची शिकवण दिली असे आपण म्हणतो. जर हे खरे असेल तर, आज ‘भक्ती’ आणि
‘परमार्थ’ म्हणून जे काही आपल्यासमोर नित्य साकारते त्यात ओंगळ अनाचाराचा बडिवार
माजलेला का दिसतो? निवडणूका जवळ आल्या की काशी, हरिद्वाराच्या यात्रांचे दणक्यात
आयोजन करणे, हा इच्छुक उमेदवारांच्या आचारसंहितेचा जणू आवश्यक भागच बनला आहे.
जत्थ्याने तिर्थाटन करून आलेले भक्त भाविक (?) ‘या माणसाने एवढ्या लोकांना एकावेळी
तीर्थयात्रा घडवण्याइतका पैसा आणला कोठून?’ या प्रश्नाने अस्वस्थ झालेले दिसत
नाहीत. बेहिशोबी पैशाने करून आणलेल्या अशा तीर्थयात्रेला ‘भक्ती’ म्हणायचे का? हे
एवढ्यावरच थांबत नाही. मतदारसंघातील लहानमोठ्या मंदिरांची डागडुजी वा नुतनीकरण
घडवून आणण्यापासून ते भजनी मंडळींना भजनाचे साहित्य वाटण्यापर्यंत या
“भक्तीगंगेला” महापूर येतो. हा सगळा असा धुमधडाका बघितला की वाटते, संतांना
अभिप्रेत असलेल्या भक्ती संकल्पनेची नीतीपासून एवढी घाऊक फारकत झालेली आहे का? हा
दांभिकपणा पाहील्यावर असे वाटते की, “यथा प्रजा तथा राजा” हेच खरे.
काही क्षणस्वत:साठी
आपल्याला करियर,
यश, पैसा हे सगळं हवं असतं.
पण चांगलं आयुष्य
मिळण्यासाठी
आरोग्य,तणावरहीत
आनंदही आवश्यक असतो.
हे आपण का विसरतो?
आजच्या जीवनशैलीत
भरपूर पैसा मिळवण्याच्या खटपटीत
खरंच आपण सुखी
संसार करू शकतो का?
खुप पैसे
मिळवण्याच्या नादात
आरोग्याची आणि
आनंदाची किंमत का टाकतो
रुग्णालय आणि
डॉक्टरांच्या पारड्यात!
24 तासातून
फक्त काही क्षण काढा स्वत:साठी,
आपल्या
बायको-मुलांसाठी, आप्तेष्ठांसाठी!
सुखी भविष्याच्या
मृगजळामागे धावून
नका विसरु
वर्तमानाला.
उद्याचे भविष्य होईल का कधी
आजचे वर्तमान?
मग का मोजतो त्याची किंमत आयुष्यभर?
चुका आणि शिका
अनेक चुका करत जीवसृष्टी
निर्माण झाली;असंख्यचुका करीत विज्ञान विस्तारले. जगाची अर्थव्यवस्था मानवनिर्मित
आहे आणि तीही चुका करीतच उभी राहीली आहे. पाकशात्रातील अनेक लज्जतदार पदार्थ ही
मानवी चुकांचीच निर्मिती आहे.चुकांमुळेच नवनिर्मिती होते,सर्जनशिलता प्रकट
होते.चुका प्रगतीची वाट मोकळी करून देतात. पण केव्हा? जेव्हा एकच चुक पुन:पुन्हा
करत नाही तेव्हाच. म्हणूनच चुकणे हे मानवाचे मोठे सामर्थ्य आहे तसेच वैशिष्यही
आहे.
तरीही जर सार्वमत घेतले तर एका
भावनेबद्दल सर्वांचे एकमत होईल.ते म्हणजे ‘माझे बरोबर असते, इतरांचेच चुकते.’
तुम्ही आता ह्या क्षणी चुकता अहात का, असे विचारले तर प्रत्येक जण प्रथम बचावात्मक
आणि मगआक्रमक पवित्रा घेतो. या क्षणी, चालू वर्तमानात आपले चुकत असेल ही भावनाच
कोणाला सहन होत नाही. माझे बरोबरच आहे ही भावना जपत प्रत्येकजण वर्तमानकाळात जगत
असतो. कृती चुकीची असली तरी त्यावेळची भावना ‘मी बरोबर आहे’ अशीच असते. चुक झाली
आहे हे आपल्याला त्या क्षणानंतर कळते व खंतही वाटते. तेव्हा वेळ निघून गेलेली
असते. पण आपल्याकडून चुक होत आहे किवा अशी कुणी जाणीव करून दिली तरी आपल्याला चालू
क्षणी ते मान्य नसते.
असे होण्यास आपली मानसिक
जडणघडण कारणीभूत आहे. चुका होणे हे नैसर्गिक आहे.कारण माणसाची शारीरिक रचनाच तशी
आहे.माणसाची पंचेंद्रिये ही कोणत्याही गोष्टीबद्दल संपूर्ण व तंतोतंत माहिती देऊ
शकत नाहीत. ज्ञानेंद्रियांकडून मिळणार्या माहितीला मर्यादा असतात. या मर्यादित
माहितीतून मेंदू निष्कर्ष काढतो. यामुळे त्या निष्कर्षालाही मर्यादा पडतात. अशा
मर्यादित माहितीतून काढलेल्या निष्कर्षावर आधारित असंक्य समजुती उराशी बाळगत आपण
जगत असतो. प्रत्येक चालू क्षणी या समजुती क्रियाशील असतात. त्या समजुतींच्या
आधारावरच आपण निर्णय घेत असतो. या समजुतींची आपण कधीच खातरजमा केलेली नसते, त्या
तपासून पाहिलेल्या नसतात की त्यांचे विश्लेषण केलेले नसते. म्हणून या समजुती
बरोबरच आहेत असे आपण समजुन चालतो. मर्यादित माहितीमुळे त्या चुकीच्या असू शकतात हे
आपण ध्यानीच घेत नाही.मर्यादित माहितीतून चुका होतात हे ध्यानी घेतले तर बर्याच
समस्या सुटण्यास मदत होईल.
चुका करणे
अनैसर्गिक आहे,चुका करणे भयंकर आहे,फक्त मुर्ख माणसेच चुका करतात,चुका करणारा मठ्ठ
असतो हे आपल्या मनावर शाळेमध्ये बिंबवले जाते.चुका करणे म्हणजे नालायक ठरणे, ही
समजूत प्रत्येक मुलामध्ये रुजवली जाते.आणि हेही ठसवले जाते की,’आयुष्यात कधीही
चुका न करणे म्हणजे यशस्वी होणे. यशाच्या या समजूतीला आपण घट्ट बांधून घेतो व चुका
टाळण्याची आटोकाट धडपड करतो.पण चुका होतातच. म्हणून चुका स्विकारणे आणि त्या पुन्हा
न होतील याची दक्षता घेणे, तसेच स्वमताला खरे ठरवण्याचा अट्टाहास सोडणे हेच आपल्या
प्रगतीचे लक्षण आहे.वेगवेगळ्या कोनातून जग वेगवेगळे दिसते म्हणून आपली समजूत जरा
बाजुला ठेऊन दुसर्या कोनातूनही पहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे आपली
बुध्दी विस्तारते आणि ‘माझेही कदाचित चुकत असेल’ ही जाणीव संवादाचा नवा मार्ग खुला
करते. आज आपल्याला गरज आहे ती संवादाची, वादाची नव्हे.
विज्ञानाची रीती [आधुनिक
तांत्रिक उपकरणे] आपण सहजच उचलली,
पण विज्ञानाची नीती
[निरिक्षण,प्रयोग,कारणमिमांसा आणि निष्कर्ष] नाही स्वीकारली.
म्हणूनच भारतीय समाजात
विसंगती भरली.
जगणे असते एकविसाव्या शतकात
पण मन मात्र सोळाव्या शतकात.
बोलणे असते पुरोगामी पण
आचरण मात्र प्रतिगामी.
वागतांना म्हणावे
आहोत आम्ही सद्वर्तनी पण चालतांना मात्र का होतो दुर्वतनी?
म्हणून विनवीतो
जगदीशा, धरी विज्ञानाची कास दशदिशा.
जोवर स्वीकारत नाही
वैज्ञानिक दृष्टी तोवर अंधश्रध्द राहील ही सृष्टी.
आपण सारेच लबाड
जगातील
बहुसंख्य माणसे प्रामाणिक असतात; पण काही मोजक्याच अप्रामाणिक माणसांमुळे सर्व
व्यवस्था बिघडते. अशा अप्रामाणिक माणसांना कडक शिक्षेची अंमलबजावणी करून सुतासारखे
सरळ केले की सर्वत्र सुव्यवस्था नांदेल, अशी आपल्या सर्वांची समजूत असते.पण
वस्तुस्थिती तशी नाही. जगात पूर्णपणे अप्रामाणिक लोक फारतर 1 टक्का असतात.आणि
प्रामाणिक लोकसुध्दा जवळपास 1 टक्काच असतात.उरलेले 98 टक्के लोकांच्या मनात ‘’निसटला
तर साव आणि पकडला तर चोर.’ अशा पध्दतीने प्रामाणिकपणा आणि चालबाजी यात संघर्ष
चाललेला असतो.प्रामाणिकपणाची झूल घसरू न देता थोडीशी चालबाजी करता आली तर ती
बिनबोभाटपणे करून टाकण्यास हे 98 टक्क्यातील लोक मागेपुढे पहात नाहीत.खरंतर आपणही
याच 98 टक्क्यातले असतो.[प्रामाणिकपणे स्वत:च्या मनाला विचारून पहा बरं!] आपल्या
लबाडीचे प्रमाण लहान असते, विस्तार छोटा असतो.त्यातून होणारा फायदाही अल्पसा असतो
हे जरी खरे असले तरी शेवटी ती लबाडीच असते.अशी लहानशी लबाडी 98 टक्के लोकांनी
केल्यामुळे त्याचा एकूण परिणाम मात्र 1 टक्का अप्रामाणिक लोकांपेक्षा प्रचंड असतो.
म्हणजे मोठ्या माशांपेक्षा आपल्यासारखे छोटे मासेच ही व्यवस्था बिघडवत असतात.
लबाडी करतांना
त्वरीत मिळणार्या फायद्याकडे बघून आपण त्यावर झडप घालतो. मात्र त्याच वेळी समाजातील
आपल्या प्रतिष्ठेला आणि प्रतिमेला नख लागणार नाही याचीही दक्षता घेतो. तशी खात्री
पटली की आपण लबाडी करायला मोकळे होतो. ही जराशी लबाडी मोठ्या लबाडीपेक्षा अधिक
घातक असते.कारण ती संख्येने प्रचंड असल्याने त्यातून होणारे नुकसानही प्रचंड असते.
याचा अर्थ मोठे घोटाळे करणार्यांपेक्षा आपल्यासारखे 98 टक्केच भ्रष्टाचाराला
मोठ्याप्रमाणात खतपाणी घालत असतात. म्हणूनच जोपर्यंत आपण सचोटीने वागत नाही
तोपर्यंत भ्रष्टाचार निर्मुलन कठीणच आहे. याचा अर्थ मोठे घोटाळे करणार्यांना
मोकळे सोडावे असा मुळीच नाही. पण त्याचवेळी अशा लोकांवर आरोप करण्याआधी आपण
आत्मपरिक्षण करावे; म्हणजे आजची समाज व्यवस्था चांगली होण्यास मदत होईल.
पूर्वकर्म ही
संकल्पना दैववादी बनवणारी आहे,म्हणून ती नाकारली पाहीजे. पूर्वसंचिताच्या
कल्पनेमुळे माणूस प्रयत्नवादी होण्याचे टाळतो. ‘काय करणार माझ्या नशिबातच नाही!’
असं म्हणून ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ ही वृत्ती बळावते. उत्क्रांतीच्या ओघात
‘देव’ ही संकल्पना भीतीपोटी निर्माण झालीली आहे. आजही माणूस देवाला भीतीपोटी जास्त
आणि आदरापोटी कमी नमस्कार करतो. हे विरोधाभासी वाटलं तरी प्रत्येकाने प्रामाणिकपणे
आपल्या मनाच्या तळाशी जावून खोलवर विचार करावा; म्हणजे मी काय म्हणतोय ते कळेल.
स्त्रीचीमानसिकजडणघडण, तिच्यावरीलकौटुंबिकवधर्मिकसंस्कार,बालपणापासूनतिच्यातनिर्माणकेलीजाणारीपरावलंबित्वाचीआणिअसहायतेचीभावना,तिच्याशारीरिकसौंदर्यालादिलेजाणारेअवास्तवमहत्व; त्याचवेळीतिच्याशारीरिकक्षमतांकडेकेलेजाणारेदुर्लक्ष,
तिच्याबौध्दिकविकासाचाउपहासकरूनतिचीतिच्यालैंगिकदेहधर्मातकेलेलीस्थानबध्द्तायासामाजिकवृत्तीमुळेस्त्रीहीनिसर्गत:
अबलानसते, तरतीबनवलीजाते. स्त्रीवपुरुषांमधीलनैसर्गिकघटकांनाअवास्तवप्रमाणातभडककरूनत्यांच्यामानसिकवशारीरिकक्षमतांमध्येआणिपर्यायानेत्यांच्यासामाजिकस्तरांमध्येजीखोलदरीनिर्माणकेलीजाते,
तीनिसर्गसुलभनसूनमानवनिर्मितआहे. म्हणूनचअसंम्हणतातकी,
'स्त्रीहीजन्मतनाही, तरघडवलीजाते.'
मनातूचिविचारकरूनीपाहे ...
उपास-तापास, नवसआणिजागरणांचा‘सीझन’ आहे. जोतोदेवालाखुशकरायच्यामागेलागलाआहे. कुणीबाबांच्यावाऱ्याकरतात, तरकुणीदर्शनाचाअतिरेककरतात. उपासाच्यानावाखालीपोटफाटेस्तोवरउपासाचेपदार्थखाल्लेजातात.जागृतमानल्याजाणाऱ्यास्थळांवरमोठमोठेनवसमागितलेजातात. अवडीच्यागोष्टीसोडणे, मंदिरांनादानदेणे, आठवड्यातएकचक्करटाकणेहेसर्वहीत्याचबरोबरसुरूहोते. यासर्वांचेकारणएकच – ‘स्वार्थ’. काहीतरीहवे, काहीतरीमिळावेम्हणूनदेवालायाप्रकारेमस्कामारलाजातो. असेचभिकाऱ्यासारखेहातपसरतमाणूससारखेकाहीनाकाहीमागतराहतो. गाडी, बंगला, चांगलीनोकरी... हीयादीसंपतनाही. मात्रभीकमागण्यातआयुष्यसंपूनजाते. आपलेकुटुंब, ऑफिसमधीलसहकारी, मुले, मित्रपरिवार, नातेवाईक, ग्राहकयांच्यामनाचा, विचारांचा, गरजांचाविचारकरायलावेळचउरतनाही. दगडासमोरडोकंटेकण्याततल्लीनझालेलामनुष्यजिवंतजीवांनाविसरूनजातो. अशानेदेवअजिबातखूशहोतनाही. दुसऱ्यांचीमनेदुखवणाऱ्यांवरदेवखूशहोईलतरीकसा!घरातल्यादेव्हाऱ्यातल्यादेवासमोरउभेराहायलादोनमिनिटंनसणारेलालबागच्याराजासमोरसाततासरांगलावतात. यालाभक्तीम्हणतनाहीत. स्वामीविवेकानंदांनीम्हटलेतेचखरे - मनुष्यसेवाहीखरीदेवपूजाआहे.
आपल्याअवतीभोवतीअसलेल्यांचीमनेसांभाळा, सर्वांशीप्रेमानेवागा, जगावरथोडाविश्वासठेवा. हीखरीपूजा. चारवाईटलोकभेटलेकीसगळेचवाईटदिसूलागतात. दोनदु:खदप्रसंगघडलेकी, नशीबखोटेवाटूलागते. नजरजाईलतिथेखोटेपणा, लबाडीआणित्रासपाहण्याचीसवयहोते. मनातकपट, द्वेष, शंकाआणिलबाडीठेवूनकेलेलीपूजाहीपूजानसूनवेडेपणाचआहे. स्वच्छ, शांतआणिप्रेमळमनहाभक्तीचापाया, बाकीसगळेनंतर. स्वशुद्धीचापायाआधीनीटबाधुनघ्या. वाईटानेमाखलेलेमनघेऊनकोणत्याहीदेवळातगेलात, कितीहीउपासकेलेतकिंवाकोणताहीनवसमागितलाततरीपदरीनिराशाचयेणार.देवाकडे‘करप्शन’ हाप्रकारचालतनाही. तिथेलाचदेऊनचांगलेआयुष्यघेतायेतनाही. तिथेचालतेफक्तमनुष्यप्रेमाचेनाणे.देवदगडाचाजरीदिसतअसलातरीदगडाचेभक्तबनूनका?
एका राजकारण्याचे
मनोगत
खुप खाऊआम्ही आम्हाला काय कुणाची भिती?
देवघेव आणि पैशापायी राज्य घेतलं हाती।
जिंकावं अन राज्य करावं हेच आम्हाला ठवं
चरण्यासाठी कुरण ठरावी अशी मिळावी खाती।
देवघेव ही आम्हा शिकवली कारभराची रीत
खुर्ची संग लगीन लागलं जडली येडी प्रीत।
लाल बत्तीची ऐटही येते या खुर्ची पाठी
लाख रुपये खाऊनी करतो सोन्याची माती।
सत्य, अहिंसा गाडूनी टाकू सत्ता मिळ्ता
हाती
खुप खाऊ आम्ही आम्हाला काय कुणाची भिती?
संभ्रमात की
भ्रमात?
गेल्या 8 –10 वर्षांमध्ये
सामाजिक स्थिती झपाट्याने बदलली आहे.कुटुंब त्रिकोणी–चौकोनी झाली. एकूलत्या एक आपत्याला
सगळं उत्तमच मिळालं पाहीजे. अशी आपली मानसिकता बळावली. आपण कमावतो... कष्ट करतो ते
आपल्या मुलाबाळांसाठीच; शिवाय आपल्या लहानपणी मन मारून जगणं नशिबी आलं... आपले हाल
झाले तसे मुलांचे होऊ नये असं वाटू लागण्यात गैर काहीच नाही. पण त्यामुळे झालं काय
की, मुलांना हवं ते सहज मिळू लागल्यामुळे त्यांची नकार पचवण्याची क्षमताच
संपुष्टात आली. मग आवडत्या कॉलेजला प्रवेश मिळाला नाही म्हणून
आत्महत्या...परिक्षेच्या दडपणाने आत्महत्या...मार्क कमी मिळाले म्हणून आत्महत्या!
असं सत्र सुरु झालं.
सध्या-साध्या
भांडणाचं परिवर्तन खूनात होऊ लागल्याच आपण पहातोय.
पैसे मिळवण्याच्या नादात पालक़ांच्या मनात
अपराधीपणाचा भाव निर्माण होतो. म्हणून पालकांना आपल्या मुलांशी ठामपणे
वागण्याची,त्यांना शिस्त लावण्याची भिती वाटतेय. मुलांना हवं ते देण्याच्या
सवयीमुळे मुलांमध्ये हेकेखोरपणा वाढतोय. ती आत्मकेंद्री बनताहेत...स्वार्थी
बनताहेत. दूरदर्शनवर चमकणार्या मुलांना पाहून आपल्या मुलांनी झटपट शहाणं व्हावं
म्हणून त्यांची इतरांशी तुलना करून पालक आपल्याच पायावर धोंडा पाडून घेताहेत.शेजारच्या
मुलाला 90% पडले म्हणून आपल्या मुलाला त्याच्यापेक्षा जास्त पडले पाहीजेत असा
अट्टाहास धरला जातोय.आपला पाल्य रडला तर तो पालक़ांकडून नेभळट समजला जातोय.
खरंतर मुलांच्या निरोगी मानसिक वाढीसाठी
त्यांना वाईट वाटणं, दु:ख होणं, नकार पचवता येणं,भांडण सामोपचाराने सोडवता येणं, अपयशाने
खचून न जाता पुन्हा प्रयत्न करणं हे सगळं शिकवण्याची खूप गरज आहे. मुलांना कोणतीही
गोष्ट तयार न देता त्यांना ती प्रयत्नपूर्वक मिळवण्यासाठी धडपडू द्या. अपयश सहन
करण्याची ताकद आल्यामूळे ती कणखर होतील; पुढच्या आयुष्यातले टक्केटोणपे यशस्वीपणे
झेलायला शिकतील. व्यक्ती जेव्हा मूल्यापेक्षा मोठी बनते तेव्हा मानसिकता बिथरायला
वेळ लागत नाही. म्हणून आपल्या मुलांना मूल्यांची, नीतिमत्तेची जाणीव करून देण्याची
गरज आहे.
आज समाजाची मानसिकता खालावलेली आहे.
मुलांच्या समस्या प्रचंड वाढत आहेत. अशावेळी आपल्या अतिकाळजी घेण्याने,अतिलाडाने,
पालकत्वाच्या अतिरेकाने मुलाचे नुकसान तर होत नाहीना, हे डोळसपणे पहाण्याची वेळ
आली आहे. मुलगा आणि मुलगी यामधला पारंपारिक भेद टाळून व्यक्ती म्हणून प्रत्येकाला
वाव द्यायला शिकवले पाहीजे. त्यासाठी सर्वप्रथम पालकांनी आपल्या वागण्यातील
दुटप्पीपणा, दांभिकता आणि दुभंग अवस्था संपुष्टात आणली पाहीजे.
शिक्षण व्यवसायाभिमुख असायला हवं हे जरी
खरं असलं तरी या दृष्टीकोनाचा अतिरेक होता कामा नये. शिक्षणाचा संबंध थेट नोकरीशी
किवा पोटापाण्याचा प्रश्न सोडवणार्या व्यवसायाशी जोडून आपण एक मोठी चूक करत
आहोत.केवळ नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण असा प्रचार ह्या विचारातून होत असल्याने
शिक्षण ही ज्ञानप्राप्तीची किवा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाची प्रक्रिया न रहाता
तो फक्त एक सोपास्कार झालेला आहे.त्यामुळे गळेकापू स्पर्धा वाढीस लागलीय...स्वार्थ
वाढीस लागलाय. कसेही करून मला चांगले गुण मिळाले की झाले. ही वृत्ती वाढीस लागली आहे.
खरं पहाता शिक्षण हे भविष्यात नोकरी मिळवण्याचं एक साधन आहे; साध्य नव्हे हे तत्व
ज्या समाजाने जाणले तो समाजच नवनिर्मिती करू शकला; प्रगतीपथावर गेला हे सिध्द झाले
आहे.
माणुसकीचे शिक्षण
आणि मानवतेचे संस्कार प्रत्येक घराघरामधून दिले गेले तर आजचा समाज बदलायला सुरवात
होईल. नुसताच पैशामागे धावणारा समाज पैशाचे मुल्य जाणून मणुसकीने जगायला शिकेल.
भारतामध्ये शिक्षणाचा मसुदा
तयार करण्यासाठी 1828 साली मेकॉलेवर ही जबाबदारी सोपवण्यात आली. आपल्या
मुलाला लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिलं की, मला हिंदुस्थानात जन्माने भारतीय पण
विचारांनी इंग्लिश झालेले लोक तयार करावयाचे आहेत. मी असा मसुदा तयार केला आहे की,
पुढील काही वर्षांमध्ये मी जे शिक्षण देणार आहे त्यामुळे मी तीन उद्दिष्टे गाठणार
आहे -1] भारतातील कोणत्याही माणसाला त्याच्या मातृभाषेतून नीट बोलता येणार की
विचार करता येणार नाही. 2] भारतीय कपडे घालणं त्यांना कमीपणाचं वाटेल. 3]
धर्मावरील निष्ठा फक्त कर्मकांडापुरतीच शिल्लक राहील.
आज आपल्याला काय
समाज चित्र दिसते आहे? हा आराखडा एवढ्या मोठ्याप्रमाणावर यशस्वी होईल आणि एवढे
वर्ष टिकून राहील याची त्यालासुध्दा कल्पना करता आली नसेल.मातृभाषेतूनच प्रत्येक
व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो, याबद्दल शिक्षणतज्ञांमध्ये एकवाक्यता आहे. पण हे
आपण केव्हा समजून घेणार?अनुभवातून आलेले विचार व्यक्त करण्याकरता मातृभाषेइतकं सुलभ
व वैशिष्ठ्यपूर्ण साधन असूच शकत नाही. ज्याला मातृभाषा चांगली अवगत आहे तो दुसरी
कोणतीही भाषा सहजगत्या शिकू शकतो हा सार्वत्रिक अनुभव आहे. रोजच्या व्यवहारात जर
मातृभाषेचा वापर वाढला तर समाजात चैतन्य निर्माण होईल. आपल्या इंग्रजीच्या
अट्टाहासामूळे आपण धड इंग्रजीतूनही विचार करू शकत नाही की धड मातृभाषेतूनही! सध्या
आपण एका अर्थाने बिन शिकलेल्या विद्यार्थ्यांची पिढी निर्माण करत आहोत. ही परंपरा
आपल्याला अधोगतीकडे नेत आहे. ही एक भयानक आपत्ती आहे. काहीतरी चुकत आहे ही जाणिव,
ही भावना अत्ताच आकळली नाहीतर उपचाराची वेळ निघून गेलेली असेल.
This is the problem of
attitude and not ability. आतातरी कळेल का? समाजपुरुषा झोपेचे सोंग
टाकून दे,जागा हो.यातच तुझे हित सामावलेले आहे.
जिथे शिस्त आणि पध्दत नाही
तिथे केवळ संगणक किंवा उपकरणांच्या सहाय्याने शास्त्र वा समाज पुढे जाऊ शकत नाही.
माणूसच माणसाला बदलू शकतो, शास्त्र माणसाला फारतर दिशा दाखवू शकेल.आपण एका मोठ्या
सांस्कृतिक विचाराचे वारस आहोत. पण आपल्यासारखी असांस्कृतिक वृत्ती पुढारलेल्या
देशात कुठेही दिसत नाही.
चंगळवादी
वातावरणात माणूस स्वत:ला व सामाजिक जाणिवांना पारखा होत चालला आहे. ह्व्यासी
जगतामध्ये वैयक्तिक मुल्यांचा र्हास हे सर्व गोंधळाच्या मुळाशी कारणीभूत आहे.
समाजाच्या हितामध्ये माझंही हित आहे हा विचारच नाही. दुसर्याच्या असहायतेचा फायदा
घेणं, त्याची अडचण हीच आपली संधी,सत्ता काबीज करून स्वत:करता लाभ उठवणं हे सर्रास
चाललं आहे.सध्या सर्वत्र वैचारिक अभाव पसरला आहे आणि जबाबदारीची जाण कमी झालेली
आहे. त्यामुळे कृतज्ञतेचा अभाव जाणवतो. शिवाय पैशाचं वेड यामुळे कित्येकसमस्या
निर्माण झालेल्या आहेत. चारित्र्य संपलं की भावनाशुन्यता येते. आपल्या देशात बदलत
चाललेल्या ह्या मनोवृत्तीमुळे वागणुकीत उध्द्टपणा वाढीस लागला आहे. आपल्यामुळे
दुसर्याला उपद्रव होतो ही जाणिवच नाहीशी होत चालली आहे. मनामध्ये नुसते चांगले
विचार येऊन भागत नाही तर त्यांच रुपांतर कृतीमध्ये झालं पाहिजे. पुन:पुन्हा चांगली
कृती केल्याशिवाय त्याची सवय लागत नाही;आणि एकदा का ती सवय लागली की आयुष्यात
मिळतो तो निर्भेळ आनंद.
काळोखाचा सागर
कितीही अथांग असला तरी त्यात काही प्रकाशाची बेटे असतातच. काळोखाचा सागर सनातन
त्याचप्रमाणे बेटेपण सनातन. अखेरीस मीच निर्णय घ्यायचा आहे की, त्या काळोखातल्या
लाटांवर भरकटत जाणारा पराभूत खलाशी व्हायचं का प्रकाशाच्या बेटांवर सूर्यकिरणांची
लागवड करणारा शेतकरी व्हायचं. शेवटी आपण मातीमध्येच जाणार आहोत. पण आपल्या हातात
असणार्या आयुष्याची मात्र माती करणार नाही. हा निर्णय मलाच घ्यायचा आहे.
जन्म केव्हा घ्यावा
हे आपल्या हाती नाही आणि मृत्यू अटळ आहे.गेलेलं आयुष्य गतकाळात विलीन झालेलं आहे.पुढला
क्षण आपल्या हाती नाही. पुन्हा आयुष्य मिळणार नाही. मग आत्ताच्या क्षणाला मी
गतकाळच्या अस्वस्थ विचारांचं ग्रहण का लावून घेऊ? हा विचार करता आला तर जगावं कसं
हे कळू शकतं. बहूतेकांना हे जमत नाही. संसारामध्ये पै आणि पैचा हिशोब ठेवण्याचं
महत्व समजणार्या समाजाला वेळेचं मात्र महत्व कळू नये हे आश्चर्यकारकच आहे.
आजकाल जगामध्ये
घडणार्या घडामोडींकडे पाहिले तर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की, मानवाने
विज्ञानाच्या क्षेत्रात आश्चर्यकारक प्रगती केलेली आहे. पण त्याची मनसिकता मात्र
आजूनही हजारो वर्षांपूर्वी होती तशीच आहे. बाह्यत: मनुष्याचे जीवन
खूप बदललेले दिसत असले तरी, त्याच्या अंतरंगात मानसिक पातळीवर तो अजिबात बदललेला
नाही. त्याच्यात असलेल्या षडरिपूंवर अजुनही त्याला ताबा मिळवता आलेला नाही.
असुरक्षिततेची भावना, सुखदु:खे, संशयीवृत्ती यांचा त्याच्या जीवनावर प्रभाव टिकून
आहे. किंबहुना या सगळ्या गोष्टी म्हणजेच जीवन असं समजून आपणजगत असतो. आणि दु:खंना
आमंत्रण देत असतो.
दुख: म्हणजे
आपल्याला नको असलेले प्रसंग आपल्या वाट्याला येणे किवा आपल्याला हव्या असलेल्या
गोष्टी न मिळणे. या दोन टोकांमध्येच दु:खाच्या विविध छटा पसरलेल्या असतात. दु:ख हे
निसर्गाने मानवाला दिलेली देणगी नसून मानवानेच आपल्या जगण्यातून निर्माण केलेली
परिस्थिती होय. त्यामुळेच कोणती तरी बाह्यशक्ती आपले दु:ख निवारण करेल अशी अपेक्षा
बाळगणे चुकीचे आहे. मानवाने निर्माण केलेल्या दु:खातून मानवीय उपायांनीच बाहेर
पडता येईल. त्यासाठी त्याला आत्मशोधन केले पाहिजे.आत्मशोधन म्हणजे आत्म्याचा शोध
नव्हे तर आपल्या दैनंदिन जीवनाचे आकलन करून घेणे होय. कारण दु:खातून बाहेर
पडण्याचा मार्ग आपल्या रोजच्या जीवनातूनच जातो.
पुरूषाला स्त्री देहाचं
आकर्षण वाटणं ही झाली प्रकृती, स्त्री अशा कुठल्याही प्रकारच्या संबंधासाठी तयार
नसतांना तिच्यावर जबरदस्ती करणंही झाली विकृती आणि अशी विकृती काबूत ठेवणं ही आहे
संस्कृती.समाजाला विकृती काबूत ठेवण्यासाठी मानवी प्रवृत्तीकडे निकोप मनाने पहाता
यायला हवे. खर्या अर्थाने संस्कृती प्रगल्भ व समर्थ झाली की काहीही झाले तरी
अशाप्रकारची विकृती उसळी घेणार नाही हे नक्की.
म्हणून केवळ नोकरी
करून, पुरुषांच्या बरोबरीने वागून,त्यांच्याइतकचं बाहेर कमावून स्त्रीला कधीही
समान हक्क मिळणार नाहीत. त्यापलीकडे जाऊन तिनं आधी आपलं मन स्वतंत्र केलं पाहिजे;
पारंपारिकतेचं जोखड झुगारून दिलं पाहिजे. जोपर्यंत तिचं मनच मुलगा आणि मुलगी अशा
कृत्रिम वर्गवारीला बळी पडत राहील तोपर्यंत स्त्री कधीही मुक्त होऊ शकणार नाही.
भारतीय स्त्रीला असं मुक्त होणं कठीण आहे पण अशक्य नाही. त्यासाठी लहानपणापासूनच
तिला व्यक्ती म्हणून वाढवलं पाहीजे.
आजकाल कोणालाही
बंधने नको आहेत. रोजच्या जीवनात मी रांग सोडून बसमध्ये घुसतो. सिग्नल नसतांनाही
गाडी पुढे दामटतो किवा रस्ता ओलांडतो. माझ्या 10/12 वर्षाच्या मुलाच्या हातात मी
सुशिक्षित असूनही दुचाकी/चारचाकी वहानाची चावी देतो. एवढचं नव्हे तर कौतुकाने
त्याच्या मागे बसून प्रवासही करतो. अशाप्रकारे मीच जर माझ्या मुलाला नियमबाह्य
वागण्यास शिकवत असेन तर त्याने मोठेपणी नियमांचे पालन करावे ही अपेक्षा करणे कसं
शक्य आहे? भ्रष्टाचारासाठी आंदोलन करणारे आम्ही जर असे भ्रष्ट असू तर ते आंदोलन
फसल्यास नवल नाही. उगाच दुसर्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? भारतातील
भ्रष्टाचार जर खरोखरच आपल्याला नाहीसा करायचा असेल तर सुरुवात आपल्यापासूनच केली
पाहिजे.माझ्या एकट्याने सुधारून काय होणार असे म्हणून चालणार नाही. कुणी तरी
सुरुवातीचे पाऊल टाकल्याशिवाय मार्ग तयार होत नाही. सुरवातीचा प्रवास खडतर असतो;
पण वाट मळल्यावर त्याची अमृतफळे पुढच्या पिढीला चाखायला मिळतात.प्रत्येक घरात
जेव्हा तात्कालीक फायद्याच्या विचारांपेक्षा दूरगामी फायद्याचे शिक्षण आणि संस्कार
दिले जातील तेव्हाच भारताचे भविष्य उज्वल होईल.
पलायनवादामध्ये
जीवन नाही. चूक झाली वा ठोकर खाल्ली तर हसत हसत त्याचे परिणाम भोगले पाहिजेत.
त्यापासून पळून जाता कामा नये.वागण्यात चुका होतील म्हणून का कोणी जगायचे आणि
समाजात वावरायचे सोडून देते? यश आणि अपयश तराजूत घालून जीवनाचे मोल ठरवता येत
नाही. डोळे उघडे ठेवून, सद्सदविवेकबुध्दीला स्मरून जर आचरण केलं तर दुसर्यांचं
अनुकरण आणि अनुसरण करण्याची गरज लागणार नाही. जगाच्या मुक्त शाळेत आपणच आपले गुरू
आणि आपणच आपले विद्यार्थी असतो. आपल्या प्रयत्नांची दिशा योग्य असेल तर आपण
यशाच्या जवळ जातो;अयोग्य असेल तर अपयशाकडे. एवढं सोपं आहे हे. आपणच जीवनात
गुंतागुंत निर्माण करून आपल्याला दु:खी
करत असतो. मात्र दोष लोकांना देतो आणि खापर परिस्थितीवर फोडतो. ह्यालाच पलायनवाद
म्हणतात.
गेल्यावर्षी
व्हॅलेंटाइन डे मंगळवारी आला होता. त्यामुळे अनेक प्रेमिकांनी जोड्याने जावून
सिध्दीविनायकाचे दर्शन घेण्यासाठी आणि सिध्दीविनायक पावून आपल्याप्रेमाचं रुपांतर
लग्नात व्हावं म्हणून साकडं घालण्यासाठी व्हॅलेंटाइन डेला प्रचंड गर्दी केली होती.
दोन धर्माचं हे नामी कॉकटेल प्रेमिकांनी चांगलचं साधलं.पण खरं तर प्रेमिकांना
गणपतीपेक्षा श्रीकृष्ण जवळचा वाटायला हवा.श्रीकृष्णाला सोळासहत्र नारी तर गणपतीला
फक्त दोनच! दुसरं महत्वाचं म्हणजे, आपलंलग्न शिशुपालाशी लावून देण्याचं घाटत आहे
हे रुक्मिणीला कळताच तिने श्रीकृष्णाला आपलं ‘हरण’ म्हणजेच पळवून नेण्याविषयी पत्र
लिहीलं. हे बहुदा जगातील पहिलंवहिलं प्रेमपत्र असावं.श्रीकृष्णाने ताबडतोब तिच्या
पत्राला प्रतिसाद देवून तिचं हरण केलं. म्हणून खरंतर आपल्या संस्कृतीप्रमाणे
व्हॅलेंटाइन डे हा गोकुळाष्टमीला साजरा करायला हवा. पण आपण पडलो साहेबाचे गुलाम.
आपली मानसिकता अजुनही पश्चिमेकडे तोंड वळवून आहे. ह्यातली खरी गोम ही आहे की,
वस्तूंच्या मार्केटिंगच्या दृष्टीने पावसाळ्यातील गोकुळाष्टमी सोयीची नाही.
आपल्यापैकी
अनेकांचा किती वेळ टीव्हीच्या तथ्यहीन मालीका पहाण्यात जातो, मोबाईल कानाला लावून
किती वेळ भान हरपून आपण बोलत असतो,देव दर्शनाच्या रांगामध्ये उभे राहून महत्वाचा
किती वेळ घालवतो; याचा विचार केला तर आपल्याला नेमून दिलेले काम करण्यात आपण कमी
का पडतो,याचा अंदाज बांधणे अवघड नाही. नवनवीन घड्याळे कितीही आली तरी आणि कितीही
अचुकपणे वेळ दाखवत असली तरी, ज्याला वेळेची अजिबात किंमत नाही त्याच्या दृष्टीने विज्ञानातील
ही प्रगती म्हणजे निरर्थकच म्हणावी लागेल. यावरून हे लक्षात घेतले पाहीजे की
घड्याळ महत्वाचे नसून वेळ महत्वाची आहे.
शब्द उच्चारणारी
बिनहाडाची जीभ अगदी सहजपणे कुणालाही खिळखिळं करून सोडते.
जीव लावणारे शब्द
आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात.
शब्द प्रेम देतात... शब्द
प्रेरणा देतात...शब्द यश देतात.
शब्द नाव देतात... शब्द ओळख देतात...शब्द नातं
देतात.
शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी
भावना देतात.
शब्दांचं मोल जपलं की आपलं
आयुष्यही अनमोल होतं.
आज जग एवढे
व्यवहारिक,रुक्ष आणि रखरखीत झालं आहे की, हळुवारपणा, संवेदनाशीलता माणुसकी,
माझ्यात शिरली तर मला या जगात जगता येणार नाही असं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण
झाली आहे. आणि दुर्दैव म्हणजे ही परिस्थिती आपणच निर्माण केली आहे. लहानपणी आपण कविता
गुणगुणायचो,आकाशातील तारे पहात मोठ्यांकडून गोष्टी ऐकत झोपी जायचो. आजची मुले
मात्र सिनेमाच्या गाण्यांवर आणि नाचांवर थिरकत, चित्रपटातील तार्यांचे आदर्श
गिरवत मोठी होताहेत. हाणामारीपासून दूर रहाणारे आपण मात्र मुलांना संगणकावर
हाणामारीचे खेळ आणून देत आहोत. आपण त्यांच्या हाती करीयरची पुस्तके देऊन त्यांना
भविष्यात यश आणि जास्तीत जास्त पैसा मिळवण्याच्या शर्यतीत उतरवलेय.एक सुसंकृत
वसाहत निर्माण करण्याच्या नावाखाली हिरवेगार सजीव जंगल तोडून ,सदैव सळसळणारा
समुद्र आणि खाड्या बुजवून आपण इमारतींचे कॉंक्रीटचे जंगल,मॉल्स, मल्टीप्लेक्स
इत्यादींची चकचकीत वसाहत तयार करण्याचे काम चालू केले आहे.पण यातून निर्माण होत
आहे ते असंवेदनाशीलतेचे ग्लोबल वॉर्मिंग. तेव्हा वेळीच मुलांच्या हाती पुस्तके
द्या, जीवघेण्या स्पर्धेतून बाहेर काढून त्यांच्या कलाने त्यांना वाढू द्या. नाहीतर
निर्माण होणारी असंवेदनाशील पुढची पिढी सगळ्या जुन्या संवेदनाशील गोष्टी फेकून
देईल... अगदी तुम्हालाही. म्हणून मुलांवर एवढं टोकाचं प्रेम करू नका की त्यांची
वाढ खुंटेल.
आपल्या सगळ्यांच्या
आयुष्यात ताणतणाव का निर्माण होतात? कारण आपलं आयुष्य अनेक अपेक्षांनीच आपण
गुंतागुंतीचं करून ठेवत असतो. कसं ते एका उदाहरणाने स्पष्ट करतो.समजा तुम्ही एका
मेळाव्यात सहभागी झाला अहात. तुमचे अनेक मित्रही तिथे आले आहेत. एका टेबलावर
बासुंदीचे कप भरून ठेवले आहेत. त्यातील काही कप सुंदर कलाकुसर केलेले आहेत तर काही
साधेच. तुम्हाला त्या बासुंदीचा आस्वाद घेण्यासाठी यजमानांनी सांगितले, तेव्हा
तुम्ही कोणता कप हाती घेतला? तुमच्यापैकी 99% लोकांनी पटकन सुंदर कलाकुसर केलेले
कप उचलले. आणि साधे कप मागे राहिले. यावरून काय निष्कर्ष निघतो?
तुम्हाला तुमच्यासाठी नेहमी
चांगलं तेच हवं असतं. हे ठीक आहे. पण हेच तुमच्या तणावाचं कारण असतं, हे तुमच्या
लक्षातही येत नाही. तुम्ही ज्याचा आस्वाद घेता त्या बासुंदीच्या चवीचा कप
चांगला-वाईट असण्याशी काहीही संबंध नाही. तुम्ही कलाकुसरवाला सुंदर कप घेतला काय
किंवा साधाकप घेतला त्यातील बासुंदीची चव तीच रहाणार असते. महत्वाचं काय तर
बासुंदी. पण तिच्यापेक्षा तुम्हाला कपांनीच अधिक भुलवलं आणि तुम्ही कपांकडे
धावलात. इतकंच नाहीतर प्रत्येकाची नजर दुसर्याला कुठला कप मिळाला याकडे होती. आणि
आपण सुंदर कप पटकावल्याचं समाधान तुमच्या चेहर्यावर दिसत होतं.
लक्षात घ्या,
आयुष्य हे बासुंदीसारखं आहे आणि तुमची नोकरी, पैसा, समाजातलं स्थान हे कपासारखं.
ती फक्त साधनं आहेत तुमचं आयुष्य तोलून धरणारी. हे कप ना तुमची वैचारिकता बदलू
शकत, ना तुमच्या आयुष्याला आकार देतात. पण अनेकदा काय होतं की आपण कपांकडेच जास्त लक्ष
देतो. आणि प्रत्यक्ष आयुष्याचा...बासुंदीचा आस्वाद घेण्याकडे दुर्लक्ष करतो. आनंदी
माणसाकडे सगळं काही चांगलं असतं असं नाही. पण सगळ्या काहीतून तो चांगलं निर्माण
करण्याचा प्रयत्न करतो हे नक्की.म्हणून म्हणतो, साधेपणानं जगा, उदारपणे प्रेम करा,
ममत्वाने बोला आणि बासुंदीचा आस्वाद घ्या.
आजकालचा सुशिक्षित (?) वर्ग
‘सत्यनारायणाची महापुजा’ मनोभावे करतांना दिसतो. खरं म्हणजे सत्यनारायण हा देव
पुरातनकाळी हिंदूधर्मात कधीच अस्तित्वात नव्हता. पुराण काळातच नाही तर ज्ञानेश्वर
आणि तुकारामांच्या काळातही नाही.म्हणूनच वारकरी परंपरेत ही पुजा कुठेच नाही. शिवाजी
महाराजांनी कधीही सत्यनारायण केला नाही. की गणेशभक्त पेशव्यांनीही कधी सत्यनारायण
केल्याचे कुठेही ऐतिहासीक दाखले नाहीत. पेशवाई संपुष्टात आल्यावर पुरोहीत वर्गाने
स्वत:च्या पोटापाण्याची सोय करण्यासाठी बंगालमधून सत्यनारायणाला आयात केला. कारण
पेशवाईत मिळणारा रमणा आता इंग्रजांच्या काळात थांबला होता.
सुमारे 200 वर्षापुर्वी बंगालमध्ये ‘सत्येनपीर’ नावाचा
मुस्लीम दर्गा होता. या पीराची पुजाअर्चा करण्यासाठी आणि प्रसाद अर्पण करण्यासाठी जसे
मुसलमान जमत तसेच हिंदूही. पुढे हिंदू-मुसलमानात तेढ निर्माण झाल्यावर हिंदूंनी या
दर्ग्यात जाण्याऐवजी पर्यायी पुजा करण्यास सुरवात केली. त्यासाठी सत्येन मधल्या
‘सत्ये’चा ‘सत्य’ झाला आणि ‘न’चा ‘नारायण’. अशाप्रकारे सत्यनारायणाची निर्मिती
करून मोठ्याप्रमाणात पुजा करायला सुरवात केली. इकडे महाराष्ट्रातील पुरोहीतांना
त्याचा सुगावा लागताच त्यांनी ही पुजा बंगालातून महाराष्ट्रात आणली.त्यासंबधीच्या
पोथ्या लिहील्या. त्याकाळी ब्राम्हण हेच सुशिक्षित असल्यामुळे, त्यांनी हा देव
पुराणकालीन वाटावा म्हणून स्कंध पुराणात सत्यनारायणाची कथा घुसवली आणि प्राचिनतेचा
पुरावा तयार केला.[संदर्भ : महादेवशास्त्री जोशी यांनी लिहीलेला ‘मुलांचा
संस्कृतीकोश’]
8 नोव्हेंबर 1956 रोजी
वांद्र्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गाडगेबाबांचे शेवटचे प्रवचन झाले.[ योगायोगाने
त्यांच्या आवाजातील ही टेप माझ्याकडे आहे.] तिथे त्यांना सत्यनारायणाची पुजा
झालेली दिसली. तेव्हा ते त्या लोकांवर भडकून म्हणाले, “ तुमचा हा सत्यनारायण
बुडालेल्या नौका वर काढतो ना, मग नुकतीच मुंबई बंदराजवळ एक सोन्याच्या वीटांनी
भरलेली नौका बुडालेली आहे; ती वर काढ म्हणावं. निघाले सारे हाप मँड सत्यनारायण
करायला.”
प्रबोधनकार ठाकरेंनाही
कुणीतरी सत्यनारायणाच्या पुजेला बोलावले तेव्हा ते गरजले, “ हे थोतांड ताबडतोब बंद
करा. संकटाचे निवारण करणारा म्हणून सत्यनारायण करायचा तर त्याने आधी संकट आणलेच
कसे हा जाब त्याला विचारायला हवा. तेव्हा हे लफडे घराबाहेर फेकून द्या.”
तेव्हा माझ्या
मित्रांनो, हा इतिहास समजून घ्या आणि तुम्हीच विचार करा. वैज्ञानिक दृष्टीकोन
स्विकारा आणि कर्मकांडाला देऊ नका थारा.
नारळीकर संख्या
जगप्रसिध्द शात्रज्ञ जयंत
नारळीकर लिखीत ‘चार महानगरातील माझे विश्व’ या पुस्तकात त्यांनी लिहीले आहे की,
पंतप्रधान सल्लागार समितीत असतांना एकदा बैठकीसाठी दिल्लीला जावे लागले. बैठक ज्या
कक्षात होती त्या कक्षाचा क्रमांक होता 153. तत्काळ त्यांच्यातील गणिती जागा झाला.
आणि 153 संख्येचं वैशिष्ठ्य त्यांच्या लक्षात आलं. 153 ह्या संख्येतील प्रत्येक
अंकाचा घन करून येणार्या संख्यांची बेरीज केली असता ती 153च येते.
153 = 13
+ 53 + 33 = 1 + 125 + 27 = 153.
जशी 1729 = 103
+ 93 = 123 + 13 = 1729 ही संख्या रामानुजन
संख्या म्हणून प्रसिध्द पावली तशीच 153 ही संख्याही नारळीकर संख्या म्हणून
प्रसिध्द व्हायला हवी. तेव्हा माझ्या भारतीय बंधु आणि भगिनींनो आपण सर्वांनी मिळून
153 ही संख्या नारळीकर संख्या म्हणून सर्वतोमुखी करूया; असे अवाहन करीत
आहे.
लग्न हे फक्त दोन
व्यक्तींचे नसून दोन व्यक्तिमत्वांचे असते. आणि केवळ लग्नसंस्थेमुळे ही दोन वेगवेगळी
व्यक्तिमत्वे एका छताखाली रहायला लागतात. पण आपल्यात मतभिन्नता असणारच हे गृहीत
धरून जर दोघांनीही संवादाचा प्रयत्न केला तर वादाचा भडका उडणार नाही किवा तो कमीत
कमी राहील.मुळात भडका उडण्याचे कारण फक्त मतभिन्नता नसून आपली मते जोडीदारावर
लादण्याचा प्रयत्न करणे हे असते. उपजत ईगो प्रवृत्तीमुळे पती-पत्नीच्या नात्यात
संवादातून विसंवादाकडे वाटचाल होण्यात वेळ लागत नाही. तेव्हा संयम आणि ईगोचे शमन
करण्यास शिकणं महत्वाचं असतं. आणि ही जबाबदारी दोघांची असते हे वेगळं सांगणे न
लगे.
पुष्कळदा भूतकाळाला
उगाळत पती-पत्नी वरचढ आवाजात अगदी हिरीरीने वाद घालत असतात तेव्हा खरंतर एकमेकांचे
बोलणे ते दोघेही ऐकत नसतात.पण त्याचवेळी शेजारी मात्र कान टवकारून प्रत्येक शब्द
मजेत ऐकत असतात. तेव्हा भूतकाळ विसरणं महत्वाचं. कारण हे भूतकाळाचं भूतच आपलं
वर्तमान दूषीत करून भविष्यात अंधकार निर्माण करू शकतं. तेव्हा विसंवादाचं Ctrl बटण
दाबून संवादाच Alt बटण दाबावं आणि भूतकाळाला Delete करावं. हा Task managerच आपला भविष्यकाळ सुखाचा
करणार असतो. हे लक्षात असू द्यावं. सुख म्हणजे दुखा:चा अभाव
नसून, शांत डोक्याने दुखा:चे अस्तित्व मान्य करून त्रयस्थपणे जगण्याची अनुभूती
घेणं हेच असतं.
श्रध्देला जोपर्यंत
विवेकाचे अस्तर असते तोपर्यंत श्रध्दा माणसाच्या जीवनाला समृध्द करणार्या उर्जेचे
काम करते.पण विवेकशून्य श्रध्दा माणसाच्या जीवनात भावनिक कोलाहल निर्माण करते.
त्याचे जीवन कडेलोटाच्या काठावर आणून उभे करते. श्रध्देच्या लाटेवर स्वार होऊन
माणूस जेव्हा बुध्दी व विवेक हरवून बसतो तेव्हा प्रयत्नवादाची कवाडे बंद
होतात.श्रध्देमुळे माणसाची तौलनिक विचारशक्ती कुंठीत होता कामा नये. माणसाला जसे
भावभावनांचे व्यवस्थापन करता येते तसे आपल्या श्रध्दाभावाचेही व्यवस्थापन करता आले पाहिजे. श्रध्देमुळे
दिलासा मिळत असला तरी तिच्या आधारे इतरांवर [ बाबा,बापू,महाराज इत्यादी लोक] भरवसा
टाकून वाटचाल करणेही योग्य नाही.
बुध्दीनिष्ठा आणि
विज्ञाननिष्ठा यांच्या इतकाच जीवनात भावनांचाही पाझर असायला हवा. भावनाशून्य जीवन
रुक्ष व कोरडे होईल. पण म्हणून नुसत्या श्रध्देवर विसंबून जीवनाची वाटचाल माणसाला
उत्कर्षाच्या वाटेने घेऊन जाऊ शकणार नाही; हीही तितकेच खरे.
सेंटर फॉर सायंस
अँड एंवायरमेंट,दिल्लीने चाचणीसाठी घेतलेल्या चीनच्या खेळण्यांमध्ये 54% आणि
तैवानच्या खेळण्यांमध्ये 100% प्रमाणाबाहेर विषारी रासायनिक पदार्थ आढळले. भडक
रंगाच्या खेळण्यात कॅडमियमचा वापर केला जातो. तो मेंदूसाठी घातक असतो. चामड्याच्या
वस्तूंमध्ये वापरलेल्या डायचा तस्रेच प्लॅस्टीकला मऊकरण्यासाठी वापरलेल्या थायलेटमुळे
फुफ्फुसांवर परिणाम होतो.त्याचप्रमाणे अँलर्जी, दम्याचा धोका असतो. लहान मुलांच्या
ज्वेलरीत प्रमाणाबाहेरशिसे वापरले जाते. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला धोका
पोहोचतो. या खेळण्यांची किंमत कमी असल्याने निकृष्ट दर्जाचा रंग आणि प्लॅस्टीकचा
वापर केला जातो. गडद रंगामध्ये टॉक्सिन असते.त्यामुळे ही खेळणी लहानग्यांनी तोंडात
घातल्यावर विषबाधा होते. तसेच त्यांच्या त्वचेवरही पुरळ येणे,अँलर्जी होणे असे
परिणाम होतात. त्यातूनच मग जुलाब, गॅस्ट्रो हे आजार होतात.यावरून आपण स्वस्त
खेळण्यांच्या मोहात पडायचे की थोडीशी महाग पण सुरक्षित खेळणी आपल्या लाडक्यांना
द्यायची हे आपल्यासारख्या सुशिक्षितांनी ठरवायची वेळ आली आहे. पुन्हा चीनचा
व्यापार वाढवून आपण नकळत आपल्या शत्रू राष्ट्राला मदतच करतो हेही लक्षात घ्ययला
हवे.
कळते पण वळतनाही
तंत्रज्ञान म्हणजे जगावरनियंत्रण करण्याची
कृती.
विज्ञान असते निसर्गनिर्मित
तंत्रज्ञान असते मानव निर्मित.
विज्ञानाचा शेवट होतोतत्वज्ञानात
तंत्रज्ञानाचा शेवट होतो मनवी मनात.
म्हणूनच
विज्ञान नाहीशाप नाही वरदान
तंत्रज्ञान मात्र शापही आणि वरदान.
विज्ञान दाखवते नेहमीप्रगतीची वाट
तंत्रज्ञान मात्र कधीकधी धरतो अधोगतीची वाट.
विज्ञानाचे असेहे दुधारी शस्त्र
तंत्रज्ञानाचे मात्र कधीकधीहोतेअस्त्र.
विज्ञान उजळते निसर्गाच्या दशदिशा
मानवी मन ठरवतेतंत्रज्ञानाची दिशा.
विज्ञानाच्या पोटी तंत्रज्ञाने जन्मती
तंत्रज्ञानाचेसुकाणू मात्र मानवाच्या हाती.
म्हणून प्रार्थना करीतो हे जगदीशा ,
मानवाच्या उद्धारा दावी सुयोग्य दिशा.
एकवीसाव्या
शतकात वावराणारा जो तो उठून पळतो आहे.जग हे पळणारयांची वस्ती झाले आहे. इथे
थांबायला आणि थांबलोच तर अंतरात्म्याचा आवाज ऐकायला कोणाला सवड नाही. आयुष्यात
थोडे थबकून मागे वळून पाहीले तर आपल्याला आपलाच एक वेगळाच चेहरा दिसतो. त्याच्या
डोळ्यात चमक आसते. भविष्याची स्वप्ने असतात. धावत जावून टेकडी चढण्यापासून
शीळ-गीते वाजविण्यापर्यंत काहीही करण्याची धमक असते. परंतू पैसा-आडका, घरदार,
गाडी, कपडे इत्यादी मिळवण्याच्या कैफात आपण आपल्यालाच विसरून जातो.
जेव्हा
हे सगळे हवे असते, तेव्हा फक्त आपल्यासारखे अपुरया पैशात जमवाजमव करणारे जिवलग
असतात.... आणि पुढे आयुष्यातजेव्हा ते सारे मिळते,तेव्हा ते दूरदेशी गेलेले
असतात.आयुष्यात खूप काही मिळवण्यासाठी आपण दिलेली फार मोठी किंमत आसते. पैशाने आपण
वस्तू विकत घ्यायला लागतो...पण हा फक्त व्यवहार आसतो. त्या नव्या कोरया घरातल्या
आरशात जर कधी सवडीने डोकावलो तर आपले आपणच दचकतो.म्हणून आपणच आपल्याला कधीतरी फोन
लावावा आणि स्वत:लाच काही प्रश्न विचारावेत....
1]
काय खुष आहेस जेथवर पोहोचला आहेस त्यापासून?
2] हेच हवे होटल का 30 वर्षापूर्वी?
3] हे मिळवतांना काही वाकडी वाटतर केली
नाहीस नं?
जर पहील्या दोन प्रश्नांची उत्तरे
होकरार्थी आणि तिसरयाचे नकरार्थी आले, तर तुमच्यासारखे भग्यवान तुम्हीच. पण जर एखादे
उत्तर नकरार्थी आले, तर आयुष्य सावरायची नेमकी संधी गवसते.तो क्षण महात्वाचा. हे
जेव्हा जाणवते तेव्हा आपण जिंकतो.आणि पुन्हा उभारी घेवून आनंद देणारया छंदांचा
पठपुरावा करू लागतो.तसे प्रत्येकाचे क्षितीज वेगळे असते.त्याचा ध्यास घेणे
महत्वाचे.
शहाणपणा
आपण मुर्ख आहोत
असे जगात कुणालाच वाटत नाही.
दुसरा कोणीतरी
शहाणा आसू शकतो,
यावर जगात
कुणाचाच विश्वास नाही.
आपल्याला
कोणीतरी मुर्ख बनवू शकतो
हे जगात कोणीच
कबुल करत नाही.
आणि आपण
वाट्टेल त्याला सहज मुर्ख बनवू शकतो,
असे जगात
प्रत्येकाला वाटत असते.
पण
प्रत्यक्षात
आपण ज्यांना मुर्ख समजतो ते शहाणे आसू शकतात.
आणि ज्यांना
आपण शहाणे समजतो ते मुर्ख आसू शकतात.
म्हणूनच जगात
मुर्खपणा साजरा करण्यासाठी
१ एप्रिल हा
दिवस आहे.
आता मला सांगा,
असा एखादा दिवस
शहाणपणा साजरा करण्यासाठी
का नाही?
स्पष्ट आहे की
या जगात शहाणा कुणीच नाही.
‘ब्रेकके बाद’
‘ब्रेकके बाद’असे शब्द कानावर पडले की,
आपण टीव्ही समोरून पटकन् उठून
छोटीमोठी कामे उरकून घेतो.
घरातले लहान मुल आपले टीव्हीचे हे वेड पहात असते.
घरात टीव्ही चोवीसतास तिन्हीत्रिकाळ
नळ गळत असल्यासारखा सुरूच असतो.
हलती चित्रे लहान मुलांचे सहज लक्ष वेधून घेतात.
आपण मात्र मुलांच्या मागे ‘अभ्यास कर’चा घोषा लावतो.
खरंतर आपल्या सवयींचे अनुकरण मुले करत असतात.
याचा अर्थ टीव्ही पाहूच नये असं नाही.
केव्हा आणि कितीवेळ पहावा हे आपणच ठरवलं पाहिजे.
लहानमुलं आईबाबांमध्ये आपला रोल मॉडेल शोधत असतात.
तेव्हा त्यांना निष्क्रीय बनवायचे की सक्रीय
हे आपल्या वागण्यावर अवलंबून असते.
मुलांना दोष देण्यात अर्थ नाही;
आपण आपल्या आत डोकावून पाहुया.
आत्मशोध घेऊया.
आभासी जीवन
मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच
पडतात..
कुणी 'orkut'
वर तर कुणी 'Facebook'
वर जमतात..
...प्रत्यक्ष भेटीत सगळेच
बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय 'chat'
वरच संपलेले असतात..
मग 'chat'
वर भेटूच " याचं Promise
होतं..
आणि संभाषणातून 'Sign
out' के लं जातं. ..
'लाल'
'हिरव्या '
दिव्यांच्या गर्दित मग
हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही
सैल सुटायला होतं..
'Available' आणि 'Busy'
मध्ये
प्रत्येकाचा status
घुटमळत राहतो...
आपणहून add
केलेल्या मित्रपासून
लपण्याकरिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..
ताप आल्याच आजकाल आईच्या
आधी 'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take
Care' च्या डोसेजनीच तापालाही
पळायला होतं..
मनातलं सगळं 'Facebook'
वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?
कधीतरी वाटतं पुन्हा
कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile'
ना हास्यानी replace
करावं..
शब्दापेक्षा सोबतीचं
सामर्थ्य जास्त असतं
मैत्रीचं खरं समाधान
खंद्यावरच्या हातात असतं....
चला तर पूर्वी चे दिवस
पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology
पासून जपून ठेवुया ......
1] रामदेवबाबांचे पुर्ण नाव: रामकिशन
यादव,
रहाणार- महेन्द्रगड,हरीयाणा.
2] शिक्षण- इयत्ता
आठवी पास.
3] वय- 36 वर्षे.
[शोध पत्रकारीता करणार्या पत्रकारांनी
लिहीलेल्या अनेक लेखांमधुन मिळालेली ही वैयक्तीक माहीती आपल्या ज्ञानात निश्चितच
भर पाडेल.]
रामदेवबाबांचा विचार
आणि व्यवहार
रामदेवबाबा योगाभ्यासाने मन आणि शरीरावर नयंत्रण ठेवता येते. ह्या
तत्वाचा गेली दहाबारावर्षे भारतभर फिरून प्रचार आणि प्रसार करत असतात. त्यांच्या
झंझावाती दौर्यांना प्रसारमाध्यमांकडून प्रतिसादही चांगला मिळतो. त्यामुळे
त्यांचा भक्तगणही बराच मोठा आहे. त्या
जोरावर त्यांनी काळ्यापैशाविरूध्द आंदोलन केले. ही
चांगली घटना होती.
परंतु सरकारी दट्ट्या बसल्यावर ना ते
मनावर काबू ठेऊ शकले, ना शरीरावर.त्या
रात्री हजारो समर्थकांची पर्वा न करता स्त्री वेशात पळ काढायचा
प्रयत्न केला. खरा
सत्याग्रही आपल्या अनुयायांच्या पुढे ठामपणे उभा राहून प्रतिकार करण्यास सज्ज होतो.त्यानी
मात्र पळपुटेपणा केला--- एखाद्या सामान्य माणसासारखा.वरून
शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा दाखला देऊन कांगावखोरपणा केला. शिवाजी
महाराज कधीही अहंमान्यपणे वागले नाहीत की स्त्री वेशात जाऊन स्त्रियांचा अपमान
केला नाही.सरकारवर आगपाखड करून त्यांचे स्वतःच्या
रागावरही नियंत्रण नाही हेच त्यांनी सार्या जगाला दाखवून दिले.आपल्यावर
अत्याचार करणार्याचा सत्यानाश करण्याची भाषा करणार्याला योगी का म्हणावे?
योगाभ्यासाने शरीरावर नयंत्रण ठेवता येते हे
सिध्द करण्याची वेळ जेव्हा आमरण उपोषणाची घोषणा कल्यावर आली; तेव्हा
आठ दिवसही त्यांचे शरीर त्यांना साथ देईनासे झाले.म्हणजेच
ते उपोषण करण्याइतपतही फिट नाहीत हे सार्या जगाने पाहीले. बरे
झाले;या
निमीत्ताने ऋषीमुनी योगामुळे अनेक दिवस उपाशी राहू शकतात,त्यांचे
तेज वाढते हा समज तरी खोटा ठरला.योगाभ्यास म्हणजे
आरोग्याची गुरूकिल्ली असे समजून शरीरावर वाट्टेल ते अत्याचार करणार्यांना यापासून
काही बोध घेता येईल. हेही नसे थोडके.
मनाच्या सामर्थ्यावर भाषण देणार्या बाबांनी
स्वसंरक्षणार्थ अकरा हजारांची सशस्त्र सेना उभारण्याची घोषणा करणे म्हणजे ते किती
उथळ,
उतावळ्या आणि अपरिपक्व विचारांचे आहेत
हेच दिसले. वागण्यात आणि बोलण्यात किती विरोधाभास
हा!
अशी माणसे आपल्या समाजाचे नेतृत्व करतात
यावरून आपला समाजही भंपक,अपरिपक्व आणि दुटप्पी
आहे असे सिध्द होत नाही काय?
तसे पहाता आजतागायत या बाबांनी
कुठल्याप्रकारची समाजसेवा केली आहे? हा
ही संशोधनाचा विषय आहे. कारण त्यांची
योगाभ्यास शिबीरे ही प्रचंड फी घेऊन पार पाडली जातात. दुसरे
असे की त्यांच्या औषधांच्या किमतीही भ्ररपूर असतात. याचाच
अर्थ ते एक उत्तम व्यवसायिक ‘व्यायाम शिक्षक’ आहेत.आक्षेप
आहे तो त्यांच्या समाजसेवेच्या नावाखाली चाललेल्या भोंदूगिरीला.साधी
रहाणी आणि उच्च विचारसरणी ह्या तत्वाचा प्रसार करणार्या बाबांकडे मात्र एव्हढ्या
कमी काळात 1100 कोटींची संपत्ती असावी या विरोधाभासाला
काय म्हणावे? लोकांच्या व्यवहारात पारदर्शकता असली
पाहीजे म्हणणार्या बाबांच्या व्यवहारात किती पारदर्शकता आहे हे ही तपासणे आवश्यक
आहे.
काळ्या पैशाच्या विरोधात आंदोलन करणे ही
स्वागताहार्य गोष्ट असली;तरी प्रत्येकाने आपले
सर्व व्यवहार स्वच्छ आहेत का ह्याचा स्वतःच्या मनाशी प्रामाणिकपणे धांडोळा घ्यावा. जर
उत्तर नकारार्थी असेल,तर आपण किती परस्पर
विरोधी वागतो ह्याचा तरी विचार करणार आहोत का? भ्रष्टाचारावर
घसा खरवडून बोलणार्यांची संख्या जिथे जास्त असते; तिथेच
भ्रष्टाचार जास्त असतो. ‘इच्छा नसूनही हे सगळे
करावे लागते’ असे म्हणणारी माणसे ज्या समाजात आहेत
तिथे भ्रष्टाचारावर उपाय सापडणे कठीण आहे. भ्रष्टाचारविरहीत
समाज कधीच नव्हता. परंतू सतत भ्रष्टाचाराच्या विरोधात
बोलणार्या समाजाला केवळ बोलण्यातच रस असतो.कारण
आपण केलेल्या भ्रष्टाचाराची आतून त्याला टोचणी असते. ही
टोचणी काढून प्रत्येकाने कितीही त्रास झाला तरी स्वच्छ आणि पारदर्शी वागण्याचे
ठरवले तर असे आंदोलन करण्याची वेळच येणार नाही.प्रयत्न
न करता इतरांवर दोषारोप करणे हे चुकीचे नाही काय?माझ्याएकट्याने
काय होणार असे म्हणुन कसे चालेल?स्वच्छ व्यवहाराची
सुरवात होणे महत्वाचे.एव्ह्ढे जरी आपण ह्या
घटनेवरून शिकलो तर प्रगतीचा पुढचा टप्पा गाठला असे होईल.पहा
जमते का?
वास्तु नव्हे ही तर वस्तु
आजचा तथाकथीत सुशिक्षीत माणूस वास्तुशास्त्राच्या किती
अहारी गेला आहे याचा एक मासलेवाईक नमुनादेत आहे...........
वांद्र्याच्या एका प्रसिध्द बिल्डरकडे बॉलीवूडमधील एका
प्रसिध्द नायक नबाब पुत्राने एक फ्लॅट बुक केला. परंतु त्याच्या
प्रेयसीने सांगितले की येथे शेजारच्या इमारतीतील माणसे आपल्या घरात सहज डोकावू
शकतात.
तेव्हा इथे काही मी रहायला येणार नाही. झाले त्या नायकाने बिल्डरकडे फ्लॅटचे पैसे परत मागितले. बिल्डर हवालदील झाला. कारण त्या
इमारतीत हा नायक रहायला येणार म्हणून त्याने जागेचे भाव वाढवून इतरांना फ्लॅटस
विकले होते. आता काय करायचे हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहीला.नायकाला पैसे परत दिले तर इतर लोकही पैसे मागतील; ही भिती त्याला वाटू लागली. अशा चिंतेत
असतांना त्याला कुणीतरी सुचवले की तू अमुकअमुक व्यक्तीकडे जा. ती व्यक्ती तुला यातून निश्चित काहीतरी मार्ग काढून देईल.
ताबडतोब हा बिल्डर त्या
बाईकडे गेला. आणि ही सर्व कहाणी सांगितली. त्या बाईने
त्याला असे सांगितले की, तू त्या
नायकाकडे एका वास्तुशात्र्याला पाठव.वास्तुशात्र्याला
मी सांगते त्याप्रमाणे बोलायला सांग की,’वास्तुशात्रानुसार
हे घर तुला लाभदायक आहे.जर तू हे घर
सोडलेस तर तुझ्या करीअरमध्ये मोठे प्रश्न निर्माण होतील.एकदा का करीअर डळमळीत झाली तर तुला त्यातून वर येणे जमणं कठीण आहे. तेव्हा तू हे घर सोडायचे की नाही यावर विचार कर’.वास्तुशात्र्याचे हे बोलणे ऐकल्यावर नायक नबाब पुत्र खरोखरच विचारात पडला. दोनचार दिवसांनी त्याने बिल्डरला सांगितले की,ते घर सोडणार
नाही.अणि बिल्डरचे काम फत्ते झाले.
ही गोष्ट मला खुद्द त्या बाईनेच सांगितली.यावरून लक्षात
येईल की, वास्तुशात्राच्या अहारी आपला समाज किती गेला आहे. खरं तर घरात भरपूर उजेड येतो की नाही,भिंती,दारं,खिडक्या व्यवस्थित आहेत ना,वीज जोडणी आणि
नळाला पाणी व्यवस्थित आहे ना, घराचा सातबारा
उतारा आणि मालकी हक्क योग्य आहे ना, बांधकाम मजबुत
आहे ना हे पहाणे महत्वाचे.पण आपण
अदृशाच्या भीतीपोटी नको त्या गोष्टी पहात बसतो.मुम्बईत
इंग्रजांनी कुठल्याही वास्तुशात्राचा आधार न घेता बांधलेल्या शंभर वर्षापूर्वीच्या
सुन्दर इमारती आजही दिमाखाने सौन्दर्यलेणं म्हणून उभ्या आहेत. पण मुहूर्त पाहून आणि वास्तुशांत केलेल्या आपल्या इमारती मात्र वीस-पंचवीस वर्षातच गळायला आणि पडायला लागतात.तरीही आपण
वास्तुशात्राच्या खड्ड्यात पडायचे का, याचा विचार
करणार आहोत की नाही?
मुद्राराक्षसाचा विनोद
मराठीतून
लिहितांना काना-मात्रा,आकार-उकार आणि वेलांटया जर चुकीच्या ठिकाणी दिल्या गेल्या
तर काय गमतीजमती घडू शकतात
हे
खालील वाक्यांवरून कळेल.त्यामूळे किती भन्नाट विनोद होतात ते
वाचाच.......................................................................................
1]
युवकांनी व्यसनांपासून प्रवृत्त [परावृत्त] व्हावे.
2]
सर्वांनी
कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित रहावे असे संयोजकातर्फे आव्हान [अवाहन] करण्यात येत
आहे.
3]
या दौर्यावर 25 संभावितांची [संभाव्य] नावे जाहीर करण्यात आली.
4]
पाण्यात बुडून कपाळमोक्ष. [कपाळमोक्ष दगडावर आपटून होतो.]
5]
नगराध्यक्ष दिल्लीला मेल्याने [गेल्याने] त्यांच्याऐवजी उपनगराध्यक्ष स्वागत
करतील. आठ दिवसांनी नगराध्यक्ष परत येतील.
6]
शिवसेनेचा मुत्रालयावर [मंत्रालयावर] मोर्चा.
7]
रेणुकादेवीचे वर्णन कुराणात [पुराणात] केले आहे.
8]
-----पक्षाचे धनसंपर्क [जनसंपर्क] कार्यालय.
9]
विमानतळावर त्यांना निरोध [निरोप] देण्यात आला.
10]
समाजसेवी ----- चे कुटील [कुटीर] उद्योग कार्यालय.
11]
आज ----- या राजकीय नेत्याच्या मद्यवर्ती [मध्यवर्ती] कार्यालयाचे उदघाटन आहे.
12]
महान समाजसेवक धनलालची [धनलालालजी] पारेख यांचा आज सत्कार आहे.
13]
बौध्दिक लेखांसाठी ----- वर्तमानपत्र नियमित चावा. [वाचा]
14]
अर्जुनाला नदीतील परी पातळात [पाताळात] नेत होती.
15] पावसाळ्यात नाला चुंबल्यामूळे [तुंबल्यामूळे] रोगराई पसरली.
कुटूंब लहान परंतू घरे मात्र मोठी/
सुखसोई अधिक पण फुरसत छोटी//
निर्णयक्षमता बेताची पण बुध्दीचे आगार!
अकलेचे अनेक परंतू प्रश्न भारंभार//
औषधे भरपूर पण आरोग्य ढासळलेले/
स्पर्धात्मक युगात मनाने मात्र ढेपाळलेले//
चंद्रावर जाणं सोपं पण शेजारच्याला भेटणं कठीण/
मोबाईलवर भरपूर बोलणं पण प्रत्यक्ष संवाद कठीण//
सर्वच गोष्टींचं प्रमाण मोठं पण दर्जा
घसरलेला/
जमाना फास्टफुडचा पण
पचनाने रोडावलेला//
माणसं उंच पण
चारित्र्य खुजं/
उथळ संबधात मैत्रीचं झालं भजं//
जगातदोन तर्हेची माणसं
असतात. एक रिझल्ट निर्माण करणारे आणि दुसरे रिझन्सनिर्माण करणारे. आयुष्यात आपल्याला
ध्येयापासून विचलीत करणार्या अनेक जागाअसतात, तसे अनेक लोकही असतात. त्यांचे नकारात्मक विचार आपल्याबरोबर
सततअसणारच आहेत. आपल्या सुंदर स्वप्नांपासून रोखणारे अनेक जण भेटणारच आहेत.आपण
त्यांच्याकडे दुर्लक्ष करायला शिकले पाहीजे. रिझन्स निर्माण करणारेलोकांच्या फुकट
सल्ल्याला बळी पडतात. तर रिझल्ट निर्माण करणार्यांना कायहवय काय मिळवायच आहे हे
त्यांनी नक्की ठरवलेलं असतं. त्यांच्या विचारांचीकुवत त्यांनी स्वत:तील गुणदोष
जाणून ठरवलेली असते. स्वत:विषयीच्या अवास्तवकल्पना दूर सारलेल्या असतात. इतरांशी
तुलना करणं ते टाळतात.लोक काय म्हणतीलह्या विचाराला थारा न देता आपल्या ठरवलेल्या
वाटेने ते जातात.म्हणूनच तेरिझल्ट निर्माण करतात. थोडक्यात काय तर आपण काय विचार
करतो त्यावर आपलीकृती ठरत असते. आणि ती कृतीच आपलं आयुष्य घडवत असते.
माणसाने देव या संकल्पनेतून
सुरक्षितता शोधण्याचा प्रयत्न केला आहे.कुणीतरी सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वव्यापी
आपली काळजी करणारा, आपले संरक्षण करणारा आहे. हा विचारदेखिल खूप सुखावह असतो. अशा
देवावर एकदा जबाबदारी टाकली की, माणूस वाटेल तसे जगायला मोकळा होतो. आपण काहीही
केले तरी देव आपल्याला क्षमाच करेल; कारण तो दयावान आहे, करूणामय आहे ही आपणच
देवाला लावलेली बिरूदे त्याला विश्वास देतात. वाटेल तसे जगतांना त्याला देवाची
आठवणही होत नाही. संकटकाळी मात्र देवाचा धावा सुरू होतो.
एकदा एक मनुष्य उंच
कड्यावरून खाली पडला. पडता पडता त्याच्या हाताशी झाडाची एक फांदी लागली. त्याने ती
फांदी पकडून स्वत:ला वाचवले खरे; पण तसाचतो लोंबकळत राहीला. कारण झाड कड्याच्या
बाहेर आलेले होते. तो धार्मिक प्रवृत्तीचा असल्याने त्याने देवाचा धावा सुरू केला.
देवाला त्याची दया आली. देव त्याला म्हणाला, “भक्ता, मी तुला जरूर वाचविन.फक्त तू
ती धरून ठेवलेली फांदी सोड.” परंतु त्या माणसाला ती फांदी सोडवेना व देवही काही
त्याला वाचवेना. त्या माणसाने देवाला सांगितले की, तुझ्यापेक्षा श्रेष्ठ देवाला
पाठवून दे जो मला फांदी न सोडवता वाचवू शकेल.
स्वत:चे प्राण टांगणीला
लागलेले असतांनाही जो माणूस देवाला श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरवतो, तो खरंच धार्मिक
आहे? किंबहूना त्याच्या जागेवर स्वत:ला कल्पुन पहा. आपण सगळेच स्वत:ला धार्मिक म्हणवणार्यांनी
काय केले असते. ऐकले असते का देवाचे? सोडली असती का फांदी? म्हणून देव या संकल्पनेने
माणसाला कितीही सुरक्षित वाटले तरी प्रत्याक्षात तो असुरक्षितच असतो. मग जर आयुष्य
कायम असुरक्षितच असेल तर माणूस अखंडपणे सुरक्षिततेच्या मागे आयुष्यभर का धवतो?
वास्तवाला स्विकारून निरामयपणे आनंदाने आणि विवेकाने जगणे त्याला एवढे कठीण का
वाटते?
म्हणून परिस्थितीशी
झगडून आणि परिस्थितीवर मात करून जगणे यालाच जीवन म्हणतात, हे लाक्षात घेवूया.
भूतकाळ माझा नाही,भविष्यावर
अधिकार नाही.
पण वर्तमानातला प्रत्येक
क्षण फक्त माझ्यासाठीच आहे.
म्हणून तर इंग्रजीत
वर्तमानाला ‘प्रेझेंट’ म्हणतात.
वर्तमानाचं हे बक्षिस आपण
सर्वार्थानं भोगायला हवं.
शुटींगमध्ये मनासारखा नाही
झाला शॉट तर रिटेक असतात.
पण आयुष्यात असे रिटेक घेता
येत नाहीत.
म्हणून प्रत्येक क्षणी वन
टेक ओके व्हावा,
इतकं
प्रसन्न आणि आनंदी जगता यायला हवं.
अहंकारातून
मत्सर, मत्सरातून तिरस्कार आणि तिरस्कारातून क्रोध वाढीला लागतो. माझ्या
संतापामुळे इतर लोक तर बदलत नाहीतच, उलट माझं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. त्यामुळे
मी माझ्या विचारांना बदललं पाहीजे.आणि हे लक्षात ठेवलं पाहीजे की-We have to live in the
world as it is, and not as it should be. त्यामुळे सभोवतालच्या
जगाचा स्वीकार करा आणि स्वत:ला बदला हा पर्याय मी स्वीकारला तर माझं मन:स्वास्थ्य
सुधारेल. म्हणून क्रोध आला तर थोड्यावेळानंतर तटस्थतेने विचारांचं आत्मपरीक्षण
केलं तर तो आवरणं शक्य होतं हे निश्चित! सतत जागृत राहून मनावर आत्मपरीक्षणाचा
अंकुश ठेवला तर विचारांचं भान आणि भावनांवर नियंत्रण मिळवता येईल. ‘तुका म्हणे मना
पाहीजे अंकुश/ नित्य नवा दिस जागृतीचा//
Fear
is the main source of superstitions& one of the main sources of cruelty. To
conquer fear is the beginning of wisdom.
- Bartered Russell.
या
पृथ्वीतलावर मानवजात निर्माण झाल्या क्षणापासूनच माणसाची स्वत:ला सुरक्षित
ठेवण्याची धडपड सुरू आहे. आणि लाखो वर्षानंतरही असुरक्षेची भावना मात्र आजही त्याच्यात
कायम आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात विस्मयकारक प्रगती करूनही मानसशास्त्रीय पातळीवर
मात्र अजूनही मानव स्वत:ला तसाच असुरक्षित समजतोय. कारण मानवासाठी प्रत्याक्षात
नुसते सुरक्षित असणे पुरेसे नाही, तर त्याला आपण सुरक्षित आहोत असे वाटणेदेखिल
आवश्यक असते. परंतु प्रत्यक्षात सुरक्षित असणे आणि सुरक्षित आहोत असे वाटणे ह्या
दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मनुष्याने भौतिक पातळीवर स्वत:ला कितीही
सुरक्षित ठेवले, तरी जोपर्यंत त्याच्या मनाला सुरक्षित वाटत नाही तोपर्यंत त्याची
सुरक्षिततेसाठीची धडपड सुरूच रहाते.
त्यामुळेच
विचार करण्याच्या क्षमतेने मानवाला भौतिक पातळीवर बव्हंशी सुरक्षित केले असले तरी
मानसशास्त्रीय पातळीवर मात्र असुरक्षितच ठेवले आहे. म्हणजे असे की – समजा एकदा
आजार येऊन गेल्यानंतर पुन्हा आजारी तर पडणार नाही ना, या विचाराने माणसाला
असुरक्षित वाटू लगते. किवा आपण नेमून दिलेले काम कितीही चोखपणे केले तरीही आपली
नोकरी तर जाणार नाही ना, हा विचार सतत अस्वस्थ करतो. स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी
त्याने कितीही सपत्ती गोळा केली तरी ही संपत्ती आपल्याला पुरेल ना...आपल्याजवळ
टिकून राहील ना, असे विचार मणसाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण करतात. म्हणूनच
कितीही संपत्ती गोळा केली तरी स6पत्तीचा ह्व्यास मात्र संपत नाही.
एवंच माणसाने
मानसशास्त्रीय पातळीवर सुरक्षितता शोधण्यासाठी शारीरिक बळाचा, अंधविश्वासाचा,
बाबा-गुरूंचा, दगडातील देवाचा फसवा का होईना पण आधार शोधण्याचा प्रयत्न केला
आहे...करतो आहे. खरं तर ज्ञान आणि विवेकाचाच आधार त्याला मानसिक सुरक्षितता देऊ
शकतो. पण हा मार्ग जरा खडतर असल्याने तसेच सतत विचारपुर्वक वागण्याचे आणि जबाबदारीने
जगण्याचे बंधन स्वत:वर घालून घ्यावे लागण्यामुळे माणुस दुसरा सहज सोपा मार्ग दुसर्यावर
अवलंबून रहाणेम्हणजे बाबाबुवांच्या नादी लागणे स्विकारतो. हे म्हणजे आपल्या
आरोग्याची काळजी आपण न करता डॉक्टरांनी कारावी असे म्हणण्यासारखे झाले.
आज
शिक्षणाचा प्रसार झाला असला तरी शिक्षणाने आपला मूळ हेतू साध्य केला आहे काय? असा
प्रश्न आजची सामाजिक परीस्थिती पहाता निर्माण झाला आहे.आपले सामाजिक, सांस्कृतिक
आणि औद्योगिक ऐश्वर्य वाढेल अशी स्थिती आजच्या शिक्षणाने विद्यार्थ्यांत निर्माण
केली आहे काय? एखाद्या गोष्टीचे सप्रमाण विवेचन करू शकेल, सुक्ष्म निरीक्षणातून
काढलेले निष्कर्षधीटपणे मांडू शकेल असे विद्यार्थी आजच्या शिक्षणाने तयार होताहेत
काय? दुर्दैवाने या प्रश्नांची उत्तरे नकरार्थी आहेत. आजचे विद्यार्थी फक्त
घोकंपट्टीकरून गुण मिळवण्यात धन्यता मानतांना दिसतात. आणि तथाकथित सुशिक्षित
समाजही चांगले गुण म्हणजे हुशारी समजतो. असा विद्यार्थी पदवी मिळाल्या नंतरहीचार
धड वाक्ये लिहू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. म्हणुनच कारखान्यांना त्यांच्यासाठी
प्रशिक्षणाची सोय करावी लागते.
शिक्षणामुळे
लोकशाहीवरील जीवननिष्ठाप्रगल्भ व्हावी, सहसंवेदना वाढावी, व्यक्तिमत्वाचा विकास
व्हावा ही अपेक्षा असते. पण आज संवेदनाच हरवली आहे.सुशिक्षित वर्गात एकलकोंडेपणा
वाढत आहे. उदासिनता वाढत आहे. अन्यायाविरूध्द चीड उत्पन्न होत नाही. आणि कुणी जर
अन्यायाविरूध्द उभा राहीलाच तर व्यवस्था त्यालाच चिरडून टाकण्याचा प्रयत्न
करते.प्रत्येकजण आपमतलबात मश्गुल आहे. एकुण समाज सुशिक्षित झाला पण संकुचितही
झाला. त्यामुळे देशाच्या घटनेतील मुल्ये फक्त पुस्तकातच राहीली. राष्ट्रीय
चारित्र्य हरवून गेले आहे. संघर्षाला घाबरणारी माणसे हे जग बदलू शकत
नाहीत.चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे हेच आपल्या शिक्षणाचे ध्येय असेल तर
सुशिक्षित होणे म्हणजे कुशल कामगार होणे आहे.शिक्षणाचा एवढाच सिमित अर्थ नाही हे
आपणास कळेल तोच खरा सुदिन.
मुंबईतच
नव्हे तर संपूर्ण भारतभर वासनांधानी जो नंगानाच चालवलाय ते पाहून प्रश्न पडतो की,
हीच काय ती आपली महान भारतिय संस्कृती? याला कारण आजचे पालक.त्यांच्या संस्कार
करण्याच्या कल्पना म्हणजे संस्कृत श्लोक पाठ करवून घेणे आणि धर्माच्या नावाखालील
कर्मकांडात बुडवून टाकणे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सनातनी
विचारांना कवटाळून बसणे. मुलांना वाढवतांना मुलगा आणि मुलगी असा भेद करत वाढवणे.
यावरून लक्षात येते की आजचे सुशिक्षित पालकही गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत. एका
बाजूला पाश्चिमात्य संस्कृतीचा ओढा तर दुसरीकडे आपल्या संस्कृतीचा पगडा आणि दडपण
या कात्रीत आजचे पालक सापडले आहेत. त्यामुळे आपल्या पाल्यांना नेमकं किती सैल
सोडायचं आणि कुठे नाही याच भान त्याना येत नाही. बहुतेक पालक लैंगिकदृष्ट्या
साक्षर नसल्याने adult
sexual problemsचा प्रश्न खूपच गंभीर आहे. त्यामुळे नैतिकता आणि
नितीमत्ता ही मुल्येही तपासून पहाण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे असं की, मुलांना
लैंगिक शिक्षण दिले तर आपली नितीमत्ता ढासळेल असं वाटल्यामुळे आपला समाज जास्तच
ननैतिक होत चालला आहे. हे आपल्या लक्षातच येत नाही.
समाजाच्या निकोप
वाढीसाठी स्त्री असो वा पुरूष-त्यांना एकमेक़ांचा आदर करायला शिकवण्याची,
स्त्रीच्या भावना, तिला होणारे त्रास तसचं ती एक वस्तू नसून एक व्यक्ती आहे हे
मुलांमध्ये संस्कारीत करण्याची जबाबदारी पालकांची आहे. मुलांना वाढवतांना
स्त्रीपुरूष समानतेचं बीज रुजवणं महत्वाचं आहे. मुलींनी कोणते कपडे घालावेत हे
महत्वाचे नसून मुलांचा मुलींकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलणे महत्वाचे आहे. आणि हे
काम पालक़ांनाच करावे लगेल. समाज म्हणून सरकारवर आपली जबाबदारी ढकलून चालणार
नाही.आपल्या आरोग्याची काळजी डॉक्टरने नाही तर आपणच घ्यायची असते.
हल्ली आपण यशाचा,
विजयाचा अट्टाहास धरून अभ्यासातली, खेळातली आणि कलेतली गुणवत्ता, आनंद गमावून बसलो
आहोत. कारण विचार आणि विवेकापेक्षा समोरच्याला हरवण्यातच आपण सगळी शक्ती खर्च करत
असतो.खरंतर कोणतीही गोष्ट शिकतांना जास्तीत जास्त कौश्ल्य आत्मसात करणं महत्वाचं.
कोणी स्तुती करावी किंवा निंदा करू नये यासाठी शिकावं हा दृष्टीकोन असता कामा
नये.स्पर्धेकडे हानीलाभ, हारजीत या पलिकडे निकोप दृष्टीकोनाने पाहिले
पाहीजे.स्पर्धेकडे प्रगतीचा एक टप्पा म्हणून पाहिल्यने उत्तमरितीने अभ्यास करणं,
विषय समजणं, त्याचा आनंद घेणं शक्य होईल. असं झालं तर बक्षिसाची महत्वाकांक्षा
बाळगण्यापेक्षा त्याची कार्यक्षमता व दर्जा वाढण्याला प्राधान्य देता येईल.
त्यातून गुणवत्तेला नम्रतेचं कोंदण मिळू शकेल. अन्यथा अहंभाव वाढीला लागून प्रगती
खुंटेल. गुणवत्ता वाढली की बक्षिसाकडे वाटचाल सुरू होते; पण बक्षिस हे अंतिम
ध्येय्य रहात नाही. असा विवेकी विचार पालकांनी मनी रुजवून तशी वाटचाल केली तर तो
विचार मुलांमध्येही रुजेल, वाढेल.आणि त्यातूनच आत्मप्रगतीचा मार्ग प्रशस्त होईल हे
नक्की.बुध्दी जेव्हा धैर्याचा लगाम बनते तेव्हा विवेकी विचार आणि भावना एकत्र
येतात.या अनुभवाच्या वाटेवर मग बक्षिस आणि गुणांना अतिमहत्व देण्यापेक्षा जो
अभ्यास, जो खेळ आणि जी कला शिकतो त्यात जस्तीत जास्त प्राविण्य, कौशल्य मिळवण्याला
प्रधान्य देता येईल.
आपण
सारे प्रेमाचे भुकेले आहोत. म्हणून आपण एकमेकांकडून प्रेम मागतो. आपण
ज्यांच्याकडून प्रेम मागतो तेही आपल्याकडून प्रेम मागतात. पण जो स्वत:च प्रेम
मागतोय तो प्रेम कसा देवू शकेल? ही मोठीच गफलत आहे. जणू दोन भिकारी एकमेकांसमोर
झोळी पसरून उभे राहिले आहेत. जोपर्यंत आपण काही मागतोय तोपर्यंत दुसर्याला
देण्याची समर्थता आपल्यात कशी येणार? खरंतर जो कसलीही अपेक्षा न ठेवता प्रेम वाटून
टाकतो त्यालाच प्रेम मिळतं. त्याचं प्रेमाविषयी काहीच मागणं नसतं. प्रेम त्याच्याच
दाराशी येतं ज्याचं प्रेम मागणं संपून गेलंय.कारण निसर्गाचा [न्युटनचा तिसरा नियम
आठवा –Action
& reaction are equal & opposite] असा नियम आहे की, जे अपण
देतो तेच आपल्याकडे परत येतं.आपण क्रोध देतो आणि क्रोध उलटून
परत येतो. समोरच्याला शिव्या देतो तेव्हा तोही उलटून शिव्यांची लाखोली वाहतो.
म्हणूनप्रेम
करतांना विवेक महत्वाचा आहे. प्रेमाबरोबर अपेक्षाही येतात. परंतु अपेक्षा करणं आणि
अट्टाहास वा दुराग्रह करणं यात आपण गल्लत करतो. प्रेम करणं म्हणजे लाड करणं असही
आपण मानतो. अनेकांना असं वाटतं की प्रेमात जीवलग व्यक्तिंनी एकमेकांशी सहमतच
असायला हवं. एकमेकांवर कधीही टीका किवा तक्रार करू नये. ह्याला प्रेम नाही तर लाड
म्हणतात. विवेकी प्रेमात परिवर्तनाची शक्ती असते,तर लाडामुळे आपल मन क्षीण होतं,
कमकुवत रहातं.तुमच्या अहंकाराला दुखविण्याचा धोका पत्करून प्रेम तुम्हाला
प्रामाणिक प्रतिक्रिया देतं. लाड हे नशेसारखे असतात. ते थोडा काल विरंगुळा देतात
तर प्रेम हे ध्यानधारणे सारखं चिरंतन शांती देतं. प्रेम ही बाहेरून मिळणारी गोष्ट
नाही. प्रेम हे आपल्या आंतरिक जीवनातलं संगीत आहे.प्रेम ही प्रत्येक माणसाची
अनिवार्य संपदा आहे. ती सोबत घेवूनच माणूस जन्माला येतो. प्रेम त्याच्यापाशीच
असतं. प्रेम ही जन्मापासूनच मिळालेली शिदोरी आहे. आणि ती माणसाला जीवनभर साथ देवू
शकते. पण आपण दुसर्याच्या दारावर प्रेमाची भीक मागत असतो. तेव्हा आपली आंतरिक
शक्ती जाणा आणि प्रेममय व्हा.
आपल्या सर्वांच्या आत असते
एक नेणिवेची गुहा.
त्या गुहेत आपण शिरत नाही
सहसा.
आलेला प्रत्येक क्षण सारत जातो
या गुहेच्या दाराआड.
आणि एखाद्या अडगळीच्या खोली
सारखी ही गुहा सामावते त्या क्षणाला.
दार बंद करून जगत असतो आपण
आपलं रोजचं जगणं.
पण गर्दी झाली तिथं की या
दराआडच्या अनेक गोष्टी धडका मारायला लगतात.
कधीकधी आक्रमक होऊन उगारतात
हात,कधी विव्हळत रहातात.
वहात रहातात
अश्वत्थाम्याच्या जखमेसारख्या अविरत.
त्यांच्याकडे लक्ष दिलं
नाहीतरत्या बदलतात एखद्या व्रणात.
एक वेदना बनून टोचत रहातात
भोवरी टोचाव्या तशा.
तो ठसठ्सता सल घेऊन जगतांना
कधीकधी माणूस बनत जातो कडवट.
जगावर रागवतोच पण स्वत:च्या
जगण्याचाही राग राग करायला लागतो.
अशावेळी वाटत या नेणिवेच्या
दाराची कळ उघडण्याचा पासवर्ड देणाराकुणीतरी यावा.
कवटाळून घ्यावं त्यानं आत
दडलेल्या सार्या घलमेलींना.
अलगद हात फिरवावा त्यावरून
आणि सुईसारख्या टोकदार शब्दांनी
बाहेर काढावं त्या खुपणार्या
जखमांना,पण नाही येत तो.
वाट पाहून कंटाळतो आपण.शोधत
रहातो आजूबाजूला व्याकूळ होऊन.
आणि
एक दिवस जाणवतं अचानक हा पासवर्ड आपल्याच हातात असल्याचं.
हे
जग खूप कठोर असतं याची जाणिव जगतांना सतत सोबत करते आहे. त्याग,समर्पण,सेवाभाव,मातृत्व,वात्सल्यअशा
शब्दांनी बाईच्या जगण्याचं उदात्तीकरण करणार्या समाजात बाईला काडीचीही किंमत नाही
हे मी पहातोय. अनेक परंपरा,रुढीच्या स्वत:ला अडकवून घेतलेल्या, नवरानामक पुरूषाची
मर्जी सांभाळत सार्या कुटुंबाला सांभाळतांना हाताश झालेल्या आणि जगण्याची
परीक्षा देत देत पुढं निघालेल्या बाया मी
हरघडी पहातोय. माणसामाणसात असलेलं सौहार्द पहातानाच धर्म,वर्ग आणि जातीच्या
कप्प्यात विभागलेली माणसं पहात आलोय. ह्या माणसांना प्याद्यासारखं वापरून बाजूला
सारणारे राजकीय बळाचा माज आलेले लोकप्रतिनीधी अवतीभोवती धांगडधींगा करतांना दररोज
दिसताहेत. एकीकडे आनंदात असलेली मैत्री,प्रेम या भावनांना जपणारी माणसं एखद्या
प्रसंगात क्रूर होतांना दिसताहेत.
दररोज सामान्य जन
साध्या साध्या नियमांची पायमल्ली उद्दामपणे करतांना दिसतात; तरीही 15 ऑगस्ट वा 26
जानेवारीला देशभक्तीची गाणी आळवतांना त्यांचा उर भरून येतो. भ्रष्टाचाराच्या
विरोधात अण्णा हजारेंच्या बरोबर असतांनाच वेळ आली की, भ्रष्टाचार करायला मागेपुढे
पहात नाहीत. स्त्रीला देवीच्या मखरात बसवून तीच्यावर बलात्कार करण्यासही लाज वाटत
नाही. वंशाच्या दिव्याच्या हव्यासापोटी भ्रूण हत्या करतांना हात थरथरत नाहीत.य़ा
भ्रामक जगालाच खरं जग समजून जगणार्या स्त्री-पुरूषांचं भावविश्व खर्याजगात मात्र
विस्कटून जातांना दिसत आहे. एवढं सगळं असूनही आपण म्हणतो “मेरा भारत महान”!
“भारतीय संस्कृती महान”! यापेक्षा मोठा विनोद तो कोणता?
जगातील
लाखो लोग परंपरांची,रुढींची,धर्म-कर्मकांडांची लोढणी वागवत आयुष्य कुरकुरत काढत असतात.
ही सगळी ओझी टाकण्याचे धाडस नसल्यामुळे त्यांना आयुष्यात कधीच मजा घेता येत नाही.
सतत कुठल्यातरी भीतीखाली वावरत असल्यामुळे मजा चाखायची वेळ जरी आली तरी त्यांना ते
झेपत नाही.ही लोढणी वागवायची सवय एवढी अंगी भिनलेली असते की, कुळाचाराच्या
नावाखाली परवडणार नाही असा खर्च करून कुणी कफल्लक होतात; कुणी धर्माच्या नावाखाली शरीरावर
अत्याचार करतो; तर कुणी अहंकारापोटी आपल्या धर्माची पताका इतर धर्मीयांवर
कुरघोडीकरून फडकत ठेवल्याचे समाधान मिळवू पहातो. ही लोढणी जर वागवली नाहीत तर लोक
काय म्हणतील? पाप लागेल ना? असे मुर्ख प्रश्न निर्माण करून कळपातून बाहेर फेकले
जाण्याच्या भीतीमुळे आपले जगणे दुसह्य करत असतो. हेच संस्कार आपण आपल्या
मुलाबाळांवर, लेकीसूनांवर करून पिढ्यानपिढ्या परंपरेने चालत आलेलेपण पूर्णपणे
निरर्थक आणि वेळकाढू असलेले सणवार,व्रतवैकल्ये कुळचार म्हणून नवीन पिढीवर लादत
असतो.कित्येकजण केवळ भीतीपोटी ‘देवा’चे कर्मकांड करत असतात. जर आपण हे केले नाहीतर
देव आपले वाईट करील अशी त्यांना भीती वाटत असते.पण जर देव कृपालू आणि कनवाळू असेल
तर तो असा मानवी अघोरी विचार कसा करेल? असा साधा प्रश्नही आपल्या मनाला शिवत नाही.
कारण आपण आपल्या डोळ्यावर परंपरांची झपडं ओढून ठेवलीली असतात. ती आपला सारासार
विचार कुंठीत करून टाकतात.
कुणी बंडखोरी
करायचा विचार करून नविन विचार रुजवायचा प्रयत्न केलाच तर कळपातील लोक त्याच्या
गळ्यात आपल्या पूर्वजांच्या, जातीच्या धर्माच्या अस्मितेची लोढणी अडकवून टाकतात. जसं
गाईबैलांच्या गळ्यात लोढणी अडकवून त्यांना दूर जाण्यापासून रोखलं जातं आणि गुलामी
हेच स्वातंत्र्य आहे हे भासवलं जातं तसंच परंपरांची लोढणी तोडणे म्हणजे
जातीचा,धर्माचा अपमान करणे अशा कल्पना ठाकून-ठोकून घट्ट करण्यात येतात.परंपरांचे
काही फायदे असले तरी ज्या परंपरांमुळे आपल्याला शारीरिक, मानसिक,आर्थिक त्रास
होतो, अशा परंपरांना त्वरीत सोडचिठ्ठीदिली पाहीजे.कुठलीही परंपरा ही अनादी अनंत
नसते. ती काळानुसार हळूहळू नामशेष होणारच असते. जसे सती, विधवांचे केशवपन,
अस्पृश्यता वगैरे रुढी कालौघात नष्ट झाल्या वा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
आजूनही जातीधर्माची लोढणी शिल्ल्क आहेत पन तीही काही ठिकाणी नष्ट होतांना दिसत
आहेत. म्हणूनच वृथा धर्माभिमानी सनातनी आणि पुरोगामी लोकांमध्ये कायम झगडा चालू
असतो. त्यातूनच मग आपले हितसंबंध जपण्यासाठी आगरकरांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली
जाते.सावित्रीबाईच्या घरावर दगडांचा आणि शेणाचा मारा केला जातो. तर कुणी सामान्य
माणसाने परजातीत वा परधर्मात लग्न केले म्हणून खून केला जातो.
नुकताच गणेसोत्सव
धुमधडाक्यात पार पडला.त्यानिमित्ताने रस्ते खोदून वहातुकीला अडथळे निर्माण करून
मंडप उभारले. मिरवणुकी काढून सार्या गावाला वेठीला धरून भक्तीचा हैदोस घातला.
गणपती ही बुध्दीदेवता आहे असे म्हणतात. पण काही दिवसांनी तो बुध्दीहर्ता म्हणून
ओळखला गेला नाही म्हणजे मिळवले! आता नवरात्र आले. त्यानिमित्ताने परत रस्ते खोदणे,
मंडप घालणे, वहातुक अडवणे, डिजेच्या तालावर उच्चारवात दांडीया खेळणे हे सगळे
यथासांग भक्तीच्या नावाखाली होईल.हल्ली देवभक्ती म्हणजे ध्वनी प्रदूषण करणे, आजारी
माणसांना त्रास देणे आणि देव वा देवीसमोर नंगानाच घालणे असे रुढ होत आहे. तेही
सुशिक्षीत म्हणवणार्या समाजात!!!
दरवर्षी दिवाळी आली की
फटाके फोडायचे. नाकातोंडात धूर घ्यायचा. फटाके हातात वा तोंडासमोर फुटल्यामुळे
विद्रूप व्हायचे.होळी आली की लाकडे पेटवून बेसुमार हवेचे प्रदूषण करायचे.आपल्याला
या सगळ्यांचा त्रास होत असला तरी डोळे मिटून आणि मेंदू बधीर करून परंपरा टिकवायचा
अट्टाहास करायचा. गेल्या काही वर्षात वर्तमानपत्रात बहीरेपणाच्या उपचारांवरील
जाहीरातीत वाढ झाली आहे हे आपल्या लक्षात आले आहे काय? कानाच्या तक्रारी घेवून
येणार्यांच्या संख्येत गणेसोत्सव आणि नवरात्रीनंतर वाढ झाल्याचे अनेक डॉक्टर्स
सांगतात. त्यांच्या या गंभिर इशर्याकडे आपण लक्ष केव्हा देणार? भारतियांना
उन्मादात जगायला आवडते हेच खरे. मग कितीका त्रास होईना!!!
तरीही मी आशा करतो
की भविष्यात हे प्रकार बंद होतील. कारण कोणतीही परंपरा ही अनादी अनंत नसते. ती
हळूहळू नामषेश होतेच होते. 100 वर्षापूर्वीच्या सती जाणे, विधवा केशवपन, समुद्र
पर्यटनावरील बंदी, स्त्रीयांना शिक्षणापासून वंचित ठेवणे, विटाळ पाळणे आणि
अस्पृश्यता या रुढी परंपरा जशा बाद झाल्या वा होताहेत तसेच सध्याच्या अनिष्ठ
प्रथाही जातील. त्यासाठी सुशिक्षीत तरूणांनो जागे व्हा, शिक्षणाचा अर्थ समजून घ्या
आणि काळाच्या बदलांना सामोरे जा. भविष्यात ह्या पृथ्वीवर आनंदी आणि निरामय जीवन
निर्माण करण्याची ताकद तुमच्यातच आहे; ह्याचा कधीही विसर पडू देवू नका.
‘मंदिरांपेक्षा शौचालये
बांधणे अधिक गरजेचं आहे.’ असा नारा एका हिंदुत्ववादी राजकारण्याने दिल्याबरोबर कोण
गहजब उडाला! परंपरेच्या पाईक लोकांनी अगदी हिंदू धर्म बुडाल्याची हाकाटी दिली.
शरीराला सक्षम रहाण्यासाठी जसे पोटभर अन्न खाऊन उर्जा मिळणे आवश्यक असते, तसेच
शरीराला आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी पोट साफ होणेही आवश्यक असते.बरे,या उत्सर्जित
गोष्टी शेवटी निसर्गात खत म्हणून झाडांना अन्न तयार करण्यासाठी वापरता येतात ना?
म्हणजे श्रध्दा ठेवण्यात या नैसर्गिक क्रियांचा अडथळा नक्कीच तर्कसंगत नाही. हे
परंपरावाद्यांच्या लक्षात येत नाही. कारण अशा कितीतरी रुढी परंपरा आपण डोळ्यावर
पट्ट्या बांधून आपल्या पुर्वजांनी सुरू केल्या म्हणून पाळत असतो.त्यापायी मंदिरे
बांधणे म्हणजेच धर्म रक्षण असा समज रुढ झाला आहे.खरंतर स्वच्छ्ता पाळणे-मग ती
व्यक्तीगत असो वा सार्वजनिक हा खरा आरोग्यपूर्ण जगण्याचा शरीरधर्म आहे.हे आपल्या
लक्षातच येत नाही.
पाश्चात्यांच्या नावाने खडे
फोडणार्यांनी हे जाणून घ्यावे की त्यांनी स्वच्छ्तेला इतके महत्व दिले की, ‘cleanliness is godliness’
असे नुसते शाब्दीक बुडबुडे फोडले नाही तर आचरणातही आणले. म्हणूनच
त्यांच्या देशातील शौचालये ही आपल्या मंदिरांपेक्षाही स्वच्छ असतात. भिमाशंकराच्या
देवळात मी स्वत: जळमटे पाहील्यावर तिथल्या पुजार्यांकडे विचारणा केली असता तो
‘धार्मिक’ मला उध्द्टपणे बोलता झाला की,‘काय करायचे ते करा. आमचे कुणीही काहीही
वाकडे करू शकत नाही. जास्ती बोलाल तर तुम्हालाचधक्केमारून येथून हाकलून देवू.’
मुसलमानांच्या
मशिदी, क्रिश्चनांचे चर्च यामध्ये जेवढी स्वच्छ्ता आणि शांतता असते त्याच्या एक
शतांशानेही आपल्या मंदिरात या गोष्टी आढळणे का बरे दुरापास्त व्हाव्या? त्यांच्या
या प्रार्थना गृहात ह्जारो-लाखो माणसे जमली तरी कधीगोंधळ, चेंगराचेंगरी झाल्याच्या
बातम्या कधी वाचल्याचे आठवतनाही. त्याच्या समाजात भक्तीची जी शिस्त आहे ती आपल्या
समाजात हे परंपरावादी कां आणत नाहीत? कारण आपल्या लोकांना धर्म आणि कर्मकांड यातील
फरकच कळलेला नाही.याचा अर्थ ते श्रेष्ठ आणि आपण कनिष्ठ असा होत नाही. त्यांच्यातही
अनेक रुढी परंपरा आणि कर्मकांड आहेत. पण त्याची शिस्त नक्कीच वाखाणण्यासारखी
आहे.परधर्मियांना नुसत्या शिव्या देण्यापेक्षा त्यांच्यातील चांगले गुण घेणे
केव्हाही चांगलेच ना? की गडबड गोंधळ घालणे, लोकांना त्रास देणे ह्यालाच भक्ती
म्हणायचे आणि धर्म पाळल्याचे समाधान मिळवायचे?
रशियात
झालेल्या एका भाषापरिषदेच्या निमित्ताने सुप्रसिद्ध लेखिका श्रीमतीमालतीबाई बेडेकर
यांनी एक आठवण सांगितली होती. ती मोठी मार्मिक आहे.भारतातील विविध भाषा बोलणाऱ्या
लेखककवींना या परिषदेला आमंत्रित करण्यातआले होते. परिषद संपली तेव्ह सर्व भारतीय
कविलेखक एकत्र आले आणि इंग्रजीतबोलू लागले. तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या एका
रशियन लेखकाने त्यांनाविचारले, “तुमच्या
देशाला स्वतंत्र भाषा नाही काय? तुम्ही
सारेजणइंग्रजीसारख्य़ा परकीय भाषेत का बोलता? ही
तर तुम्हांला, तुमच्या
देशालागुलाम करणाऱ्या देशाची भाषा!'' हे
ऐकून सर्व भारतीय कवि, लेखक
निरूत्तरझाले होते. आमचे चेहरे बघण्यासारखे झाले होते, असे मालतीबाई बेडेकरांनीसांगितले.
मी आजही विद्यार्थ्यांना विचारतो की तुम्ही कशासाठी शिकता? तेव्हा त्यांचं उत्तर `नोकरीसाठी' शिकतो, असंच
असतं. मुलांच्या आईवडीलांचीमनोवृत्ती त्यांच्या मनोवृत्तीत प्रवर्तीत होते हे याचे
कारण आहे.इंग्रजी माध्यमाच्या शाळा कशासाठी काढता? असा जेव्हा प्रश्न विचारला जातो, तेव्हा या प्रश्नाचेही उत्तर `नोकरी' हेच
असते. आईवडिलांनी `नोकरी'चा एवढाधसका का घ्यावा, याचे
आश्चर्य वाटते. `मी
ज्ञानासाठी शिकतो' `ज्ञान
विचारकरायला शिकविते,' म्हणून
शिकतो'
असे उत्तर देत नाही.`भाकरी आणिभाकरी' मिळविणे
एवढाच माफक विचार आमच्या शिक्षणात आहे. उच्च दर्जाची नोकरीफक्त इंग्रजी माध्यमाच्या
शाळेत गेल्यामुळेच मिळते हा लोकांचा समज आहे. आणितो त्यांनीच पसरविलेला आहे.
भारतातील हे इंडियन लोक धन्य होत. यालाविनाशकाले विपरीत बुद्धी म्हणता येईल. समाजातील `महाजन' ज्या वाटेने जातात, त्याच बरोबर असतात, असे चित्र नेहमी दिसते, नव्हे समजले जाते. ते करतात तेच बरोबर
अशी धारणा होते.म्हणून मग बहूजन समाजव ऐपत नसणारेही त्याच वाटेने जातात.डॉक्टर,
वकील, व्यापारी, आणि कामगार यासर्वांनाच वाटते की
इंग्रजी भाषेची चलती आहे. नोकरी, चाकरी
मिळवून देणारीती गुरूकिल्ली आहे.आपण आजही मनसिक गुलामगिरीत अडकलो आहोत
म्हणूनचइंग्रजांच्या राज्यावर अजूनही सूर्य मावळत नाही हेच खरे आहे.
१८५९मध्ये विद्यापीठात १३२ विद्यार्थी
परीक्षेस बसले होते. पैकी २२ पास झाले.असे का व्हावे, याचा
शोध घेण्यात आला. मातृभाषेच्या अभ्यासाशिवाय परभाषांचाअभ्यास किंवा परभाषेतील
ज्ञान संपादन करणे अवघड आहे, हे
इंग्रजांनीचसांगितले. धन्य त्या इंग्रजांची. २८ एप्रिल १८६२ रोजी कुलपती सर
फ्रिजरयांचे दीक्षान्त भाषण झाले, त्यांनी मातृभाषेतूनच
शिक्षण दिले जावे असापुरस्कार केला.कुलगुरू सर जेम्स गिब्ज यांनीही मातृभाषेचा
पुरस्कार केलाहोता. त्यांनी म्हटले होते, मातृभाषेवर
प्रभुत्त्व असल्याशिवाय परकीयभाषेवर प्रभुत्त्व मिळविता येणार नाही. शिवाय
मिळविलेल्या ज्ञानाचा लाभइतरांना करून देण्यासाठी प्रादेशिक भाषांचा उत्तम अभ्यास
व्हायला पाहिजे.
मीइंग्रजी भाषेविरूध्द नाही. पण शिक्षक
म्हणून मला असे वाटते की, मातृभाषेतूनशालेय
शिक्षण घेतल्याने मुलांची आकलनशक्ती चांगली वाढते. मातृभाषेतून विषयचांगला
समजल्यामुळे पाया पक्का होतो. इंगजी माध्यमातून शिकतांना आधी मुलेमातृभाषेतून
विचार करतात आणि मग इंग्रजीतून. त्यामुळे भारतीय मुलांच्यामेंदूवर अतिरीक्त ताण
येतो. आणि अभ्यास फक्त गुणांसाठी केला जातो. हा माझाअनुभव आहे. कारण मी गेली
कित्येक वर्षे इंगजीमाध्यमाच्या शाळांमध्ये शिकवतो आहे.
तेव्हा हे प्रकर्षाने जाणवते.मीमातृभाषेचा वृथा अभिमान बाळगणारा नाही; तर
मुलांच्या दीर्घकालीन घडण्याचात्या मागे विचार आहे.
घरीआणि समाजात सगळीकडे मराठी बोललं जात
असतांना फक्त शाळेत इंग्रजी मध्येशिकवलं गेलं तर शब्दांमधून अर्थ लक्षात
घेण्याच्या प्रक्रियेत अधिक परिश्रमकरावे लागतात आणि समजावणार कोणी नसेल तर
शब्दांचेअर्थ लक्षात न घेता पाठ केले जातील अशी शक्यता वर्तवली आहे.
"भाषा" हेमाहिती (information) समजून
घेण्याचं माध्यम आहे आणि ते व्यवस्थित अवगतअसेल तरच माहिती समजू शकते. त्यामुळे
अवगत असलेल्या माध्यमातून माहितीद्यावी आणि नंतर दुसरी माध्यमे पुरेशी अवगत झाली की
मग त्या माध्यमातूनहीमाहिती द्यायला हरकत नाही. एखाद्याला घरच्या किंवा समाजातील
परिस्थितीमुळेइंग्रजी पुरेशी अवगत असेल तर त्याने त्या भाषेतून शिक्षण घ्यायला
काहीचहरकत नाही.
आणि दुसरे म्हणजे परकी कोणतीही भाषा
नंतरस्वप्रयत्नाने आत्मसात करता येते. त्यासाठी इंग्रजी माध्यमातच शिकायला हवेअसे
नाही.हा माझा स्वानुभव आहे. कारण मी मुळचा मराठी माध्यमातील असूनहीगेली 35 वर्ष
मात्र मी कॉन्व्हेंट शाळांमध्ये शिकवतो आहे. मला कुठेहीभाषेची अडचण आली नाही.मुळात
मातृभाषा पक्की असेल तर मग इतर कुठलीही भाषाशिकणे अवघड नसते.ती आपल्या मेंदूची
क्षमता आहे. कारण आकलनशक्तीचा पायापक्का झलेला असतो.
आपण दूरदृष्टीने विचार न केल्यामुळेच आज
मुलांचीवैचारीक क्षमता कमी झालेली दिसते.परिणामस्वरूप त्यांना read between lines करता
नाही.शब्दाचा फक्त कोशातील अर्थ कळतो पण शब्दामागील भावना कळतनाहीत.आणि पदवी
घेतल्यानेच चांगली नोकरी मिळते हाही एक भ्रम आहे.ज्याच्याकडे मेहनतीची तयारी आहे, नवनव्या
कल्पना अंमलात आणायची धमक आहे, अपयशातून यशाकडे
जाण्याचे जीद्द आहे, अशा लोकांना sky is the limit असते.त्यांना
कोणीही अडवू शकत नाही. लहानपणीच असे विचार मुलांमध्ये निर्माण केलेतर तो फ्क्त
परिक्षार्थी न होता खरा विद्यार्थी होईल. त्यासाठी लागणारीआकलनशक्ती, विश्लेषक
विचार करण्याची कुवत मातृभाषेतूनच चांगल्या प्रकारेवाढू शकते. म्हणून मातृभाषेतून
शिक्षण घ्यायला हवे.
शिक्षण
हे फक्तनोकरी साठी म्हणून न घेता ज्ञानासाठी घेतले तर माणसाच्या बुध्दीची
झेपत्याला जगाच्या पाठीवर कोठेही नोकरी मिळवून जगण्यास समर्थ करील. म्हणूनचविचार
करायला शिकणे जितके मातृभाषेतून सहजसाध्य होईल तितके इंग्रजीमाध्यमातून नाही. आपण
मुलांना फक्त साक्षर बनवायचे की सुशिक्षीत? म्हणूनआपण
र्हस्व दृष्टी टाकून देवून दूरदृष्टीने विचार करायला शिकूया.
कुठल्याही
प्राण्याला भिती वाटली,अस्तित्वाच्या लढाईची
वेळ आली तर तो तीनप्रकारांनी प्रत्युत्तर देतो. प्रतिस्पर्धी बरोबरीचा किंवा लहान
असेल तर ‘आक्रमण’ करतो, शक्तीमान असेल तर ‘पलायन’ करतो;आणि दोन्ही जमण्यासारखं नसेलतर ‘निपचित’ पडतो. अविश्वास किंवा विरोध झाला की
मुलांमधला ‘विचार’ संपतो;आणि ती भावनीक प्रेरणांनी व्यक्त होतात.
मुलं एकतर अंगावरयेतात,भांडतात,तिथून निघून जातात किंवा काहीच प्रतिसाद
देतनाहीत...दुर्लक्ष करतात.मुल आपलं ऐकत नाही असं वाटलं की, आपल्या मनातलीभिती जागी होते. आपल्याला
ती स्वतःच्या अस्तित्वाची भिती वाटते. अपमान, संताप, दुःख अशा बर्याच छटा तिला असतात. ‘मुल आपलं ऐकत नाही म्हणजे
काय...त्याच्या भल्यासाठी आणि प्रेमापोटीच आम्ही सांगतोय ना?’ असे आपल्यालावाटणे स्वाभाविक आहे;पण आपल्या देहबोलीतून ते दिसत नाही. आपण
आपल्यासामर्थ्याच्या जोरावर बळजबरीने मुलांना वाकवू पहातो. आणि मुलं मात्र
असमर्थअसल्यामुळे त्याच्या पद्धतीनं प्रतिकार करण्याचा केविलवाणा प्रयत्न
करतरहातात.
आपलं मुल अपयशी झालं तर लोक आपल्याला बोललावतील...म्हणजेच ‘लोक काय म्हणतील?’ हीच चिंता सर्वात जास्त असते.मुलांच्या
यश-अपयशात आपण आपली तथाकथित प्रतिष्ठा पणाला लावतो. बरे,लोकम्हणजे तरी कोण?...तर या अवाढव्य जगात आपल्याला ओळखणारी
पाचपंचवीस माणसं!त्यासाठी आपण कोण आटापिटा करतो! आपल्या मुलांना आपल्या
सुप्तमहत्वाकांक्षेपायी त्यांची कुवत न जोखता किती दडपण आणतो! इतरांशी तुलनाकरून
आपल्या मुलांना किती घुसमटून टाकतो! याचा आपण पालक म्हणून कधीतरीविचार करणार आहोत
काय? मुलांचं कोवळेपण, मुलांची निरागसता, मुलांची विचारकरण्याची आणि प्रयोगशील
अनुभवातून शिकण्याची पद्धत आपल्यामहत्वाकांक्षेमुळे मुलांना एकांगी व एकसाची काम
करायला लावून पुर्णपणेचिरडून टाकतो. जणू काही आपलं मुल हे आपल्या हातातील एक
यांत्रिक खेळणं आहेअसं आपलं वागणं असतं. यातूनच आपल्यात आणि मुलात विसंवाद व्हायला
लागतो.मुलं अपल्याला टाळू लागतात.आईवडील आपल्याला समजून घेत नाहीत असे
त्यांनावाटायला लागते.आणि त्यांना समजून घेणारे मित्र जवळचे वाटतात.ते
घराबाहेरजास्त वेळ राहू लागतात.
आपण मुलांच्या भविष्याच्या चिंतेने ग्रस्तअसतो,पण जगत मात्र असतो स्वतःच्या
भूतकाळात.मुलं मात्र स्वतःच्या वर्तमानातजगत असतात. एकीकडे ‘आमच्या लहानपणी...’ हे स्वगत आपल्या मनात सततमोठ्यांदा चालू
असतं. तर दुसरीकडे ‘वर्तमानात कसं जगायचं?’ यासाठीव्यक्तिमत्व विकासाचे कोर्सेस आणि
पुस्तके वाचणंही चालूच असतं. मनातलाभूतकाळ, कल्पनेतला
भविष्यकाळ आणि आजचा दोघांचाही वर्तमानकाळ यात अशीविलक्षण रस्सीखेच चालू असते.आपण
अनुभवलेले तणाव, पैशाची ओढाग्रस्त, नोकरीसाठी केलेली वणवण,जगतांना झालेली अवहेलना आपल्या
मुलांच्या वाट्यालायेवू नये म्हणून आपण मुलांना सुखाच्या कोषात वाढवतो.त्यांना
काही कमी पडूदेत नाही. मुलांना हवं ते हवं तेव्हा मिळाल्यामुळे आपण त्यांना खरं तर
पंगुबनवतो.त्यांना एखादी गोष्ट मिळवण्यासाठी झगडावं लागतं याचं आकलन होत नाही.मग
ती अस्वस्थ होतात,निराश होतात,आक्रस्ताळेपणा करू लागतात.
म्हणूनत्यांच्यात लहाणपणापासूनच जबाबदारीची जाणिव निर्माण करणं
महत्वाचंअसतं.त्यासाठी आपण मुलांना वेळ दिला पाहीजे.मुलांना आपल्या
घरगुतीचर्चांमध्ये सहभागी करून घेतलं पाहीजे. त्यांनाही एक व्यक्ति म्हणून
आदरानेवागवलं पाहीजे.त्यांच्या चुका त्यांना सकारात्मक पद्धतीने दाखवून
द्यायलाहव्यात. वेगवेगळे पर्याय त्यांच्या समोर ठेवून योग्य तो पर्याय निवडायलावाव
दिला पाहीजे. हे वागणं आपल्या सहनशक्तीची कसोटी पहाणारं जरी असलं तरीआपल्या
मुलांमधील विसंवाद कमी होण्यास मदत करणारं आहे; हे मुलांच्यावर्तणुक बदलातून आपल्याला
नक्कीच जाणवेल.पहा प्रयत्न करून. जीवन हे दुःखाचाडोंगर नसून आनंदाचा सागर आहे; हे कळेल.
प्रत्येक माणसाच्याआत एक विश्व सामावलेलं असतं. म्हणूनच आपण
म्हणतो, ‘पिंडी ते ब्रम्हांडी’. म्हणजे या जगात जर अव्यवस्था, अनाचार, अत्याचार, हिंसा असेल तर त्याचंकारण आपल्या
प्रत्येकाच्या आतच त्याची बीजं आहेत असं नाही कां होत? अपल्याचअंतरंगाचं दृश्य स्वरूप या जगात
आपल्याला बघायला मिळतं.
आपलं
मुल जरलहानपणापासून छोट्या पडद्यावर खून मारामार्या पहातच मोठं होत असेल; आणियुद्धाचे व्हिडीओ गेम्स खेळून वाढत
असेल, तर या गोष्टींविषयी त्याचं मनसंवेदनाहीन
होतं. त्यामुळेच शाळेतील मुलं पटकन हमरीतुमरीवरयेतात...मारामारी करतात.
साध्यासाध्या कारणांवरून एकमेकांचे जीव घ्यायलामागेपुढे पहात नाहीत.
म्हणूनच
आपल्या पालकत्वात जिथे कुठे द्वेष, अशांतीची बीजं असतील
तर त्यांना शोधून काढून नाहीशी करायला हवीत.मुलांपर्यंत आपण काय पोहोचवतोय याचा
विचार करायला हवा. वंश, वर्ण, देश, धर्म, जात, आर्थिक स्तर, शिक्षण यात भेदाभेद करून माणसांमधल्या
मैत्रीचेपूल तोडून विद्वेशाच्या भिंती तर बांधत नाही ना? हे बघायला लागेल.जगातअसलेल्या वैचारीक
कुरूपतेला आपण खतपाणी तर घालत नाही ना?
याचाही
विचारकरावा लागेल.
भयाचा
प्रसंग असो वा आनंदाचा या प्रत्येकवेळी जो विचारानेवागतो, संयमाने वागतो, कुठलीही गोष्ट उताविळपणे करत नाही, त्याच्यावर कधीहीपश्चातापाची वेळ येत
नाही.म्हणूनच आपल्या मुलांमध्ये मानवजातीचा आणि चराचरसृष्टीचा मैत्रीपूर्ण स्वीकार
करण्यासाठी ससद्भावनेची बीजं रुजवावीलागतील.
हजारो पुस्तके वाचून मिळणार्या ज्ञानापेक्षा एक
जिवंत अनुभव खूप काही शिकवून जातो. शाळेत पुस्तके शिकवली जातात, पण जीवन नावाचे
पुस्तक शिकवले जात नाही. त्यामुळे शिकूनही मुले अपूर्णच रहातात. बेकार नावाचे
बिरूद त्यांना पदवीबरोबरच बहाल केले जाते. कारण अनुभवावरील आधारीत शिक्षण त्यांना मिळालेलेच
नसते. चिमणीची पिल्लं चाळीस दिवसात आकाशात भरार्या घेतात आणि माणसे मात्र चाळीस
वर्षाचे झाली तरी गटांगळ्या खात असतात. कारण चिमणीच्या पिल्लांना पंख आतून फुटलेले
असतात आणि माणसांना पदव्या बाहेरून चिकटवाव्या लागतात. म्हणून आतून ज्ञानाचे पंख
निर्माण करणारे व पंखात बळ देणारे अनुभवजन्य शिक्षण विद्यार्थ्यांना दिले गेले
पाहीजे. त्यासाठी सर्वात मोठा सहभाग पालक़ांचा असावा लागतो. विद्यापिठातर्फे
मुलांना नुसत्या पदव्या दिल्या जातात. पण जीवनात धडका घेण्याचे आणि खडकावरती
बिजारोपण करण्याचे काम मात्र पालकांनाच करावे लागते. त्यासाठीच पालकांचा मुलांशी
मैत्रीपूर्ण संवाद असणे महत्वाचे आहे.
आपण मध्यमवर्गीय एक विसरतो की, ज्या तर्हेचे
शिक्षण आपल्याला शाळा-कॉलेजात मिळते, ज्या तर्हेच्या परीक्षा पध्दतीला आपण सामोरे
जातो त्यात पारंगत असलेली मुले जरी शैक्षणिक जगतात यशस्वी होतांना दिसत असली तरी
भविष्यात आर्थिक यश त्यांना खात्रीने मिळतेच असे नाही... बरेचदा नाहीच. शैक्षणिक
नैपुण्याचा उपयोग किमान सुरक्षित अशी जीवनशैली मिळवण्यासाठी जरूर होतो. पण
त्यापलीकडे काहीच नाही. खर्या अर्थाने ज्यांच्याकडे यशस्वी म्हणवून घेण्याची, कर्तृव
व आर्थिक ताकद असते त्या बहुतेक व्यक्ती शैक्षणिक जगात बहुदा नगण्य असल्याची अगणित
उदाहरणे आहेत. 11वी, 12वीत प्रथम येणारी अथवा आय.आय.टी.तसुध्दा गेलेली किती मुले
जगप्रसिध्द उद्योजक किवा संशोधक झालीय हा एक संशोधनाचा विषय आहे.माहिती,ज्ञान
आणि शहाणपणा ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. माहितीला ज्ञान समजणं हे जितकं
अपतरिपक्वतेचं लक्षण आहे; तितकंच माहितीतून येणार्या ज्ञानाला शहाणपण समजणं हे
आपल्या विकासासाठी घातक ठरणारं आहे.
आपली शिक्षण पध्दती लॉर्ड मेकॉलेने सुमारे 200 वर्षापूर्वी ब्रिटीश साम्राज्यासाठी
कारकुनांची फौज तयार करण्यासाठीच निर्माण केली हे विसरता कामा नये. या पध्दतीत
उत्तम कारकुन, सचीव, जास्तीत जास्त आय. ए. एस. अधिकारी तयार होवू शकतात. पण
स्वत:मधील प्रज्ञा ओळखायला ही पध्दत अडथळा निर्माण करणारी आहे. याचा अर्थ दुसर्या
माणसाला श्रीमंत करण्यासाठी आपल्याकडे जे गुण असायला हवेत, ते आत्मसात करायला मदत
करणारी ही शिक्षणपध्दती आहे. तेव्हा धडेच्या धडे पाठ करून आणि उत्तरे लिहून
परीक्षांमध्ये गुण मिळवणार्यांची फौज खरोखरच हुशार आहे का? असा प्रश्न निर्माण
होतो. शैक्षणिक जगातल्या यशाबद्दल हे अतीव आकर्षण जे मध्यमवर्गात आहे ते कमी झाले पाहीजे.
त्यापेक्षा जगात आर्थिक सामाजिक आणिनविन काही निर्माण करण्याची वृत्ती देणार्या
शिक्षणाचा गांभिर्याने विचार करायला हवा.
विज्ञानाच्या विकासाचा सारा इतिहास हा श्रध्दा
तपासण्याचा इतिहास आहे. पृथ्वीवरील मानवासाठी आकाशातील दयाळू बापाने दिवसा प्रकाश
मिळावा म्हणून सूर्य आणि रात्री शीतल चांदणे मिळावे म्हणून चंद्र निर्माण केले; हे
पवित्र बायबल मध्ये लिहीले आहे. कोपर्निकस, गॅलिलीयो यांनी या श्रध्दा तपासल्या,
छळ सहन केला म्हणूनच आधुनिक खगोलशास्त्राचा जन्म झाला.सामाजिक इतिहासात स्त्रीने
शिक्षण घेऊ नये, मासिक पाळीत स्त्री अपवित्र होते, पती निधनानंतर स्त्रीयांनी
केशवपन करावे, विधवांनी विवाह करू नये, चातुर्वण्य पाळावे, शुद्रांचा विटाळ होतो.
आशा अनेक रुढी परंपरा या धर्मश्रध्देचा भाग होत्या. पण चार्वाक, बुध्द, फुले,
आगरकर, सावरकर यांनी या अंधश्रध्दांची तपासणी करून त्यावर कडाडून हल्ला चढवला
तेव्हा आज हे सग़ळे नष्ट झालेले दिसते वा त्यांचे प्रमाण कमी झालेले दिसते.
मानवी जीवनात श्रध्दांना स्थान जरूर असते. कारण
प्रत्येक माणसाचे व्यक्तीत्व हे विचार व भावना यातूनच बनलेले असते. आणि श्रध्दा हे
त्या भावनांचे परिणित झालेले रुप असतात. माणसाला त्याची
जात,पंथ,धर्म,क्षुद्रता,स्वार्थ आणि हेवेदावे यापलीकडे नेऊन माणूस म्हणून
मुल्यात्मक आशय देणारी ती श्रध्दा; आणि विचारांना संकोच करते, डोळे मिटून वागण्यास
भाग पाडते ती अंधश्रध्दा. अंधश्रध्दा ही कठीणीकरण झालेले अज्ञान असते. त्याला
व्यक्तीच्या भावनांचे, परंपरेचे आणि धर्मविचारांचेसामर्थ्य लाभलेले असते. म्हणूनच श्रध्देच्या
तपासणीला नकार देणे हा हटवादीपणा अंधश्रध्दा जोपासण्यासाठीच केला जातो.
हिंदू धर्मावरच अंधश्रध्दा निर्मूलन चळवळ हल्ला का करते हा अक्षेप
मात्र गैरसमज पसरवणारा आणि चुकीचा आहे. या चळवळीने मुस्लिम आणि क्रिश्चन धर्मातील
अनेक बाबाबुवांचा पर्दाफाश केलेला आहे.याचे कागदोपत्री पुरावे चळवळीकडे आहेत.
प्रश्न धर्माचा नाहीच. दिशाभूल करणारी कोणत्याही धर्मातील अंधश्रध्दा तेवढीच
त्याज्य आहे. दुसरे असे की, या देशात 80% हिंदू आहेत तेव्हा स्वाभाविकच 80%
अंधश्रध्दा हिंदूच्याच असणार आणि कर्यकर्तेही 80% हिंदूच असणार.त्यमुळे ही चळवळ
स्वाभाविकपणे हिंदू समाजात जास्त दिसणार. एकीकडे अंधश्रध्दा निर्मूलनाची गरज आहे
म्हणायचे आणि दुसरीकडे ते काम फक्त हिंदूंमध्येच का करता असा आरडाओरडा करायचा हा
शुध्द कांगावखोरपणा झाला. तेव्हा हे लक्षात घेतले पाहीजे की, श्रध्देची चिकीत्सा
करायची आणि ज्या श्रध्दा समाजिक जीवनात अनिष्ट, अयोग्य वाटतात, त्यांच्या विरोधात
जाऊन सनदशीरपणे विरोध संघटीत करण्याचे स्वातंत्र्य देणे हेच योग्य व इष्ट आहे.
युरोप पहातांना मला काही गोष्टींचा उलगडा झाला.
आपल्या देशापेक्षा आकारानं लहान असलेल्या देशांनी कशाच्या जोरावर एवढी प्रगती
केलीते कळलं. ती कारणं अशी...
1] तिथले रस्ते प्रशस्त आणि स्वच्छ आहेत. 2]
रस्त्यांवर होर्डींग लावलेले नसतात, फेरीवाले
नसतात,कचरा नावालाही सापडत नाही...अगदी जंगलातून जाणार्या हायवेवरही.
3]
शिस्त काय असते, याचा उलगडा तिथल्या रस्त्यांवरून होतो. रस्ते मोठे आहेतच, पण फुटपाथही
प्रशस्त आणि मोकळे. बस थांब्याच्या शेड्सही व्यवस्थित असतात. तिथं भिकारी रहात
नाही. संपूर्ण शहरात, शहराबाहेर एवढेच काय जंगलातील हायवेवरही रस्ता पार
करण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारलेले असतात.आणि लोक त्या झेब्रा
क्रॉसिंगमधूनच रस्ता ओलांडतात. 4] रस्त्यावरचा वेग व चिन्हातून दिलेल्या सूचना
पाळल्या जातात. त्यामुळे तिथे अपघातहा प्रकार जवळजवळ नाहीच. 5] टोलनाके कमी,
यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होते. 6] पादचारी हिरवा सिग्नल असेल तेव्हाच रस्ता
ओलांडतात- तेही झेब्रा क्रॉसिंगमधूनच. 7] बससाठी वेगळी पार्कींग असते. तिथेच बस
उभी करावी लागते. बसमध्ये बसण्यासाठी तिथपर्यंत चालत जावं लागतं. 8] रस्त्यावर
पाळीव जनावरं मोकाट फिरतांना दिसत नाहीत. 9] वाहनचालक उगीचच हॉर्न वाजवत नाहीत.
मला 15 दिवसात जास्तीतजास्त 3 ते 4 वेळाच हॉर्न ऐकू आला. 10] तिथले चालक चुकीच्या
बाजूने ओव्हरटेक करत नाहीत की विरूध्द दिशेने येत नाहीत. तसेच भर रस्त्यात ते कुठेही
तो ओलांडत नाही. 11] रस्त्यावर वहानं नसतील तरीही लाल सिग्नल पाहील्यावर गाड्या थांबतात.
कुणीही गाडी पुढे दामटत नाही. 12] दोन
गाड्यांमध्ये योग्य अंतर आणि योग्य वेग राखला जातो. 12] हायवेवरील वहानांच्या
आवाजाचा त्रास बाजूच्या घरांना होऊ नये म्हणून फायबर किवा पत्र्याचे मोठे बोर्ड
दुतर्फा लावलेले असतात. 13] चालक शिस्तीने लेनमधूनच गाडी चालवतात व योग्य ठिकाणी
पार्क करतात. मर्यादांचं उल्लघन करणार्या चालकाना 2 ते 3 वेळा दंड झाल्यावर
त्यांचा परवाना रद्द केला जातो. 14] सगळ्या हायवेंवर आणि शहरातही सगळीकडे सार्वजनिक
स्वच्छतागृह असून तिथली व्यवस्था आपल्याकडे ज्या सोयी पंचतारांकीत हॉटेलात दिसतात
तशी सार्वजनिक स्वच्छतागृहात दिसते.कुठेही पान,तंबाखू, गुटख्याची पिचकारी नाही.
15] सर्वात महत्वाचे म्हणजे ट्रॅफिकचा सेन्स तिथले नागरीक आणि सरकार या दोघांनाही
आहे. स्वच्छतेची तर कमालच! अगदी जंगलातील रस्त्यांवरही कुठेही घाण नाही. जंगलही
स्वच्छ! अशी स्वच्छता अगदी आल्प्स पर्वतावरील उंच शिखरावर, डोगरातील रेल्वे
स्टेशनवर आणि भरपूर गर्दीच्या ठिकाणीही दिसून आली. 16] खरेदीच्या ठिकाणी सगळी
यंत्रणा अपडेट असल्याने लबाडी नाही आणि घासाघीसही नाही.
सगळे नियम काटेकोरपणाने
पाळणारे नागरीक आणि सरकारी दक्ष अधिकारी किती महत्वाची भूमिका बजावू शकतात हे
दिसले. आपल्याकडे ‘स्वाहाकार आणि कुंपणानंच शेत खाण्याचा प्रकार’ असल्यामुळे
आपलादेश मागे कां राहीला याचं उत्तर मला अशा पध्दतीनं मिळून गेलं.
...आयुष्य हे असेच असते. कधीही बदलू नयेत अशी वाटणारी शाश्वत मूल्ये
बदलतात,नाती बदलतात. आयुष्य तुम्हाला कधीही कोणत्याही गोष्टीचे वचन देत नाही की,
आणाभाका घेत नाही. पण हे सगळं तुमच्या आजूबाजूचे लोक घेतात. काहींच्या मते तुम्ही
अनमोल असता तर काहींच्या मते तुम्ही कवडीमोल.आयुष्य अशाच सफेद असत्यांनी भरलेले
असते. हे असत्य आहे हे कळल्यावर तुम्ही त्याला कसे सामोर जाता,यावर तुमच्या
आयुष्याची खोली ठरते. आयुष्याची लांबी-रुंदी जन्मत:च ठरलेली असते; पण खोली
ठरवण्याची जबाबदारी तुमची असते. क्षणभर वाटते, ही खोटी वचने नसती तर आयुष्य अधिक
बरे झाले असते...सुंदर झाले असते. पण तरीही आपण अशा बेगडी वचनांवर विश्वास ठेवतो.
आजकाल आपण सगळे अशा तुकड्यातुकड्यांवर जगायला शिकलो आहोत; हेच खरं.
निसर्गाने स्त्री व पुरूष हे पूर्णत: भिन्न मनोवृत्तीचे केले आहेत.
याला त्यांच्यातील मेंदूची रचना व कार्य हे कारणीभूत असते. कसं ते
पहा.........मेंदूचे दोन मुख्य भाग पडतात, उजवा मेंदू आणि डावा मेंदू. त्यांच्या
मूलभूत कार्यातही फरक असतो. पुरूषांमध्ये डावा मेंदू तर स्त्रीयांमध्ये उजवा मेंदू
जास्त प्रभावी असतो. डावा मेंदू हा तर्काचा आधार घेऊन विचार करणारा तर उजवा मेंदू
हा भावनांच्या अहारी जाऊन विचार करणारा असतो. डावा मेंदू एकावेळी एकाच विषयाचा,
एकाच मुद्द्याचा विचार करतो; तर उजवा मेंदू हा एकाचवेळी अनेक मार्गांनी अनेक
विषयांचा विचार करतो. म्हणूनच स्त्रीया एकाचवेळी अनेक गोष्टी कुशलतेनं करू शकतात.
त्यामुळे पुरूष मनातून स्त्रीयांचा हेवा आणि मत्सरही करत असतो. ह्या भितीपोटी
स्त्रीने आपल्या वरचढ होऊ नये म्हणून तीला मुलांच्या संगोपनाच्या
नावाखाली,धर्माच्या नावाखली पुरूषाने चलाखीकरून बंदीवान करून टाकले. स्त्रीयांना
अक्कल कमी असते, त्यांचं कार्यक्षेत्र म्हणजे फक्त चूल आणि मूल असा समज रुढी
परंपरेने घट्ट रुजवला. त्यांना शिक्षणाचा हक्क नाकारला. परिणामी स्त्रीयांना हेच
आपलं जीवन असं वाटायला लागलं. परंतू कर्त्या सुधारकांमुळे तिच्यासाठी शिक्षणाची
दारे खुली झाली. आणि आता स्त्रीया पुरूषाच्या खंद्याला खांदा लाऊन प्रत्येक
क्षेत्रात बरोबरी करू लागल्यावर तर पुरूषाची पाचावर धारण बसली. त्याच्या पुरूषी
वर्चस्वाला धक्का बसू लागल्यामुळे ते वर्चस्व टिकवण्यासाठी तो अधिकधीक हिंस्त्र होऊ
लागलाय.पण हे फार काळ चालू शकणार नाही. दमनक्रिया ही तात्पूरतीच असते हे काही
सुज्ञ पुरूषांच्या लक्षात आलंय. तेव्हा स्त्रीयांविषयी सकारात्मक झाले पाहीजे,
त्यांना बरोबरीच्या नात्यानं वागवलं पाहीजे,त्यांचा वस्तू म्हणून बाजार मांडता
कामा नये हे आता पुरूषाला हळूहळू कळू लगलंय.भविष्यात खर्या अर्थानं
स्त्री-पुरूषांमध्ये सहजीवन फुलू लागेल हे नक्की.
शिक्षण कसं असावं याबद्दल विचार करतांना मला
लोकमान्य टिळकांचं एक वाक्य आठवत. ‘शिक्षण हे सामाजिक, सांस्कृतीक, आणि औद्योगिक
सौहार्द राखेल,वाढवेल अशी पिढी निर्माण करणारं असावं.’ आजचं शिक्षण असं आहे का,हे
तपासून पहाण्याची वेळ आली आहे.आज जग बदलतंय आहे. तेव्हा शिक्षणाचं स्वरूपही
बदलायला नको का?विद्यार्थी कसा असावा याविषयी तर्कतीर्थ लक्ष्मणशात्री जोशी
म्हणाले होते की, ‘ चांगला विद्यार्थी हा व्यापक दृष्टी, सर्वसमावशक बुध्दी,
सूक्ष्म अवलोकन, आणि निरीक्षण,समस्या निदान व निवारण करण्याची ताकद असलेला तसेच
चांगला नागरीक बनण्याची क्षमता असणारा हवा.हे लक्षात घेतलं तर शिक्षण माणसाला काय
देतं, तरआपल्याला कळेल की शिक्षण हे त्याला व्यक्तीमत्वदेतं, त्याचं विश्व व्यापक
करतं,त्याला माणुसकी शिकवतं,जगण्याशी इमान राखण्याची प्रेरणा देतं.
त्याच्यामध्येलोकशाही निष्ठा, समाजनिष्ठा, कार्यनिष्ठा, सहसंवेदना निर्माण करतं.
त्याला जीवनशिक्षण देतं, त्याच्यात प्रखर राष्ट्रभक्ती निर्माण करतं.
...तर शिक्षण म्हणजे काय, जे माणसाला जगण्याची उभारी देतं ते. आजच्या शिक्षणातून
विद्यार्थ्यामध्ये कृतीशीलता निर्माण व्हायची गरज आहे. त्याची समाजाकडे डोळसपणे
पहाण्याची क्षमता निर्माण झाली पाहीजे. त्याची उद्यमशीलता वाढायला हवी. तसेच
जीवननिष्ठा बळकट व्हायला हवी. पण माझं निरीक्षण असं आहे की, माझ्या पिढीतले लोक
सुशिक्षित झाले, सुरक्षित झाले आणि संकुचीतही झाले. शिक्षणाने त्यांची दृष्टी
व्यापक केली नाही तर उलट खुजी केली. ते एकमेकांना,समाजाला स्वातंत्र्य, समता,
बंधुता ही मुल्ये देऊ शकले नाहीत. त्यांच्या जगण्यामध्ये एकलकोंडेपणा आला,उदासीनता
आली. आज या वर्गामध्ये आसपास घडलेल्या अन्यायाबद्दल चीड येत नाही. एखाद्या
अन्याय्य घटनेविरोधात उभं रहायला कुणीही तयार होत नाही; आणि फक्त बघ्याची भूमिका
घेतांना दिसतात..या सगळ्याचा परीणाम अपरिहर्यपणे समाजावर झाला आहे आणि समाजात
स्थितीशीलता निर्माण झाली. ही सगळी परीस्थिती बदलण्याची गरज आहे. त्यासाठी खूप काम
करावं लागेल.समाजात चैतन्य निर्माण करावं लागेल. हे परिवर्तन घडवण्यासाठी ठामपणे
उभी रहाणारी माणसं आज हवी आहेत. ती घडवणारं सामर्थ्य शिक्षणातून मिळालं पाहीजे,अशा
प्रकारची शिक्षणपध्दती निर्माण करावी लागेल. शिक्षणातून विवेचन करण्याची,स्वत:चं
परीक्षण करण्याची क्षमता माणसात निर्माण झाली पाहीजे. लक्षात ठेवा, संघर्षाला
घाबरणारे लोक कधीही बदल घडवू शकत नाहीत.
आत्मबोध
म्हणजे आत्मा किवा परमात्मा यांचा बोध नव्हे; तर स्वत:चे स्वत:ला झालेले आकलन होय.
हे आकलन तेव्हाच होऊ शकते जेव्हा मनुष्य स्वत:विषयी शिकू लागतो.त्यासाठी त्याला
आपल्यातला ‘मी’जाणून घेण्याची उत्सुकता मात्र असायला हवी.आपण कायम आपली इतरांशी
तुलना करतो.त्यांच्याप्रमाणे वागण्याचा आणि बनण्याचा प्रयत्न करतो. हा खरंतर आपल्या
व्यक्तिमत्वाचा तसेच आपल्यातील ‘मी’चा अपमानच असतो. आपल्याकडे लहान मुलांना नेहमी
सांगितले जाते की, तू अमक्यासारखा हो,तमक्यासारखा हो. पण तुझ्या रंगाने, गंधाने
आणि अंगभूत गुणांनी बहरलेले तुझे व्यक्तिमत्व आम्हाला हवे आहे, असा आग्रह मात्र
कोणी धरत नाही.
माणसातला
हा ‘मी’ त्याच्या अस्तित्वाची खूण असते. अनेकदा त्याच्यासाठी ती प्रेरकशक्ती असते.
मी हे केलं, मी हे करू शकतो,मला हे करायचे आहे, असा आत्मविश्वास निर्माण करून
त्याला कार्यप्रवृत्त करण्याची ताकद ‘मी’मध्ये असते. जोपर्यंत ‘मी’ हा स्वत्वाची
खूण म्हणून काम करीत असतो, तोपर्यंत त्या ‘’मी’पणाला माणसाचा सद्गुण म्हणून
स्वीकारले पाहीजे. त्यानंतर मात्र ‘मी’पणाचे अहंकारात आणि पर्यायाने गर्वात
रुपांतर होते. ते मग त्यामाणसाच्या जडणघडणीला हानीकारक ठरते. त्याच्या उन्नतीत
बाधा आणते. त्याला उथळ बनवते आणि त्याची शिकण्याची दारे बंद करते. कोणत्याही
गोष्टीचा अतिरेक हा जसा शेवटी विषात रुपांतरीत होतो तसेच ‘मी’पणाचेही आहे. ‘मी’पणा
जोपर्यंत स्वत्व आणि सत्व जपतोतोपर्यंत माणसाच्या अंगी विनयशीलता असते.पण जेव्हा
ह्या’मी’पणाला उर्मटपणाची व उध्दटपणाची झालर लागते तेव्हा माणसाच्या ह्या सद्गुणाचे
रुपांतर अहंकारात होते आणि हा ‘मी’ दुर्गुणी ठरतो.
आपण
अनेकदा ‘इगो’ हा शब्द अगदी सहज वापरतो; परंतु ‘इगो’ म्हणजे नक्की काय?
लहान
मुलं जन्मत: अत्यंत निर्मळ, निरागस असतात.म्हणजेच त्यांचा ‘स्व’ अत्यंत शुध्द
अवस्थेत असतो. त्यांना राग,लोभ,द्वेश,मत्सर अशा हानीकारक भावनांचा स्पर्शही झालेला
नसतो. त्यांची स्वत:विषयी कोणतीही बरोबर वा चूक, अशी मते तयार झालेली नसतात.
हळूहळू त्यांचा ‘अहम’ अर्थात ‘इगो’ भोवतालच्या परिस्थितीनुसार विकसित होतांना
दिसतो. आणि ‘स्व’वर अनेक पुटे व थर जमू लागतात.शुध्द व खर्या ‘स्व’ची जागा अशुध्द
व खोटा ‘स्व’ घेतांना दिसतो. माणसातला खारा ‘मी’ लुप्त होऊन एक कृत्रिम ‘मी’
म्हणजेच ढोंगी, अहंकारी, अशांत, अतृप्त ‘मी’ हळूहळू निर्माण होतो. स्वत:विषयी एक
चुकीची, काल्पनिक प्रतिमा हा ‘मी’च निर्माण करतो व तोच खरा ‘मी’ आहे असा भ्रम
माणसाला होतो. अशा स्वत:विषयी निर्माण केलेल्या खोट्या व अवास्तव प्रतिमेला चिकटून
रहाणे आणि तोच खरा ‘मी’ समजणे, यालाच ‘इगो’ म्हणतात.
जेव्हा
आपल्यातल्या ह्या खोट्या ‘मी’ला एखादी व्यक्ती धक्का पोहोचवते, तेव्हा एकतर
न्युनगंड तरी होतो वा त्याला अहंगंड तरी होतो.ही आपण ‘इगो’ला चिकटल्याची लक्षणे
आहेत.’मी’ खरा कसा आहे याचा दीर्घकाळ विसर पडल्याने समोरच्या माणसाने दिलेली दूषणं
आपण जशीच्या तशी स्वत:ला चिकटवून टाकतो.यामुळे खरंतर आपला ‘स्व’ म्हणजेच आपली
योग्यता आपण कळत-नकळत दुसर्याच्या हातामध्ये देत असतो. त्यामुळे स्वत:विषयी
बनवलीली खोटी स्व-प्रतिमा जोपर्यंत कार्यरत आहे, तोपर्यंत तणावाला सामोरं
जाणं,वारंवार दुखावलं जाणं, नकारात्मक विचार व भावनांना बळी पडणं हे अपरिहर्य आहे.
आपल्यातील खारा ‘मी’ जाणून घेण्याचा प्रयत्न करणं हाच खरा आत्मबोध होय.
श्रध्दा म्हणजे अशा गोष्टीला
सत्य मानणे की, जी कदाचित खरीही नाही. याचाच अर्थ असा की, मानलेली गोष्ट
प्रत्याक्षात तशीच आहे किवा नाही याची शहानिशा न करता ती तशीच आहे असे समजणे.
श्रध्दाळू मन हे त्याच्या श्रध्दाविषयावर चटकन विश्वास ठेवते. परीक्षण करणे, शंका
घेणे, प्रश्न करणे, सत्यासत्यतेचा पडताळा घेणे हे त्याच्या गावीही नसते. उलट असे
करणे म्हणजे श्रध्दा डळमळीत होणे असे ते मानते. ज्या गोष्टीसंबंधी आपल्या मनात
स्पष्टता असते, ज्या गोष्टींचे आपल्याला व्यवस्थित आकलन झालेले असते, त्या
गोष्टींच्या बाबतीत श्रध्देचा प्रश्नच उद्भवत नाही. याचा अर्थ असा होतो की, ज्या गोष्टींचे
आपल्याला यथार्थ आकलन झालेले नाही अशा गोष्टींविषयी ठाम कल्पना बनवणे व ती गोष्ट
आपण बनवलेल्या कल्पनेप्रमाणेच आहे असे समजणे म्हणजेच श्रध्दा ठेवणे होय.
मानवी
मेंदू हा पूर्ण सुरक्षित असेल तरच व्यवस्थित काम करू शकतो–केवळ शारीरिक
सुरक्षितताच नव्हे,तर मानसिक सुरक्षिततादेखील.माणसाचे मन जर असुरक्षिततेच्या
भावनेने पूर्णपणे ग्रासलेले असेल, तर तर्कशुध्द विचार करण्याची त्याची क्षमता
कुंठीत होते; तो हिंसक बनतो आणि इतरांसाठी धोकादायक ठरतो.म्हणूनच मानसिकरीत्या
माणसाला सुरक्षित वाटणे हे अन्न-वस्त्र-निवारा याइतकेच आवश्यक आहे. श्रध्दा ही
कितीही भ्रामक व वस्तुस्थितीला सोडून असली तरी ती जोपर्यंत माणसाला मानसिक
सुरक्षितता देत असते, तोपर्यंत माणूस ती सोडणे शक्य नाही. संघर्ष, स्पर्धा, द्वेश,
भय आणि असुरक्षिततेची भावना या गोष्टींवर आधारीत मानवी जगात देवासारखा
सर्वशक्तिमान,दयाळू, क्षमाशील व प्रत्येकाला समजावून घेणारा,न्यायप्रिय, सर्व
परिस्थितीत आपले रक्षण करणारा, आपले कल्याण करणारा असा कोणीतरी पाठीराखा आहेही
कल्पनाच इतकी लोभस व पूर्ण मानसिक सुरक्षितता देणारी आहे,की भयाने झपाटलेलामाणूस
देव व त्याच्या अनुषंगाने येणार्या सर्व संकल्पनांवर श्रध्दा ठेवू लागला तर नवल
काय? म्हणूनच म्हणावेसे वाटते की, देव जर खरोखरच असला तर तो निश्चितच भयग्रस्त
मनाने निर्माण केलेल्या त्याच्या संकल्पनेपेक्षा वेगळा नसेल.
अंधश्रध्देचे निर्मूलन करणे
म्हणजे लोकांच्या श्रध्दांना तडा पोहोचवणे नव्हे. कारण कोणाचीही श्रध्दा हिरावून
घेणे म्हणजे त्याला मानसिकरीत्या असुरक्षित करणे होय. असा असुरक्षित माणूस आक्रमक
आणि हिंसकच होण्याची अधिक शक्यता असते. अंधश्रध्देपासून मुक्त व्हायचं असेल तर,
मुळात माणूस श्रध्दावान का बनतो याचा शोध घेणे आवश्यक आहे. बाह्यत: कितीही बदल केले
तरी मुळातच मानसिकरीत्या भयग्रस्त व असुरक्षित माणूस कसा बरे तर्कशुध्द विचार करू
शकेल आणि अंधश्रध्दा सोडू शकेल? म्हणून प्रत्येकाला शारीरिक आणि मानसिकरीत्या
सुरक्षित वाटेल असे वातावरण जगात निर्माण करणे आवश्यक आहे.
कुठलीही समस्या उभी ठाकली तर
ती का उभी ठाकली, आपण कुठे कमी पडलो, पुन्हा असे होऊ नये म्हणून काय करणं आवश्यक
आहे हे बघणं आणि ते आपल्याला समजत नसेल तर संबधित तज्ञाचा सल्ला घेणं ही झाली
सकारात्मक समायोजन शैली. या उलट ती समस्या दूर करण्यासाठी देवीचा कोप झाला,भूतबाधा
झाली, कोणीतरी जादूटोणा केला अशा समजूती करून निरर्थक कर्मकांड करणं, देव देव
करणं, बाबा,बापू वा भगताच्या मागे लागणंही आहे नकारात्मक समायोजन शैली! त्यातून
समस्येचं निराकरण होण्याऐवजी ती वाढीस लागते. याउलट तज्ञाच्या सल्ल्यातून उपचार
आणि मार्गदर्शन मिळतं व समस्या सुटण्यास मदतच होते. पण आपण पहील्यांदा देवदेवस्की
करतो आणि अती झाले की डॉक्टरकडे जातो. तोपर्यंत कधीकधी वेळ निघूनही गेलेली असते
आणि दोष मात्र तज्ञांना दिला जातो.या मानसिकतेचा आणि मानसिक समस्येचा भाग आला की
प्रथम अंध धार्मिकतेची मदत घेतली जाते. हा दुर्दैवी अविवेक मनस्वास्थ्य बिघडवून
टाकतो. बाबा,बापू,महाराज यांचे गंडेदोरे अध्यात्मिक वाटतात. या अंधश्रध्देमुळे
धर्माच्या आणि अध्यात्मिकतेच्या नावाखाली आर्थिक व मानसिक तर कधीकधी लैंगिक शोषण
होते. वेळ वाया जातो त्यामुळे समस्या बळावते. हे आपण लक्षात घेणार आहोत की नाही?
बुध्द उवाच, ‘मी जे काही सांगितलं त्यावर केवळ मी
सांगितलंय म्हणून विश्वास ठेवू नका. केवळ परंपरा सांगते म्हणूनही काही ऐकू नका.
कोणी प्रसिध्द व्यक्ती परंपरांचं समर्थन करते म्हणून तुम्ही त्या तशाच पुढे
चालवल्या पाहिजेत असे नाही. केवळ शक्य आहे म्हणून बरोबर आहे असे समजू नका. केवळ
व्यवहार्य आहे म्हणून स्वीकारू नका. सगळ्यांचे सगळे विचार ऐकून तुमच्या
सद्सद्विवेकबुध्दीला जे योग्य वाटते त्यावरच विश्वास ठेवा; आणि त्यप्रमाणे आचरण
करा. डोळ्यावरच्या अनेक पट्ट्या काढून तुमच्या मनाची घडी बसवा. हेच केव्हाही
योग्य.’
व्यक्तीगत व सामाजिक जीवनात कितीतरी रुढी आणि
परंपरा आपण डोळ्यावर पट्ट्या ठेवून पाळत असतो. कितीतरी परंपरा कालबाह्य झाल्या तरी
आपल्या पूर्वजांनी सुरू केल्या, सांगितल्या म्हणून आपण पाळत असतो. स्त्रीयांमधील
शिवाशीव, विटाळ हे अशीच एक रुढी आजही कमी-अधिक प्रमाणात पाळली जाते. म्हणूनच
स्त्रीयांना त्या काळात अजूनही मंदिरात पुजाअर्चा करणे सोडाच साधा प्रवेशही
नाकारला जातो. काय तर म्हणे स्त्री त्या काळात अपवित्र झालेली असते. खरे तर ती एक
नैसर्गिक चक्रानुसार होणारी उत्सर्जन प्रक्रीया आहे. आज त्यासाठी व्यवस्थित काळजी
घेण्यासाठी साधनंही उपलब्ध आहेत. तरीही एकविसाव्या शतकात आगदी सुशिक्षित
स्त्रीयादेखील ही परंपरा अगदी मनोभावे पाळतांना दिसतात. त्यासाठी लग्नसराईच्या
काळात वा घरातील देवधर्माच्या कार्यक्रमात अडथळा येऊ नये म्हणून डॉक्टरांकडून पाळी
पुढे जाण्याच्या गोळ्या घेतात.
या उत्सर्जीत वस्तू शेवटी निसर्गातच विसर्जीत
होतात ना? म्हणूनच श्रध्दा ठेवण्यात या नैसर्गिक क्रियांचा अडथळा नक्कीच तर्कसंगत
नाही. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेणे म्हणजे ‘विज्ञानविसंगत परंपरा
पाळण्यासाठी विज्ञानानेच निर्माण केलेल्या गोळ्या घेणं’ हा तर निव्वळ भोंदूपणा
झाला. उलट ह्या गोळ्यांमुळे स्त्रीयांचं मनस्वास्थ्य बिघडतं. त्यांच्या
तब्बेतीच्या पुढे तक्रारी वाढू शकतात. पण आपल्या संस्कृती रक्षकांना त्याची तमा
नसते. कारण त्यांच्या दृष्टीकोनातून स्त्री ही एक वस्तूच असते. पावित्र्य हे
स्वच्छतेत असते; म्हणून त्या काळातली स्वच्छ स्त्री ही पवित्रच असते. हे पॅड्सच्या
जाहीराती मुलाबाळांसहीत दूरदर्शनवर पहाणार्या आजच्या आधूनिक (?) स्त्रीपुरुषांना
कळेल काय?
अंधश्रध्दा आणि आपण
आजही आपल्या देशात नरबळी
सारखे प्रकार घडता आहेत हया विषयी वाचल्यावर, ऐकल्यावर आणि पाहिल्यावर मन सून्न होतं. डॉ. दाभोलकरांचे बलिदान व्यर्थ गेले की काय असंही वाटू लागतं.
दाभोलकरांनी अंधश्रध्देच्या विरोधात इतका प्रदीर्घ लढा दिल्यानंतरही जर आपल्या
देशात नरबळीसारखे प्रकार होत असतील तर आपला देश अंधश्रध्देच्या गर्तेत किती खोलवर
रूतलेला आहे हे लक्षात येतं. डॉ. दाभोलकरांनी जर
अंधश्रध्देच्या विरोधात लढा उभारलाच नसता तर आतापर्यत अजून किती बळी गेले असते
याची कल्पनाच न केलेली बरी. जादूटोणा विरोधी कायदा जरी अस्तित्वात आला असला तरी
त्याची अंमलबजानी कशी केली जातेय यावर पुढील सर्व निर्भर आहे.
आजही महाराष्ट्रातील कोकण
भागात लग्न वगैरे ठरल्यावर अथवा ते होण्यापूर्वी देवाला कौल वगैरे लावण्याचे
प्रकार सर्रास होत असतात. यात त्यांच्या मनाला पटत
असो वा नसो स्वतःला सुसंस्कृत आणि उच्चशिक्षित म्ह्णवून घेणार्यांचाही सह्भाग
खेदाने असतो, देव आपल्याला ह्वा तसा कौल
देईपर्यत स्वतःची आणि त्या अनुषंगाने देवाची फसवणूक
करण्याचा हा प्रकार असतो. त्यामुळे कोणाचं नुकसान होत नसलं, तरी काही अंशी का होईना अंधश्रध्देला खतपाणी मिळ्तंच. हे सत्य नाकारता येणार
नाही. गुरू करणं हा मोक्षाला जाण्याचा
एकमेव मार्ग असा भारतातील बर्याच लोकांचा समज आहे. काही गुरू तर लोकांना चॉकलेट-
गोळ्या वाटाव्या तसा गुरूमंत्र वाटत फिरत असतात, शिष्याची योग्यता न पाह्ता.
एखाद्या गुरूमंत्राचा जप केला की आपल्याला सर्व पापातून मुक्तता मिळ्ते आणि आपला मोक्षाचा मार्ग सुखकर होतो असा
गैरसमजही बर्याच जणांचा झालेला दिसतो. या अशा बुरसटेल्याअंधश्रध्देने ग्रासलेल्या
विचासरणीचा काही भोंदू साधू फायदा उचलत, आपला स्वार्थ साधत कशी करोडोची माया जमा करतात हे आता जगजाहीरच झालेलं आहे. गावाकडे आजही हया ना त्या झाडावरच्या भुताला दरवर्षी
कोंबड्याचा नाहीतर नारळाचा नैवेद्य चढ्विला जातोच आहे. हे झालं सर्वसामान्य माणसांबद्द्ल पण जेंव्हा दूरदर्शनवर भुतं-खेतं, जादूटोणा, पूर्नजन्म आणि काळीजादू वगैरे प्रकार
मालिकांच्या माध्यमातून सर्रास दाखविले जातात तेंव्हा या माध्यमाशी संबंधतीत
असणारे नक्की समर्थन कोणाचं करत असतात ?दूरदर्शनसारख्या माध्यमांचा वापर
अंधश्रध्दा कमी करण्यासाठी करायचा की त्यांना खतपाणी घालण्यासाठी याचाही नव्याने
विचार व्हायला ह्वा.
सध्याचे पालक आपल्या
मुलांवर चांगले संस्कार करण्याची आपली जबाबदारी पार पाडत नाहीत आणि ती वाया गेली
की, त्यांना बाबाच्या नाहीतर
बुवाच्या पायावर घालतात ज्यातही नवसाने झालेल्या मुलांचा सह्भाग बर्यापैकी असतो.
पूर्वी देव्हार्यात निदान देव तरी असायचे पण ह्ल्ली काहींच्या देव्हार्यात
देवाच्या जागी बाबा आणि बुवांच्या तस्बिरी लावलेलेल्या दिसतात ज्यांच्यासमोर त्याच
बाबांनी रचलेल्या अथवा रचून घेतलेल्या अर्थहीन आरत्यांचा रोज सकाळ-संध्याकाळ न
चुकता बोलल्या जातात..
आजच्या समाजातील आई-वडील आणि त्यांची मुलं यांच्यातील दुरावा कमी होण्या ऐवजी
वाढत चाललाय आणि पालक़ांनी जर
मुलांशी संवाद वाढवला नाही तर तो तसाच वाढत जाणार. आजही आपल्या देशातील कित्येक घरात
कोणती ना कोणती अंधश्रध्दा कोणा ना कोणाकडून कळत - नकळ्त जोपासली जातेच. आपल्या
देशातील अंधश्रध्दा ही एखाद्या महाकाय अजगरासारखी आहे. जिने डॉ. दाभोलकरांना
गिळंकृत केलं...आता त्यांच्या नंतरही
त्या महाकाय अजगराबरोबरचा लढा सुरूच आहे. तो लढा कदाचित कधीच संपणार नाही तो असाच
सुरू राहणार...
निसर्गाने स्त्री व पुरूष हे पूर्णत: भिन्न मनोवृत्तीचे केले
आहेत. याला त्यांच्यातील मेंदूची रचना व कार्य हे कारणीभूत असते. कसं ते
पहा.........मेंदूचे दोन मुख्य भाग पडतात,
उजवा मेंदू आणि डावा मेंदू. त्यांच्या मूलभूत कार्यातही फरक असतो.
पुरूषांमध्ये डावा मेंदू तर स्त्रीयांमध्ये उजवा मेंदू जास्त प्रभावी असतो. डावा
मेंदू हा तर्काचा आधार घेऊन विचार करणारा तर उजवा मेंदू हा भावनांच्या अहारी जाऊन
विचार करणारा असतो. डावा मेंदू एकावेळी एकाच विषयाचा, एकाच
मुद्द्याचा विचार करतो; तर उजवा मेंदू हा एकाचवेळी अनेक
मार्गांनी अनेक विषयांचा विचार करतो. म्हणूनच स्त्रीया एकाचवेळी अनेक गोष्टी
कुशलतेनं करू शकतात. त्यामुळे पुरूष मनातून स्त्रीयांचा हेवा आणि मत्सरही करत
असतो. ह्या भितीपोटी स्त्रीने आपल्या वरचढ होऊ नये म्हणून तीला मुलांच्या
संगोपनाच्या नावाखाली,धर्माच्या नावाखली पुरूषाने चलाखीकरून
बंदीवान करून टाकले. स्त्रीयांना अक्कल कमी असते, त्यांचं
कार्यक्षेत्र म्हणजे फक्त चूल आणि मूल असा समज रुढी परंपरेने घट्ट रुजवला. त्यांना
शिक्षणाचा हक्क नाकारला. परिणामी स्त्रीयांना हेच आपलं जीवन असं वाटायला लागलं.
परंतू कर्त्या सुधारकांमुळे तिच्यासाठी शिक्षणाची दारे खुली झाली. आणि आता
स्त्रीया पुरूषाच्या खंद्याला खांदा लाऊन प्रत्येक क्षेत्रात बरोबरी करू लागल्यावर
तर पुरूषाची पाचावर धारण बसली. त्याच्या पुरूषी वर्चस्वाला धक्का बसू लागल्यामुळे
ते वर्चस्व टिकवण्यासाठी तो अधिकधीक हिंस्त्र होऊ लागलाय.पण हे फार काळ चालू शकणार
नाही. दमनक्रिया ही तात्पूरतीच असते हे काही सुज्ञ पुरूषांच्या लक्षात आलंय.
तेव्हा स्त्रीयांविषयी सकारात्मक झाले पाहीजे, त्यांना
बरोबरीच्या नात्यानं वागवलं पाहीजे,त्यांचा वस्तू म्हणून
बाजार मांडता कामा नये हे आता पुरूषाला हळूहळू कळू लगलंय.भविष्यात खर्या अर्थानं
स्त्री-पुरूषांमध्ये सहजीवन फुलू लागेल हे नक्की.
Rushi & Rived are good friends. One day while walking
together near the seashore, Rushi slapped Rigved due to trivial
difference.Rigved wrote on the sand, ‘My best friend slapped me today.’ They
latter patched up & continued their walk. As they were watching the
wonderful sight of the sun set in the sea, there was strong current dragged
Rigved to deep waters. Immediately Rushi rescued him.
Rigved thanked Rushi profusely & wrote on the nearby
rock, ‘My best friend saved my life today.’ Rushi was surprised at this &
asked Rigved, ‘When I slapped, you wrote on the sand; when I saved you, you
wrote on the rock.’ Rigved replied, ‘My master told me that whenever someone
hurts you, write it on the sand as it can be washed away. Whereas if someone
does good act, write it on the rock so that it will be remembered forever.’
Rigved
continued further, ‘This how one should manage one’s hurt. Generally we do the
opposite. People remember good act like it is written on running water while a
bad act garlanded & thus keeping their hurt alive. This is a poor
management of life. My master has taught me to place both good & bad
experiences of the life in unique way.’
मी लहान असताना मला सगळेजण सांगायचे खुप अभ्यास कर मोठा हो
नाव कमवं . पणमला खुप अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं हे कधी कळलंच नाही.
क्रमिकपुस्तके वाचायची प्रश्नांची उत्तरे पाठ करायची . शाळेत दिलेला(शिक्षकांनी, बाईंनी सांगितलेले काम लेखनाचे वा वाचनाचे)अभ्यास पूर्णं
करायचा. परीक्षा आलीकी,परीक्षा द्यायची निकालाची वाट बघायची आणि निकाल लागल्यावर
मिळालेल्यामार्कांवर सगळेजण आपल्याला हुशार ठरवतात याचा अभिमान वाटायचा. याच
विचारातराहून शिक्षण पूर्णं केले. नोकरी पण मिळवली .नोकरीलातीन वर्ष पूर्ण
झाल्यावर सगळेच ज्या गोष्टी करतात तसं मी ही विवाह बंधनातबांधला गेलो . माझ्या
संसार रुपी रोपटं आता बहरायला लागलं.मला दोन मुलंझाली. मुलं शाळेत आनंदाने जायला लागली. पण
पहिल्याच आठवड्यात मला माझ्यामुलीने प्रश्न विचारला बाबा अभ्यास म्हणजे काय ? आता बघा मलाच आता पर्यंतत्याचा अर्थ कळला नव्हता मग मी काय
त्याला अर्थ सांगणार ! मी माझ्यासभोवतालच्या माणसांनी आई बाबांनी, नाना काकूंनी माझ्या शिक्षकांनी मला जेकाही अभ्यास म्हणून
सांगितलं होतं तेच मी त्याला सांगितलं. मुलाचं समाधानझालं का नाही हे नक्की सांगता
येणार नाही पण माझं मन त्या उत्तराने फारअवस्थ झालं. अरे आपणही शाळा शिकलो मग अभ्यास
म्हणजे काय हा प्रश्न मला कधीचका पडला नाही. मी जो केला ज्यातून मला भरपूर गुण
मिळाले तोच का अभ्यास मगत्याचा उपयोग मला माझे काम करताना किंवा जीवन जगताना का
होईना? अभ्यासानेमाणूस जर ज्ञानी होतो तर मी ज्ञानी नाही का नाही झालो? मला तर सगळे हुशार म्हणायचे , मला चांगले गुण मिळायचे. पण मला तर पाठीमागचं थोडंफारच आठवतंय.
मन याविचारात व्यस्त झालं की अभ्यास म्हणजे काय नक्की काय मुलं शाळेत
दाखलझाल्यापासून अभ्यास सुरू होतो हे खरं ... मी या संदर्भात असलेली पुस्तकेविविध
लेख वाचायला सुरुवात केली. आणि मला माझ्या प्रश्नाच उत्तर मिळाल कीअभ्यास
म्हणजे खेळ.......
पण खेळ कसा? या विचारात पडलो खेळाचा आणि अभ्यासाचा संबंध काय ? भरपूर खेळांची नावे लिहून काढली आणि शोधू लागलो की काय संबंध
असावा याचाएक गोष्ट कळली की अवयवांचा योग्य वापर , मनाची एकाग्रता,डोळ्यांनी
योग्यनिशाणा सधावा लागतो, कानांनी अचूक ध्वनीचा वेध
घ्यावा लागतो . मग याच तर सर्व गोष्टीअभ्यासासाठी आवश्यक असतात. मग अभ्यास हा
सुद्धा एक खेळ आहे . ही संकल्पनामला सुचली ती माझ्या नजरेतून मी मांडत आहे.
जरा विचारकरा माझ्या उदाहरणातून मी दाखवून देतोय की एखाद्या
प्रश्नाच्या उत्तरापर्यंत म्हणजेच मुळाशी जाणे व त्याची पूर्णं माहिती घेणे याला
अभ्यासम्हणायचं किंवा यातून नविनच काही तरी शोधायचंम्हणजे अभ्यास होय. प्रश्नअसा
निर्माण होतो की पहिलीत शिकणाऱ्या मुलाला कुठं एखाद्या उत्तरासाठी असंखोलात शिरावं
लागतं किंबहुना १० वी च्या विद्यार्थ्याला सुद्धा असं काहीकरावं लागत नाही. आणि जर
एखाद्या समस्येच्या मुळापर्यंत जाणे म्हणजे अभ्यासआहे असं मानलं तर शाळकरी मुलं
करतात तरी काय व त्यांचे पालक त्यांच्याकडून अभ्यास म्हणून नेमंक काय करून घेतात
कोणास ठाऊक.
क्रमिक पाठ्यपुस्तकाच वाचन म्हणजे अभ्यास असा अर्थ लावून समाज
वावरतो आहे.पाठ्यक्रम जर बघितला तर त्यात त्या मुलाने मुळापर्यंत जावं असं त्यात
काहीचनाही. मुलांच्या क्षमतांचा विचार करता योग्य वाटतो. यातून आणखी नवीनकल्पनेचा
उदय आपण जे घेत आहोत ते शिक्षण म्हणायचे की प्रशिक्षण ? शिक्षणानेमाणूस सुशिक्षित व सुसंस्कारित होतो. तर
प्रशिक्षणाने तो कौशल्य प्राप्तकरून घेतो. मला असं वाटतं की, आपण पहिली पासून जे घेतोय ते शिक्षण नाही तर ते प्रशिक्षण आहे
. याप्रशिक्षणात आपल्याला आपले डोळे, कान , जीभ , त्वचा , नाक याज्ञानेंद्रियाचा योग्य वापर करायचे कौशल्य प्राप्त करायचे
आहे असते. कौशल्यप्राप्ती साठी सराव महत्त्वाचं असतो . सरावानेच माणूस परीपूर्ण
होतो. हासराव आपणाला परिपूर्ण होण्यास मदत करतो. क्रमिक पुस्तके हि सुद्धा
सरावासाठीच आहेत. जसं खेळात यश संपादन करणे अंतीम ध्येय तसेच या प्रशिक्षणातकौशल्य
प्राप्ती हे अंतिम ध्येय.
मुलांना खेळायला खूप आवडतेमग् जर शिक्षकांनी व पालकांनी
त्यांच्या मानगुटी वर अभ्यास नावाचे भूतन बसवतां या शिक्षण रुपी प्रशिक्षणातून
सरावाच्या माध्यमातून विविधखेळाच्या स्वरूपात जर ही कौशल्य विकसित केली तर खऱ्या
अर्थाने १० वी नंतरखरा मुळापर्यंत जाऊन पोहोचायचं आहे असा अभ्यास करण्यासाठी मुलं
पात्र होतील.
एकच उदा. पहिलीत अक्षरांची ओळख , त्यांचं वाचन, व डोळ्यांचा
योग्यवापर करून प्रमाण बद्ध लेखनजर प्रमाणबद्ध लेखन करता आलं तर अक्षर
सुवाच्यवळणदार येईल. अभियंता होण्यासाठी नजरेतूनच प्रमाण बद्धता ठरवता येणं
हेकौशल्य इथच मिळतंय. आणी हे खेळ म्हणून सहज करून घेता येण्यासारखं आहे .मनाची
एकाग्रता , नजरेचा वेध, हि कौशल्य
आहेत. ही सरावानेच मिळतात किंवाआत्मसात होतात.
म्हणून मला असं वाटतं कीअभ्यास
हा सुद्धा एक खेळ आहे त्याचं भूत बनविण्यात काही अर्थ नाही. मुलांना खेळ आवडतात
अभ्यास नाही.हेच जर खेळ व सराव म्हणून केले तर आनंदाने स्वीकारतात असा अनुभव
आहे एक पालक म्हणून व एक शिक्षक म्हणून देखील.
हल्लीच्या
पालकांना असे वाटते की, आपल्या मुलांना पदवी मिळाली म्हणजे ते सुशिक्षीत झाले.
त्यांना आपण पूर्ण शिक्षीत केले. कारण पालकही अशाच पध्दतीने शिक्षीत झालेले असतात.
पुस्तकी शिक्षण म्हणजेच खरे शिक्षण असे या सगळ्या सुशिक्षीत पालकांना वाटत असते.
पण खरेच का आपण सुशिक्षीत असतो का?
जर आपण
खरेच सुशिक्षीत असू तर आपण केलेल्या चुका स्विकारतो का? की त्यांचे समर्थन करतो?
आपले मत मांडतांना समोरच्याचे मत विचारात घेतो का? आपल्यापेक्षा कुणी चांगले काम
केले तर त्याची मनापासून वहावा करतो का? की आपल्याला असूया वाटते? दुसर्यातील
चांगल्या गुणांची कदर करतो क़ा? की त्याच्यातील व्यंग शोधण्यात आपणास आनंद
होतो?स्वत:ची कुवत आणि ताकद ओळखतो का? की स्वत:विषयीच्या अवास्तव कल्पनांनाच
कवटाळून बसतो? आपला जास्त वेळ टीका, तक्रारी करण्यात जातो का? कोणतीही कृती
करण्यापुर्वी सारासार विचार करतो का? की परंपरेच्या जोखडाखाली प्रवाहपतित होतो?
आपल्या अपयशाचे खापर दुसर्यांवर फोडतो का? कितीही त्रास झाला तरी सत्याची कास
धरतो का? बोलतांना विचार करून बोलण्यापेक्षा भावनेच्या अहारी जावून बोलतो का?
या
प्रश्नांची उत्तरे आपण आपल्याच मनाशी प्रामाणिकपणे दिली तर आपल्यालाच कळेल की आपण
खरेच सुशिक्षीत आहोत की फक्त साक्षर. पुस्तकी शिक्षणाने आपण फारतर साक्षर
होऊ पण सुशिक्षीत होण्यासाठी चिंतन आणि मननाचा सराव असणं आवश्यक असतो. आपल्यापैकी
कितीजण स्वत:शी प्रामाणिक असतात? कळपाच्या विरोधात जाण्याचे धाडस किती लोक
दाखवतात? कितीजण कठोर आत्मपरिक्षण करतात?
मोठ्या माणसांची नावंजिभेवर ठेवून आणि त्यांचे
देव्हारे माजवून आजही आपण जर जातीपातीच्या भिंती उभारणार असू,
भूत-पिशाच्याच्यासंकल्पनांना कवटाळणार असू, धर्माच्या नावाखाली ध्वनीप्रदूषण आणि
गुंडगिरी करणार असू, परंपरेच्या आडून अन्यायकारक गोष्टींना थारा देणार असू तर पदवी
मिळूनही आपण सुशिक्षीत झालो असे कशाच्या आधारावर म्हणता येईल?
गोष्ट
मागच्या वर्षाचीच आहे. गंगटोकमध्ये एका बागेत संध्याकाळी बागेतील फुलांचे निरिक्षण
करीत फिरत होतो. समोर एक सुमारे दोन फुट खोलीचा कारंजाचा खड्डा बांधलेला होता.
कारंजे बंद होते आणि खड्डाही कोरडाच. आमच्या मागून एक भारतीय जोडपे आले .त्यांच्या
सोबतची दोन मुले उत्सुकतेने त्या खड्ड्याकडे धावली. त्याबरोबर आई लगेच म्हणाली,
“तिकडे जाऊ नका. पडाल आत.” मुले गुपचूप आई-बाबांजवळ येऊन बसली. थोड्यावेळाने एक
पाश्चात्य जोडपे तिथे आले. त्यांचीही दोन मुले त्या खड्ड्याकडे गेली. त्यांनी
उत्सुकतेने आत डोकावून पाहीलं. खड्ड्यातल्या एका मोठ्या दगडावर पाय ठेवून मुलगा आत
उतरला.मुलगीही मागून हळूहळू उतरली. त्यांचे आई-वडील जरी एकमेकांशी बोलत असले तरी
त्यांचे मुलांकडे बारीक लक्ष होते. मुलांनी त्या खड्ड्यात काहीबाही बोलत एक फेरी
मारली. कारंजे, त्याची तोटी चाचपून पाहिली. आता त्यांना वर यायचे होते; पण ते
उतरण्याएवढे सोपे नव्हते. त्यांनी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न केले. शेवटी एका
दगडावर पाय ठेवून मुलगा वर आला. पण त्याच्या पाठीमागून येणारी मुलगी मात्र घसरली.
त्याबरोबर तिची आई चटकन मुलीला सावरायला उठली. पण विषेश काही नाही असे वाटून
पुन्हा बोलण्यात गुंतली. मुलाने बहिणीला वर यायला मदत केली आणि पुन्हा दोघे नव्या
उत्सुकतेने दुसरीकडे वळले.
यावरून भारतीय मनाला वाटेल की, पहा या पाश्चात्य
आई-बाबांना मुलांची काळजीच नाही. ते आपले बोलण्यात स्वत:तच दंग! आणि भारतीय आईबाप
मात्र कसे आपल्या मुलांना आज्ञाधारकपणे वागायचे ते शिकवतात. ‘हाताची घडी, तोंडावर
बोट’ हा आपल्या संस्कारांचा पाया असल्यामुळे आपल्याला हे खरे वाटते.आणि पाश्चात्य
कसे संस्कारहीन आहेत असा आपला गोड समज(?) करून घेतो.पण हा समज खरा आहे काय?
मला
खात्री आहे की, आई-वडीलांचं मुलांवर प्रेम असतं - मग ते भारतीय असो की पाश्चात्य.
पण भारतीय पालकांचे होते काय की, ते आपल्या मुलांवर आंधळी माया करतात. त्यांना
त्यांची खूप काळजी वाटते. त्यांना मुलांचा झालेला अपेक्षाभंग, त्यांना झालेले दु:ख
तसंच त्यांनी निराश झालेलं पहावत नाही. त्यांच्या बाबतीतले सर्व निर्णय आपणच अधिक
योग्यरित्या घेऊ शकतो, असे वाटल्यामुळे आपल्या मुलांनी कोणते शिक्षण घ्यावे,
कोणाशी लग्न करावे, किती मुले होऊ द्यावीत तसेच त्यांनी नोकरी करावी की व्यवसाय याविषयी
त्यांचे आग्रही सल्ले असतात. लहानपणापासून आज्ञाधारकतेच्या गोंडस संस्काराखाली
वाढल्यामुळे ही मुले भविष्यात निर्णय घ्यायला ,त्या निर्णयाला जबाबदार रहायला शिकत
नाहीत. त्यांना स्वातंत्र्य पेलता येत नाही. गप्प बसा संस्कृतीमुळे ती पंगू बनतात.
पाश्चात्य पालक मात्र आपल्या मुलांना चुका करण्याचे स्वातंत्र्य देतात.
‘जा,पहा,करा आणि आपल्या निर्णयाची जबाबदारी घ्या’ हा त्यांच्या संस्कारांचा
मूलमंत्र. परिणामी ती मुले चिकित्सक, विश्लेषक कुतूहलाने जगाकडे पहाणारे सामाजिक
जाण असलेले उत्तम नागरीक बनतात.
आपण किती दांभिक आहोत हे आता तरी आपल्या मनाशी
कबूल करणार आहोत काय?
आज
अतीलाडात वाढलेल्या मुलांना आणि ज्यांच्या सार्या इच्छा-अपेक्षा पालक तातडीने
पुर्ण करतात, अशा मुलांना शिक्षणाच्या सुरक्षित वातावरणातून कामाच्या ठिकाणी
गेल्यावर तिथे सहकार्यांशी जुळवून घेणे कठीण बनते. सांघिकरीत्या काम करणे जिकरीचे
होते. म्हणून पालकांनीही मुलांना वाढवतांना अतीसंरक्षित वातावरणात वाढवणे टाळायला
हवे. त्यासाठी चारचौघात त्याचा वावर वाढवणे, इतरांशी जुळवून घ्यावे लागणे याचे
प्रशिक्षण घरातूनच दिले पाहीजे.त्यांना घेतलेल्या निर्णयातील यशापयश पेलण्याची
क्षमता यायला हवी. करीयर निवडीचे स्वातंत्र्य द्यायला हवे. काही वर्षांनी जरी
त्यांना वाटले की, आपला निर्णय चुकला तर खचून न जाता नव्या मार्गाने जाण्याची
हिम्मत यायला हवी.पण... सध्या पालकांनी आपल्या मुलांना गिनीपिग केलंय. आपल्या
अपूर्या इच्छा-आकांक्षा त्यांच्यावर लादून मुलांच्या करीयरची ते निवड करताहेत.
मुलाचा कल वा आवड न पहाता आपला मुलगा/मुलगी इंजिनीयरींगला, मेडीकलला आहे हे
सांगण्यात पालकांना धन्यता वाटते...आपली पत वाढल्यासारखी वाटते. त्यामुळे मुलांनी
पूर्वप्राथमिक शिक्षण पूर्ण करण्याआधिच त्यांना पालक क्लासेसमध्येगुंतवून टाकतात.
परिणामी या क्लासेसचे इतके पेव फुटले आहे की, दहावीचे अनेक विद्यार्थी निकाल
लागण्यापूर्वीच अकरावीच्या अभ्यासाला लागलेले दिसतात. यात मुलं इतकी अडकून जातात
की, त्यांना वेगळ्या वाटेचा विचार करण्याचा, वेगवेगळे प्रयोग करण्याचा अवकाशही
मिळत नाही. बहुसंख्य पालक पदवी अभ्यासक्रमाची निवड करतांना मुलांच्या आवडीनिवडीपेक्षाही
त्या क्षेत्राला बाजारपेठेत किती मागणी आहे, तो अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर
वर्षाकाठी किती पॅकेज देणारी नोकरी मिळेल याचा विचार करून तशाच अभ्यासक्रमात
प्रवेश घ्यायचा आटापिटा करतात.
तेव्हा पालकांनो, एक लक्षात ठेवा, सावलीत वाढणार्या
रोपट्याला कधीही बळ येत नाही. त्याला वाढण्यासाठी ऊन हे लागतच... मुलांचही तसंच
आहे. मुलांना खूप सुरक्षिततेत वाढवणं हे मुलांच्या विकासासाठी बाधक ठरतं. मुलांना
निवडस्वातंत्र्य द्यायला हवं. करीयर... ज्यावर त्यांची पुढची अनेक वर्षे अवलंबून
आहेत, ते निवडण्याचं स्वातंत्र्य तर हवंच हवं. आपण खस्ता कशा काढल्या, याचे
वारंवार वर्णन मुलांना करून त्यांच्यावर दबाव आणणं अयोग्य आहे. वरचेवर आपल्यला
भोगाव्या लागलेल्या त्रासाचा उल्लेख ऐकून मुलांना उबग येतो आणि उलटा परिणाम
होण्याचीच शक्यता अधिक असते. मुलांचे यश हा स्टेटस सिंबॉल म्हणून मिरवण्याचा
मुद्दा नाही. मुल आपले असले तरी त्याला स्वत:च्या क्षमता आहेत,आवडीनिवडी आहेत, याचा
पालकांना विसर पडता कामा नये. जर तुम्ही आपल्या आशा-अपेक्षांचे ओझे मुलांवर लादले
तर त्यामुळे नुकसान होण्याचीच शक्यता जास्त. म्हणून त्यांना निवड... मग ती
शैक्षणिक असो, लग्नाची असो वा सामाजिक रुढी-परंपरांची, निवड करण्याची मोकळीक द्या.
उगाचच दहावी-बारावीच्या वर्षात घरात सुतकी वातावरण ठेवण्याची गरज नाही. मुलांच्या
यशासाठी त्यांना त्यांच्या छंदापासून, बाकीच्या नॉर्मल वागण्यापासून दूर ठेवण्याचे
कारण नसते. कारण बोर्डाच्या परीक्षेत मिळालेले गुण ही त्यांच्या हुशारीची एकमेव
कसोटी नसते. त्यांचे ध्येय्याकडे जाण्यासाठीलागणारे कठोर परीश्रम आणि अभ्यासात
झोकून देण्याची वृत्ती फुलवण्यातच पालकांचे खरे कौशल्य आहे.
नुकतेच
12वीचे निकाल लागले आहेत. प्रत्येकाला आपापल्या वकूबाप्रमाणे गुण मिळालेले
आहेत.12वी ही करीयर घडवण्यासाठीचा मोठा टप्पा आहे हे निश्चित.पण म्हणूनच आपल्या
पाल्याला कमी गुण मिळाले तरी पालकांनी नाराज होता कामा नये. आयुष्य मोठे आहे.
करीयर घडवण्यासाठी आनेक संधी कुठे आणि कधी उपलब्ध होतील ते सांगता येत नाही.
आजच्या विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रस्फोटाच्या काळात तर अगणित संधी निर्माण
होताहेत. आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचे करीयर निवडतायावे आणि त्यात त्यांना यश
मिळवता यावे यासाठी अनुकूल वातावरण पालकांनी निर्माण केले पाहीजे.
मित्रांनो,संभषण
कला, परस्पर व्यक्तीसंबंध वृध्दींगत करण्यासाठी लागणारे कौशल्य, स्वयंशिस्त,
भाषेवर प्रभूत्व या आवश्यक सॉफ्टस्कीलचे प्रशिक्षण घरातूनच मिळायला हवे. ही मूलभूत
कौशल्ये एकदा आत्मसात केली की, कुठल्याही क्षेत्रात जम बसवण्यास अडचण येत नाही.
मात्र त्यासाठी कष्टाला पर्याय नाही. आपल्या करीयरमध्ये उंची गाठण्यासाठी कुठलेही
शॉर्टकट चालत नाहीत. अस्सल असते तेच टिकते. म्हणून आपण जे क्षेत्र निवडू त्यातील
मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यासाठी जर प्रशिक्षण घ्यावे लागले तर न कंटाळता
ते जरूर घ्यावे. कारण नोकरी मिळवण्याकरीता वा एखादा व्यवसाय करण्याकरीता आपण
कोणत्या महाविद्यालयात शिकलो यापेक्षाही आपल्याला काय येते हे पाहीले जाते.
करीयरच्या उत्तम बांधणीसाठी सतत वाचन,
आजूबाजूच्या घटनांची माहीती घेणे, सरकारी धोरणे,त्यात होणारे बदल यांची माहीती
असणे आवश्यक असते. त्यासाठी वयाच्या विशिष्ट टप्प्यावर पध्दतशीरपणे प्रयत्न करायला
हवेत. आपण जिथे काम करणार आहोत तिथे आभ्यासातून आपण जे शिकलो, त्याचबरोबर इतरही
कौशल्यांचा वापर करण्याची आवश्यकता असते, हे लक्षात ठेवले पाहीजे. नोकरीच्या
बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी आपण घेतलेल्या पदवी बरोबरच आपल्या व्यक्तिमत्वाचाही कस
लागत असतो. म्हणून आपले व्यक्तिमत्व कसे प्रगल्भ होईल, खुलेल यासाठीचे प्रयत्न
व्हायला हवेत. आपले व्यक्तिमत्व एकसूरी राहू नये याकरिता अनावश्यक पूर्वग्रह
बाळगणे टाळायला हवे.
नास्तिकता
हा शब्द भारतीय तत्वज्ञानात विविध अर्थांनी प्रचलीत आहे.याचा एक दार्शनिक अर्थ
म्हणजे वेदप्रामाण्य नाकारणारे. दुसरा रुढार्थ हा की, देव किवा कुठलेही ईश्वरी
अस्तित्व नाकारणारे. तिसरा व्यवहारीक अर्थ म्हणजे भौतिक विश्वाच्या पलीकडले गृहीत
धरलेले जीवन नाकारणारे.आणि चौथा अगदी अर्वाचीन अर्थ म्हणजे बुध्दीप्रामण्य
स्वीकारणारे.
मानवी
संस्कृतीच्या उत्क्रांतीचा अभ्यास केला असता असे दिसते की, मानवी अस्तित्वानंतर
विकासाच्या टप्प्यात ईश्वराची संकल्पना निर्माण झालेली दिसते. अगदी प्राथमिक
अवस्थेतील मनाला जाणवलेल्या पंचमहाभूतांच्या भयग्रस्त स्वरूपापासून प्रारंभ झालेला
हा ईश्वरी शोधाचा प्रवास मानवाच्या स्वत:च्या विकासाबरोबर विश्वचैतन्याच्या
कल्पनेपाशी येऊन थांबतो. अर्थात ईश्वराची स्वीकारलेलीही विश्वरुप कल्पना
समाजातल्या एका विशिष्ट चिंतनशील स्तरासाठी उपयोगी आहे.जनसामान्यांचा ईश्वर मात्र
नवसाला पावणारा, भक़्तीला जागणारा, शुभ-अशुभ कौल देणारा असाच असतो. अशा ईश्वराचे
स्वरूप गृहीत धरल्यावर त्या सर्वच देवता सुंदर असणे, पराक्रमी असणे हे ओघाने आलेच.
थोडक्यात, मानवी सद्गुणाच्या कल्पनांनी ईश्वराला मढवले.
ईश्वर
हा विश्वाचा आधार आहे, नियंता आहे, या प्रकारचा विचार संस्काराने दृढ केलेला असतो.
पण प्रत्यक्षात मानवी व्यवहार,मानवी प्रवृत्ती व ईश्वरी नियंत्रण याचा कुठेच संबंध
दिसत नाही. ईश्वाराच्या गृहीतकामुळे समाजातील कुठलीही अनैतिकता कमी झालेली दिसत
नाही. उलट चित्र असे दिसते की, सर्व प्रकारच्या गैरव्यवहारासाठी फार मोठा आधार
ईश्वराच्या नावावर धर्माचा, धर्म संस्थेचा व धर्माचार्यांचा घेतला जातो. ही एक
अंतर्मुख करणारी बाब आहे. तसेच दयाघन म्हणून गृहीत धरलेला, संकटात हाकेला ‘ओ’
देणारा हा ईश्वर कधीही कुणाचेही प्रश्न सोडवण्यास अवतरेल हीही एक करून घेतलेली
समजूत मानवाला फसवा आधार देत असते. परिणामी माणूस पलायनवादी होतो. ईश्वरावर जबाबदारी
टाकून स्वत: बेजबाबदारपणे वागायला मोक़ळा होतो. ‘असेल हरी तर देईल खाटल्यावरी’ ही आळशी
वृत्ती निर्माण होते.
सहाजिकच
समाजातील हे वास्तव विचाराला नास्तिकतेकडेच नेणारे आहे. खरे तर, मानवाचे कुठलेही
प्रश्न हे केवळ त्याच्या आपापसातल्या प्रामणिक भावनेतून, एकमेकांच्या सहकार्यातूनच
सुटणार, हे उघड आहे. नास्तिकता ही बुध्दीप्रामण्यावर आधारलेली असल्यामुळे ते एक
जीवनमूल्य आहे. प्रचलीत धर्माचा,धर्मग्रंथांचा, तत्वज्ञानाचा, त्याला जोडूनच इतिहासाचा,
तर्कशास्त्राचा, समाजशात्राचा साकल्याने व केवळ बुध्दीला प्रमाण मानून केलेल्या
व्यासंगातून, चिंतनातून नास्तिकता एका वैचारिक निष्ठेतून स्वीकारलेली असते.या
प्रकारे अंगीकारलेला नास्तिकतेचा विचार हा विवेकनिष्ठ दृष्टीकोन असतो. या
भूमिकेमुळे नास्तिक हा पाखंडी नसून समाजातील विवेकाचा विकास तसेच धर्मनिरपेक्ष
नैतिक मूल्यांचा प्रसार करणारा असतो. विवेकाधिष्ठीत समाजाची निर्मिती करण्यास
प्रवृत्त करणारा असतो. तो स्वत: जबाबदारीने तर वागतोच, पण समाजालाही जबाबदारीने
वागण्यास प्रवृत्त करतो.
कदाचित हे आदर्शचित्र वास्तवात येणे आज दुरापास्त
दिसत असेल; परंतू किमान आज धर्माच्या नावाखाली जे अस्मितावादी अध:पतन होतांना
दिसते आहे,ते कमी होण्यास या विचाराची नक्कीच मदत होईल.
खाजगीत बोलतांना बरेचदा आपण अन्याय, अत्याचार,
लाचलुचपत आणि इतर भ्रष्ट व्यवहारांविषयी अत्यंत पोटतिडकीने बोलत असतो. मग प्रश्न
असा उरतो की, आपण सर्वच सामान्यजन जर ह्या अनैतिक व्यवहाराच्या विरोधी आहोत, तरीही
हे व्यवहार जोमाने कसे काय फोफावताहेत? याचाच अर्थ आपल्या बोलण्यात आणि आचरणात
निश्चितच तफावत आहे. एकीकडे तत्वाच्या गप्पा मारणारे आपण वेळ आली की, क्षुल्लक
गोष्टीच्या निमित्ताने का होईना, पण अशा व्यवहारात भागीदार होतो. अशावेळी आपल्या
मनाला ‘नाईलाजाने ह्या परिस्थितीत करावं लागतयं’ असे वरपांगी समर्थन देऊन मनाची
रुखरुख कमी करण्याचा प्रयत्न करतो. ‘आपण एकटे कुठे कुठे पुरे पडणार?’ असाही
निरुत्तर करणारा प्रश्न स्वत:ला विचारून आहे त्या परिस्थितीला शरण जातो. हे
धोकादायक आहे.एकूण भारतीय समाजमनात असा दांभिकपणा खोलवर रुजला आहे.
सर्वसाधारणपणे लोक झुंडीच्या मागे जाणारे असतात.
तेव्हा विवेकवाद्यांनी ह्या सगळ्या विरुध्द एक चळवळ नेटाने चालवली पाहीजे.चळवळींना
भूतकाळ नसतो, पण चळवळी इतिहास घडवू शकतात. तेव्हा ‘सामर्थ्य आहे चळवळीचे...’ हे
लक्षात घेऊन झुंडीच्या मानससात्राचा चांगल्या पध्दतीने उपयोग करून देश आणि दिवस
बदलता येतील हे नक्की.
श्रीकृष्ण एकदा युधिष्ठीर आणि दुर्योधन
यांना एक काम सांगतात. युधिष्ठिरालासांगतात की, दिवसभर
फिरून गावात किती दुर्जन लोक आहेत ते पाहा आणि मलासांगा. दुर्योधनाला सांगतात की,
गावात दिवसभर फिरून किती सज्जन लोक आहेत
तेपाहा आणि मला सांगा. दोघेही आपापल्या कामाला लागतात. संध्याकाळी परतयेतात.
श्रीकृष्ण विचारतात, सांगा तुम्हाला काय
आढळले? युधिष्ठीर म्हणतो,’गावात एकही दुर्जन
व्यक्ती आढळली नाही.’ तर दुर्योधन म्हणतो,’ गावात एकही सज्जनव्यक्ती आढळली नाही.’
तर्कशात्र हे सत्य युक्त अनुमानांची
रचना करणारे शास्त्र असते. साधारणत: अनुमानात काही विधाने सत्य म्हणून स्वीकारलेली
असतात. आणि त्यांच्यापासून काही विधानांचा अर्थ काढला जातो. विचार करणे ही कृती
म्हणजे जग आणि जगाचे विविध घटक, घटना, नियम यांचा परस्परसंबंध समजावून घेणे असते.
पण बेशिस्त विचार म्हणजे विचार नव्हे. विचारांचे नियम पाळून सत्य व युक्त विचार
करणे आणि योग्य निष्कर्षाला येणे ही बाब निश्चित कृतीसाठी आवश्यक असते. त्यावेळी
विचार कसा करावा याचाही विचार करावा लागतो. अशा विचारांच्या नियमांचे शास्त्र
म्हणजेच तर्कशास्त्र.
युधिष्ठीर
आणि दुर्योधनाच्या विचारांच्या कृतीतच फरक असल्यामुळे दोघांचेही तर्क भिन्न
निघाले. म्हणूनच म्हणतात, ‘जशी दृष्टी तशी सृष्टी.’
आपल्याला
असं वाटत असतं की, आजच्या काळातील आधुनिक जीवन चिंता आणि ताण यांनी भरलेलं आहे, तर
ते खरं नाही. या चिंतांचं खरं कारण आपण स्वत: असतो. आपण कुठल्याही संस्कृतीतले
असू, कुठेही रहात असू, चिंतेतच रहाणार. कारण चिंतेचे कारण आपण परिस्थितीत शोधत
असतो. आपण सर्वांनीएक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवली पाहीजे की, ज्या ज्या वेळी
आपल्याला असं वाटेल की, एखादी गोष्ट चूक आहे,कुठे तरी काही तरी चुकतयं, त्या त्या
वेळी चुकीचं कारण आपल्या आत शोधायला लागा. शंभर पैकी नव्याण्णव वेळा आपल्या आतच ते
कारण मिळेल.
पण कारण
अन्य ठिकाणी शोधण्यामुळे आपल्या मनाला एक फसवं सांत्वन मिळतं की, मी चूक केली
नाही; जे घडलं ते परिस्थितीमुळे. मग आपल्या मनाला अपराधी वाटत नाही. अजाणता मनात
निर्माण होणारी आत्मनिंदा अनुभवावी लागत नाही. इतरत्र शोधलेले कारण समोर करून आपण
म्हणू शकतो की, ‘या चुकीचं हे पहा कारण. हे कारण नाहीसं होईपर्यंत मी तरी काय
करणार?’ या कारणाची आपण स्वसंरक्षणार्थ ढाल करतो. ही लबाडी आहे.
पत्नी पतीमुळे त्रासलेली असते, आई मुलांमुळे
वैतागलेली असते, मुलं वडीलांमुळे चिडलेली असतात. प्रत्येक व्यक्ती त्रासलेली,
गांजलेली असते; पण आपल्या त्रासाचं कारण दुसर्या व्यक्तीत, परिस्थितीत, अन्य
घडामोडीत शोधत असते. प्रत्येकाला वाटतं की, या त्रासाचं कारण बाहेर कुठेतरी आहे.पण
दु:खाचं कारण खरं तर आपल्या आतच असतं. त्याचा प्रामाणिकपणे शोध घेतला आणि ते
नाहीसं केलं तर जीवन नक्कीच आनंदमय होईल.
नुकत्याच फुटबॉलच्या जागतिक स्पर्धा संपल्या. त्यात
जपानी खेळाडूंचं वर्तन वेगळेपणा दाखवून गेलं. त्यांचा खेळ संपल्यावर त्यांनी
मैदानात पडलेला कचरा गोळा करून त्याचा दिखावा न करता निमूटपणे कचराकुंडीत टाकला.
