Sunday, November 21, 2021

आत्मपरीक्षण कोण करणार?

1) अ) 'ब्राह्मण कोणाच्या घरी जाऊन स्वतः सांगत नाही की मला पूजा करायला बोलवा.' हे म्हणणे वरवर बघता अगदी बिनतोड वाटते. पण त्याचवेळेस आपण हे सोईस्कररित्या विसरतो की, शेकडो वर्षे जर देवा-धर्माच्या नावाखाली भीती निर्माण करून लोकांना मानसिक गुलाम करून अंधश्रद्ध ठेवले गेले असेल तर अशी अंधश्रद्ध माणसे त्यांना बोलवणारच ना? ब्राह्मणांनी देवाधर्माच्या नावाखाली आपली पोटाची खळगी भरण्यासाठी अशा प्रकारे लोकांना मानसिक पंगू करून ठेवले तर दोष ब्राह्मणांचा नाही तर कुणाचा? म्हणून ब्राह्मण काय 'मला पूजेला बोलवा म्हणून सांगायला तुमच्या दारी येत नाही', असे बोलणे हा तर शहाजोगपणा झाला.🤛JK 

आ) ब्राह्मण द्वेष?🤔JK  

संघ-भाजप-सावरकर विरोध हा ब्राह्मणद्वेष असेल तर मला तो 100% मंजूर आहे. कारण मी संत ज्ञानेश्वर, गोपाळ कृष्ण गोखले, सुधारकाग्रणी आगरकर, विनोबा भावे, पटवर्धन बंधू , साने गुरुजी, र धो कर्वे, एस.एम.जोशी, मधू दंडवते, बाबा आमटे, भाई डांगे, डॉ.दाभोलकर यांचे सह पंडित नेहरु, एम. एन. रॉय अशा अगणित ब्राम्हण नेते आणि विचारवंतांच्या मार्गावरून चालणारा एक लहानसा कार्यकर्ता आहे. त्यांच्या विचारांचा वसा ही माझी जीवन शिदोरी आहे. त्यामुळे संघोटे, सनातनी सावरकर आणि भाजप विरोध हा ब्राह्मणद्वेष म्हणून मला सदैव मंजूर आणि अभिमानास्पद राहील. कारण "हिंदू समाज" हा काही त्यांच्या बापजाद्यांचा गुलाम नाही! खटासी व्हावे महाखट... काय समजलेत? 

इ) मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही कायम ब्राह्मणांच्या विरोधात का लिहिता? तुम्ही ब्राम्हणद्वेषी आहात. पण मित्रांनो, हा ब्राह्मण द्वेष नसून आजही समाजातील बहुजन वर्गाला बारशापासून बाराव्यापर्यंत आणि  सत्यनारायणापासून गणपतीपर्यंत तसेच वटसावित्रीपासून मार्गशीर्षच्या लक्ष्मी व्रतापर्यंत, नाशिक, वारणासीसारख्या धार्मिक शहरांमध्ये तर वर्षाचे बाराही महिने नारायण नागबळीपासून ते श्राद्धाच्या कर्मकांडापर्यंत प्रत्येक वेळी ब्राम्हणांची गरज लागतेय. हे जर आपण डोळे उघडे ठेवून समाजाकडे पाहिले तर हे आपल्या लक्षात येते. बहुजनांचा जीवनातील किती महत्त्वाचा काळ हा ब्राह्मणांनी निर्मिलेल्या अंधश्रद्धायुक्त कर्मकांडातच व्यतीत होताना आपण पाहत आहोत. त्यामुळे बहुजन समाजाला जागृत करणे हे आपले काम आहे, असे मला वाटते. म्हणून मी सातत्याने भट-ब्राम्हणांनी देवाधर्माची भीती दाखवत बहुजनांना मानसिकरीत्या पंगु बनवून स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी निर्माण केलेल्या अंधश्रद्धा आणि कर्मकांडांविरोधात प्रहार करत असतो. या धार्मिक कर्मकांडात हितसंबंध गुंतलेल्या ब्राह्मणांना यात ब्रह्मणद्वेष दिसणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. पण इतर ब्रह्मणांनीही की जे स्वतःला पुरोगामी म्हणवतात त्या शिक्षित ब्रह्मणांनीही मी भटशाही विरोधात करीत असलेल्या टीकेला ब्राह्मणद्वेष समजणे याचा अर्थ हे शिक्षित ब्राह्मण खरे पुरोगामी नसून आपले जातभाई असणाऱ्या भटांना मदत करणारे प्रतिगामीच असले पाहिजेत. तसेच बहुजनांनीही याला ब्राह्मणद्वेष म्हणणे म्हणजे त्यांना आपण कुठल्या गर्तेत आहोत हेच कळत नाही असे म्हणावे लागेल. JK

ई) संघोटे हिंदुत्ववादी धर्मांध म्हणतात, 'गर्व से कहो हम हिंदू है।' पण ते हे विसरतात की, ते ज्या आई-बापाच्या पोटी जन्माला आले तो धर्म त्यांना अपघाताने लाभला आहे. मग त्यात कसला गर्व मानायचा? 

ते जर मुस्लिम आईबापांच्या पोटी जन्माला आले असते तर 'गर्व से कहो हम मुसलमान है।' असे म्हणत त्यांनी नक्कीच हाळी दिली असती. 

म्हणून ज्याला आपल्या अपघाती धर्माचा फुकाचा अभिमान वाटतो तो तर आयत्या 'बिळा'तला 'नागोबा' असतो. कसे?😎JK

ब) कोणताही माणूस सर्वगुणसंपन्न नसतो. कारण तो सर्वप्रथम माणूसच असतो. म्हणूनच तो चुकाही करू शकतो, हे आपण स्वीकारले पाहिजे... मग तो किती का मोठा असेना. तेव्हा त्याचे सगळेच विचार स्वीकारले पाहिजेत असे नाही. त्यामुळे त्यांच्या विषयीचा आदरही कमी होण्याचा प्रश्न नाही. त्यांच्या विचारातील जे तर्कशुद्ध, बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ विचार आहेत तेच विचार सुज्ञ माणसे लक्षात घेतात, आणि बाकीचा फापटपसारा सोडून देतात. ज्यांना हे कळत नाही ते पोथीनिष्ठ सतत गोंधळलेले असतात, म्हणून बरेचदा एकांगी विचार करत आपण ज्यांना आदर्श मानतो ते किती महान आहेत, हे सांगण्याचा खटाटोप करत असतात. 

खरे पहाता जगातील कोणताही मर्त्य मानव सदासर्वकाळ बरोबर असूच शकत नाही. सावरकर, टिळक, गांधी, नेहरु, पटेल, सुभाषचंद्र, हेडगेवार, गोवळकर गुरुजी किंवा अगदी माझा, तुमचा जन्मदाता आणि तुम्ही व मी सारेच कधीकधी बरोबर कधीकधी चुकीचे असतात. तेव्हा चुका मान्य करुन/अथवा दुरुस्त करुन जो पुढे जातो तोच वर्तमानाचा कर्ता आणि भविष्याचा दिपस्तंभ बनतो बाकिचे इतिहासाच्या एखाद्या पुस्तकात एखादया प्रकरणात, पानात, परीच्छेदात, समासात, ओळीत किवा अगदीच मोजक्याच दोन शब्दात झाकोळले जातात.

मानवी आयुष्यात आदर्शवाद असलाच तर तो तात्कालिक असतो. याचा अर्थ एखादी व्यक्ति एखाद्या बाबतीत आदर्शवादी असली तरी सर्वच बाबतीत सबंध आयुष्य ती आदर्शवादी जगलेली नसते. तेव्हा नेहरू असोत, गांधी असोत, आंबेडकर की सावरकर-सरदार पटेल; ही माणसेच होती आणि त्यांच्याकडूनही काही चुका झाल्या असतील, हे आपण समजून घेतले पाहिजे. पण या महामानवाना देव्हाऱ्यात बसवून पुजणारे अंधभक्त मात्र त्यांना सर्वगुसंपन्नता बहाल करून देवत्व देतात तेव्हा खरा घोळ सुरू होतो.

क) सर्वसाधसरण माणूस पापभिरू असतो, हे फार ढोबळ वाक्य आहे. आशा माणसांना "Otherwise gentleman" म्हणतात. दुसरे असे की, नैतिकता ही लादता येत नाही तर ती आपल्या अंगात मुरवावी लागते.कुणी तरी मला पाप देईल असे वाटून सभ्य असणे वेगळे आणि माझ्या कृत्याला मीच जबाबदार आहे असे समजून प्रायश्चित घेणे वेगळे. तेव्हा कायदा किंवा देवधर्मापेक्षा स्वतःवर नितीमत्तेने रहायचा संस्कार करायला हवा.

ड) सावरकरांना सनातन्यांना जातीअंताचे महत्व न पटवता आल्यामुळे ते दलितांना सवर्णांच्या मंदिरात प्रवेश देऊ शकले नाहीत म्हणून त्यांना दलितांसाठी वेगळे पतितपावन मंदीर उभे करावे लागले. त्या मंदिरात सवर्ण जात नव्हतेच, हेही सत्य आहे. एक नवीनच पतितपावन मंदिर उभे केले ही गोष्ट कौतुकास्पद नसते हेच पुष्कळांना कळत नाही! अशा घटना चिंताजनक असतात. सर्व जातीजमातींना मोकळे असणारे नवे मंदिर शेवटी फक्त अस्पृश्यांचे मंदिर उरते आणि पुढे तेही तिथे येणे सोडून देतात. कारण पतित-पावन मंदिरात अस्पृश्यांनी यावे पण सवर्णाच्या मंदिरात जायचा त्यांनी आग्रह धरू नये अशी सावरकरांची ढोंगी भूमिका होती. त्यांचे अस्पृश्यता निवारणाचा कार्य हे अस्पृश्यांना आपल्या जाळ्यात ओढून ब्राह्मणी हितसंबंधांसाठी लढवण्याच्या उद्देशानं होतं. त्यात कोणताही उदात्त हेतू नव्हता हेच सिद्ध होते. 

रत्नागिरीत भागोजी शेठ कीरांच्या मदतीनं हे पतितपावन मंदिरही उभं राहिलं होतं. जेव्हा या मंदिराची कोनशिला बसवली गेली त्या वेळी ‘बहिष्कृत भारत’मध्ये याविषयी एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यात कीरांनी आपला पैसा अशा प्रकारे खर्च करण्याऐवजी अस्पृश्य वर्गातील लोकांच्या शिक्षणासाठी व अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीत खर्च केला असता तर तो सत्कारणी लागला असता, असा अभिप्राय दिला होता. बहिष्कृत वर्गास खास देवळांची जरुरी नाही; उलट अशी देवळे बांधल्याने अस्पृश्यतेचा प्रश्न सुटणे अधिक लांबणीवर पडेल; अस्पृश्यांसाठी खास देवळं बांधली तरी स्पृश्य व अस्पृश्य यांच्यातली भेदरेषा कायम होईल, अशी त्यांची भूमिका होती.

सावरकरांवरची सर्व बंधने इ.स.१९३७ ते ४७ संपलेली होती. या दशकात सार्वजनिक विहिरी, तळी, व मोठी मंदिरे हरिजनांना मोकळी व्हावीत यासाठी लढण्यास त्यांना वेळ मिळालेला दिसत नाही, की सावरकरांनी हिंदूंची प्रतिष्ठित मंदिरे हरिजनांसाठी मोकळी करण्याचे लढे दिले नाहीत. प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी सावरकरांबद्दल त्यांच्या 'शिवरात्र' या पुस्तकात लिहिले आहे की, अस्पृश्यता निवारण हा सावरकरांचा फुरसतीचा उद्योग होता. कारण १९३७ नंतर त्यांनी कुठलेही अस्पृश्य निवारणाचे कार्य केले नाही ते का? त्या उलट पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी मोकळे करण्याचे काम साने गुरुजींसारख्या गांधीनिष्ठ माणसाने करून खरे अस्पृश्य निवारण म्हणजे काय ते दाखवून दिले.

2) 'देवाधर्मामुळे माणूस नीतीमान राहतो आणि समाजात नीतिमत्ता टिकून राहते', हा भक्तांचा भ्रम आहे. कारण डोळे उघडे ठेवून समाजात वावरले तर असे लक्षात येते की, जे देव धर्म मानणारे आहेत ते बरेचदा सिग्नल तोडण्यासारखा लहानसा भ्रष्टाचार करण्यापासून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार का करत असतात? एवढेच नव्हे तर देवळातील पुजारीही देवासमोरच देवळात बलात्कार कसे करतात? अनेक बाबा बुवा स्त्रियांचे शोषण का करत असतात? विरोधी मत प्रदर्शित करणाऱ्यांना अंधभक्त अत्यंत गलिच्छ भाषेत आणि आईमायीच्या शिव्या देत व्यक्त का होत असतात? की असेच वागणे यालाच ते नीतिमत्ता समजतात? याचा अर्थ 'देवधर्मामुळे नीतिमत्ता टिकून राहते', हे विधान आत्मवंचना करणारे आहे, हेच सिद्ध होत नाही का?🤔JK

वाटलंच होतं अशी बावळट  कॉमेंट येईल म्हणून! महाशय, आम्ही काय मानतो यापेक्षा लोक काय मानतात त्यावर चर्चा, टीका-टिप्पणी करणे जास्त महत्त्वाचे असते. आम्ही देव मानत नाही म्हणून आम्हाला देवाबद्दल बोलायचा अधिकार नाही, असे म्हणणे म्हणजे 'तुम्ही जर दारू पीत नसाल तर तुम्हाला दारूविषयी बोलायचा अधिकार नाही.' किंवा जर 'एखाद्या डॉक्टरला हृदरोगाचा अनुभव नसेल तर त्याने हृदयाची शस्त्रक्रिया करू नये.' असे हास्यास्पद बोलण्यासारखे झाले. म्हणून अशी बावळट प्रतिक्रिया फक्त बिनडोक अंधभक्तच करू शकतात.  

3) संविधानाच्या 25 व्या कलमानुसार धर्मस्वातंत्र्याचा हक्क म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता व आरोग्य यांच्या अधीन राहून सद्विवेक स्वातंत्र्याला आणि धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकास आहे. याचा अर्थ वैयक्तिकरित्या घरात धर्मपालनाला आडकाठी नाही, पण सार्वजनिकरित्या रस्त्यावर धर्माची उपासना करता येणार नाही. तेव्हा तुमच्या घरात तुम्हीं कोणता धर्म पाळता त्याच्याशी सरकारला वा कुणालाही देणेघेणे नाही. पण सार्वजनिकरित्या लोकांना वेठीस धरून त्याचा उत्सव करणे संविधानाला मान्य नाही, हे लक्षात घ्या. आणि संविधानातील कलमांचा सोईचा अर्थ काढून कोल्हेकुई करणे बंद करा.

