Tuesday, January 5, 2021

माधुरीचे पौष्टिक पदार्थ

1) दररोज पोळी भाजी खाऊन कंटाळा येतो. पण उदर भरण्यासाठी जेवण करणे तर आवश्यक असतेच. त्याशिवाय काम करायला ऊर्जा कशी मिळणार? 

ज्यांना स्वयंपाक ही एक कला वाटते त्यांना दररोजच्या जेवणात वेगवेगळे प्रयोग करावेसे वाटतात. माझी सहचारिणी खाद्य पदार्थांचे याच पद्धतीने दररोज वेगवेगळे प्रयोग करत असते. त्यातील आजचा हा चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ...
.

*ब्राउन राईस, मिक्स डाळी आणि शेवग्याची पाने यापासून तयार झाले आहे हे #अडाई.* जेवणाची लज्जत वाढवायला सोबत आहे गुळ, सलाड आणि हिरवी चटणी. © माधुरी काबरे.




2) बाजरीच्या भाकरीत लसूणाची पात कापून एकजीव केल्यावर लसूणाचे केलेले हे लाडू! दिसायला जेवढे मनमोहक आहेत तेवढेच खायलाही उत्कृष्ट आणि पौष्टिकही!! 
           
© Zainab & Madhuri



बाजरीची भाकरी तव्यावर फुगली की गॅस बारीक करायचा. मग वरचा पापुद्रा हलकेच सोडवून आत मध्ये बारीक चिरलेली लसूण पात आणि एक चमचा भरून साजूक तूप भरायचे. त्यावर पुन्हा पापुद्रा दडपून झाकण ठेवायचे. मंद गॅसवर फक्त दोन मिनिटे शिजू द्यायचे. मग भाकरी ताटात घेऊन गरम असतांनाच कुस्करायची; आणि त्याचे लाडू वळायचे. त्याच्या बरोबर दही आणि गूळ द्यायचे. थंडीच्या दिवसात शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी कच्छमध्ये खेडेगावात हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो.


No comments: