Monday, February 10, 2020

फाळणीचे खरे गुन्हेगार

फाळणीचे खरे गुन्हेगार - जगदीश काबरे.

अखंड भारताचे तुणतुणे वाजवणाऱ्या धर्मांध हिंदुत्ववाद्यांनो, खरा इतिहास जाणून घ्या.

अनेक हिंदुत्ववाद्यांचा असा समज आहे की, गांधीजी हे भारताच्या  फाळणीला जबाबदार होते. हे त्यांना जर खरोखरच खरे वाटत असेल तर हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचे अनेकदा आभारच मानले पाहिजेत. इतकेच नव्हे तर त्यांना तेहतीस कोटी एकवा देव मानून त्यांची रोज सकाळ संध्याकाळ पूजा करायला पाहिजे. कारण भारताची फाळणी करून गांधीजींनी हिंदुत्ववाद्यांवर मोठेच उपकार केले आहेत! 
कसे ते पहा...

आज भारतात मुस्लिमांची संख्या सुमारे १४ टक्के आहे. तरीही हिंदुत्वावाद्यांना त्यांचे अस्तित्व सहन होत नाही. समजा भारताची फाळणी झाली नसती तर, भारत-पाकिस्तान-बांगलादेश हे एकत्र असते. म्हणजे 'अखंड' भारत असता तर तेथे मुस्लिमांची संख्या किमान ४० टक्के झाली असती. आज १४ टक्के लोकांचा बाऊ करणाऱ्यांची त्यावेळी काय अवस्था झाली असती याची कल्पना त्यांनीच करावी.

अखंड भारतात मुस्लिमांना सर्वच गोष्टीत किमान ४० टक्के वाटा द्यावा लागला असता. केवळ फाळणी झाल्यामुळेच भारतात हिंदूंना राजकारण, सत्ता, प्रशासन, सरकारी व खाजगी नोकर्‍या, उद्योगधंदे, मिडीया आणि इतर सगळ्याच ठिकाणी किमान ९० टक्के वाटा मिळतो आहे. त्यापैकी बहुतेक वाटा हिंदुत्ववाद्यांचे पुढारपण करणाऱ्या जातींकडे जातो. याउलट अखंड भारतात त्यांना देवळातील घंटाच मिळाली असती. शिवाय अखंड भारतात मुस्लीम धर्माचा प्रचार फार जोरात झाला असता.

अखंड भारतात दलित आणि मुस्लिमांची एकूण टक्केवारी ६० हुन जास्त झाली असती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना दलितांचे अधिकार हिरवून घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे शक्यच झाले नसते.

तेंव्हा आज हिंदुत्ववाद्यांना जे काही अधिकार मिळत आहेत ते फाळणीमुळे मिळत आहेत. हे त्यांच्या मठ्ठ मेंदूत शिरेल काय?म्हणून फाळणी जर गांधीजींनी केली असेल तर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत की नाही? पण तसे करण्याऐवजी हे नतद्रष्ट संघोटे लोक गांधीजींना सतत शिव्या घालण्याचा उद्योग करत आहेत. ही कृतघ्नता नव्हे काय?

लखनौ करार मुस्लीम लीगचे मोहम्मद अली जिना व राष्ट्रीय काँग्रेसचे लोकमान्य टिळक यांच्यात झाला. हा करार डिसेंबर १९१६ मध्ये झाला. या करारानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ व ज्या भागात अल्पसंख्य असतील तिथे संख्येपेक्षा अधिक प्रतिनिधित्व देण्यासाठी मान्यता देण्यात आली. हा करारच धर्माधारित फाळणीसाठी आधारभूत झाला असे समजले जाते. मग लोकमान्य टिळक यांनाही हिंदुत्ववादी संघटना फाळणीसाठी जबाबदार का धरत नाहीत?