भारतीय लोकशाहीने प्रत्येक नागरीकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. तेव्हा तुम्ही आम्ही सांगू तसेच लिहा, यावर लिहा, ते बोलू नका, कोणते कपडे घाला, काय खा अशी दादागिरी आणि गळचेपी करणारी भाषा करणे म्हणजे संविधानातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटणे होय. आणि हे गळा घोटाण्याचे काम कर्मकांडी अंधभक्त कायम दादागिरीने करत आले आहेत. वरून तेच शहाजोगपणे विरोधकांना 'तुम्ही तुमचे विचार लादू नका', असा दम देऊन कांगावखोरपणा करत असतात. ज्यांना वैचारिक मुद्दे मांडता येत नाहीत असे प्रवाहपतीत अंधभक्त विचारांना घाबरून अशी कोल्हेकुई सुरू करतात. त्या उलट आम्ही समोरच्यावर दाबावाची भाषा न वापरता आमचे विचार स्पष्टपणे मांडतो... अंधश्रध्दांनी भरलेले राजकीय आणि धर्मातील खाचखळगे आणि खड्डे दाखवतो. अर्थात ज्यांना आमचे विचार पटत नाही त्याचा त्या खड्ड्यात पाडण्याचा अधिकारही आम्हास मान्य आहे...

म्हणून आमचे विचार मांडणे मात्र आम्ही सोडणार नाही. ज्यांना पटत नाही ते कोल्हेकुई करतील आणि ज्यांना आमचे विचार पाटतील ते शांतपणे स्वीकार त्याचा करातील, याची आम्हाला जाण आहे. म्हणून आम्ही फक्त विचारांची बीजे परत राहतो. विरोधकांवर दोषारोप करून आपले फसवे समाधान करून घेत नाही. कळले?

4) अ) या ग्रुपमध्ये जर 1%ही इतर धर्मीय नसतील तर त्यांच्या कर्मकांडावर टीका येथे करून काय उपयोग? ज्यांना सुधारण्यासाठी चिकित्सा करायची ते तरी हजर असले पाहिजेत ना? नाहीतर ती टीका वांझोटीच ठरणार. आणि झालाच तर हिंदू धर्मांधांना आणि त्यांच्या अंधभक्तांना त्याचा विकृत आनंद मिळणार. त्यांच्या  विकृत आनंदासाठी आपण आपली बुद्धी आणि वेळ का वाया घालवायचा?  तुमच्या विकृत समाधानासाठी आम्ही आमचा वापर नक्कीच करू देणार नाही. हे नक्की.

सगळ्या धर्मातील अंधभक्तांचे 'दुसऱ्या धर्मावर टीका करण्याची हिंमत दाखवा. फक्त हिंदुधर्मावरच टीका करण्याचा ठेका घेतलाय काय?', असे रडगाणे असते. पण असे रडून आणि इतर धर्मातील दोष दाखवण्याचा कांगावखोरपणा करून आपल्या धर्मातील दोष कमी होत नसतात, की प्रश्नही सुटत नसतात. होते ते फक्त स्वतःचे फसवे समाधान! उलट अंधभक्तीमुळे त्या दोषांचे हे बिच्चारे समर्थन करून स्वतःच्या पायावर धोंडा पाडून तर घेतातच, पण समाजालाही मागास ठेवण्यात हातभार लावतात. हे दुर्दैवी आहे. कितीवेळा सांगायचे की, आम्ही सर्व धर्मातील कुप्रथांवर लिहीत असतो, पण मंदबुद्धी पुनःपुन्हा एकाच बिनडोक टेप लावत असतात की, ' हे हिंदू द्वेषी आहेत. एकाच धर्माला टार्गेट करत असतात'. ह्यावरून हे अंधभक्त किती न्यूनगंडग्रस्त आहेत हेच सिद्ध होते. बिच्चारे! 

इतर धर्मातही अंधश्रध्देच्या आहारी गेलेली माणसे असतातच, हे आम्हास माहीत आहे. म्हणून आम्ही मुस्लिम आणि इतर धर्मातील कर्मकांड आणि चुकीच्या प्रथांवर वेळोवेळी लिहिलेच आहे. तुम्ही ते वाचत नाही हा तुमचा दोष! पण धर्मअंधांना स्वतःच्या चुकीच्या प्रथांचे समर्थन करण्यासाठी 'त्यांच्यावर लिहिण्याची हिम्मत नाही का ?' असा प्रश्न विचारण्याचा कांगावखोरपणा करावाच लागतो. बिच्चारे!!! 

तुमच्यासारख्या अंधभक्तांपेक्षा आमच्यात हिम्मत आहेच म्हणून जर खरंच वाचायची इच्छा असेल तर याच ग्रुपमध्ये ख्रिश्चन पादऱ्यांचे अत्याचार आणि मुस्लिमांतील तालाक, बुरख्यावर आणि इतर कुप्रथांवर आम्हीच लिहिलेल्या 24/11/17,  02/12/17  आणि 07/12/17, 08/02/18, 09/02/18, 30/03/2018, 01/04/2018, 06/05/2018, 16/06/2018, 18/06/2018, 26/06/2018, 02/07/2018, 06/07/2018, 09/07/2018, 10/07/2018, 19/07/2018, 21/07/2018, 28/07/2018, 12/08/2018, 25/092018, 26/09/2018, 27/09/2018, 21/11/2018, 07/02/2019, 30/03/2019, 09/07/2019, 29/09/2020, 09/10/2020 17/03/2021, 19/03/2021 या तारखेच्या पोस्ट वाचाव्यात, म्हणजे तुमचा गैरसमज दूर होईल. नाहीतर कोल्हेकुई करत बसा, आणि आपलाच धार्मिक न्यूनगंड कुरवाळत बसा. अरे, धर्मांधतेपायी मेंदू गहाण ठेवलेल्या गर्दभांनो, किती आपल्याच दोषांवर पांघरूण घालणार!!!

ब) a. हिंदूंच्या धार्मिक सुधारणांवर कुणी बोलले-लिहिले की हिंदुत्ववादी अंधभक्त तात्काळ म्हणतात, 'आधी मुस्लिमांना सांगा'. म्हणजे असे की, 'मुलींनी तोकडे कपडे घालून मंदिरात जाऊ नये' यावर टीका केल्यास अंधभक्त म्हणतात, 'आधी मुस्लिम स्त्रियांना बुरखा काढायला सांगा'. किंवा स्त्रियांना शबरीमला वा शनि शिंगणापूर येथे स्त्रियांना प्रवेश द्या असे सुधारकांनी म्हटले की, हे धर्मांध हिंदुत्ववादी म्हणतात, 'आधी मुस्लिम स्त्रियांना मशिदीत, दर्ग्यात प्रवेश देऊन त्यांच्यात सुधारणा करण्याची हिंमत दाखवा'. पण असे शहाजोग सल्ले देतांना अंधभक्त हे विसरतात की, तसे झाले तर मुस्लिम सुधारतील तुम्ही नाही. मला एक कळत नाही हे अंधभक्त स्वतःला आजार झाला तर औषध दुसऱ्याला देऊन बरे होतात काय? किंवा त्या दुसऱ्या माणसाचा आजार अगोदर बरा करा आणि मग माझा बरा करा; असं म्हणून ते स्वतःलाच फसवत असतात. तुमचे हे म्हणणे म्हणजे, 'आम्ही शेणात आणि गोमूत्रात लोळू पण मुस्लिम सुधारले पाहिजेत.' असे आहे. व्वा! म्हणजे तुम्हाला मुस्लिमांची किती काळजी आहे नाही!

b. मुस्लिम समाजाची खरी काळजी कुणाला असेल तर ती या देशातील हिंदुत्ववाद्यांना! हिंदू धर्मातील चुकीच्या गोष्टींवर बोलल्यास ते म्हणतात, "तुम्हाला मुस्लिम धर्मातील दोष दिसत नाही का?" असा खड़ा सवाल करून त्यांच्या अंधश्रद्धा आधी दूर करा असं नम्र आवाहन ते करत असतात!! म्हणजे हिंदुत्ववाद्यांना आपण मागास राहिलो तरी चालेल, पण मुस्लिमांनी मात्र सुधारावं असं वाटत असतं! हिंदू लोकांना वैचारिक अंधार प्रिय आहे म्हणून मुस्लिमांनाच सुधारणेच्या प्रकाशाचे कवडसे दाखवा, असा सद्विचार करणारे हिंदुत्ववादी किती परोपकारी व त्यागमाय आहेत नाही!!  स्वतः बुरसटलेल्या अंधश्रध्दांना कवटाळून लोकांना शहाणपणाचे डोस पाजणारे, खरे बुद्धिमान आहेत हे हिंदुत्ववादी!!!

c) आपल्याच धर्मातील दोष दाखवतात म्हणून सगळ्या सुधारकांना दांभिक हिंदुत्ववाद्यांनीच छळले होते आणि छळत आहेत. ते मुस्लिमांची भीती दाखवून सतत सामान्य हिंदूंना घाबरवत आले आहेत. सगळ्याच धर्मात धर्मांध, कर्मकांडी, रुढी-परंपरावादी लोक जास्त असतात तर विचारी माणसे कमी असतात. 

मुस्लिम धर्मात हमीद दलवाई, रझिया पटेल, रुबिना पटेल, अजगरली इंजिनियर, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर असे अनेक सुधारकी विचारांचे कार्यकर्ते होते आणि आहेत. तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे शमशुद्दीन तांबोळी, पैगंबर शेख हे कार्यकर्तेही कार्यरत आहेत. भलेही मुस्लिम लोकात सुधारणावादी कार्यकर्ते कमी असतील पण त्यांच्यातही शिक्षणामुळे हळूहळू बदल होत असताना दिसतो आहे. हिंदूंना बदल स्वीकारायला शंभर-दीडशे वर्षे लागली तर त्या धर्मातील लोकांनाही बदल स्वीकारायला काही काळ जावा लागेलच ना?

दुसरी कडे युरोपात ख्रिश्चनांमध्ये आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग्स सारखे नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ, कार्ल सागान, आयझॅक असिमॉव सारखे लेखक, बर्टर्ड रसेल सारखे विचारवंत सुधारणावादी होते. पाश्चात्य देशात कालानुरूप लोकांच्या विचारात बदल झाल्यामुळे त्यानी धर्म घरात ठेवण्याचा शहाणपणा केला. धर्म व राजकारणाची फारकत केल्यामुळेच ते विकसित झाले. त्या उलट आपली मानसिकता पूर्वजांचे ज्ञान हेच अंतिम सत्य समजून धर्माचा उपयोग राजकारणासाठी केल्यामुळे आपण विकसनशीलच राहिलो आहोत. 

व्हॅटिकनचे प्रमुख फ्रान्सिस पॉप यांनी तर चारशे वर्षांपूर्वी गॅलिलिओच्या बाबतीत चर्चने जे केले ते चूक होते म्हणून त्याविषयी दोन वर्षांपूर्वी जाहीर क्षमाही मागितली. अशा पद्धतीने हिंदू किंवा मुस्लीम धर्मातील कोण्या धर्ममार्तंडाने आपल्या पूर्वजांच्या चुकीची जाहीरपणे मागण्याचे धाडस केले आहे काय?

तेव्हा इतर धर्माशी तुलना न करता अंधभक्तीचा फाफटपसारा सोडून आपण वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारून काळानुसार किती वाटचाल केली आहे याचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. इतर धर्मांचा द्वेष करून काहीही साध्य होणार नाही. झालेच तर आपलेच नुकसान होईल, हे आपल्या जेवढ्या लवकर लक्षात येईल तेवढे बरे.

d) असे का बरे? 🤔JK

1) डीपीवर देवाचा फोटो दाखवणारे बहुतेक अंधभक्त हे *शिवराळ* का असतात? 

2) डीपीवर देव ठेवणाऱ्यांना त्यांचा देव सभ्य भाषेत बोलण्याचा संस्कार करत नाही काय? 

3) डीपीवर संतांचे फोटो लावणारे बहुतेक *आसंती* भाषा का बोलतात? 

4) डीपीवर संतांचे फोटो ठेवणाऱ्यांना त्यांचा आवडता संत अंधश्रद्धेची जळमटे दूर करायला शिकवत नाही काय? 

5) डीपीवर शिवाजी राजांचा फोटो लावणारे बरेचदा तोंडात *शिव्यांचा तोबारा* का भरतात?

6) डीपीवर शिवाजी राजांचा फोटो ठेवणाऱ्यांना राजांचा सर्वांशी समान न्यायाने आणि आदराने वागण्याचा गुण आत्मसात करायला भीती वाटते काय?

7) त्याचप्रमाणे बाबासाहेब वा बुद्धाचा डिपी ठेवणारे विरोधकांशी आदराने का बोलत नाहीत?

एकूण काय तर, सगळ्याच जाती-धर्मातील कट्टर अंधभक्त हे एकजात असंस्कृत असतात, हेच खरे.

e) शिक्षित धर्मांधांनो, मुस्लिमांनी वा इतर धर्मियांनी हिंदूधर्मावर टीका केली तर त्यांना मोठ्या तोंडाने शहाजोगपणे सांगता की, 'आम्ही आमचे पाहून घेऊ. आमच्या धर्मात नाक खुपसायची गरज नाही.' म्हणजे त्यांनी केलेली टीका जर आवडत नसेल तर तुम्हाला इस्लाम वा इतरधर्मांवर टीका करण्याचा काय अधिकार आहे? तेव्हा तुम्ही त्यांच्या धर्मात नाक खूपसण्यापेक्षा आधी आपल्या बुडाखाली काय जळते आहे ते पहा आणि मग इतर धर्मीयांची बुडे हुंगायला जा. काय समजलेत?

मला एक कळत नाही की, अन्य धर्माविषयी बोलून हिंदू धर्मातील दोष कसे नाहीसे होतील? उलट तुमच्यासारखे आत्मपरीक्षण न करता इतर धर्मांतील दोष दाखवून आपल्याच धर्मातील दोष झाकायचा प्रयत्न केविलवाणा प्रयत्न करतात हेच निषेधार्थ आहे.

खरे पहाता, विचारी माणसं सर्वच धर्मांधांची चिकीत्सा करतात. थोडं डोकं शाबूत ठेवून पाहिलंत, तर हिंदू असो वा मुस्लीम वा ख्रिस्ती... सर्व धर्मांतील अनिष्ट प्रथा आणि व्यवहारांविरोधात पुरोगाम्यांनीच आवाज उठवला आहे आणि कार्यक्रमही दिलेले आहेत... धर्मांधांनी वा अंधभक्तांनी नाही.

म्हणून फक्त हिंदूंनाच काय बोलता हे तुणतुणं वाजवणारा संघी थयथयाट बंद करा.

तुमच्यासारख्यांच्या वैचारिक पूर्वजांनीच गतकाळात संत तुकारामांचं  जगणं असह्य केलं, सावित्रीबाईंवर शेणगोळे फेकले, आगरकरांची प्रेतयात्रा काढली आणि आता दाभोलकर/ पानसरेंना संपवलं. 