याचे संदेश आपण भारतीयांनी फेसबुक आणि व्हॉट्सअँपवर भरभरून पाठवले. पण आपण आपली
साधी गल्लीही स्वच्छ ठेवू शकत नाही. किती हा विरोधाभास! ह्याची मनाला कुठेही टोचणी
लागत नाही. राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय प्रश्नांच्या वायफळ गप्पा मारत कोपर्यावर
तासन् तास उभे राहू.आणि रस्त्यावरच बिनदिक्कत पिचकार्या टाकू. खाल्लेल्या
वेफर्सचे पुडे, चहाचे प्लॅस्टीकचे कप तिथेच टाकू. आपल्याकडे सुविचारांचा सुकाळ आहे
पण आचरणाचा मात्र दुष्काळ! त्यामुळे झाले आहे काय तर, भारताचा भार उचलण्यास आमचे
खांदे ताठ राहीनासे झाले आहेत.India मधील आम्ही फक्त ‘I’चाच विचार करू लागलो. आणि राष्ट्रीयत्वाची भावना
लयाला गेली. मी... माझी बायको... माझी मुले इतपतच आपण सुखाची व्याख्या शोधू लागलो.
त्यातून आई-वडीलांनाही वगळले. मग राष्ट्रविचार तर फारच दूरची बात झाली. सीमेवर
सैनिक धारातिर्थी पडले तरी फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शहीदांवरची गाणी लावून
शोक व्यक्त करण्याइतकी मन:स्थिती निब्बर झाली. ह्याला मढ्यावरच्या टाळूवरचे लोणी
खाणे म्हणतात.
दहीहंडीच्या
सर्वात वरच्या थरावर 12 वर्षाखालील मुलांना बंदी घातलेल्या बालहक्क आयोगाच्या
आदेशाला समस्त गोविंदा पथकांनी धाब्यावर बसवून कायदा हातात घेण्याची भाषा केली
आहे. ह्यावरून आपले सामाजिक भान किती खालावले आहे आणि गुंडगिरीच्या पातळीवर उतरले
आहे ते दिसते. तेही संस्कृती, परंपरा जपण्याच्या नावाखाली!खरे तर संस्कृती
रक्षणाच्या पडद्यामागील राजकारण आणि अर्थकारणातील हितसंबंध आता लपून राहीलेले
नाहीत. म्हणूनच तथाकथित संस्कृती रक्षक व परंपरावाद्यांना सामाजिक सुधारणा नको
असतात.
या
उत्सवांचा मुख्य हेतू राजकीय लाभ उठवणे आणि भोळ्याभाबड्या जनतेची
संस्कृती-परंपरेच्या नावाने अस्मिता जागवणे हाच असतो. परिणामी एकुणच सगळे सण
धंदेवाईक झाले आहेत. उत्सवांद्वारे मिळालेली संस्थाने अभेद्य ठेवण्यात त्यांना
अधिक स्वारस्य असते. जनतेला रस्त्यांवर नाचवून, स्वत:ला दूरदर्शनवर चमकविण्याचा नेते
मंडळींचा हा कावा सामान्यजनांच्या आता लक्षात यायला लागलेला आहे. उत्सवामुळे
होणारे ध्वनीप्रदूषण, कायदा धाब्यावर बसून केलेली कृत्ये, त्यातील
अर्थकारण,राजकारण आदी बाबी आता लोकांना समजू लागल्या आहेत. म्हणूनच ह्या मुठभरांपलीकडल्या
सामान्यजनांचा अशा उत्सवांना विरोधच असतो.
मुंगीचाही शिरकाव होणार नाही अशा अलोट
गर्दीमुळे त्या परिसरात रहाणार्या नागरीकांपैकी कोणी आजारी, अत्यवस्थ व्यक्तीला
वा गर्भवती स्त्रीला तातडीने इस्पितळात न्यायचे झाल्यास जीवावर बेतणार.तसेच कोणाचे
मयत झाले तरी आणीबाणीचा प्रसंग ओढवणार. त्यातच उखडलेले रस्ते,त्यामुळे होणारी
वहातूक कोंडी, लोंबणारे पाईप, केबल्स, गटारांची तुटकी झाकणे, कचर्याचे ढीग, दहशत
निर्माण करणारी भटकी कुत्रीया सर्व रस्त्यावरील त्रासामुळे सामान्य माणूस जेरीला
आहे. हा विचार सार्वजनिक रस्ते आपलीच जहागिरी असल्याच्या गुर्मीत वावरणारे हे
संस्कृती रक्षक करत नाहीत. यावरून ते कोणत्या प्रकारचे संस्कृती रक्षण करतात हे
दिसते. कारण उत्सवाचा आनंद हा गंभिरतेने उत्साहाच्या मापदंडाने मोजायचा असतो, हे
थैल्यांमधील नोटांच्या आणि नाण्यांच्या वजनाशी तोलून धरणार्यांना कळत नाही असे
नाही; पण समाजाच्या उध्दारापेक्षा स्वार्थ महत्वाचा ठरतो.
माझा एक
मित्र नुकताच जर्मनीला जाऊन आला, त्याचा हा बोलका अनुभव त्याच्याच शब्दात
..........
’मी
फ्रॅंकफर्ट विमानतळावर उतरल्यावर मला घ्यायला आलेल्या माझ्या जर्मन मित्राच्या
गाडीतून निघालो. रस्त्यात पेट्रोल भरण्यासाठी आम्ही एका पेट्रोल पंपावर थांबलो.खूप
थंडी असल्याने बहूदा तिथे कोणी कर्मचारी नव्हता. माझ्या जर्मन मित्राने स्वत:
उतरून गाडीत पेट्रोल भरले आणि आतमध्ये कॅशियरकडे गेला. कुठल्या ठिकाणाहून, किती
पेट्रोल भरले ते संगितले व तितके पैसे दिले. गाडीत बसल्यावर मी त्याला प्रश्न केला
की, ‘आपण पैसे न देता तसेच निघून गेलो असतो तर काय फरक पडला असता?’ माझा हा भारतीय
मानसिकतेचा प्रश्न कदाचित त्या जर्मन मित्राला कळला नसावा, म्हणून तो प्रश्नार्थक
चेहर्याने माझ्याकडे पाहू लागला. मी पुन्हा जेव्हा त्याला तोच प्रश्न विचारला
तेव्ह तो म्हाणाला की, ‘असे कोणी का करेल? जर आपण पेट्रोल भरले तर त्याचे पैसे
द्यायलाच हवेत ना?’
मला आपल्याकडे काय झाले असते त्याचा विचार आला
आणि माझी मान शरमेने खाली गेली. लहानपणापासून पाश्चात्यांच्या अंगात प्रामाणिकपणा,
सामाजिक नियमांचे भान बिंबवले जाते आणि लहानथोर सगळेच त्याचे पालन करतात. तरीही
आपण पाश्चात्य संस्कृतीच्या नावाने खडे फोडतो आणि आपल्या दांभिक भारतीय संस्कृतीचे
गोडवे गातो, याला वदतोव्याघात म्हणतात.
एखाद्याचे
मत आपल्याला पटलेनाही तरी त्याचे मत बाळगण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे, हे कधीच
विसरता कामा नये. अशावेळी वादविवाद करून त्याचे मत हिरीरीने खोडून काढतांना आपल्या
मनात जर द्वेष उद्भवू लागला तर नुसताच वितंडवाद होतो, आणि आपली उर्जानाहक खर्च
होते. आपल्या विधायक विचारांना खीळ बसते. आपले विचार नकारात्मक, अगदी हिंसकसुध्दा
होऊ शकतात. आपले आणि समाजाचे भले करण्यासाठी ही उर्जा खर्च करण्याऐवजी त्या
माणसाला किवा त्या समाजाला नामोहरम करण्यासाठी आपण व्युहरचना सुरू करतो. इथेच
अध:पतनाला सुरूवात होते. कित्येकदा असे घडते की, समोरच्या व्यक्तीचे मत अधिक
तर्कशुध्द व स्वीकारण्याजोगे आहे, त्यामुळे आपले भले होणार आहेअसे आपल्याला उशीरा
का होईना लक्षात येते. मात्र तरीही आपल्या मनाची जी स्वमतांध चौकट झालेली असते,
त्यामुळे आपण आपल्या मताला चिकटून रहातो. वेगळ्या मताच्या माणसाला दूषण देतो.
त्याच्याबद्दल भलेबुरे बोलतो. आणि स्वत:चेच नुकसान करून घेतो.[म्हणूनच
रुढी-परंपरावादी आणि अंधश्रध्दाळू माणसांना सुधारणावादी विचार पटणे कठीण जाते.]
परमताविषयी
उदारता बाळगणे हे स्वविकासाला पोषक असले तरी परमत आपल्यावर लादून घेण्याची दुर्बल
सहिष्णुताही कामाची नाही. त्यासाठी आपल्या मतात, दृष्टीकोनात लवचिकता हवी.
कालानुरूप तर्कशुध्दपणे मतांची फेरमांडणी करायला हवी. स्वमतांध लोक नुसते तिरस्कार
करीत असतात. वेगळ्या मतांच्या लोकांचा द्वेष करीत असतात. तिथे विवेक, सहानुभूती,
प्रेम यांना थारा उरत नाही. एखाद्या गोष्टीवर, कामावर, विचारावर, समुदायावर वा
व्यक्तीवर श्रध्दा असणे स्वाभाविक आहे. त्यातून मते बनतात. पण ती परिवर्तनशील हवी.
एका व्यक्तीच्या आयुष्यात सुध्दा बालपणी, तरूणपणी आणि वृध्दापकाळी मते भिन्न होत
जातांना आपणास दिसतात. तेव्हा आपल्या मतांना जखडून रहाणे म्हणजे स्वमतांध होणे
होय. अशी कट्टरता माणसाला अतिरेकी व दहशतवादी बनवते. ती माणसाची अवनती घडवायला
कारणीभूत ठरते.इतरांची मते बुध्दीच्या कसाला पारखून घ्यायची असतील, तर आपले मतही
तसेच पारखून स्वीकारण्याचा वा नाकारण्याचा हक्क इतरांनाही आहे, हे सत्य स्वीकारले
पाहीजे.
म्हणून माणसाने नुसते श्रध्दाशील असू नये, तर
त्याची श्रध्दा बुध्दीनिष्ठ असावी. प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी स्वीकारायला व
तिच्यावर विश्वास ठेवायला जर तुम्ही मनुष्याला भाग पाडाल, तर तो लवकरच पागल होऊन
जाईल.असे पागलपण आजही 21व्या शतकात बरेच ठिकाणी आपल्याला दिसते. त्यासाठी
जनमानसाची मानसिकता बदलण्याचे काम सुधारणावाद्यांना धीर न सोडता चिकाटीने करत
रहावे लागेल.
आज जशा
करीअर, नोकरी, नाती यांच्या व्याख्या बदलत गेल्या आहेत, तशाच सुख, मजा, आयुष्याचा
उपभोग घेणे यांच्याही व्याख्या बदलत गेल्या आहेत. काही वर्षांपूर्वी सगळ्या
घराबरोबर एकत्र रहाणे, हे आयुष्य यशस्वीपणे जगल्याची खूण असायची. आता मात्र पैसे
साठवून एकट्यानेच जगण्याचे प्रयोजन मान्यता पावले आहे. त्याच्या समर्थनासाठी
फसव्या व्याख्याही तयार होत आहेत. आणि त्यालाच वास्तव मानून चालणं सुरू आहे.
अलीकडच्या
काळात कुटूंब व्यवस्थेला हादरे मिळण्याचे निमित्त म्हणजे दोन पिढ्यांतील वैचारिक
अंतर. त्यामुळे विभक्त कुटूंब पध्दती आता आपल्याकडेही रुजली आहे. मात्र या
पध्दतीच्या गरजांची व्यवस्था जर समाजात निर्माण झाली नाही तर कठीण परिस्थिती
उद्भवणार आहे. सामाजिक बदलाच्या या पायरीवर नव्या कुटूंब व्यवस्थेत पाळणाघरे,
वृध्दाश्रम, वृध्दांसाठी डे केअर या सगळ्यांकडे नकारात्मक दृष्टीने न पहाता
कुटूंबाचा विस्तार म्हणून पहावे लागेल.
या
सामाजिक बदलाच्या लाटेत कुटूंबातील जाणत्या पुरूषाची भूमिका महत्वाची ठरणार आहे.
मुलांच्या जडणघडणीत पुरूषांचा सहभाग मोलाचा असायला हवा. तसंच त्याला बायकोच्या
जाबाबदार्या, तिचं जगणंही समजून घेण्याची त्याची मानसिकता वाढायला हवी. त्यासाठी
पुरूषाला वर्षानुवर्षांची पुरूषी मनोवृत्ती सोडायला हवी. पौगंडावस्थेतील मुलांशी
लैगिकता, लग्नाची आणि नात्यांची संकल्पना अशा संवेदनाशील विषयावर घरात वडीलच
चांगल्या पध्दतीने बोलू शकतात. तेव्हा ‘मला या विषयांवर बोलायचा संकोच वाटतो किवा
मला बोलता येत नाही’ असे पुरूषाला म्हणून चालणार नाही. कारण घरातून जर या विषयावर
चर्चा करण्याची कोंडी फोडली गेली नाही तर, पालक आणि पाल्य अशी वेगवेगळी बेटं तयार
होऊ लागतात.ज्याची सुरूवात सध्या आपापल्या घरात व्हायला लागली आहे. लैगिकतेसारख्या
अवघड विषयावर जर घरातच सुसंवासाने चर्चा केली तर, मुलं अर्धवट ज्ञानापासून वाचतील,
व्यसनांपासून दूर राहू शकतील आणि चुकीच्या मार्गापासून परावृत्त होतील. त्यासाठी पालक
आणि पाल्य यांच्यात विश्वासाचं नातं तयार होणं गरजेचं आहे. आणि हे उत्तम संवादानेच
घडू शकतं. कणखर घर हवं असेल तर मुलांची काळजीपूर्वक व प्रयत्नपूर्वक जडणघडण करावी
लागेल.
म्हणूनच मुलांचं स्वतंत्र व्यक्तीमत्व घडवतांना,
त्यांना भावनाशील,संवेदनाशील आणि जबाबदार माणूस घडवण्याची सामाजिक जबाबदारी
पालक़ांची आहे हे विसरून चालणार नाही. मुलांना निर्णय घेऊ द्या,त्यांच्याशी संवाद
ठेवा, निर्णयामागील गुणदोष समजावून द्या, मात्र मुलांनी घेतलेले चुकले तरी
खंबीरपणे मुलांच्या पाठी उभं राहून आधार स्तंभ व्हा. आज कुटूंबातल्या सगळ्यांना
गुणदोषासकट स्वीकारणारं परिपक्व घर हवंय. आजच्या काळाची ती गरज आहे.
आपल्याभोवती
जे आरसे आहेत ते म्हणजे लोकांच्या नजरा! या नजरा सतत आपल्या वागण्या-बोलण्याचा
त्यांच्या कुवतीनुसार अर्थ लावत असतात. आणि हेच आरसे आपल्याला स्वत:ला ओळखायलाही
मदत करत असतात. दैनंदिन जीवनात एकाचवेळी आपण भिन्न भिन्न भूमिका करत असतो. कधी
मालक तर कधी नोकर, खधी पती तर कधी पिता, कधी माता कधी कन्या, कधी पत्नी कधी सासू,
कधी दाता तर कधी याचक. अशा एकपात्री खेळात भूमिका,परिस्थिती आणि आपले स्वत:चे मूळ
व्यक्तिमत्व यांची सरमिसळ करत वेगवेगळी रुपे, मुखवटे आपण वापरत असतो. इथेच गडबडीला
सुरूवात होते. मग आपला कोणता मुखवटा कोणत्या आरशात चांगला दिसतो ’तो मीच’ असे
वाटून घ्यायला सुरवात होते. अशा भोवतालच्या आरशातील प्रतिबिंबांनी सांगितल्यामुळे
‘मीच तो’ अशी भावना निर्माण होते. अनेक आरसे भलतेच चलाख असतात. बघणार्याला काय
हवंय तेच उत्तर वारंवार देतात. अशी उत्तरं ऐकायची एकदा का सवय लागली की, आपण
सोयीस्कररीत्या इतर आरशांना विसरत जातो. आपल्या लाडक्या आरशाच्या आवाजात इतर आरशांचा
कोलाहल आपल्याला ऐकूच येत नाही; किवा ऐकू आला तरी आपण मोहापायी त्याकडे काणाडोळा
करतो.
म्हणूनच
महत्वाचं आहे काही गोष्टींचा तठस्थपणे नीट विचार करणं. पहीली म्हणजे समाजाच्या
नजरेतलं माझं प्रतिबिंब हे वास्तव आहे का? की माझी प्रतिमा चांगली व्हावी म्हणून
मी चढवलेला तो मुखवटा आहे, हे शोधून काढणे. दुसरी गोष्ट म्हणजे जे आरसे आपण निवडतो
ते आपल्याला सोयीचे वाटतात म्हणून? की ते प्रतिबिंब पाहून आपली आत्म-संतुष्टतेची
भावना बळावते म्हणून? तिसरी बाब म्हणजे आपल्या जीवनाचे लगाम आपण समाजात असलेल्या आपल्या
प्रतिमेच्या हातात देतोय का? म्हणजेच आपल्या प्रतिमा केवळ समाजाला काय वाटेल, या
दडपणाने बदलतो वा बदलण्याचा प्रयत्न करतो का? सर्वात महत्वाचे म्हणजे माझे सर्व
मुखवटे बाजूला काढून मी प्रामाणिकपणे स्वत:ची प्रतिमा तठस्थपणे पाहू शकण्याचे धाडस
माझ्या अंगी आहे का? आणि कळीचा मुद्दा असा आहे की,आपले मुखवटे, आपण झाकून ठेवलीली
सत्यं, व भळभळत्या जखमा ही वस्तुस्थिती आहे हे स्वीकारत आपले जीवन समृध्द करू शकतो
यावर आपला विश्वास आहे का?
हीच वेळ आहे आपल्या आत्मपरिक्षणाची!
आज जग जवळ आले आहे. संवादाची माध्यमे वाढली
आहेत आणि ती गतीमानही आहेत.फेसबुक व्हॉट्सअँपच्या माध्यमातून सतत लोकांसमोर
येण्याची चाह, आयुष्यातल्या प्रत्येक घटना, प्रसंग लगेचच इतरांना सांगण्याचा
अनिवार उत्साह, त्यावरचे ‘लाईक’ किती यावरून आपले स्थान ठरवण्याचा प्रयत्न यासाठी
सतत केन्द्रस्थानी रहाण्यासाठी चाललेली ही ‘नेटधारी’ धडपड ही सगळी लक्षणे वरवरच्या
संवेदनाशीलतेचीच आहेत. कारण प्रत्यक्ष किवा आपण जिथे रहातो, वावरतो तिथे काय चालले
आहे हे पहायचेच नाही. आजूबाजूलाही लक्ष द्यायचे नाही. सगळे पहायचे ते त्या ‘भिंती’वर!
जगात जे काही घडत आहे, माध्यमांद्वारे जे काही दिसत आहे, त्याकडे निर्विकारपणे
पहायचे, आपला प्रत्यक्ष संबंध नसल्यासारखे. जणू आपण एकएकटे स्वतंत्रपणे एका एका
बेटावर रहात आहोत.
पण प्रत्यक्ष संवेदनेच्या पातळीवर काय? अशी
एखादी घटना अस्वस्थ करते का आपल्याला? हलवते का मुळापासून गदगदा आणि भाग पाडते का
हस्तक्षेप करायला? फक्त ‘लाईक’ करून एखाद्यावेळी ‘कॉमेंट’ दिली की संपते का आपली
जबाबदारी? शेवाळलेल्या दगडी गोट्याला पाण्याच्या प्रवाहातले तरंग जाणवत नाहीत; असे
तर झाले नाही ना आपले. की आपल्या मेंदूचे बधीरीकरण करून टाकले आहे ह्या अशा
पध्दतींनी?
एकदा का ‘भिंती’वर व्यक्त झाले की मग
संवादाची गरजच उरत नाही. समोरच्या माणसाशी, आपासच्या लोकांशीही बोलण्याची, त्यांना
समजून घेण्याची आवश्यकता भासत नाही. शेजारी काय जळते आहे याच्याशी काही देणेघेणे
नाही, पण जगातल्या कुठल्याही गोष्टीवर आपली प्रतिक्रिया आणि ‘लाईक’ देणे आवश्यक वाटू
लागते. त्याशिवाय आपण आहोत ही कल्पनाच करवत नाही. आपण जिवंत आहोत असे वाटत नाही.
बरे संवादी असणे म्हणजे
केवळ बाहेरच्या जगाशीच वरवरचा संबंध असणे असेही नाही. कधीकधी आपल्या स्वत:शीसुध्दा
संवाद असावा लागतो. सतत स्वत:ला तपासावे लागते. स्वत:च्याही आत वाकून पहाण्याची
कंगोरे न्याहाळण्याची आंतरिक गरज असते. समाजात वावरतांना आपण डोळे उघडे ठेवून
वावरत असू तर मग आपल्या आजूबाजूच्या घटना-घटितांचाही अन्वय लावतांना कधी तरी
अंतर्मुखही व्हावे लागते. हे आपण लक्षात घेणार आहोत काय? की यंत्रवत जगणार?
मनुस्मृती,पुराणे आणि देवळे असा तिपेडी फास हिंदू
समाजावर लटकवून भिक्क्षुकशाही ब्राम्हणांनी आपल्या जातीच्या सवतसुभ्याचं सोवळं
वर्चस्व आजवर टिकवून धरलेलं आहे.या मर्मावर कुणी घाव घालताच एकजात सुधारक-दुर्धारक
भट सापासारखे फुसफुसतात. कारण या तिपेडीवर प्रत्येक भट जगत असतो. पण या तीनही गोष्टी
म्हणजे अखिल भटेतर दुनियेच्या उरावरील प्राणघातक धोंडी आहेत. या गोष्टी नष्ट करा!
जाळून खाक करा!! की भिक्षुकशाही रसातळाला गेलीच!!! ( प्रबोधनकार ठाकरे यांच्या
‘देवळांचा धर्म, धर्माची देवळे’ या पुस्तकातून साभार.)
विचार,
कल्पना आणि भावना यांची प्रचंड शक्ती आपल्या ठायी असते. त्यांचा वापर
आपण्विधायकतेने केला तर आपण समाधानी आणि आनंदी जीवन जगू शकतो. आणि जर या शक्तांचा
निर्बुध्दपणे वा विकृतपणे उपयोग केला तर जीवन दूषित होऊन जाते. जीवनात साडेसाती
निर्माण होटल ती या शक्तींच्या गैरवापरामुळे. अशाप्रकारे साडेसाती निर्माण करणारा
शनी आकाशातला नसून आपल्या विचारांमध्येच दडलेला असतो. विचार सशक्त असतील तर
कोणत्याही संकटाचा सामना करण्याचं सामर्थ्य अंगी येतं. मग तो कालखंड दु:खाचा न
वाटता आपल्या कृतीशीलतेला आव्हान देणारा ठरतो.संकटाशी झगडतांना नव्या संधी समोर
येऊ लागतात. आणि त्या संधीमधून उत्कर्ष होऊ लागतो. म्हणजे साडेसाती खरंतर भाग्याची
ठरते.
आपण जर संकटांनी खचून गेलो, तर उमेद हरवून बसतो.
संकटे आपल्या मानगुटीवर बसतात. आपण हतबल होत जातो आणि आपले विचार नैराश्याने
ग्रस्त होतात. अशावेळी माणूस दैववादी बनतो. माझ्या नशिबात दु:ख, त्रास, संकटे
लिहून ठेवली आहेत, हा विचार मनात पक्का झाला की,आपण चुकीचे निर्णय घेऊ लागतो. मग
संकटांची मालीका सुरू होते. ही साडेसाती आपण स्वत:च आपल्यावर ओढवून घेतलेली
असते.
आपण किती विकृत समाजव्यवस्थेत
जगत आहोत! कालपर्यंत ज्या महापुरुषांच्या
नावाने प्रबोधन होत होतं, त्यांच्या विचारांचे आचरण करुन
लोक समाज सुधारक झाले, त्यांच्याच विचारांना तिलांजली देऊन
आज काल्पनिक देवाच्या रुपात त्यांना बसवून आपण विचाराने सुध्दा अंध झालोय. तथागत
गौतम बुद्ध ,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या रुपाचे गणपती बसवून त्यांच्या
विचारांची कत्तल तर आपण करतोच, पण येणार्या पिढीला आपण दैववाद व आंधश्रध्देत
गुरफटवत चाललोय याचीही आपल्याला जाण राहीली नाहीय. पु. ल. देशपांडे यांच्या ‘नामस्मरणाचा जप’ या लेखात त्यांनी भाकित केलेली भिती आज सत्यात आवतरतांना
दिसते आहे. विकृत होत चाललेल्या उत्सवावर काही बोलायचे नाही. बोललो तर धर्ममार्तंडांच्या
भावना दुखवतात अशी सरळ ओरड उठते. खंडणीखोरासारखी वर्गणी उकळणे असू द्या किंवा
उत्सावामध्ये पब सारखे संगीत असू द्या की दारु पिऊन हौदास घालणारे नृत्य
असू द्या, काहीच बोलायचे नाही. बोलाल तर परिणाम वाईट होतील अशी धमकी मिळते. मग मला
काय त्याचे म्हणून जगणारे षंढ आणि भाकरीसाठी जगणारे लोक पाहिले की, वाटतं कशाला माणूस
म्हणून जन्मलो? तर्क मांडणे व प्रश्न विचारणे चुकीचे आहे का? ज्यांनी उभ्या
आयुष्यात कधी दैववाद स्वीकारला नाही, अशा महापुरुषांना देव बनवून आकरा दिवसात बुडवणारे
हे लोक! खरंच किती प्रगती केली आहे या लोकांनी!!
आपल्या
पूर्वजांना विमानविद्या अवगत होती यावर काही शंकेखोर जंतु वितंडवाद घालत आहेत. पण लब्धपुराणातील
खालील श्लोकावरून त्यांना अणू, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स, या
सर्व गोष्टींचं ज्ञान तर होतंच पण विश्वउत्पत्तीचा सिद्धांतही त्यांना ठाऊक होता
हे दिसून येईल. श्लोक असा आहे:
“कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती
करमूले
तु गोविंदं, प्रभाते करदर्शनं”
कणाद
ऋषीने अणूचा शोध लावल्यानंतर त्याचा शिष्य कराद याने अणूचे गुणधर्म शोधून काढले.
त्यामुळे अणूंना ‘कर’ असं नाव मिळालं. ‘कराग्रे’ म्हणजे कराच्या अग्रभागी. अणूंच्या टोकाला. अणूंच्या सर्वात बाहेर
इलेक्ट्रॉन्स असतात. ते चंचल असतात. एका जागी स्थिर असत नाहीत. एकाच वेळी त्यांची
स्थिती आणि वेग अचूक मोजता येत नाही हे हायझेनबर्ग यानं दाखवून दिलेलंच आहे.
लक्ष्मी चंचल असते. म्हणून ती इलेक्ट्रॉन्सचं प्रतीक आहे. ‘कराग्रे
वसते लक्ष्मी’चा अर्थ अणूंच्या टोकाला इलेक्ट्रॉन्स वसत
असतात.
अणूगर्भात
प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतात. त्यांना एकत्र ठेवण्याचं काम ग्लूऑन्स करतात.
ग्लू म्हणजे सरस. ते सरसाप्रमाणे त्यांना चिकटवून ठेवतात. म्हणून सरस्वती
(सरस-वती) म्हणजेच ग्लूऑन्स. तेव्हा ‘करमध्ये सरस्वती’चा अर्थ अणुकेंद्रात ग्लूऑन्स असतात.
गोविंद
म्हणजे कृष्ण. कृष्ण हा बहुरूपी आहे. सर्वसंचारी आहे. ऊर्ध्व दिशेला(up) – अधर दिशेला किंवा खाली(down), तळाशी(bottom) – वर(top) सर्वत्र असतो. तो
विलक्षण(strange) आहे. मोहन आहे. सर्वांना मोहवणारा(charm करणारा) आहे. आता up, down, bottom, top, strange, charm हे कशाचे वर्णन आहे ते सर्व जाणतात. ते
क्वार्क्सचं वर्णन आहे. तेव्हा गोविंद म्हणजे क्वार्क्स हे कुणालाही मान्य व्हावे.
सर्व एलिमेंटरी पार्टिकल्स क्वार्क्सची बनली आहेत असं आजचं विज्ञान सांगतं. म्हणून
‘करमूलेतु गोविंदम’. सर्व अणूंच्या
मुळाशी क्वार्क्स आहेत.
प्रभाते
म्हणजे पहाटे असा संकुचित अर्थ घेण्याचं कारण नाही. पहाटे म्हणजे विश्वाची पहाट
होताना. Big
bangच्या वेळी. त्या वेळी सर्व अणूंचा जन्म झाला. म्हणजेच अणूंचे
दर्शन झाले. अर्थात ‘प्रभाते करदर्शनं’
या वरून आपल्या पूर्वजांना अणू, इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स, न्यूट्रॉन्स,
ग्लूऑन्स, क्वार्क्स या सर्व गोष्टींचं ज्ञान तर होतंच पण
विश्वउत्पत्तीच्या सिद्धांताचं ज्ञानही होतं हे सिद्ध होतं.