खरेतर फाळणीसाठी बॅरीस्टर जीनांची मुस्लिम लीग आणि सावरकरांची हिंदुमहासभा यांनी आपल्या द्वेषी वक्तव्याने आणि तेढ माजवणाऱ्या कृत्यांनी देशाला दुंभगण्याचे रणशिंग फुंकले होते. त्याचाच  एक मोठा भाग म्हणजे जीनांनी अखंड भारतसाठी खुप जाचक अटी-शर्तीचा प्रस्ताव तयार केला होता. त्यात प्रामुख्याने...
१) अखंड भारताचा पहीला पंतप्रधान मुस्लिम असावा असे म्हटले होते. (अंखड भारतसाठी अंशत: मान्य ) 

२) शिक्षणात आणि नोकरीत मुस्लिमाँना ५०% आरक्षण पाहिजे. (अमान्य) 

३) मुस्लिमांसाठी ५०% राखीव मतदारसंघ पाहिजे. (अमान्य) 

अखंड भारतसाठी अट नं १ मान्य ही झाली असती, पण अट नं २ आणि ३ क्रमांकाच्या अटी गांधींना किंवा कॉंग्रेसला आजिबात मान्य नव्हत्या. कारण याच दोन्ही अटींमुळे भारतावर कायम मुस्लिम पंतप्रधान राहीला असता; जेणेकरून भारताला मुस्लिम देश बनविण्याचा बॅरिस्टर जीनांचा डाव सफल झाला असता. आणि इथल्या बहुसंख्य समाजावर प्रचंड अन्याय-अत्याचार झाला असता. ह्याचा दूरगामी विचार करून गांधींनी आणि कॉंग्रेसने बॅरिस्टर जीनांचा हा प्रस्ताव सपशेल धुडकावून फाळणीला मान्यता देवून भारताला धर्मनिरपेक्ष देश बनवण्याचा विडा उचलला.

दुसरी गोष्ट मुस्लिमांसहित भारताच्या सर्वच धर्मातील रहिवाशांना सोबत घेऊनच भारत बनतो हे समजून घेतले पाहिजे. फाळणीसाठी जेवढी इस्लामी कट्टरता जबाबदार आहे तेवढीच हिंदुत्ववादी कट्टरतादेखील जबाबदार आहे. पुढेही भारताच्या अखंडतेला याच दोन्ही बाजूंच्या कट्टरतेकडून धोका संभवतो.

हे वाचल्यावर मुस्लिम लीगचे जिना आणि द्विराष्ट्र कल्पनेचे जनक सावरकर हेच कट्टर खरे फाळणीचे गुन्हेगार असूनही अजूनही तुम्ही गांधीजींना फाळणीचे गुन्हेगार समजत असाल तर तुमच्यासारखे नतद्रष्ट तुम्हीच.

माजी पंतप्रधान नेहरूंबद्दल प्रश्नोत्तरे.

*माजी पंतप्रधान नेहरूंबद्दल प्रश्नोत्तरे.* या विकृत, खोट्या, मुस्लिम-द्वेष्ट्या पोस्टला *उत्तर* - उत्तम जोगदंड.

वरील विकृत व खोटी पोस्ट ही एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न करते. एक, नेहरू यांना हिंदूंनीच ‘मारून मुटकून मुसलमान’ बनवणे व दोन, नेहरूंना ते मुस्लिम आहेत, असे सिद्ध करून म्हणूनच ते तिरस्करणीय आहेत असे खोटेपणाने दाखवून मुस्लिमांविषयी मळमळ व्यक्त करणे. या विषयी सविस्तर माहिती पुढील लिंक वर (https://marathi.factcrescendo.com/were-jawaharlal-nehru-muhammad-ali-jinnah-and-mohammed-abdullah-sheikh-brothers/)
 मिळते. तरीही, थोडक्यात या पोस्टला उत्तर पुढे दिले आहे.  

१) या पोस्टच्या प्रश्न क्रमांक ११ ला प्रथम उत्तर देऊ या. या प्रश्नाच्या उत्तरात एम ओ मथाई यांच्या पुस्तकाचा उल्लेख करून त्यानुसार केलेले पोस्ट मधील तथाकथित दावे, मुबारक अली, थुसू रहमान, मोतीलाल नेहरूंच्या पाच बायका, मुस्लिम मोतीलाल, असे काहीही त्या पुस्तकात अजिबात आढळून येत नाही.  
२) मोतीलाल नेहरू यांना पाच बायका नव्हत्या. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या बाळंतपणातील (बाळासह) मृत्यू नंतर त्यांनी स्वरूप रानी थुसू यांच्याशी दुसरे लग्न केले. त्या काश्मिरी ब्राह्मण होत्या, मुस्लिम नव्हे! स्वरूप राणी व मुबारक अली यांचा कधीही विवाह झाला नव्हता. 
३) स्वरूप रानी यांच्या पोटी नेहरूंनी जन्म घेतला. त्यांना दोन बहिणीही होत्या. त्यातील विजयलक्ष्मी पंडित आपल्याला माहिती आहेत. दुसरी मुलगी कृष्णा! त्यामुळे मुबारक अली वगैरे कथा खोट्या आहेत व प्रश्न क्रमांक १ ते ८ यांच्या उत्तरांमधील माहिती खोटी आहे हे सिद्ध होते. 
४) मोतीलाल यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. ते काश्मिरी ब्राह्मण होते व बहादुर शाह जफर द्वितीय याच्या दरबारात दिल्लीचे कोतवाल होते. १८७५ च्या उठावानंतर त्यांची नोकरी गेली. 
५) फिरोज गांधी हे पारशी होते. ते मुस्लिम असल्याचा उल्लेख खोटा आहे. मथाई यांच्या त्या पुस्तकात फिरोज गांधी हे पारशी आहेत असाच उल्लेख आहे.  पारशी व मुस्लिम यांच्यात बरेचदा समान नावे आढळून येतात. म्हणून पारशी लोकांना मुस्लिम समजणे वेडगळपणाचे आहे.  
६) प्रश्न क्रमांक दहा मधील जवाहरलाल, जिना आणि अब्दुल्ला यांच्या नात्याविषयीचे (मोतीलाल यांच्या विविध पत्नींची मुले असल्याचे) दावे तर खोटेपणाचा कळस आहे. मोतीलाल यांचा जन्म १८६१ सालचा. जिना यांचा जन्म १८७६चा. म्हणजे जिना यांच्या जन्माच्या वेळी मोतीलाल १५ वर्षांचे होते. १५व्या वर्षात चौथे लग्न करून जिना यांना मोतीलाल यांनी जन्म दिला असेल यावर मूर्खातला मूर्ख मनुष्य सुद्धा विश्वास ठेवणार नाही. शेख मोहम्मद इब्राहीम व बेगम अकबर जहान अब्दुल्ला यांचे पुत्र हे शेख अब्दुल्ला आहेत. 

जवाहरलाल नेहरू व मुस्लिम धर्मीय यांच्या विषयी मनात प्रचंड तिरस्कार असणार्‍या व्यक्तीने या दोहोंचे मिश्रण करून, तद्दन खोटी माहिती पेरून वरील पोस्ट बनवलेली दिसते. या मागील बोलावविता धनी कोण आहे हे सांगायची गरज नाही. नेहरू यांचा तिरस्कार करण्यासाठी त्यांना येणकेण प्रकारेण मुसलमान बनवायचे व एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना मुसलमान तर कायम तिरस्कारणीयच आहेत, म्हणून त्यांच्या विषयी तिरस्कारासाठी अजून एक आयाम निर्माण करून द्यायचा हा उद्देश या पोस्ट मागे आहे. नियमितपणे येणार्‍या अशा खोट्या पोस्ट पाहता या पुढे अशा पोस्ट्सची अवस्था ‘लांडगा आला रे आला’ असे खोटेच ओरडणार्‍या गुराख्यासारखी झाली आहे व त्यावर कोणीही अगदी सामान्य विचारी मनुष्य यापुढे विश्वास ठेवणार नाही. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*हेडगेवार, गोळवलकर, सावरकर कोण होते? त्यांचे भक्तगणंग काँग्रेस व नेहरू परिवारावर का जळतात? नेहरू परिवाराविषयी खोटेनाटे पसरवणाऱ्यांना त्यांच्याच विडंबनात्मक भाषेत दिलेले हे उत्तर...*
- by Ajay Makhtedar

प्रश्न १. *थुसू रहमान बाई नावाची बाई कोण आहे?*
 उत्तरः केशव हेगडेवार यांच्या आई.

 प्रश्न २. *केशव हेगडेवार यांचे वडील कोण आहेत?*
 उत्तरः श्री. मुबारक अली.

 प्रश्न ३. *बळीराम हेडगेवार आणि केशव हेडगेवार यांच्यात काय संबंध आहे?*
उत्तरः बळीराम हेडगेवार हे मुबारक अली यांच्या निधनानंतर थुसू रहमान बाई यांचे दुसरे पती आहेत. बळीराम, मुबारक अली यांचे आचारी म्हणून काम करत होते आणि त्यांच्यासाठी ती दुसरी पत्नी आहे. तर बळीराम हेडगेवार हे केशव यांचे सावत्र पिता आहेत.

प्रश्र्न ४. *बळीराम हेडगेवार यांना एकूण किती बायका होत्या?*
उत्तर : त्यांना एकूण ५ बायका होत्या 
१. रेवती (यांच्या पासून बळीराम यांना काशीबाई आणि मालती या दोन मुली झाल्या
२. *थुसू रहमान बाई* (हिचा पहिला नवरा मुबारक अली यापासून *केशव*)
३ मंजिरी (हिच्या पासून *विनायक* हा मुलगा)
४ हरणाबाई (हिच्या पासून *माधव* हा मुलगा)
५. मुस्लिम नोकर (हिच्या पासून *महम्मद* हा मुलगा)
अशी एकूण ४ मुले आणि २ मुली  ही अपत्ये बळीराम हेडगेवार यांना होती...

 प्रश्न ५. *केशव हेडगेवार हे  देशस्थ ब्राम्हण जन्मापासूनच आहेत?*
 उत्तरः नाही, आई वडील दोघेही मुसलमान आहेत.

 प्रश्न ६. *केशव हेडगेवार यांचे नाव त्यांच्या सावत्र वडिलांमुळे पडले का?*
उत्तर: हो. पण स्वत: बळीराम हे पण देशस्थ ब्राम्हण नाहीत.

 प्रश्न ७.  *बळीराम हेडगेवारचे वडील कोण आहेत आणि हेडगेवार हे आडनाव त्यांच्या नावाशी कसे जुळले?*
 उत्तर: बळीराम यांचे वडील हैद्राबाद (सिकंदराबाद) येथील जमील मोहम्मद अली आहेत. ते  १८५७ च्या बंडखोरीनंतर हैद्राबाद इथून पळून यवतमाळला गेले.
तेथे त्यांनी आपले नाव बदलून गंगाधर हेडगेवार असे ठेवले आणि लोकांना त्याची जात विचारण्याची संधी न देण्यासाठी गळ्यात जानवे घालून ब्राम्हण असे सांगायला सुरूवात केली. डोक्यावर टोपी घेऊन गंगाधर हेडगेवार नागपूरला गेले.
तिथे त्यांचा मुलगा बळीराम यांनी आचाऱ्याचे काम करण्यास सुरवात केली. हेच काम पुढे केशवने केले. काँग्रेसच्या सभा, अधिवेशनात जेवण पुरवण्याचे काम केशव हेडगेवार करायचा.

 प्रश्न ८: *केशव हेडगेवारची मुलं कोण आहेत?*
 उत्तरः कुठलीही माहिती उपलब्ध नाही, *अनैतिक संबंधातून फडणवीस* नावाच्या बाईला दोन मुलं झाली होती.

 प्रश्न ९. *मंजिरीचा मुलगा विनायक कोण आहेत?*
उत्तरः महान साहित्यिक आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...* यांना दामोदर सावरकर यांनी दत्तक घेतले. व आपले नाव दिले.

 प्रश्न १०. *केशव हेडगेवार (RSS संस्थापक), मुहम्मद अली जिन्ना (पाकिस्तानचे माजी पंतप्रधान), विनायक सावरकर आणि माधव गोळवलकर (RSS सरसंघचालक) यांचे एकमेकांशी काय नाते आहे?*
उत्तर: वर उल्लेखलेल्या चौघांच्या मातांचे पती बळीराम हेडगेवार होते.
माधव गोळवलकर यांची आई बळीरामची चौथी पत्नी आहे.
जिनांची आई बळीरामची पाचवी पत्नी आहे. बळीराम हे केशव हेडगेवार यांचे सावत्र वडील आहेत.

 प्रश्न ११. *अभ्यासाच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अशी कोणतीही माहिती मिळत नसताना ही सर्व उत्तरे कोठे मिळाली?*
 
उत्तरः बाळकृष्ण सीताराम मुंजे, गोळवलकर, हेडगेवार, रज्जूभैय्या यांच्या चरित्रातून
 👉 बाळकृष्ण सीताराम मुंजे

 *आता तरी लक्षात आले का की मुहम्मद अली जीना, सावरकर, गोळवलकर आणि हेडगेवार परीवाराचा काय संबंध आहे?* 
का विनायक सावरकरने जिनांच्या मुस्लिम लिगसोबत युती करून चार राज्यात संयुक्त सरकार स्थापन केली होती?
का या लोकांनी आजवर मुस्लिम लीगचा विरोध केला नाही?
का संघी लोक जाऊन जिनांच्या कबरीवर डोकं ठेवतात?
का यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला?
का हे हिंदूंना भडकावून सतत दंगली घडवून आणतात?
का यांना हिंदूंचे सुख बघवत नाही?
*आपल्या अनैतिक जन्माचा ते सूड उगवत आहेत.*

ही सर्व माहिती मला एका आतल्या गोटातील संघीने पाठवून दिली आहे...
मित्रांनो, सत्य लोकांना कळू द्या...

Thursday, February 6, 2020

देऊळ आणि त्यातील मूर्तीसंबंधीचे छद्मविज्ञान



देऊळ आणि त्यातील मूर्तीसंबंधीचे छद्मविज्ञान जाणून घेऊया... जगदीश काबरे.

1) मूर्तीची प्रतिष्ठापना करताना मूर्तीखाली ठेवलेल्या तांब्याचा तुकडा जास्तीत जास्त शुभ(!) चुंबकीय ऊर्जा स्वतःत सामावून नंतर तो भवताल रेडीएट करतो म्हणे!!! सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे की नेहमीचे तांबे हा किरणोत्सारी धातू नाही, तेव्हा रेडीएशनचा प्रश्न इथेच निकालात निघतो. दुसरं ऊर्जा ही नुसती उर्जाच असते, शुभ-अशुभ ऊर्जा हा प्रकार फक्त धर्मअंधासाठीच असू शकतो. त्यामुळे चुंबकीय वैश्विक ऊर्जा असा भारदस्त शब्द वापरून लोकांना दिपवून त्यांचा मेंदू बधीर करणे हाच धर्मअंधाचा उद्देश आहे, हे स्वच्छ आहे.अशी कुठेलीही ऊर्जा तांबे शोषून घेऊ शकत नाही.धातू विद्युत वाहक आहेत याचा अर्थ ऊर्जा शोषणे असा लावणाऱ्याच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच आहे.

2) चर्च मध्ये शेकडो स्त्रीपुरुष बुटचप्पल घालूनच त्यांच्या देवाची एकाग्रतेने आणि एकासुरात प्रार्थना करतात. बुटचपला पायात असूनही त्यांची चर्चेस आपल्या देवळांपेक्षा शेकडो पटीने स्वच्छ असतात. याचे कधी आपण आत्मपरीक्षण करणार आहोत काय ? खरं तर शुभ आणि पवित्र व्हायब्रेशन अस्तित्वाच नाही. हा आंधळ्या मनाचा खेळ आहे. जर ते वैज्ञानिक सत्य असेल तर ते कुठल्या वैज्ञानिक संशोधन प्रबंधात लिहून सिद्ध केले आहे, त्याचा संदर्भ आजतागायत कुणीच का दिला नाही ? नुसते वैज्ञानिक शब्द वापरले म्हणजे ते विज्ञान होत नाही, आणि ज्यांना ते विज्ञान वाटते त्यांचा I Q तपासायची वेळ आली आहे हे निश्चित.

3) देवळातील घंटा वाजवल्यामुळे सप्तचक्र उद्दीपित होतात आणि नादाची व्हायब्रेशन्स आपल्यात शोषली जातात. ह्यावरही कुठेही शास्त्रशुद्ध माहिती उपलब्ध नाही. घंटेला नाद असतो हे जरी मान्य असले तरी तेवढाच प्रभाव melodious संगीताचाही पडतोच की. आणि ती अनुभूती घरातही घेता येते, त्यासाठी देवळात जायची गरज काय ? त्या अस्तित्वात नसलेल्या व्हायब्रेशन्स काय फक्त देवळात असतात असे म्हणणाऱ्याला लहरीच्या विज्ञानाची प्राथमिकही माहिती नाही असे म्हणावे लागेल.

4) कापूर, फुले, तीर्थ,घंटानाद आणि मंत्रोच्चारण या पाच गोष्टींचा संबंध पंचेंद्रियांशी जोडणे हा एक चांगला कल्पनाविलास आहे.त्या पलीकडे त्याची किंमत शून्य आहे. हा सगळा आंधळ्या मनाचा खेळ आहे. जर तांब्याच्या/चांदीच्या भांड्यातील पाण्याने कफ व तापासारखे आजार बरे होत असतील तर अशी भलामण करणाऱ्याने डॉक्टरकडे न जाता स्वतः वर हा प्रयोग करून पहावा. आणि त्याचे documentation तयार करून प्रसिद्ध करावे.नुसत्याच उंटावरून शेळ्या हाकू नयेत.