जरा तुकारामांची गाथा काढून वाचा आणि स्वपरीक्षण जमलं तर करा... नाही तर त्यांनाही विचाराल, आमच्याबद्दलच का बोलता म्हणून! तुमच्यासारखे दांभिक धर्मांध इतर धर्मीयांबद्दल बोलायची हिम्मत नाही का, असे तुकाराम,आगरकरांनाही विचारायला कमी करणार नाहीत!🤦JK

f) तुम्हाला एकच धर्म दिसतो दुसरा धर्म नाही काय, असा पुरोगाम्यांना मानभावी प्रश्न विचारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांनो, तुमच्या घरात तुमचा मुलगा प्रचंड आजारी असताना त्याचा आजार दैवावर सोडून तुम्ही आधी शेजारच्या आजारी मुसलमानाची शुश्रूषा करायला धावणार का? 

तेव्हा हिंदूंनाच विरोध का? मुसलमानांना विरोध करतांना फाटते काय? असे म्हणणाऱ्याची वृत्ती ही "आजार डोक्याला आणि मलमपट्टीचा उपचार ढुंगणाला" करणाऱ्या अर्धवट वैद्यासारखी असते. किंवा "आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी" नेणाऱ्या बावळट, येडपट माणसासारखी असते.🤦

म्हणून आता तुम्हाला हिंदू धर्मच दिसतो दुसरा धर्म दिसत नाही, एकाच धर्माला टार्गेट करू नका, असे मूर्खासारखे प्रश्न विचारणे सोडून द्या. आणि आपल्याच धर्मातील अंधश्रद्धा, कुप्रथा नष्ट करायची सुरुवात करून आपला धर्म असा स्वच्छ करा की, इतर धर्मीयांसाठी तो एक वस्तुपाठ ठरेल. कारण माणसाची प्रगती धार्मिक अंधश्रध्दांना जोपासून नव्हे तर त्यांना तिलांजली देऊनच आली आहे, हे लक्षात ठेवा.🙄JK

g) तुम्हाला मुसलमानातील अंधश्रद्धा दिसत नाहीत काय? असला बोगस युक्तिवाद करणाऱ्यांना माझे सांगणे असते की, माझ्या लहानपणापासून, माझ्याच धर्माच्या मंडळींनी मला धादांत खोटं सांगत आले आहेत की जगात देव आहे, आपली जात खूप हुशार आहे, माणूस मेल्यावर स्वर्गात जातो, उपास करून देव पावतो... या आणि असल्या कितीतरी भंपक गोष्टी मला सांगायला फक्त आणि फक्त माझीच मंडळी आली होती. रस्त्यात, संस्कार वर्गात, बागेत, घरात, दारात, तुम्ही म्हणाल तिथे हे सगळं "खोटं" मला फक्त माझ्याच लोकांनी सांगितलंय... इतर कोणत्याही धर्मातल्या व्यक्तीने... इस्लामी, ख्रिस्ती, शीख धर्मरक्षकाने असलं काहीही येऊन मला सांगितल्याचं स्मरत नाही. त्यांच्या धर्मात असं शिकवलं जात नाही, असं अजिबात नाही. पण मला शिकवायला त्यांच्यातलं कोणी आलेलं नाही.

त्यामुळेच मला खोट्या, अतार्किक, अतिरंजीत आणि काल्पनिक गोष्टी सांगून दिलेल्या त्रासाची “जाहीर माफी” फक्त माझ्याच धर्मातील धर्ममार्तंड आणि माझ्यावर चुकीचे संस्कार करणाऱ्या मोठ्या माणसांनी मागायला हवी.

“फक्त अमच्या धर्माला का बोलता?” हा प्रश्न आज विचारणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावं की, माझ्या लहानपणापासून माझ्या धर्मातील धर्मांध माझ्याशी सतत खोटं बोलत असताना मी इतर धर्मीयांविषयी का बोलावं? तेव्हा आधी तुम्ही तुमचा खोटेपणा मान्य करा, तो दुरुस्त करा आणि मग इतर धर्मियांना जाब विचारायला जा. – जेट जगदीश.

h) तुम्ही हिंदुद्वेषी आहात. तुम्हाला फक्त हिंदू धर्म दिसतो इतर धर्मातील अंधश्रद्धा दिसत नाहीत का? असा प्रश्न विचारण्याची सध्या अंधभक्तांनी फॅशन रूढ केलेली आहे. कारण त्यांना आत्मपरीक्षण करायची भीती वाटते. सत्य पचवता येत नाही. मग दुसऱ्यांना दोष देणे सोपे.

म्हणून ते कुराण-इस्लाम, बायबल-ख्रिश्चँनिटी तसेच इतर म्हणजे पारशी, शिख, जैन, बौद्ध, ज्यू वगैरे धर्मिय... त्यांच्या रूढी, परंपरा, अंधश्रद्धा यांची चिकित्सा का केली जात नाही? फक्त हिंदूधर्माची का चिकित्सा करता? एकाच धर्माला ठेचता आणि दुसऱ्याची भलामण का करता?... असा कातडीबाचावू प्रश्न विचारत असतात.

हा प्रश्नच मुळात लॉजिकल युक्तिवादाकरीता केलेलाच नसतो. तर तो फक्त बिनडोकपणे केलेला "पलायनवाद" असतो. जसे की लहानपणी दोन भावंडांना उठवायला आलेल्या आईला, "आधी त्याला उठव" हे संगण्यामागे "मला झोपू दे" असं म्हणून आपल्यावर आलेली ब्याद इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न असतो, अगदी तस्सच!

भक्तांनो, तुम्ही भारतातील राजकारणावर बोलता की रशियातील? कशावर बोलून तुम्हाला देशात सुधारणा होईल असे वाटते? तसेच हिंदूंनी आपल्या धर्मातील अंधश्रद्धा नाहीशा करून आपल्याच धर्मात सुधारणा करणे आवश्यक नाही काय? आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा की, ज्या ज्या श्रद्धा चिकित्सेला नकार देतात त्या सगळ्या अंधश्रद्धाच असतात. त्यामुळे अशा श्रद्धांचेही निर्मूलन करणे आवश्यक ठरते.

कोणताही बदल स्वीकारण्यासाठी अंगी धाडस लागते आणि विचार करण्याची प्रवृत्तीही... जोपर्यंत तुम्ही ती जोपासत नाही तोपर्यंत तुमचे जीणे हे मेंढरू वृत्तीच्या प्रवाहपतितासारखे गलितगात्र होते. तुम्हाला बिनडोक मेंढरू व्हायला आवडेल की वैचारिक माणूस, हे तुम्हीच ठरवायचे आहे. त्यासाठी देवाच्या, अल्लाच्या किंवा गॉडच्या भीतीने चांगले वागणे चांगले की स्वतःशी प्रामाणिक राहून नीतिमत्तेने वागणे चांगले? तुम्हाला काय वाटते?🤔JK

i) मला माझाच हिंदू धर्म दिसतो. कारण माझ्या हिंदू धर्मातील चुकीच्या रूढी-परंपरा, व्रतवैकल्ये, व्यर्थ कुलाचार, पोथ्यापुरणांनी निर्मिलेले पूजेचे कर्मकांड अशी अंधश्रद्धारूपी जळमटे नष्ट व्हावी म्हणून समाजात वैज्ञानिक आणि विवेकी दृष्टिकोन जागृत करणे हे माझे प्रथम कर्तव्य ठरते. ज्यांना या जळमटांची घाण तशीच ठेवून दुसऱ्या धर्मातील जळमटे काढण्यासाठी धावपळ करण्याची इच्छा असते ते सत्य न पचवता येणारे, भ्रमातच आभासी आनंद शोधणारे, नवविचारांच्या प्रकाशाची भीती वाटणारे अंधारप्रिय मुके, बहिरे आणि आंधळे उंटावरचे शहाणे असतात.😷

कट्टर हिंदुत्ववादी जेव्हा परधर्मीयांबद्दल वाचाळ वटवट करून हिंदू धर्माला बदनाम करतात तेव्हा सर्वसामान्य हिंदू एकजुटीने त्यांचा निषेध का करत नाहीत? आज पर्यंत आर एस एस, बजरंग दल, हिंदू जनजागरण समिती, श्रीराम सेना, इ. यांनी परधर्मीय द्वेष निर्माण करणारी वाचाळ वटवट अनेकदा केली; तरीही त्यावर स्वतःला हिंदू म्हणणाऱ्यांनी  साधा निषेधही नोंदवलेला नाही. याचा अर्थ त्यांचीसुद्धा त्या वाचाळपणाला मूकसंमती असते असा होत नाही काय?🤔JK

5) अ) तथाकथित 'गॉड पार्टीकल'चे खरे मूळ नाव 'हिग्स बोसॉन' असे आहे. पण सामान्य माणसांना त्याच्या दुर्मिळतेचा अंदाज यावा म्हणून आस्तिक जसे देवाला दुर्मिळ समजतात तसे त्या कणाबद्दल त्यांना कळावे म्हणून त्याला 'गॉड पार्टीकल' अशी उपमा दिली गेली. पण बिनडोक अंधभक्त त्यांना खरेच देवकण समजून मोठाच विनोद करत आहेत. कारण त्यांची बुद्धी मतितार्थ समजण्यापेक्षा फक्त शब्दश: अर्थ जाणण्याएवढीच अप्रगल्भ राहिलेली आहे.

ब) अनेकदा लोक मला विचारतात की, आपल्या नावापुढे आपण 'जेट' असे लिहिता त्याचा अर्थ काय? तो याप्रमाणे...
Just Eloquent Thoughts  या शब्द समूहाचे JET हे लघुरूप आहे. त्याचा अर्थ आहे 'प्रामाणिक ओघवते विचार'... हा योग्य विचार करूनच 'जेट' हा शब्द आम्ही आमच्या नावाआधी लावतो.

आता 'जगदीश' या नावाबद्दल...
मी नास्तिक असल्यामुळे बरेचदा लोक मला विचारतात की, तुमचे नाव मग "जगदीश" कसे ? कारण भाषाशास्राप्रमाणे ह्या शब्दाची संधी जगत + ईश अशी होते, म्हणजे जगाचे पालन करणारा ईश्वर. आणि जर तुम्ही देवच मानत नाही तर मग नाव का बदलत नाही ? किती बालिश प्रश्न आहे हा! कारण ह्या लोकांना जगाचे पालन करणारा म्हणजे जगाला विवेकवादाची कास धरून वैज्ञानिक दृष्टीकोन देऊन त्यांच्या मनाची मशागत करणारा हा अर्थ माहीतच नसतो. तसेच माझ्या जगाचा सूत्रधार मीच आहे, म्हणजे मीच आहे माझा तथाकथित ईश्वर! पण माणसे फक्त शब्दकोशातील अर्थ जाणतात, म्हणून त्यांना त्याचा गर्भित अर्थ कळत नाही, वा कळून घेण्याची त्यांची इच्छा नसते.

क) आपण बरेचदा अनेक शब्द भोंगळपणे वापरत असतो. म्हणून विश्वास आणि श्रद्धा या शब्दांच्या अर्थात खूप मोठा फरक आहे, हे आपल्या गावीही नसते. कारण श्रद्धा चिकित्सेला नाकरते, तर विश्वास चिकित्सक स्वीकारतो. म्हणूनच चूक कळली की, विश्वास बदलतो; पण श्रद्धा चूक कळली तरी तिलाच घट्ट चिकटून बसणारी गोचीड असते. JK

7) फेसबुक, व्हाट्सअप्पवर एकदा का पोस्ट टाकली की त्यावर आपला कॉपीराईट चालत नाही. कारण कोण कशाप्रकारे एडिट करून कटपेस्ट करेल ते सांगता येत नाही. माझ्याही अनेक पोस्ट अशा अनेक लोक आपले नाव घालून फिरवत असतात. त्याला आपला नाईलाज असतो. मी अशा लोकांना ते आपले विचार प्रसारित करायला हातभार लावताहेत म्हणून दुर्लक्ष करून सोडून देतो.

कॉपी-पेस्ट बद्दल म्हणाल तर त्यासाठी चांगले वाचन आणि अभ्यासू वृत्ती अंगी असावी लागते. ज्यांचे विचार आम्हाला आवडतात आणि जे विवेकी व वैज्ञानिक दृष्टिकोन देणारे असतात, त्यांचा आम्ही प्रसार करणे आमचे कर्तव्य समजतो. ह्यात चूक काहीच नाही. त्या उलट कॉपी-पेस्टला कमी लेखून खिल्ली उडवणारे अंधभक्त हे आपल्यातील अभ्यासू वृत्तीचा अभाव अभिमानाने मिरवण्याची गोष्ट समजत असतात.🙃

8) गाडगेबाबाही देव मानत होते, पण ते देवळातल्या दगडाला नाही तर माणसांमध्ये देव पहा असे ते म्हणत. त्यांनी आयुष्यभर देवळाच्या प्रांगणात प्रवचने दिली, पण देवळातल्या दगड्या देवाला जाऊन कधीही नमस्कार केला नाही, हे लक्षात ठेवा. 

त्यामुळे अंधभक्तांचे देव मानणे आणि गाडगेबाबा, संत तुकाराम यांचे देव मानणे यात जमीन अस्मानाचा फरक आहे. गाडगे बाबा आणि संत तुकाराम दगड्या देवाला 'तीर्थे धोंडा पाणी' असे म्हणून शिव्याही घालत. देवाला धोंडा म्हणणे ही एक प्रकारे देवाला दिलेली शिवीच नाही काय? 

ते मानवतेला देव मानत, तर अंधभक्त मात्र दगडालाच देव मानतात. म्हणून अंधभक्त दगड्या देवाला गोडधोडाचा प्रसाद लाच म्हणून देतात आणि तो प्रसाद देवाच्या नावाखाली स्वतः ओरपतात. 

संतांचा बुद्धीप्रामाण्यवाद न झेपणारे हे अंधभक्त 'संत देव मानत होते', असे म्हणून चुकीच्या पद्धतीने संताना प्रोजेक्ट करतात. हा तर हितसंबंध गुंतलेल्या आणि दगड्या देवाच्या पायाशी डोके गहाण ठेवलेल्या अंधभक्तांचा स्वार्थीपणाच आहे.🙏JK

9) आता जातीयता कुठे उरली आहे? कोण पाळतो जातिभेद? असे प्रश्न विचारणाऱ्यांनो, जातीभेद निर्मूलनाच्या बाबतीतही आपली वरवरची सुधारणा झालेली दिसतेय. जातीभेदातील अन्याय व अनिष्ठता लक्षात घेऊन आपण ही सुधारणा केलेली नाही, तर परिस्थितीच्या रेट्यामुळे व्यापार, प्रवास व नोकरीच्या निमित्ताने विविध जातींची संपर्क आल्यामुळे जातीभेदाची बंधने आपोआप शिथिल झाली. पण त्यामुळे आज संधी मिळेल तेथे प्रत्येक जात आपला सवतासुभा निर्माण करून आपले स्वतंत्र बळ वाढवत आहे. अस्पृश्यतेच्या रूढीतील विलक्षण अविचार, अन्याय, अमानुषता ही सर्वथैव असमर्थनीय असल्यामुळे आपण तिचा समजून-उमजून व मनापासून त्याग केला पाहिजे. पण आपण तसे न केल्यामुळे आज अस्पृश्यतेची मगरमिठी आपल्या मनावर पूर्वीइतकीच पक्की बसलेली आहे. त्यामुळे अस्पृश्यांना आजही आपण तुच्छतेने वागवतो. अगदी क्षुल्लक कारणावरूनही त्यांची हत्या करण्यास मागे पुढे पहात नाही. परिणामी राष्ट्राच्या ऐक्यास धोका निर्माण झाला आहे. म्हणून अस्पृश्यता निर्मूलनाच्या बाबतीत आपल्याला अपयश आलेले आहे, हे स्वतःच्या मनाशी तरी आता आपल्याला प्रामाणिकपणे कबूल करावेच लागेल.

जातीव्यवस्था कालबाह्य झाली आहे म्हणूनच का आजही दलितांवर अत्याचारांचा कळस गाठला जातो? आंतरजातीय विवाह केला म्हणून बाप आपल्या गरोदर मुलीचा गळा घोटतो! जातपंचायत जातीचा नियम तोंडला म्हणून कुटुंबे वाळीत टाकण्याची आज्ञा देते! तेव्हा शहामृगी पवित्रा न घेता डोळे उघडे ठेवून जगाकडे बघा. त्यात तुमचेच भले आहे. यावरून आता जातीयता कुठे उरली आहे  असा प्रश्न विचारणारे आत्मपरीक्षणाला किती घाबरतात हे स्पष्ट आहे. मग दांभिकपणे छद्म तत्वज्ञानाची पोपटपंची करणे एवढेच त्यांच्या हाती उरते. बिच्चारे! 

10) अ) शिक्षणाने माणूस डॉक्टर, शास्त्रज्ञ होतो, पण त्याच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईलच असे नाही. तो फक्त पुस्तकी ज्ञानाने तंत्र कुशल होतो, पण विवेकी विचारांनी प्रगल्भ होतोच असे नाही. म्हणजे असे की, त्याला शिक्षणामुळे हे नक्की माहीत असते की, ऊर्जा निर्माणही होत नाही आणि नष्टही, पण तरीही अनामिक ऊर्जेने बाबाने हवेतून काढलेल्या वस्तू पाहून तो त्या बाबाच्या तथाकथित चमत्काराला बळी पडतो. कारण माणसांचे विचार हे भावनांशी निगडित असतात. म्हणून विचार हे सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. त्याउलट उर्जेला भावना नसतात, म्हणून त्या सकारात्मक किंवा नकारात्मक असूच शकत नाहीत. ऊर्जा ही भौतिक राशी असल्यामुळे ती तठस्थच असते. तरीही धर्ममार्तंड सकारात्मक आणि नकारात्मक उर्जेबद्दल जे सांगेल ते भान हरपून आपण ऐकतो. ह्यालाच मानसिक गुलामी म्हणतात, जी घराघरातून संस्काराच्या नावाखाली वाढवली जात असते. परिणाम स्वरूप इसरोमधील काही शास्त्रज्ञ याच गुलामी मानसिकतेचे बळी असतात. म्हणून ते गंडे-दोरे आणि बाबाबुवांच्या अंगठ्या घालतात. तीच गत डॉक्टराचीही होऊ शकते. त्याला मूल कसे जन्मते याची पूर्ण शास्त्रीय माहिती असते, तरीही तो वांझ स्त्रियांना हमखास मूल देणाऱ्या बाबाच्या कच्छपी लावतो. 

थोडक्यात काय तर ही सगळी शिक्षित मंडळी या अंधश्रद्ध समाजातूनच जन्माला आलेली आहेत. त्यांच्यावर लहानपणापासून देवाधर्माच्या कर्मकांडांचे, कुळाचार पाळण्याचे आणि देवाविषयी भीती बाळगण्याचे संस्कार होतात. म्हणून जोपर्यंत ते विवेकाने विचार करून स्वतः स्वतःशीच झगडून आपले विचार बदलत नाहीत तोपर्यंत ते प्रवाहपतितासारखेच जगत असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णालयात छोटेसे देऊळ किंवा देवाचा फोटो असला तर त्यात विशेष ते काय!

वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या अभावामुळे माणूस उच्चशिक्षित झाला तरी धर्मान्ध, अंधश्रद्ध, चुकीच्या अस्मिता गोंजारणारा, जातीसाठी माती खाणारा आणि आपल्या धर्माची श्रेष्ठता सांगण्यासाठी बेभान होऊन इतर धर्मीयांना तुच्छ लेखणारा असू शकतो. पण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला मात्र सर्वसमावेशक वृत्तीचा असतो. आणि अशा लोकांचीच आज भारताला गरज आहे.

ब) माझ्यासोबत वावरणाऱ्या माझ्याच चेहऱ्यामोहऱ्याच्या माझ्या बांधवांची वाटतेय. गोष्टी अशा डोळ्यांदेखत बिघडत जात असतानाही आपल्या आसपासच्या जगण्यातलं काही बिघडत चाललंय असं त्यांना मुळी वाटतच नाहीये, त्यांच्या बुडाला काहीच चटके जाणवत नाहीयेत, हे जास्त भीतीदायक आहे. ज्या शहाण्यासुरत्या बुद्धिजीवींनी, लेखक-कलावंतांनी या अविचारी प्रवृत्तींच्या कच्छपी लागून कळसूत्री भावल्यांगत नाचणाऱ्या सामान्य लोकांना विवेकाचा अंकुश टोचून भानावर आणायचं, तेच आम्ही आमच्या शब्दांची शस्त्रे म्यान करून बसलोय. आमच्यातलेच काही सत्तेच्या तालावर डोलत आपल्या सहिष्णू परंपरांचा गळा घोटू लागलेत. जागल्याच्या भूमिकेत वावरणाऱ्यांनाच आपल्या आयडेंटिटीचं विस्मरण होऊन तेही मंबाजीच्या तालावर नाचू लागलेत. डोळ्यांदेखत होऊ लागलेल्या या माझ्याच अपमृत्यूपेक्षा अधिक भयावह काय असू शकतं?

11) a) आपल्या लिहिण्याने जग बदलेल किंवा फार मोठा फरक पडेल असा भाबडा आशावाद आम्ही अजिबात बाळगत नाही. आमच्या लिहिण्याने लोकांची मते पूर्णपणे बदलून जातील असाही फाजील आत्मविश्वास नाही. फक्त लोकांनी आपल्या जगण्याशी निगडीत मुद्दे काय आहेत, आपल्या जीवनमरणाचा खरा प्रश्न काय आहे ह्याचा किमान विचार करावा आणि त्यानुसार योग्य त्या गोष्टीना प्राधान्य द्यावं, हे समजण्यासाठी आम्ही लेखन प्रपंच करतो. कारण आम्हाला हे माहीत आहे की, आमच्या असण्या-नसण्याने काहीही फरक पडत नसला तरीही आम्ही निर्बुद्धासारखे निष्क्रिय राहू शकत नाही. त्याचवेळेस सगळ्यांना आमचं सगळच पटेल असा आग्रहही अजिबात नाही. 

मुळात पोस्ट वाचून कोणी किती लाईक केले वा कॉमेंट्स केल्या हे पाहण्यासाठी मी माझ्या पोस्ट लिहीत नसतो  तर माझ्या मनातले विचार फक्त लोकांपर्यंत पोचवण्याचे काम करतो. ज्यांना वाचायचे आहेत ते वाचतील आणि ज्यांना वाचायचं नाही ते वाचणार नाहीत. त्यासाठी त्यांनी लाईक केले काय, नाही केले काय, मला त्याने काही फरक पडत नाही. माझं मन मोकळं करण्याचा हा माझा हक्काचा मार्ग आहे. त्यामुळे तो दुसऱ्या कुणावरही अवलंबून नाही.

आम्ही फक्त विचार पेरत जातो. ज्यांना आवडतील ते विचार करून बदलतील, आणि ज्यांना आवडणार नाही ते शंख करतील. हे आम्ही जाणून आहोत. तेव्हा आमचे विचार समोरच्याने स्वीकारलेच पाहिजे असा आमचा कधीही अट्टाहास नसतो. कारण अट्टाहास फक्त स्वतःला शहाणे समजून लोकांना अक्कल शिकवणारेच करतात. म्हणूच अशा लोकांच्या शिव्यांनाही ओव्या समजून न थकता शांतपणे उत्तरे देऊन विचारप्रवृत्त करणे हेच आमचे काम आम्ही इमानेइतबारे करत असतो. भलेही आपल्या आयुष्यात आपल्या कामाचा result नाही मिळाला तरी आम्ही कधीच निराश होत नाही. कारण हे काम पिढ्यांच्या मापनात मोजायचे असते. - जेट जगदीश.

b) भारतात हिंदूच बहुसंख्येने असल्यामुळे त्यांच्यातील चूकीच्या चालीरितींवर टीका मोठ्या प्रमाणात होणारच. तसेच मी हिंदू धर्मात जन्मलो, वाढलो त्यामुळे लहानपणापासून मी धर्मातील रूढी, प्रथा-परंपरा पाहतच मोठा झालो. पण समज आल्यापासून मला त्यातील फोलपणा दिसू लागला. प्रश्न पडू लागले. त्याची योग्य उत्तरे मोठ्याकडून न मिळाल्यामुळे विचारवंतांच्या पुस्तकांनी मला दिशा दिली. मग आपल्याच धर्मातील देवाच्या नावावर चालणाऱ्या अनिष्ठ गोष्टीवर दोष दिग्दर्शन केले तर त्यात चूक काय? पण चिकित्सेला द्वेष समजणे हा तर मेंदूची कवाडे बंद करून मेंढरू वृत्तीच्या आत्मपरिक्षणाला घाबरणाऱ्या अंधभक्तांचा अंगभूत गुणधर्म आहे. त्यामुळे ते बिच्चारे अंधभक्त लोकांच्या धर्मातील दोष दाखवून आपल्या धर्मातील चुकीच्या प्रथांचे समर्थन करतात, तेव्हा त्यांची कीव कारावी तेवढी थोडीच आहे. 

 पण हिंदू धर्मावर टीका करणारे हे नेहमीच परधर्मीय वा हिंदुद्वेषी असतात असे समजणे हा तर मूर्खपणाच आहे. तसेच हिंदु बहुजनांना अंधश्रद्धेच्या गर्तेत लोटणारे ब्राह्मणच दोषी आहेत म्हणून त्यांचे दोष दाखवल्यावर ते दाखवणारे ब्राह्मणद्वेषी कसे काय होऊ शकतात? मी हिंदू धर्मातील कुप्रथांवर घणाघाती शब्दात परखड टीका करणाऱ्या विवेकानंद, आगरकर, प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, लोकहितवादी या महामानवांच्या विचारांची बांधिलकी जपणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे. म्हणून मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या विचारांच्या आधारे स्वतःच्या धर्मावर ही टीका करण्याचे धारिष्ट्य दाखवू शकतोय. 

अंधभक्तांसारखे चुकीच्या गोष्टींचे समर्थन करून वृथा अभिमान बाळगणे हे मला जमणार नाही. उलट आपले दोष कळल्यावर आपण आपले परखड आत्मपरीक्षण करून ते दोष नाहीसे करण्यावर भर देणे जास्त योग्य नाही काय? पण अशा वेळेस दोष दाखवणाऱ्यालाच हिंदुद्वेषी, ब्राह्मणद्वेषी, देशद्रोही, अरबन नक्षली अशी लेबले लावणे यात कोणता शहाणपणा आहे?

c) आजपर्यंतचा इतिहास पहाता हिंदू धर्मात झालेल्या सुधारणा ह्या कट्टर विचारांच्या सनातन्यांनी केलेल्या नसून त्या वरंवार धर्माला आव्हान देऊन त्यात सुधारणा घडवून आणणाऱ्या समाजसुधारकांनीच केलेल्या  आहेत. चार्वाक, संत तुकाराम, बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, सुधारक आगरकर, विज्ञानानिष्ठ सावरकर, प्रबोधनाकार ठाकरे, यांच्या घणाघाती आघातामुळेच हिंदू धर्म व्यापक बनला आहे. या सुधारणावाद्यांना छळण्याचं काम मात्र सनातन्यांनी सातत्याने इमानेइतबारे केलेलं आहे. एवंच हिंदूंनी बदल लगेच स्वीकारला असे म्हणणे हे स्वतःशीच प्रतारणा करण्यासारखे आहे. जो काही बदल स्वीकारला तो एकतर परिस्थितीच्या रेट्यामुळे नाईलाजाने वा सुधारकांच्या वैचारिक लढ्यामुळे. तेव्हा धर्मांधांनी ह्या सत्याकडे डोळेझाक करून शहामृगी पवित्रा घेऊ नये, आणि स्वतःशीच प्रामाणिक रहावे. म्हणजे अशी पोकळ विधाने करावी लागणार नाहीत.

आम्ही जरी उपरोल्लेखित सुधारकांच्या पासंगाला पुरणार नसलो तरी त्यांनी दाखवलेल्या वाटेवरून विवेकी विचारांची बीजे रुजवत चाललो आहोत, याचा आम्हास सार्थ अभिमान आहे. अंधभक्तांसारखा पूर्वजांचा पोकळ अभिमान बाळगण्यापेक्षा हे केव्हाही चांगले.

d) हिंदू सहिष्णू आहेत हा तुमचा भ्रम आहे. ज्ञानेश्वरांना छळणारे, तुकारामांच्या गाथा बुडवणारे, नामदेवांना महाराष्ट्रातून परागंदा होण्यास भाग पाडणारे, शिवाजी राजांना शूद्र समजून त्यांचा राज्याभिषेक न करणारे, दाभोलकर, पानसरे, कुलबर्गी, गौरी लंकेश या विचारवंतांचा खून करणारे, शेकडो वर्षे पददलीतांवर अत्याचार आणि बलात्कार करणारे हे सगळेच सहिष्णू होते असे तुम्हास म्हणायचे आहे की काय? कोणत्या सहिष्णुतेचे लक्षण आहे? एकूण काय तर सगळ्या धर्मातील धर्मान्ध असहिष्णुच असतात. पण कट्टर हिंदुत्ववादी अंधभक्तांना धार्मिक अस्मितेने घेरल्यामुळे त्यांना ही कृत्ये धर्मरक्षणासाठी केली आहेत असे वाटते, म्हणून त्यात त्यांना असहिष्णुता दिसणे कठीण!