5) प्रदक्षिणेमुळे मूर्तीच्या मागील बाजूस पसरलेली ऊर्जा मिळते. आणि ती settle व्हावी म्हणून क्षणभर टेकायचे. पहिली गोष्ट ऊर्जा ही कधीही स्थिर नसते, मग ती settle व्हायचा प्रश्नच नाही. दुसरी गोष्ट क्षणभर टेकण्याची, तर तिचा उर्जेशी काही संबंध नाही तर तो आहे विश्रांतीशी,आणि विश्रांती कुठेही चांगलीच. 

एवंच यातील एकाही मुद्यात कुठेही विज्ञान नाही... म्हणजे धर्मअंधाने लावलाय तो बादरायण संबंध... लोकांना वैज्ञानिक शब्द वापरून उल्लू बनवण्यासाठी! कारण यातील एकाही मुद्याला वैज्ञानिक सिद्धता नाही. हा सगळा अस्मितेचा आणि "पहा, आमचा धर्म कसा वैज्ञानिक आहे", हे दाखवणाऱ्या अभनिवेशाचा अट्टाहास आहे. जर धर्म एवढा वैज्ञानिक आहे तर, आजतागायत एकही शोध का लावला नाही धर्मअंधांनी ? व्हाट्सअँप, फेसबुकचा सढळ वापर करणारे हे धर्मान्ध पाश्चात्यांना शिव्या देत त्यांनीच लावलेले हे शोध वापरून अंधश्रद्धा मात्र पसरवत असतात. ह्यालाच विज्ञानाचा दुरुपयोग करणे म्हणतात. 

तेव्हा नव शिक्षित तरुणांनो, यांची ही चाल शेकडो वर्षे यशस्वी झाली तरी आता मात्र त्याच्या या फसवणुकीला बळी पडायचे नाही. अशाप्रकारची माहिती देणाऱ्याला संदर्भ विचारायचे... प्रतिप्रश्न करायचे... उत्तरासाठी पाठपुरावा करायचा . योग्य उत्तर मिळेपर्यंत सोडायचे नाही. त्या निमित्ताने जर ते अभ्यासाला लागले तर सत्य कळल्यावर आपोआपच त्यांचा धर्मअंधळेपणा कमी होईल, आणि तेही आपल्याबरोबर विवेकशील होतील... वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारतील. तेव्हा त्यांना तुच्छ लेखू नका, उलट त्यांच्याशी प्रश्नोपनिषधाने संवाद साधा.

Saturday, February 1, 2020

हिम्मत असेल तर त्यांना सांगा...

हिंदुधर्माबद्दल काही लिहिलं की, बऱ्याचवेळा धर्मांधांची एक कमेंट हजेरी लावून जातेच... ती म्हणजे, "हिंम्मत असेल तर इतर धर्माबद्दल लिहून दाखवा ना!" त्याबद्दल सयुक्तिक उत्तर ... (^m^) (^j^) (मनोगते)

अनेक कडव्या धर्माभिमानी लोकांचा प्रश्न असतो. आम्ही धार्मिक गोष्टी करायला लागलो की, तुम्हाला पुरोगामित्वाचा उमाळा येत असतो. मुस्लिम धर्मात स्त्रिया बुरख्यात असणे, त्यांना मशिदीत माजारपर्यंत जायला मज्जाव असणे, तीन तलाकची पद्धत, खतना करणे या सगळ्यांबद्दल अनेक पुरोगाम्यांनी अनेक वेळेला चिकित्सा आणि टीकाही केल्या आहेत. पण तुम्ही त्या वाचत नाही हा तुमचाच रंगांधळेपणा आहे. 

मुसलमान लोकांच्या अजानबद्दल कधी बोलाल की नाही असे आव्हानात्मक बोलून मुसलमान स्पीकर लावून अजान लावतात म्हणून ढणढणाटी उत्सव आणि फटाके यांच्या निमित्ताने मी माझी प्रकृती धोक्यात घालावी असा होत नाही. आमच्या मते तेही चुकीचेच आहे, पण प्रश्न करणाऱ्यांना एकच सवाल विचारावासा वाटतो, *"मुसलमान एक गोष्ट करतात म्हणून तुम्हीही करणार काय? मुसलमान इतका अनुकरणीय  कधीपासून झाला तुम्हाला ?"*  लोकांच्या चुका दाखवून आपल्या चुकांचे समर्थन करणे यालाच दुटप्पीपणा म्हणतात.'त्यांनी शेण खाल्ले म्हणून आम्हीही शेण खातो', असे म्हणण्यासारखे झाले हे!