12)  मी जेव्हा जेव्हा तथाकथित धार्मिक आणि संघोट्या हिंदुत्ववाद्यांना प्रश्न विचारतो की, हिंदू धर्मातील चार चांगल्या प्रथा सांगा, त्यावेळेस ते बहुतांश उदाहरणे नीतीमत्तेने कसे वागावे यासंबंधीची देत असतात. पण नितीमत्तेने वागण्यासाठी धर्माची गरज लागत नाही. माणसाकडे विवेक असला म्हणजे पुरे.

तसेच त्यांची बरीचशी उदाहरणे सणवार, व्रतवैकल्ये,पूजेतील कर्मकांड ह्या चांगल्या प्रथा आहेत, अशी सांगणारी असतात. त्यांचा हा युक्तीवाद कसा चुकीचा आहे हे खालील काही उदाहरणांनी स्पष्ट होईल...

1) पोळ्याच्या दिवशी बैलांना पुजायचे आणि बैलांकडून काम करून घेताना त्यांना पारणे टोचायचे! यालाच ते कृतज्ञता व्यक्त करणे म्हणता काय?

2) गणपतीच्या दहा दिवसात उंदराला पुजायचे, पण वर्षातील बाकीचे सगळे दिवस उंदीर दिसला की त्याला ठेचायचे. यालाच प्राण्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे म्हणतात काय?

3) नागपंचमीला सापाला दूध देऊन पुजायचे आणि बाकीचे बारा महिने तेरा काळ साप दिसला की त्याला ठेचायचे! हीच त्यांची सापाविषयी कृतज्ञता असते काय?

4) ब्राह्मणाला अन्नदान करायचे आणि गरिबांना भीक मागायला लावायचे! हीच त्यांची सभ्यता आहे काय?

5) वृक्षांची पूजा करणे असे हिंदुधर्म शिकवतो, असे तत्वज्ञान उगाळणारे हे विसरतात की, आपल्या भारतात सगळे डोंगर प्रचंड वृक्षतोडीमुळेच उघडेवाघडे झालेले आहेत. त्यामुळे मातीची धूप होऊन भूस्खलन होत आहे... दरडी कोसळत आहेत. हीच  त्यांची वृक्षांप्रती कृतज्ञता असते काय?

6) राखी पौर्णिमेला बहीण भावाला राखी बांधून भावाकडे रक्षण देण्याची मागणी करते. म्हणजे रक्षाबंधनाच्या सणातून स्त्री ही अबला आहे, ही समजूत घट्ट रुजवली जाते. आणि पुरुष मात्र इतर कोणाची तरी बहीण असलेल्या मुलीला दिसेल तिथे नजरेने आणि जमले तर शारीरिक बलात्कार करणे मर्दपणाचे लक्षण समजतात! म्हणूनच भारत देश हा जगभर बलात्काऱ्यांचा देश म्हणून प्रसिद्ध झाला आहे, त्याचे काय?

7) होळीच्या दिवशी शिवराळ भाषेत व्यक्त होणे आणि रंगपंचमीला रासायनिक रंग लावून लोकांना त्रास देणे, या प्रथेतून कोणते चांगले संस्कार निर्माण होतात?

8) दिवाळीला फटाके वाजवून प्रदूषण वाढवण्यातून कोणती संस्कृती दिसते?

9) गरबा खेळतांना मुलींसोबत किती छेडछाड करतांना कोणती संस्कृती दिसते?

10) नागा साधू नागडे फिरून आपल्या लिंगाचे दर्शन महिलांना देत असतात, यात कोणती संस्कृती दिसते?

11) सत्यनारायणाच्या कथेमध्ये सांगितल्याप्रमाणे लीलावतीने प्रसाद भक्षण केला नाही म्हणून तिच्या नवऱ्याची धनाधान्य आणि संपत्तीने भरलेली नौका बुडवणारा देव हा देव नसून राक्षसच असला पाहिजे. आणि प्रसाद खाल्ल्यावर बुडवलेली नौका वर आणून मेलेल्यांना जिवंत करणारा जादूगार असला पाहिजे. असल्या भंपक कठेवर विश्वास ठेवणारा धार्मिक बिनडोकच नाही काय?

अशी यादी आणखी वाढवता येईल. तूर्तास तथाकथित धार्मिकांचा दुटप्पीपणा कळण्यासाठी एवढी पुरे... ज्या सणांना हे लोक चांगल्या प्रथा समजतात त्या किती मागास विचारांच्या आणि गलिच्छतेने बरबटलेल्या आहेत, हे लक्षात त्यांच्या कसे येत नाही? रूढी आणि परंपरा या मानवी वर्तनातूनच निर्माण होत असतात, हेही त्यांच्या गावी नसते. धर्माचा बचाव करताना मोठ्या तोंडाने तत्त्वज्ञाचा आव आणायचा, पण प्रत्यक्ष वागताना मात्र हैवानियत दाखवायची; असा दांभिकपणा धर्मांध हिंदुत्ववादी धार्मिकांच्या नसानसात भरून राहिलेला आहे!🤛

नीतीमत्तेने वागण्यासाठी धर्माची आवश्यकता नसते: तर व्रत-वैकल्ये, कर्मकांडी कुळाचार, पूजाअर्चा या प्रथा धार्मिकतेमुळे आलेल्या असतात. नीतीने वागण्यासाठी विवेकी विचारांची गरज असते... तर व्रतवैकल्ये, कर्मकांडी कुलाचार, पुजाअर्चा ह्या रूढी-परंपरांमुळे येणाऱ्या प्रथा आहेत. तेव्हा धर्माभिमान्यांनी आपापल्या धर्मातील चार चांगल्या प्रथा धर्मचिकित्सकांना  सांगायला काय हरकत आहे? म्हणजे धर्मावर टीका करणाऱ्या पाखंडी लोकांना चोख उत्तर दिल्यासारखे होईल. तेव्हा धर्माभिमान्यांनी अशी हिम्मत दाखवावीच!👊JK

13) सजग आणि विचारी माणसे वास्तवापासून फारकत घेऊन जगू शकत नाहीत. पण भ्रमात रहाणाऱ्या अंधभक्तांच्या अंगाशी आले की, 'या ग्रुपमधील राजकीय पोस्ट भाजप, RSS विरोधीच का असतात?' असा  कातडीबचावू बालिश प्रश्न अंध नमोभक्त नेहमीच करत असतात. त्याचे कारण असे की, अंधभक्तांची भाजप आणि मोदींवर अंधश्रद्धा एवढी जबरदस्त आहे... त्यांचा खोटारडेपणा, त्यांची फेकूगिरी, त्यांची छद्म वैज्ञानिक बडबड, त्यांचा चुकीचा इतिहास सांगणे या सगळ्या चुकीच्या गोष्टीचेही जीव तोडून ते समर्थन करत असतात. तेव्हा आम्ही त्यांना फक्त सत्य परिस्थिती दाखवून त्यांच्या डोळ्यावर भाजप, RSS आणि मोदी-अंधश्रध्देची पडलेली झापडं दूर करायचा अल्पसा प्रयत्न करत असतो.

कारण अंधश्रद्धा ह्या फक्त देवाधर्माबद्दलच असतात असे नाही, तर त्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, छद्म वैज्ञानिक अशा अनेक प्रकारच्या असतात. पण ज्यांचा मेंदू संकुचित विचारांनी भरलेला आहे, त्यांची झेप नेहमी कुपमंडूक विचार करण्यापलीकडे जात नाहीत. कारण त्यांच्याकडे बहुश्रुत दृष्टिकोन नसतो. वाचन फक्त सोईचेच असते. त्यामुळे गैरसोईचे मुद्दे द्वेषी वाटणे स्वाभाविकच आहे. परिणामी द्वेष आणि चिकित्सा यातील फरक कळण्याएव्हढी त्यांची बुद्धी  प्रगल्भ झालेली नसते. एवंच या सगळ्या पोस्ट राजकीय अंधश्रद्धा दूर करणाऱ्या असल्यामुळे या ग्रुपच्या नावाला जागणाऱ्या आहेत. पण हे अंधभक्तांच्या पचनी पडणे कठीण!

*या आधीही कोणतंही सरकार असलं तरी चुकीच्या धोरणांवर टीका केलीच होती. वेळोवेळी विरोधही केला होता. कारण आम्ही अंधभक्तांसारखे त्यांच्या तारणहाराच्या चुकीच्या गोष्टींचे समर्थन करण्यात मग्न रहात नसून वास्तवाची जाणीव करून देऊन भ्रमातून बाहेर काढणे आमचे कर्तव्य समजतो.*

'तुम्ही अमुक सत्ताधीशाबाबतच का लिहिता?' हा भक्तांचा प्रश्न तुम्ही फलंदाजाकडेच चेंडू का टाकता असे गोलंदाजाला विचारण्याइतका बावळटपणाचा आहे. जो फलंदाजी करतोय त्यालाच गोलंदाजी केली जाणार! नॉन स्ट्राइकिंग एन्डला असलेल्याला गोलंदाजी कशी करणार? असले भक्तगणंगीछाप प्रश्न ज्यांच्या डोक्यात असतील त्यांनी बालीश प्रश्न विचारण्याआधी लक्षात घ्यावे की, 7 वर्षांपूर्वी हे भाजपेई काय बरळत होते आणि तेव्हा त्यांनी जिथे विरोध केला तेच त्यांना आम्ही आज दाखवून देत त्यांचेच दात त्यांच्या घशात घालत आहोत. असे करून आमची मोदी विरोधी टीका म्हणजे मोदींद्वेष वाटणाऱ्या मोदींबिंदू झालेल्या आणि मोदीभक्तीच्या अंधश्रद्धेच्या बुडालेल्यांना जागे करण्यासाठी असते. 

समजले?⚒️🛠️🔨JK

14) तुमच्या प्रश्नांच्या उत्तराबाबत म्हणाल तर ती पोस्टासंबंधी असतील तर नेहमीच आम्ही सडेतोडपणे आम्ही दिली आहेत. पण अंधभक्त म्हणातील तेच खरे संदर्भ आणि तीच खरी उत्तरे तर दुसऱ्याचे खोटे, असे सोईचे वागणे असते. यालाच दांभिकपणा म्हणतात. इथेही सोईचे तत्वज्ञान सांगून तोच दांभिकपणा करत अहात. असा दांभिकपणा अंधभक्तांच्या नसानसात भरला आहे. अंधभक्तांना कितीही योग्य शब्दात उत्तरे दिली तरी जोपर्यंत त्याच्या सोईचे विचार दिसत नाहीत तो पर्यंत ती उत्तरे त्यांना खोटीच वाटतात. जसे परीक्षेला एखाद्या प्रश्नाचे उत्तर आले नाही तर तो प्रश्नच परीक्षेत आला नव्हता असे म्हणून स्वतःचीच पाठ हात दुःखेपर्यत थोपटण्यासारखे आहे. असो. धर्माअंधतेपायी मेंदू गहाण ठेवलेल्या अल्पमती असलेल्यांचा हा अंगभूत गुणधर्म आहे. त्याला ते तरी काय करणार? बिच्चारे! 

👉 अंधभक्तांना ज्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाहीत तेव्हा ते प्रश्न उपस्थित करणाऱ्याच्या विश्वासार्हतेलाच हात घालतात वा भलताच प्रतिप्रश्न विचारून आपलेच काय ते खरे असे करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. बिच्चारे!

ज्यांना पोस्टच्या विषयावर योग्य शब्दात मुद्देसूद प्रतिवाद करता येत नसतो ते एक तर उठवळपणे थिल्लर खिल्ली उडवतात वा वैयक्तिक दोषारोप करत शाब्दीक गुद्दे मारून आपला कंड शमवून न्युनगंड झाकायचा केविलवाणा प्रयत्न करत असतात. आशा लोकांची कीव करून मी त्यांना अनुल्लेखाने मारत असतो. असो. समझने वालो को इशारा काफ़ि होता है। JK

15) ज्ञानेश्वरांना संन्याशाची पोरे म्हणून छळणारे ब्राह्मण! 

नामदेवांना पंजाबात परागंदा होण्यासाठी भाग पाडणारे ब्राह्मण! 

शिवाजी राजांचा राज्याभिषेक नाकारणारे देशद्रोही ब्राह्मण!

तुकारामांची गाथा इंद्रायणीत बुडवणारे ब्राह्मण! 

तसेच तुकाराम सदेह वैकुंठाला गेले अशी आवई उठवणारेही ब्राह्मणच! 

नामदेव, चोखामेळा इ बहुजन संतांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नाकारणारे जात्यांध्य ब्राह्मण! 

घटकंचुकीचा खेळ खेळणारे स्त्रीलंपट पेशवे ब्राह्मण!

आगरकरांची जिवंत प्रेतयात्रा काढणारे ब्राह्मण!

कुटुंब नियोजनाचा प्रसार करणाऱ्या र धो कर्वेना वेशागमनाला प्रोत्साहित करणारा म्हणून शिव्या देणारेही ब्राह्मण!

सावित्रीबाई फुलेंवर शेणगोळे फेकणारे ब्राह्मण!

महात्मा ज्योतिबा फुलेंवर मारेकरी धाडणारेही ब्राह्मणच!

राष्ट्रपिता महात्मा गांधींवर गोळी झाडणारा ब्राह्मण!

किती उच्च (की हुच्च) संस्कारी आहेत हे ब्राम्हण! 

तरीही म्हणे, असे हे कपट-कारस्थनी आणि भ्रष्ट ब्राह्मण हिंदू संस्कृतीचे रक्षणकर्ते आहेत! या सारखा मोठा विनोद नाही. अशा हूच्च ब्राह्मणांचा आजच्या हिंदुत्ववादी ब्राह्मणांनी कधीतरी निषेध केला आहे काय?🤔JK

16) धर्मांधांनो, मी कोणत्या धर्मात जन्मावे हे माझ्या हातात नव्हते. त्यामुळे मी हिंदू धर्मातील आईच्या पोटी जन्मलो.  लहानपणापासून हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा, कर्मकांड यांच्याशी मला जवळून परिचय झाला; आणि त्यामधील शोषणही कळले. म्हणून मला आमचा हिंदू धर्मच दिसतो, कारण हिंदू धर्मात हिंदूंचेच शोषण होते, इतर धर्मियांचे नाही. म्हणून विचारी हिंदूंनीच ह्या शोषण करणाऱ्या लबाड हिंदूत्ववाद्यांचा भांडाफोड करणे आवश्यक ठरते. 

मी जसा सज्ञान झालो आणि मला माझ्या हिंदू धर्मातील अंधश्रद्धांचा तिटकारा यायला लागला. ही संकल्पना माणसानेच निर्मिलेली आहे हे अगरकरांमुळे मला कळले. म्हणजे आकाशात असा देवबिव कोणी नसतो हे समजायला लागल्यापासून मी नास्तिकतेकडे वळलो... माझ्या वयाच्या अठराव्या वर्षापासून ते आज सत्तर वर्षापर्यंत मी नास्तिकच आहे आणि मरेपर्यंत नास्तिकच राहणार. कारण माझ्यावर भगतसिंगाच्या नास्तिकतेचा संस्कार झालेला आहे. मला हे चांगलेच कळले आहे की, नैतिकतेने वागण्यासाठी देवाधर्माची गरज लागत नाही; तर आपला विवेक तेवढा जागा ठेवावा लागतो.

दुसरे असे की तुम्ही आधी तुमच्याच घरातला कचरा साफ करणार की आपल्या घरातील कचऱ्यात तसेच लोळत राहून शेजाऱ्याच्या घरातला कचरा साफ करायला जाणार? तेव्हा मी माझ्याच धर्मातील बुरसटलेल्या विचारांचा कचरा साफ करणे आवश्यक ठरते. ज्यांना असे वाटत नाही त्यांना आपल्या घरातील घाण प्रिय आहे हेच सिद्ध होते. परिणामी त्यांचे मन धार्मिक अनाचाराच्या रोगराईने ग्रस्त झाले नसते तरच नवल! म्हणूनच अशी रोगराई नष्ट करण्याचे काम प्रत्येक विचारी माणसाला करायलाच हवे.

पण जसा मोदींच्या विरोधी बोलणारा मोदींद्वेषी आणि देशद्रोही ठरतोय तसा हिंदुधर्मातील कुप्रथा आणि बुरसटलेल्या विचारांवर बोलणारा हिंदुद्वेषी वा दुसऱ्या धर्माचा ठरवला जाणे हा तर मंबाजींच्या अवलादीचा थिल्लर आणि उठवळपणाच आहे. तुमच्यासारख्या कर्मकांडी हिंदुत्ववाद्यांनीच हिंदू धर्माला रसातळाला नेलेय. तेव्हा ज्यांना हिंदुधर्मात सुधारणा नको आहेत त्यांनी हिंदुधर्म सोडून चालते व्हावे. काय समजलेत?😡JK

17) अ) नुसतेच दोषारोप करण्यापेक्षा कृपया पोस्टमधील तुम्हाला वाटलेल्या चुकीच्या मुद्यांचे मुद्देसूद खंडन करून आपली वैचारिक पातळी दाखवावी. वाचाळ वटवट करण्यापलीकडे कसलाच अभ्यास नसल्यामुळे मुद्देसूद बोलता येत नाही म्हणून चडफडाटाने योग्य उत्तर देता आले नाही की, चुकीची वैयक्तिक शेरेबाजी करण्याची पळवाट काढणे हा तर अंधभक्तांचा अंगभूत गुणधर्म आहे. म्हणूनच 'नाचता येईना अंगण वाकडे.' ही मराठीतील म्हण आळशी अंधभक्तांना चपखल लागू पडते. कुवतच तोकडी त्याला ते तरी काय करणार? बिच्चारे! 

आ) धर्मान्ध नेहमीच त्यांच्या अकलेचे दिवाळे निघालेले असल्यामुळे पोस्टचे मुद्दे सोडून पोस्टकर्त्याच्या नावाचा अपभ्रंश करत त्यांच्या वाडवडिलांनी केलेले खानदानी घरंदाज असंस्कृत संस्कार उजागर करत असतात. अंधश्रध्देच्या गटारीतील रोगट जंतू शेवटी आपली खरी लायकी दाखवतात. 

इ) धर्मांधांना सत्य पचवता येत नसल्यामुळे परखड शब्द झोम्बतात. म्हणून ते त्यांना त्यांच्या पातळीतील शब्दकोशानुसार शिवराळ वाटणे स्वाभाविक आहे. धारदार  भाषा ही दांभिकांना बोचणारच. धारदार शब्दात लिहिणे म्हणजे असभ्यपणा करणे नव्हे, तर त्याला कानउघडणी करणे म्हणतात. म्हणून जेवढ्या चांगल्या शब्दात लिहिता येईल तेवढ्या चांगल्या शब्दात पण टोकदारपणे लिहिणे हे अंधभक्तांसारख्या शिवराळ भाषेत लिहिण्यापेक्षा केव्हाही चांगलेच. त्यामुळे लक्ष्यावर नेमका नेम साधता येतो. पण ज्यांना कटू सत्य पचवता येत नाही त्यांना हे कळणे कठीण! म्हणून ते लोकांनी चांगली भाषा वापरावी म्हणत शहाजोग सल्ले देत फिरतात. बिच्चारे कांगावखोर!!! 

ब) वि दा सावरकर 'विज्ञाननिष्ठ निबंध' या पुस्तकात म्हणतात... आपल्या हिंदुसमाजातील स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुध्दिबंदी, रोटीबंदीप्रभृति अनेक धार्मिक म्हणून मानल्या गेलेल्या रुढींपायी आज आपल्या राष्ट्राची किती अपरिमित हानि होत आहे ते दाखवून त्याचे आणि अशाच विविध प्रकारच्या धार्मिक छापाच्या भाबडे रणाचें अच्चाटण करण्यासाठी झटत असता आम्हांस असे आढळून आले, की अनेक सनातनी मंडळींकडून आमच्या सुधारक मंडळींवर जे स्थिरटकीय (स्टीरिओ टाअिण्ड) ठाम आक्षेप घेतले जातात, त्यात 'लोकांच्या धर्म भावना तुमच्या या प्रचारामुळे दुखतात; म्हणून तुमच्या ह्या सुधारणा गर्हणीय होत!' हा एक आक्षेप नेहमी येतो. त्या सुधारणा राष्ट्रहितास आवश्यक आहेत की नाहीत हा प्रश्नच जणू काय विचारात घेण्याचे कारण नाही.

तीच गोष्ट धर्मभावनांची. धर्म असेल तर त्याविषयींच्या सद्भावना दुखवू नयेत हे ठीकच आहे; पण *जर एखादा अधर्माला धर्म समजत असेल आणि जर त्या अधर्माविषयीच्या त्याच्या भावना अितक्या धर्मवेड्या असतील, की आमच्या सभ्य नि सदिच्छ अपदेशानेही त्या दुखावतील, तर अशा प्रसंगी त्या अधर्मभावना दुखविणेच खरें धर्मकृत्य ठरतें, अधर्मभावना तशा अर्थी दुखविल्यावाचून गत्यंतरच उरत नाही.* 

सावाला चोराच्या तडाख्यातून सोडविताना चोराच्या भावना दुखतात; मरू द्या त्या सावाला, असे म्हणावयाचें की काय? आपली आई वाताच्या झटक्यात खिडकीतून खड्डयात उडी मारू लागली तर तशा प्रसंगी तिच्या भावना कितीही दुखावल्या तरी त्या दुखवून तिला तशीं प्राणघातक उडी न मारू देणें हेच खऱ्या मातृभक्तीचे कर्तव्य होय, खरा पुत्र धर्म होय. तीच गोष्ट राष्ट्रभक्तीची आणि स्वधर्मभक्तीची होय. राष्ट्रहितास अत्यंत हानिकारक अशा ज्या ज्या धार्मिक रूढि तुम्हांस वा आम्हांस लोकविकृष्ट वाटतात त्यांचा त्यांचा उच्छेद करण्यासाठी झटणे हेच तुमचें वा आमचें राष्ट्रीय कर्तव्य होय.

क) आपल्या कठोर शब्दांच्या प्रहारांनी लोकांच्या भावना दुखावतात, असा विचार करून जर बोटचेपे धोरण आगरकर, प्रबोधनकार ठाकरे, महात्मा फुले, विज्ञाननिष्ठ सावरकर, महर्षी शिंदे, शाहू महाराज, गाडगेबाबा, बाबासाहेव आंबेडकर, र धो कर्वे एवढेच काय तर विवेकानंदही यांच्यासारख्या धर्म आणि समाजसुधारकांनी स्वीकारले असते तर आज महाराष्ट्र एवढा बदललेला दिसलाच नसता. त्यांनी सतत कठोर शब्दात आणि जहाल भाषेत धर्मांधांच्या आणि अंधभक्तांच्या भावना दुखावल्या म्हणूनच शंभर वर्षांनी आज समाजात बदल झालेला दिसतो आहे. मी त्यांच्या पासंगालाही पुरणारा नसलो तरी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून परखड विचार मांडत असतो. तरीही माझे शब्द त्यामानाने कमी जहालच असतात. तेव्हा 'तुमच्या कठोर शब्दांनी बहुसंख्य लोकांच्या म्हणजे अंधभक्तांच्या भावना दुखावतात आणि ते आमच्यापासून दुरावतात' असे म्हणणार्‍या बोटचेप्या तथाकथित सुधारकांनी भक्तांनी आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून स्वीकारलेले लाळघोटे धोरण आम्हाला ठेवणे शक्य नाही. ते तुमचे तुम्हाला लखलाभ असो.JK

ड) एकतर वैयक्तिक प्रश्नाना आम्ही उत्तरे देत नाही, पण इथे प्रश्न सामाजिक विचारांचा असल्यामुळे मी उत्तर देतोय...

मी स्वतः जन्माने मारवाडी, माझी बायको देशस्थ ब्राह्मण, मुलाची बायको मराठा, मुलीचा नवरा बौद्ध म्हणजे पूर्वीचा महार, पुतण्याची बायको बंगाली, पुतणीचा नवरा पंजाबी, एका भाच्याची बायको गुजराथी तर दुसऱ्या भाच्याची बिहारी. असे आमच्या घरातच आंतरभराती संमेलन भरलेले आहे.

तेव्हा आम्ही नुसते हवेत तत्वाच्या गप्पा मारून उंटावरून शेळ्या हाकणारे दांभिक नाही आहोत हे लक्षात आले असेलच. म्हणून नेहमी समोरच्याला आव्हान देताना आधी त्याची माहिती काढावी आणि मग बरळावे. नाहीतर तुमच्यासारखे तोंडघशी पडायला होते. कळले?

18) अ) फेसबुक वरील हिंदुत्ववाद्यांच्या चर्चा, पोस्ट किंवा comments मध्ये खालील गुण आढळतात:

१. विनोद बुद्धीचा अभाव.(सर्वात अधिक).

२. स्वकेंद्रित पणा.

३. माहिती/अभ्यासावर वर आधारीत मतांऐवजी भावनांवर आधारित मते.

४. पूर्वग्रह.

५. अभ्यासाअभावी विलक्षण ठाम मते.

६. पोस्ट काय आहे ह्या पेक्षा ती कोणी लिहिली आहे ह्याला महत्व देण्याची चुकीची मनोवृत्ती.

७. सांगितले काय आहे? ह्या पेक्षा कसे सांगितले आहे, इकडे बघण्याची कोती मनोवृत्ती.

बिच्चारे! संघाच्या बौद्धिक वर्गांमध्ये बुद्धीची धार बोथट केल्यामुळे वरील सगळे गुण हिंदुत्ववाद्यांमध्ये ठासून भरलेले आहेत. अरेरे!😉

ब) पोस्ट मध्ये कुठल्याही धर्माचे नाव घेतलेले नसतांनाही काही विद्वानांना हिंदूधर्माचीच आठवण होते. हे झाले 'चोराच्या मनात चांदणं', या म्हणीसारखे. मग ते समर्थनासाठी लोकांना दोष देऊन तुम्ही कसे चुकीचे आहात हे शहाजोगपणे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. यावरून शब्दांचे अवडंबर माजवणाऱ्यांना rational thinking करता येत नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले.

क) वाटलंच होतं अशी बावळट प्रतिक्रिया येईल म्हणून! महाशय, रूढ अर्थाचे शब्द वापरावेच लागतात. कारण ते शब्द योग्य तो अर्थ ध्वनित करून सामान्यजनांना विचार समजण्यासाठी मदत करतात. त्यांचा कुणाच्या मानण्या न मानण्याशी संबंध नसतो. पण ज्यांची अक्कल संकुचित असते ते लोकांवर कोणते शब्द वापरायचे आणि कोणते नाही यावर दबाव आणू पहातात. जशी काय भाषा यांच्या 'बापाची पेंड' आहे.(हा वाक्प्रचार आहे, उद्धटपणा नव्हे.) उद्या तुम्ही म्हणाल की, तुम्ही दैव, नशीब, प्राक्तन मानत नाही तर ते शब्द वापरण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे जेवढे हास्यास्पद आहे तेवढीच हास्यास्पद तुमची प्रतिक्रिया. तेव्हा आम्ही शब्द विचारपूर्वकच वापरतो. पण  ज्यांना त्यात विवेक दिसत नाही तो त्यांच्या बौद्धिक कुवतीचा प्रश्न आहे. असो.

19) अ) मोदींच्या विरोधात बोलले की, 'मोदीद्वेषी'... 

भाजपच्या विरोधात बोलले की, 'देशद्रोही'... 

हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात बोलले की, 'हिंदुद्वेषी'...

सावरकरांच्या विरोधात बोलले की, 'काँग्रेसी गुलाम'...

संघोट्यांच्या विरोधात बोलले की, 'कम्युनिस्ट, नक्षलवादी'...

आंबेडकरवाद्यांच्या विरोधात बोलले की 'छुपा संघी'...

हिंदू धर्माच्या विरोधात बोलले की, 'मुस्लिम धार्जिणे'...

अशाप्रकारे सगळ्या अडचणीच्या प्रश्नांसाठी अशी सुलभ सोपी बालबुद्धीची उत्तरे अंधभक्तांनी रूढ केलेली आहेत.

गुडघ्यात मेंदू जो आहे त्यांच्या...🙃JK

ब) जात्यधांना वा धर्मांधांना, अभ्यासाचे वावडे असते. हे सगळे व्हाट्सअप विद्यापीठाचे आभासी पदवीधर असतात. त्यामुळे त्यांना लेखकाविषयी – तो किती का विद्वान असेना त्याच्याबद्दल – काहीही माहीत नसते. ते मूर्ख फक्त आडनावावरून जात ओळखण्यात पटाईत असतात. त्यांच्यासाठी माझे आवडीची चारोळी आहे... 

कसलाही अभ्यास नसतो कवडीचा 

तरी वाचाळ वटवट करतो वाचावचा

गलिच्छ शब्दांना पिंकतो पचापचा

अंधभक्त असतो असा दीड दमडीचा!🤛JK

20)  अंधभक्त धर्मअंधांच्या लेखी जो जो हिंदू धर्मावर टीका करतो तो कधी नक्षली-कम्युनिस्ट, तर कधी मुस्लिम तर कधी ख्रिस्ती, आणि तेही पुरेसे नसेल तर शेवटी बौद्ध म्हणून आपली संकुचित वृत्ती प्रदर्शित करून हसे करून घेत असतात. याच न्यायाने मग हिंदू धर्मावर टीकेचे मोहोळ उठवणारे आगरकर, प्रबोधनकार ठाकरे, विवेकानंद, लोकहितवादी, शाहू महाराज, महात्मा फुले, विज्ञाननिष्ठ सावरकर इ. धर्मसुधारकही हिंदुद्वेषीच होते म्हणायला हवेत.