मग इतर धर्मियांनी कसंही वर्तन केलं तरी मान्य करावं का? अजिबात नाही! एक पुरोगामी म्हणून इस्लाम, बौद्ध, जैन, ख्रिश्चनांतील आणि इतर धर्मातील असंख्य अनिष्ठ रुढींना आमचा ठाम विरोध आहेच. कुरुंदकर, हमीद दलवाई, अनिल अवचट, डॉ. श्रीराम लागू, श्याम मानव तसेच नरेंद्र दाभोलकर यासारख्या अनेक समाजवादी पुरोगाम्यांनी तो अनेकदा मांडलेलाच आहे. अंनिसने अनेक आंदोलने ही मुस्लिम बाबाबुवांच्या विरोधात केलेली आहेत. त्याच प्रमाणे जावेद अख्तर अनेकदा जाहीररीत्या आपण नास्तिक आहोत आणि इस्लाम वाईट आहे, हे मांडत असतात. म्हणून काही ढोंगी लोकांमुळे तुम्ही पुरोगामित्व बदनाम करू शकत नाही, की हिंदू धर्माच्या उन्नतीचा प्रयत्न थांबवू शकत नाही.

तेव्हा "आम्हाला काय सांगता, इतर धर्मियांना सांगा ना!" असा टाहो फोडणाऱ्यानी आणि फॉरवर्ड करणाऱ्यानी एकदा स्वतःच्या निष्ठा आणि हेतू तपासले पाहिजेत. हिंदूंचा विकास व्हावा, हिंदूधर्मीयांची प्रगती व्हावी असं ज्यांना वाटत नाही, त्यांनी खुशाल असल्या अस्मिता जोपासण्यात धन्यता मानावी. त्यांनी दगड मारून ना हिंदू स्त्रिया शिकायच्या थांबल्या की हिंदू विधवांचे पुनर्विवाह अडले नाहीत. तेव्हा उत्कर्षासाठी पुरोगामित्व हे अटळ आहे! शेवटी 'परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे.' हे आमची गीता सांगतेच. नाही का?

म्हणून दुसऱ्या धर्मातील व्यक्तीने बदलावं मग आम्ही बदलू, यासारखा दुसरा अविवेकी आग्रह नाही. असं जेव्हा एखाद्या व्यक्ती वा समूहाच्या बाबतीत आपल्याला वाटतं, तेव्हा स्वतःच्या मनाशी थोडासा गृहपाठ करून बघावा. त्या व्यक्ती वा समूहाच्या नेमक्या कुठल्या वागण्यात बदल घडावा असं आपल्याला वाटतंय त्याची एक यादी करावी. ती यादी तपासून बघावी. हे लक्षात येईल की इतके सगळे बदल त्या व्यक्ती वा समूहाने 'आपल्याला' बरं वाटावं म्हणून करायचे आहेत! मुळात ती व्यक्ती अशी का आहे, त्याचा आपल्याशी अर्थाअर्थी संबंध नसतो. त्या व्यक्तीचं पूर्वसंचित (आनुवंशिकता, जडणघडण, स्वभाव वगैरे) त्याला जबाबदार असतं. त्या व्यक्तीला दोष देणं, तिने आपल्या अट्टाहासाप्रमाणे बदलावं अशी स्वतःची अवास्तव अपेक्षा तिच्यावर लादत राहणं हे खूप सोपं आहे. त्या अपेक्षा शेवटी आपल्या आहेत, त्या कुठून येताहेत त्यांचा शोध त्यांच्या मुळाशी जाऊन आपणच घेऊ शकतो हे कळणं महत्त्वाचं. अर्थात ही प्रक्रिया कठीण असली तरी ती आपल्या हिताची असते. म्हणूनच तुकोबारायांनी म्हणून ठेवलं आहे,'तुका म्हणे होय मनाशी संवाद, आपुलाचि वाद आपणांसी!' 

मी वाढलो हिंदू धर्मात. लहानपणापासून टिव्ही, पुस्तकं या सगळ्यात हिंदु धर्माबद्दल, त्यातल्या गोष्टींबद्दल कळत गेल्या. एखाद्याचं व्यंगचित्र बनवायचं असेल तर मुळात ती व्यक्ती आधी आपण पाहिलेली असावी लागते. तसंच हिंदु धर्म आजुबाजूला असल्यामुळे त्यातल्या त्रुटी, चुकीच्या गोष्टी (ज्या मला वाटतात) त्या प्रश्न पडल्यामुळे कळत गेल्या. एवढ्या बारकाव्याने आम्हाला दुसऱ्या धर्माबद्दल जराही माहिती नाही. त्यांच्या गोष्टीबद्दल वा कसल्याही धार्मिक सवयींबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. 'नमाज', 'त्यांनी चार बायका करणं' आणि 'चर्चमधलं कॅन्डल लावणं' येवढीच आम्हाला माहिती असते. 

शिवाय भारतात सुमारे 80% हिंदूच आहेत. आपल्या लोकांचा विकास व्हावा असं जर आपल्याला वाटलं तर ते स्वाभाविकच नाही का? जगाचा इतिहास आपल्याला हेच सांगतो की, रूढी-परंपरांच्या... धर्मान्धतेच्या मागे लागून मध्ययुगातील स्पेनपासून ते आजच्या अफगाणिस्तानपर्यंत सर्वानी स्वतःचे अतोनात नुकसानच केलेलं आहे! ते टाळण्यासाठी समाजातील माणसांना विचारी करणे आवश्यक ठरते. म्हणून समाजसुधारणेसाठी जीवाचे रान करणारे पुरोगामी हेच खरे हिंदुधर्म सुधारक आहेत, आणि परंपरावादी मात्र हिंदुद्वेष्टेच! हाच निष्कर्ष भक्तांच्या कर्मकांडीपणावरून निघतो! कारण ते रूढी, परंपरा, कर्मकांड, पूजाअर्चा यालाच धर्म समजून चालले आहेत.

या कुपमंडुक वृत्तीमुळे ते पुरोगाम्यांना तुच्छ लेखून म्हणतात, 'आमच्या धर्माचा अपमान केलाय ना, मग आता दुसऱ्या धर्माचाही अपमान करा'. असे आव्हान देत असतात. ही कुठली वृत्ती आहे? मला लागलंय तर दुसऱ्यालाही लागायला हवं? यातून तुमच्या 'पवित्र' भावना जागृत होतात काय? हिंदू धर्मात असं सांगितलंय का? आणि अंधभक्त तरी धर्म व्यवस्थित पाळतात काय? खरंतर धर्म पाळणारे बव्हंशी दांभिकच असतात. पण आपण दांभिक आहोत, हे न कळण्याइतपत तरी माणसाने मुर्ख नसावं!

कल्पना करा, आपल्याला आजार झालेला आहे. तर आपण त्यावर कडू औषधं घेतो. गरज पडली तर शरीराची चिरफाड करून व्याधीवर उपाय करतो. 'तो शेजारी बघा, मधुमेह असून कित्ती साखर खातो, बिनधास्त! आणि मी काय म्हणून पथ्य पाळू?'  हा युक्तिवाद आपण सुरू केला तर नुकसान आपलंच होतं. नाही का? तसंच माझ्या धर्मात काही दोष असतील तर त्यावर बोलून, टीका आणि चिकित्सा करून आपल्या धर्माची उन्नती होईल का शेजारच्या दोषांकडे बोटं दाखवून? पण या चिकित्सेला उत्तरे देता येत नाहीत म्हणून 'तुम्ही आमच्या श्रद्धास्थानांवर हल्ला करणारे हिंदुद्वेषी आहात' असे म्हणून आपण आपल्यालाच मागास ठेवण्यात काय हशिल आहे?

हां, आता रुढीच्या नावाखाली स्त्रियांना सापत्न वागुणक देणं अगर सणाच्या नावाखाली पर्यावरणाला हानीकारक वर्तन ठेवणं किंवा मग बाबाबुवांच्या नादी लागून पैसे उधळणं हा आपल्याला दोष वाटतच नसेल तर गोष्ट वेगळी. समोर खड्डा आहे हे दाखवण्याचे काम सजग विचारी माणसे करत असतात. त्या खड्ड्याला टाळायचे की, त्यात पडायचे हे सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून असते.  

म्हणून आमचा राग कुठल्याही एका धर्मावर नाही, तर त्या त्या धर्मातील दांभिकतेवर आणि शोषणावर आम्ही प्रहार करून धार्मिक सुधारणा घडवून आणू इच्छितो. काय समजलेत?