ज्या अर्थी तुम्ही आमच्या लिखाणावरून आमची जात आणि धर्म ठरावताय यावरून हेच सिद्ध होते की, तुम्ही आणि तुमच्यासारखे इतर लोक हेच खरे जत्यांध आणि धर्मान्ध असून देशात लोकांनी अंधश्रद्धच राहावे म्हणून जीवाचे रान करत आहेत. अशाच तुमच्यासारख्या धर्मांध लोकांमुळे देश मागास राहिला आहे.

*आम्ही उपरोल्लेखित महानुभवांच्या पासंगला पूरणारे नसलो तरी त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकून प्रबोधन करण्याचा खारीचा वाटा उचलत आहोत, आणि लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत. याचा आम्हास धर्मांधांसारखा वृथा अहंकार नसून सार्थ अभिमान आहे. काय समजलेत!* JK

👊 जोपर्यंत अंधभक्त तेच तेच चुकीचे कर्मकांड आणि परंपरा पाळत राहातील तोपर्यंत आम्हालाही परत परत तेच तेच सांगावे लागेल. त्याला आमचा नाईलाज आहे. मग भलेही तुमच्यासारख्या टीनपाटानी त्याला कॉपी-पेस्ट म्हणून हिणवले वा हिंदुद्वेष समजले तरी आमच्यालेखी अशा धर्मांधांची किंमत शून्यच. 

21)  'आम्ही टॅक्स भरतो तो फुकाट्यांना पोसायला नाही', अशा गमजा मारणाऱ्या निर्लज्ज जात्यंधांनो, शिक्षण आणि आरोग्य सेवा फुकट देणे हे सरकारचे कर्तव्यच आहे. सरकार काही उपकार करत नसते. कारण ती देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांमध्ये केलेली सरकारची गुंतवणूक असते. टॅक्स ही चॅरिटी नाही. तर ती सक्तीची वसुली आहे. आणि तिचा उपयोग योग्य गोष्टींसाठी व्हावा ही आपण मतदार म्हणून निवडलेल्या सरकारच्या धोरणावर देखरेख करण्याचा प्रश्न आहे. तेव्हा 'उचलली जीभ लावली टाळ्याला' या प्रकारची वाचाळ वटवट बंद करा.😡JK

22) भ्रामक युक्तीवादावर चटकन विश्वास का बसतो?(^m^)(^j^)(मनोगते)

‘इतके सगळे लोक वापरतात, इतक्या पिढ्या वापरतात, ते काही मूर्ख आहेत का?', असा भ्रामक युक्तिवाद लोकांना पटतो. 'लोकप्रीयता आणि प्राचीनत्व, हीच सिद्धता... हा एक लोकप्रीय तर्कदोष आहे. काळाच्या विशाल पटलावर अनेक कल्पना, अनेक युक्तिवाद, अनेक तथाकथित सत्ये ही लोकप्रिय (उदा. नाळेला शेण लावणे), लोकमान्य (उदा. मंत्राने सापाचे विष उतरवणे) इतकंच काय जगन्मान्यसुद्धा (उदा. रजस्वला अपवित्र असते) होती/आहेत. मात्र वैज्ञानिक निकषांवर घासून पाहता अशा कित्येक संकल्पना त्याज्य ठरल्या. थोडक्यात 'जुनी' पद्धत, लोकमान्यता, हा कोणत्याही प्रकारे शास्त्रीयत्वाचा पुरावा होत नाही.

पण मुळात इतक्या अविश्वसनीय गोष्टींवर लोक विश्वास ठेवतातच का? याची अनेक कारणे आहेत. माणसाचा मेंदू हा तर्कशुद्ध विचार करण्यासाठी मुळी रचलेलाच नाही. आदिमानवाच्या अवस्थेत उत्क्रांत होत असतांना आफ्रिकेच्या जंगलात भटक्या अवस्थेत निर्माण झालेला मेंदू, आधुनिक युगात वेळोवेळी आपली पुराणकालीनता दाखवून देत असतो. प्राचीन काळी स्वतःचा आणि आसपासच्या व्यक्तींचा अनुभव हेच ज्ञान आणि हाच पुरावा होता. अमुक फळ खाऊ नकोस ते विषारी आहे म्हटल्यावर विश्वास ठेवणे किंवा विषाची परीक्षा पाहणे, असे दोनच पर्याय होते. तेव्हा अनुभवी मंडळींचा सल्ला शिरसावंद्य मानणे हा जगणं सुलभ करणारा संस्कार होता. झाडीत कुठे सावली हलली, तर अंधारातले अंधुक ठिपके जोडून, झटकन तिथे वाघ आहे वा नाही हा निर्णय करायला आपला मेंदू उत्क्रांत झाला आहे. जवळ जाऊन खात्री करू पहाणं म्हणजे जीवाशी खेळ होता. सावधपणे लांबून निघून जाणं म्हणजे जीव वाचवणं होतं. असे झटपट निर्णय घेण्याने, गडबडीने माहितीचे ठिपके जोडल्याने, गफलती होऊ शकतात. वाघ नसताना तो आहे असं वाटू शकतं. पण या गफलतींची किंमत फारच किरकोळ. तेव्हा ही झटपट विचारपद्धती उत्क्रांत होऊन, त्यातल्या गफलतींसकट, आपल्या मेंदूत कोरली गेलेली आहे.

आधुनिक जगात विचार करण्याची ही पद्धत लोढणं बनली आहे. आजही विश्लेषणाऐवजी, गोष्टीरूप पुरावा आपल्याला अधिक भावतो. अर्धवट पुराव्यांचे ठिपके जोडून आजही आपण नकळतपणे चित्र पूर्ण करत असतो. कारण प्रतिक्रियाही झटपट होते, तर प्रतिसादाला मात्र वेळ लागतो. म्हणून आजही माणसाच्या मेंदूवर बुद्धीपेक्षा भावनांचा अंमल सहज चढतो. बुद्धीने मेंदू साधकबाधक विचार करून उत्तर शोधून काढेपर्यंत भावनेने त्याचे उत्तर शोधले असते. ह्याच कारणामुळे लोकांचा भ्रामक गोष्टींवर चटकन विश्वास बसतो.

विज्ञान म्हणजे काय तर निरीक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती. (Knowledge ascertained by observations, critically tested, systematized & brought under general principles) वेगळया शब्दात सांगायचं म्हणजे, तर्कसुंसगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञान वाढीला लागतं.

निरीक्षण करून, उपलब्ध ज्ञान वापरून, तर्कानं त्या घटनेमागचं कारण शोधायला हवं, ते योग्य आहे की नाही हे पडताळण्यासाठी पुरावे मिळवायला हवेत, आणि ते पुरावेही तपासून बघायला हवेत. ही सत्यशोधनाची वृत्ती म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन ही वैज्ञानिक विचारशृंखला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाने निसर्गातील घटितांमागील इंगित शोधण्याची पद्धत! बोल एवढा सगळा विचार सामान्य माणसे नेहमीच करत नाहीत आणि म्हणून आपल्या सोयीचे अर्थ काढून ते देवा धर्मातील भ्रामक संकल्पनांना बळी पडतात.

23) a) अंधभक्तांची समाजात आपलेच म्हणणे दामटवत पसरवण्याची पद्धत...

सर्व प्रथम धर्मअंध आपल्या विरोधी विचार करणाऱ्याला शाब्दिक विरोध करतात. त्याने तो बधला नाही की मग हमरीतुमरीवर येतात. त्यालाही तो घाबरला नाही तर त्याचे चारित्र्यहनन करतात. तरीही त्याचे विचार लोक स्वीकारत आहेत असे दिसले की मग त्यालाच संपवून टाकतात. त्या नंतरही त्याचे विचार जिवंत राहिले आणि जनमानसात पसरत राहिले की मग धार्मअंधांच्या दुटप्पी वागणूकीनुसासर त्यांचे गोडवे गायला लागतात. जसे बुद्धाला 9 वा अवतार मानून हिंदू धर्मियांनी आपलेसे केले. हीच त्यांची हताशा त्यांना सैरभैर करते. त्या अस्वस्थतेतून ते माणसांचे खून करायला उद्युक्त होतात. हाच खरा इतिहास आहे. ✍️ JK

b) *हल्ला सनातन्यांचा*! (^m^)(^j^)(मनोगते)

*१)सनातन्यांचा पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.* 

*लोक शिकलेच नाहीत, खरी माहितीच जर त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही, काही जाणंच आली नाही तर कशाला जनता उठाव करतेय? म्हणून सनातन्यांचा पहिला हल्ला हा शिक्षणावर/ज्ञानावर असतो.* मग जनतेला आपल्या इच्छेप्रमाणे वापरून घ्यायला सोपं जातं. 

*२)सनातन्यांचा दुसरा हल्ला रोजगारावर असतो, कुटुंबाला खायलाच काही मिळाले नाही तर माणूस जिथे पैसा मिळेल तिकडे धावतो. मग भले ते काम स्वतःच्या विचारांविरुद्ध असो कि अनैतिक असो.*

*३)सनातन्यांचा तिसरा हल्ला हा इतिहासावर असतो. इतिहासातील स्वतःला अनुरूप बदल हे जनतेला खोट्या अभिमानाच्या गुंगीत ठेवण्यास उपयोगी पडतात.*

*४)सनातन्यांचा चौथा हल्ला हा मानवी मेंदूवर असतो. खोट्या कथा पेरणे, त्याचे स्तोम माजवणे, उदात्तीकरण करणे. खोट्या कथांना आधार म्हणून जनतेच्या मनातील प्रतीकांचा (उदा. जात, धर्म, राष्ट्र, सैनिक, दैवत, शिवाजी, क्रांतिकारक इ.) वापर आणि हे सर्व करत असताना आपली प्रतिमा डागाळू नये म्हणून वरून प्रामाणिक, भोळेपणा किंवा सात्त्विकतेचा आव.* 

*५)सनातन्यांचा पाचवा हल्ला हा विरोधकांवर असतो. कारण त्यांच्यात भविष्याचा वेध घेण्याची उपजत शक्ती असल्याने सनातनी काय करतात तर पुढे त्रास होईल अशा व्यक्तीची बदनामी ते आजपासून सुरु करतात. ज्या व्यक्तीची बदनामी करायची आहे त्याच्या बदनामीसाठी एखादा क्षुल्लक किंवा खोटा आरोप शोधून काढतात (तो प्रत्येकातच सापडतो) त्या व्यक्तीच्या बाकी अनेक कार्याकडे दुर्लक्ष केले जाते, आरोपाला योग्य ठरतील असे आणखी दहा खोटे आरोप जोडले जातात आणि बदनामी सतत सुरुच राहते. आपापल्या कामात मग्न असलेली भोळी जनता तेच खरे मानून बसते. सत्य समजून घ्यायला त्यांना कुठे वेळ आहे?*

*हे सगळे हल्ले अपयशी ठरले की मग सनातन्यांचा शेवटचा हल्ला म्हणजे माघार घेऊन आम्ही तुमचेच, आम्ही किती भोळे हा जप ते सुरु ठेवतात तो पुन्हा योग्य वेळ येईपर्यंत.*

तेव्हा मित्रांनो, सनातन्यांचे हे मेंदू नासवण्याचे कपट कारस्थान वेळीच ओळखा अन्यथा आपला देश पुन्हा एकदा मध्ययुगात लोटला जाईल. शिक्षण घेऊन विचारी व्हा... वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारून अंधश्रद्धा, देवाधर्माच्या नावाखाली चालणारी कर्मकांडे यांना थारा देऊ नका...

c) विज्ञान-तंत्रज्ञान भौतिक घटनांची घटीते असतात, म्हणून ते तठस्थ असते. त्याला कुठलेही मानवी गुण लागू पडत नाहीत. त्या अर्थाने विज्ञान-तंत्रज्ञानाला भावना नसतात. विज्ञान तंत्रज्ञानाला दुधारी शस्त्र म्हणतात त्याचे कारण त्याचा वापर कसा करावा हे माणसाच्या विचारसरणीवर अवलंबून असते. वैज्ञानिक दृष्टीकोन असलेला माणूस त्याचा विधायक कामासाठी वापर करतो. पण ज्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नाही तो मात्र विज्ञानाचा स्वार्थासाठी उपयोग करतो... म्हणजेच विघातक उपयोग करतो. म्हणून विज्ञान सुख, समाधान, मानसिक शांती देऊ शकत नाही अशी अज्ञानी मुक्ताफळे उधळली जातात. विज्ञानाच्या दुरुपयोगाची कटू फळे आज आपण पर्यावरणाच्या ऱ्हासाने पाहत आहोतच. 

तेव्हा दोष द्यायचा असेल तर विज्ञानाला किंवा वैज्ञानिक दृष्टिकोनाला नाही; तर विज्ञानाचा चुकीचा उपयोग करणाऱ्या माणसालाच द्यायला हवा. स्व-संस्कृतीचा अभिमान शिरजोर झाला की, ज्ञानालाच नव्हे तर आकलनालाही मर्यादा येतात.🤦JK

24)  आम्ही जेव्हा धर्मसुधारणेच्या बाबत आमचे विचार मांडतो तेव्हा अनेकदा अंधभक्त हा प्रश्न विचारतात की तुम्ही तुमच्या घरातल्या किती लोकांचे विचार बदलले आहेत. वरवर पाहता हा प्रश्न अगदी बिनतोड वाटतो, पण विचार केल्यावर त्यातील फोलपणा सिद्ध होतो. कसा तो खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल...

यासंदर्भात मला ल. रा. पागारकरांना आगरकरांनी सांगितलेली एक गोष्ट आठवते. आगरकर पांगारकरांचे शिक्षक होते. एक दिवशी वर्गात पांगारकरांनी आगरकरांना प्रश्न विचारला, "सर तुम्हाला एक प्रश्न विचारू काय?" 

आगरकर म्हणाले, "विचार की, त्यात परवानगीची काय गरज?" 

पांगारकर म्हणाले, "काल श्रीमती आगरकरांना मी देवळात नाकदुऱ्या काढताना पाहिले." 

आगरकर म्हणाले, "मग?" 

पांगारकर म्हणाले, "नाही, पण सर तुम्ही देव मानत नाही ना." 

त्यावर आगरकर म्हणाले, "अरे मी म्हणजे माझी बायको नाही ना." (म्हणजे तिला तिचे स्वातंत्र्य आहे.) 

याचा मतितार्थ असा की, देवाधर्मावर टीका करणारे जर स्त्रियांना गुलाम समजत नसतील तर ते त्यांच्यावर दबाव आणू शकत नाहीत. ते समजावू मात्र शकतात, नव्हे ते त्यांचे कर्तव्यच आहे. त्याप्रमाणे वागणे न वागणे हे त्या व्यक्तीच्या मनावर अवलंबून आहे. कारण ते त्या व्यक्तीचे स्वातंत्र्य आहे असे ते मानतात. म्हणूनच सुधारक कधीही परंपरावाद्यांसारखी दादागिरीची भाषा करत नाहीत, तर लोकांना प्रथा परंपरेतील चुकीच्या गोष्टी काय आहेत ते समजावून देण्याच्या प्रयत्न करतात.

माझ्याकडे जेव्हा मी नास्तिक्याकडे वळत होतो आणि घरात कर्मकांडाच्या विरोधात बोलत होतो तेव्हा माझे आई-वडील म्हणाले की, 'तू आता मोठा झाला आहेस. तुझे विचार तुला कळतात, पण आमच्या लहानपणापासून हे आमच्यावर असेच संस्कार झाले आहेत. त्यामुळे आम्ही काही आता बदलू शकत नाही. तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्य म्हणून तू तुझा कसाही वागायला मुक्त आहेस.' याचपद्धतीने मीही मग ठरवले की, त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणून तेही त्यांच्या पद्धतीने जायला मुक्त आहेत. ह्यात मी त्यांना नास्तिक बनवू शकलो नाही याचे मला दुःख वाटत नाही.

मुळात विवेकवादी नास्तिक होण्याची प्रक्रिया ही एक वेळ घेणारी प्रक्रिया आहे. कारण लहानपणापासून आपण ज्या धर्मात जन्मलो आहोत त्याचे संस्कार आपले आई-वडील सतत करत असतात, आणि लहानपणी झालेले संस्कार जोपर्यंत तुम्ही स्वतः विचार करून... स्वतःशी झगडून बदलत नाही तोपर्यंत ते बदलणे कठीण! पण अशाप्रकारे विचार करणारी किती मंडळी असतात? समाजात चालत आलेल्या रीतीरीवाजाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी अंगी धाडस लागते. असे धाडस सगळ्यांच्याच खरे असते असे नाही. असे बरेच लोक असतात की, ज्यांना समाजातील घातक रूढी-परंपरा आवडत नाहीत. पण त्याविरोधात बोलायला त्यांची जीभ रेटत नाही. कारण समाजाच्या विरोधात जायचे धाडस नसते. त्यापेक्षा 'यामुळे आपले काही नुकसान होत नाही ना' असा कातडीबचाऊ विचार करून ते गप्प राहणे पसंत करतात. सगळ्यांनाच असे गप्प राहणे जमत नाही, म्हणून ते तेवढे बदलतात. त्यांच्या घरच्यांनीही त्यांच्यामुळे बदलावे अशी अपेक्षा करणे गैर आहे. 

एवंच आगरकर आपल्या बायकोचा देवभोळेपणा कमी करू शकले नाहीत, म्हणून आगरकरांचा विवेकवाद खोटा ठरत नाही की, नरहर कुरुंदकरांनी आपल्या बायकोच्या समाधानासाठी  मुलाची मुंज केली, म्हणून त्‍यांचा विवेकवादही कमअस्सल ठरत नाही. त्या परिस्थितीत त्यांनी त्यांच्या परीने जेवढे प्रयत्न करायचे ते केलेलेच असतात, पण ते व्यक्तिस्वातंत्र्य मानतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे त्यांना बोल लावणे चुकीचे आहे, असे मला वाटते. JK

25) अखंड हिंदुस्थानात फसवे स्वप्न–जेट जगदीश

मुळात भारत हा अखंड हिंदुस्तान कधी नव्हताच मुळी. वेगवेगळ्या सुमारे 576 संस्थानिकांची वेगवेगळी राज्ये होती. त्याला हे हिंदुत्ववादी बळेबळे अखंड हिंदुस्थान म्हणतायेत! ह्यासारखा मोठा विनोद नाही.😂

त्यातल्या त्यात मोगल काळामध्ये आजच्या भारत देशातील बहुतांश प्रदेशावर मोगलांनी एकछत्री अंमल केला. त्यानंतर इंग्रजांनी आजचा भारत आपल्या अंमलाखाली आणून देश म्हणून निर्माण केला. हा खरा इतिहास आहे. 

या हिंदुत्ववाद्यांना अखंड हिंदुस्तान हवा आहे; पण कसा... तर काश्मीर हवा, पण काश्मीमधील मुसलमान नकोत. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान येथील फक्त जमीन हवी; पण तेथील मुस्लिम माणसे नकोत. असा कधी अखंड भारत होऊ शकतो काय? भारतातील 14 टक्के मुसलमानांना घाबरून आजही 78 टक्के हिंदू 'खतरेमे आहेत' म्हणून कोकलतात. मग या सगळ्या देशांतील मुस्लीम संख्या वाढून त्यांची टक्केवारी वाढली तर हिंदुत्ववाद्यांना चालेल काय? 

खरे पहाता, या मुस्लिमद्वेष्ट्या हिंदुत्ववाद्यांना अखंड हिंदुस्थानाचा जप करत देशाचे शतखंडित तुकडे करायचे आहेत. बहुजन जनतेला देवाधर्माच्या भयगंडाखाली अंधश्रद्धेच्या आणि दरिद्रयाच्या खाईत लोटून स्वार्थासाठी उच्च वर्णीयांचे वर्चस्व असलेली सत्ता संपादन करायची आहे. हे त्यांच्या अखंड हिंदुस्थानाच्या जपमाळेमागील इंगित आहे.

तेव्हा बहुजनांनो, जागे व्हा... अजूनही वेळ गेलेली नाही. नाहीतर तुम्ही या दांभिक हिंदुत्ववाद्यांच्या हातचे बाहुले झालेच म्हणून समजा! तेव्हा मात्र वेळ निघून गेलेली असेल.😎

26) a) कोणताही विचार हा बहुतांश समाजाचे चित्र प्रकट करणारा असतो. त्याचा अर्थ सरसकट समाज वाईट असतो असा होत नाही. कारण यात अपवाद असतातच, पण मतलबी जात्यंध मात्र अशा अपवादांचा आधार घेऊन ब्राह्मणांनीच महाराष्ट्रात सुधारणा घडवून आणल्या असे म्हणत आम्ही कसे स्वच्छ आणि चांगले आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न. यावरून असा युक्तिवाद करणारे किती जात्यंध आहे हेच सिद्ध होते. कारण ते माणसाला माणूस म्हणून ओळखण्याऐवजी त्याच्या जातीला महत्व देऊन त्याला ओळखत असतात. अशा नतद्रष्ट लोकांमुळेच आज समाजात मोठ्या प्रमाणात माणसामाणसात विसंवादाची दरी वाढलेली आहे.

प्रत्येक वेळी परिस्थिती अंगावर उलटणार असे दिसले की, हेच आजचे जात्यंध ब्राम्हण सावाचा आव आणत तत्वज्ञ बनतात आणि आणि आम्हीच काय तो पुरोगामीत्वाचा झेंडा फडकवला मानभावीपणे मोठ्या तोंडाने बरळत असतात. पुनःपुन्हा आगरकर, रानडे, गोखले, टिळक, साने गुरुजी, कर्वे, दाभोळकर, बाबा आमटे या त्याच त्या ठराविक सुधारणावादी अपवादांची उदाहरणे देऊन समाजातील दाहक वास्तवता नाकारतात. खरे तर या उपरोल्लेखित अपवादांच्या सुधारकी विचारांना साथ देत नथु(ह)रामी-खोले आणि कुटील मंबाजी भाटिय नीच वृत्ती नष्ट करणे हेच सर्वसामान्य ब्राह्मणांचे काम असले पाहिजे. पण या दाहक वास्तवाला बगल देणे हा तर स्वतःची जात श्रेष्ठ समजणाऱ्या जात्यंधांचा कातडीबचावू हातखंडा खेळ आहे. म्हणून अपवादांची उदाहरणे देणारे ब्राह्मण हे भ्याड शिखंडीच्या जमातीचे आहेत.🤛JK

b) प्रत्येक काळातील धर्मांधांना सुधारक धर्मद्रोहीच वाटत होते. म्हणून त्यांनी अगरकरांची जिवंत प्रेतयात्रा काढली, राजाराम मोहन रॉयना हिंदुद्वेषी ठरवले तर संतती नियमनाचा प्रसार करणाऱ्या र. धो. कर्व्यांना वेश्या गमनाला प्रोत्साहन देणारा म्हटले. संत तुकारामांना धर्मद्रोही ठरवून त्रास दिला होता... त्यांचा खून केला(?), सावित्रीबाईंना धर्मबुडवी म्हणले होते. एकूण काय तर धर्मान्ध स्वतः काही करत नाहीत मात्र अंधश्रध्देच्या गटारात लोळत कोणत्याही काळातील सुधारकांच विकृतपणे विरोधच करतात. धर्मांधतेपायी डोके गहाण ठेवल्यावर असेच होणार, हे सुधारकांना माहीत असते. 

ज्या काळात समाजात सर्वसामान्यांकडून जातीयता कठोरपणे अंमलात आणली जात होती त्या दोन-चारशे वर्षापूर्वीचे सोडा; पण आजच्या युगात स्वातंत्र्यता, समता, बंधुता आणि न्याय ही चतुःसूत्री संविधानाने प्रत्येक नागरिकाला बहाल केल्यानंतरही नथुराम-पूनम पांडे प्रवृत्ती आणि खोले बाईंची वृत्तीही जिवंत आहे. त्यांच्या या नीच कृत्याचे समर्थन करणारे आणि टाळ्या वाजवणारे ब्राह्मणच किंवा ब्राह्मणाच्या वळचणीला गेलेले आणि खुनी नथुराम गोडसे देऊळ बांधणारे असे सगळे ब्राह्मणी वृत्तीचे लोक असतात. म्हणजे ती वृत्ती अपवाद नसून समाजातील सर्वसामान्य ब्राह्मणांची वृत्ती आहे, असे म्हणणे भाग आहे. म्हणूनच या प्रवृत्तीचे लोग समस्त ब्राम्हण समाजाचे हलकट प्रतिनिधी ठरतात. 

c) हिंदूधर्म ही काही कोणाची खाजगी मालमत्ता नाही. आमचा धर्म आम्हाला स्वच्छ करायला कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही . सुधारणा होतच राहतील , नव्हे कराव्याच लागतील . धर्माच्या ठेकेदारांना जर हे चालत नसेल तर त्यांनी हिंदूधर्मातून चालते व्हावे . येथे राहयचे असेल तर कुणालाही न फसवता रहावे . धर्माच्या नावाने फसवणूक, कर्मकांडी शोषण, जातीवाद सहन केला जाणार नाही . काय समाजलेत ?

27) जुनाट रोग बरा करण्यासाठी कधी कधी कडू औषधांचे डोस द्यावे लागतात. म्हणून सौम्य भाषा वापरणे हा भाबडेपणा होईल. ज्यांना समजूनच घ्यायचे नाही अशांसाठी जर ते एवढे सोपे असते तर त्यांनी आगरकारांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली नसती. आणि संतती नियमनाचा प्रसार करणाऱ्या र. धो. कर्व्यांना वेश्या गमनाला प्रोत्साहन देणारा म्हटले नसते. कृपया आगरकरलिखित 'सुधारका'चे खंड वाचावेत. तसेच र. धोंचे 'समाजस्वास्थ्य'ही, आणि जमल्यास प्रबोधनाकार ठाकरेही. म्हणजे जहालभाषा काय असते ते कळेल. त्यामानाने आमची भाषा बरीच सौम्य असते.🤛

28) प्रत्येक जण आपापल्या पिंडाप्रमाणे काम करीत असतो. काही मृदुपणे कार्य करतात त्याचा जसा फायदा होतो तसा एक घाव दोन तुकडे पध्दतीचाही फायदा होतो. एका कार्यकर्त्याने हाच उग्रपणाचा आरोप डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केला होता तेव्हा त्यांनी त्याला विचारले, "तू दाढी कोणत्या ब्लेडने करतोस?"

तो म्हणाला , "7 'O' clock  ने."

बाबासाहेबांनी विचारले, "त्याच ब्लेडने का ?"

तो म्हणाला, "त्या ब्लेडला धार चांगली असते."

तसे बाबासाहेब म्हणाले, "अस्सं, मग समोरचे झाड त्या ब्लेडने तोडून आणतो का?"

"ते कसे शक्य आहे? त्याला कुऱ्हाडच लागेल." कार्यकर्ता म्हणाला.

"मग आमचेही तसेच आहे, आम्हाला झाड तोडायचे आहे. दाढी करायची नाही. आम्हाला हातात कुऱ्हाडच घ्यावी लागेल."

29) 1) गोपाळ गणेश आगरकरांचे शासनाने प्रसिद्ध केलेले 'सुधारक निबंधांचे 3 खंड', 

2) सावरकर लिखित 'क्षकीरणे', 'विज्ञाननिष्ठ निबंध', 'जात्युच्छेदक निबंध', 

3) प्रबोधनकारांचे 'धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म', 'भिक्षुक्षाहीचे बंड', 

4) दत्तप्रसाद दाभोळकर लिखित'विवेकानंद कोण होते?', 'शोध स्वामी विवेकानंदांचा'

5) इतिहासाचार्य वि. का. राजवाडेलिखित 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास'

6) सानेगुरुजीलिखित 'भारतीय संस्कृती'

7) भगतसिंगलिखित 'मी नास्तिक का झालो?'

8) पू. ल. देशपांडेलिखित 'एक शून्य मी'

9) आ. ह. साळुंखे लिखित 'आस्तिक शिरोमणी चार्वाक', 'विद्रोही तुकाराम'

10) शरद बेडेकरांचे 'ईश्वरविराहित जीवन 6 खंड'

11) अनिल अवचट, नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव यांची अंधश्रद्धा विषयक प्रत्यक्ष अनुभवाने लिहिलेली अनेक पुस्तके

12) मंगला आठलेकरांचे 'धर्म आणि हिंसा' हे पुस्तक

13) महात्मा फुलेंचे 'समग्र वाङ्मय'

14) लोकहीतवादींची 'शतपत्रे'

ही पुस्तके जरूर वाचा म्हणजे त्यांनी हिंदुधर्मवेड्यांना किती जहाल शब्दात फटकारले आहे ते कळेल. त्यामानाने आमची टीका बरीच मवाळ असते.

आळस सोडून अभ्यास करा... आत्मपरीक्षण करा म्हणजे चिकित्सा चुकीची वाटणार नाही. तुम्ही स्वतःशीच प्रामाणिक असाल तर झालाच तर बदल तुमच्यातही होईल.

या व्यतिरिक्त ज्ञान वर्धनासाठी  1) डॉ. सुलभा ब्रम्हनाळकरांचे 'गोफ जन्मांतरीचे' 

2) पु.ग. वैद्यचे 'विज्ञानप्राणित जीवन', 'विज्ञान आणि समाज'

3) बाबासाहेब आंबेडकरांचे 'शूद्र पूर्वी कोण होते?' 'बुद्ध आणि त्याचा धम्म', इ.

4) य. ना. वालावलकरांचे 'श्रद्धा विसर्जन'

5) निळू दामलेंचे 'धर्म वादळ'

चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या विचारांना निश्चित दिशा मिळण्यासाठी किमान ही पुस्तके तरी वाचायला हवीत.


No comments: